आपल्याला सगळं कसं,साधं सोपं पाहिजे …
राज्य करणारे करतात निषेध…
पण सैनिक मात्र ,जीवानिशी जतो …
शहीद होणं , हुतात्मा होणं म्हणजे नेमक काय ?
शेवटी मृत्यूच तो ….
नाही का ?
मग आपण सजवतो त्यांची प्रेतं …
गुंडाळतो आपल्या तिरंग्यात ….
आणि जमलंच, तर थोडा संताप व्यक्त करत
जोडतो आपले हात …
आदरा खातर …
मरताना खरंच ,त्याला वेदना झाल्या असतील का हो?
आपला गाव,आई-बाप ,मित्राची हाक,बायकोचं हसू छकुलीचं रुसू …
यातलं काही आठवलं असेल ?
खरं खरं सांगा …
कि सांगून टाकू , हसत हसत शहीद झाला तो … ?
ऐका माझं ,आपण असंच करु.…
तिरंग्यात गुंडाळून आणु ….
प्रेताला पार्थिव वगेरे म्हणू …
आणि त्याला सरणावर जाळताना 'अमर रहे'च्या घोषणा दिल्या
कि सगळंच सोप्पं होईल …
तो आपल्यासाठी मेलाय हे विसरण्यासाठी …
.
.
आपल्याला सगळं कसं, साधं सोपं पाहिजे …
मग आपण सजवतो शब्दांची प्रेतं
प्रतिसाद आवडला