गविकाकाचा सल्ला.
पेप्रात बरीच सदरं येतात. त्यातली काही "विचारा तुमच्या शंका" किंवा "इथे मिळतील सल्ले" स्टाइल असतात.
त्यातील काही टिपिकल प्रश्न गविकाकांना विचारावेत म्हटलं. त्यांचाही झटकन प्रतिसाद आला.
तुम्हालाही काही प्रश्न व शंका असल्यास गविकाकांना सल्ला विचारु शकाल.
एक टेम्प्लेट केस येथे देत आहे.
प्रश्न:
काका, मी इयत्ता दहावीत आहे. आमच्या शेजारी एक ताई राहते. तिच्याविषयी माझ्या भावना वेगळ्या आहेत.
मला ती खूप आवडते. ती जाता येता माझ्याशी बोलते. नुकतीच ऑफिसला जाताना एकदा ती मला "बाsय" असं म्हणाली. यामुळे तिच्याही मनात फीलिंग्ज आहेत हे मला समजलं.
तेव्हापासून माझं तिच्याकडेच लक्ष लागलेलं असतं. तीही जाता येता माझ्याशी बोलते. मी तसं अजून तिच्यापाशी बोललो नाहिये. पण मी सुरुवात कशी करु याविषयी कृपया सल्ला देणे. माझे अभ्यासाचेही नुकसान होत आहे.
एक विद्यार्थी.
.
.
गविकाकांचे उत्तरः
श्री. रा.रा. विद्यार्थी, नमस्कार.
गहन आहे प्रश्न.. पण करतो प्रयत्न.
तुम्ही दहावीत आहात. एका शैक्षणिक वर्षास एक मानवी वर्ष या प्रमाणात तुमचे आजपावेतोचे शिक्षण झाले आहे असे मी गृहीत धरतो. म्हणजेच आपण अंदाजे १४ वर्षाचे आहात.
तुम्ही उल्लेख केलेली "ती" ऑफिसात जाताना तुम्हाला निरोप घेण्यासदृश हावभाव आणि अविर्भाव करते. बालकामगार गुन्ह्याचे या बाबतीत उल्लंघन झालेले नसून "ती" नोकरी करण्याच्या कायदेशीर वयाची आहे असंही मी गृहीत धरतो. शिवाय ती ऑफिसात कामावर जाते, (बांधकामावर नव्हे) असं उल्लेखावरुन दिसत असल्याने तर्कदृष्ट्या ती किमान डिग्रीपर्यंत शिकली असावी. तस्मात तिचे वय वीस वर्षांच्या वर आहे असेही मी गृहीत धरतो.
याचाच अर्थ ती तुमच्यापेक्षा किमान सहा वर्षांनी मोठी आहे. तसे असण्यास काही हरकत नाही. तसे असल्यास ती आवडण्यासही काही हरकत नाही. पण जग हरकतींपेक्षा शक्यतांवर चालत असते हा एक मोठा दु:खद नियम आहे. त्यामुळे कु. (हेही एक गृहीतक मांडायचे अंमळ विसरलो) "ती" हिज आपण आवडत असलात तरी लैंगिक पुनरुत्पादनाच्या उद्देशाने (ज्याला अंकुरावस्थेत प्रेम असेही म्हणतात), आवडत असाल अशी शक्यता बिंदुवत वाटते. त्यामुळे तुमच्या भावनांशी पूर्णपणे सहानुभूति ठेवूनही तुम्ही उल्लेखलेली "ती" तुमची "ही" होण्याची शक्यता नगण्य असल्याने आपण खुद्द हपीसात जाण्याच्या वयापर्यंत कळ काढून त्या वेळी तत्कालीन दहावीतल्या "तीं"ना "हाय" करावेत असे सुचवून पाहतो.
तोसवर आपल्या भावनांचे दमन करण्याची गरज नाही. नैसर्गिक गोष्टींना अनैसर्गिक समजू नका इतकेच सांगतो. बाकी दहावीत असल्याने तुम्हांस अधिक स्पष्टीकरण नकोच अशी आशा.
आपला का?का?.
गवि.
.
.
.
ता.क.:
वाचकांनीही आपल्या आयुष्याशी संबंधित प्रश्न विचारावेत. दर आठवड्याला किंवा गविकाकांचे जेवण उत्तम झाले असल्यास केव्हाही निवडक प्रश्नांची उत्तरे देण्यात येतील.
द.ही.:
फाजील प्रश्नांना प्रश्नकर्त्याचे दुर्दैव समजले जाईल.
--मनोबा व गविकाका
वर्गीकरण
प्रतिक्रिया
ते तुम्ही डायरी कुठे लिहिताय
=))
गवी काका नवरा रोज अंघोळ करुन
=))
(No subject)
>>गवी काका नवरा रोज अंघोळ
नशीब माझं .. कोणाचा टोवेल ?
छे छे, अभि हम आपको ओळखने
@नशीब माझं .. कोणाचा टोवेल ?
रोज आंघोळीला बंदी घालावी.
बेड बदला
दूसरा नवरा घरात आणावा
हा सल्ला फार्फार आवडला
मनापासून सांगतो मुद्दाम गहन विचार करणारे
ओह्ह ख्म्मॉन बर्फु काका ...
'आहे त्याच नवर्याची सवय
"मला डाव्या हाताने उजवा कान
खाजवा
आणि कान सुद्धा!!
अरे हे काय? थांबले का सगळे ?
गविकाका,
@गांडूळशेती कशी करावी?>>>.
२. मन (आयडी) कुठे गेलाय?
प्रश्न पडणं हे जिवंत असल्याचं
तुफान धागा
गविकाका
इतके दिवस कळ काढली अजून थोडी काढा....
फक्त तेवढ्याकाळात तुम्ही खपू
लै भारी धागा
अध्यात्मिक प्रगतीसाठी मिपावरच
आभार
माझा प्रश्न
सौम्य णिषेद
निषेधाचा निशेढ
मौजमजा ?
मौजमजा???लोक इथे शिरियशली काहीतरी विचारत आहेत , गविंसारखे मातब्बर त्यांचे शंका समाधान करत आहेत आणि समं ला इथे मौजमजा सुचते आहे ?????? लोक हो, आम्हाला "भाकर मिळत नसेल तर शिरापुरी खा "सुप्रसिद्ध झरिना वाक्याची आटव्ण झाली आणि ड्वोळे पाणावले !! . . . . . . . मा. केजरीवाल - या अन्यायाकडे लक्ष देतील काय ? ( हल्ली त्यांनी सर्व " अन्यायाचे " घाऊक कंत्राट घेतले आहे..म्हनून त्याना विचारत आहे !)असे करु नका. कुणीतरी यायचं
सुप्रसिद्ध झरिना वाक्याची
अर्र्र्र्र्र्र
???
गवि काका गवि काका , डुआयडी
हम्म.
जन्मना वर्जिनल आयडी, डुआयडी
गविकाका
@ प्रसाद गोडबोले ,