✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

नविनच

म — मिसळलेला काव्यप्रेमी, Tue, 01/07/2014 - 12:39
पावसात भिजूनही मी कोरडाच राहणे हे जरा नविनच होते चिंब होऊनही मी धुंद न होणे हे जरा नविनच होते . हा कुठला नवा खेळ? . दाटून येता 'तो' जीव असा हुरहुरतो 'तो' येताच दारचा निशिगंध बहरतो ढग फुटून 'तो' असा काही बरसतो त्या गंधाने मी आकंठ मोहरतो . नेहमी हा पाऊस येतो आणि मी शुद्ध हरवतो सचैल भिजून भान हरपतो कोसळणाऱ्या मेघधारांनी माझे सूर भिजतात हृदयात मेघमल्हाराची गाज उमटू लागते मनात वसंत रुंजी घालाया लागतो मग आजच असे का व्हावे? . हा वर्षाव कोरडा का वाटावा कां आज मी ओथंबत नाही नेहमीसारखा . . हम्म... आज ह्या पावसाची दिशाच चुकली होती तो तुझ्या घराला टाळून आला होता हे जरा नविनच होते.... नविनच... |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (एक जुनी रचना)

प्रतिक्रिया द्या
5202 वाचन

💬 प्रतिसाद (19)

नेहमीप्रमाणेच झकास रे मिका.

प्रचेतस
Tue, 01/07/2014 - 12:49 नवीन
नेहमीप्रमाणेच झकास रे मिका.
  • Log in or register to post comments

(No subject)

अत्रुप्त आत्मा
Tue, 01/07/2014 - 13:07 नवीन
:)
  • Log in or register to post comments

आवडली

michmadhura
Tue, 01/07/2014 - 13:10 नवीन
छान कविता.
  • Log in or register to post comments

झकासच

चाणक्य
Tue, 01/07/2014 - 13:16 नवीन
नेहमीप्रमाणेच छान रचना
  • Log in or register to post comments

सुंदर कविता

अमेय६३७७
Tue, 01/07/2014 - 13:20 नवीन
छानच
  • Log in or register to post comments

मस्तच!

प्यारे१
Tue, 01/07/2014 - 13:43 नवीन
मस्तच!
  • Log in or register to post comments

वाचने १५३

नाखु
Tue, 01/07/2014 - 14:22 नवीन
प्रतीसाद ६ च हे नविनच... कवीता मात्र "दिल खुश" आहे
  • Log in or register to post comments

मिका.. रचना जुनी आहे हे कळतंय

गवि
Tue, 01/07/2014 - 14:23 नवीन
मिका.. रचना जुनी आहे हे कळतंय.. !! ठीकठाक.
  • Log in or register to post comments

छान आहे रचना... आवडली.

इन्दुसुता
Wed, 01/08/2014 - 07:44 नवीन
छान आहे रचना... आवडली.
  • Log in or register to post comments

उदाहरणार्थ नविनच वगैरे

चित्रगुप्त
Wed, 01/08/2014 - 08:08 नवीन
हे एक आणखी उदाहरणार्थ नविनच वगैरे. आवडले.
  • Log in or register to post comments

मिका, सुरेख!

संजय क्षीरसागर
Wed, 01/08/2014 - 10:40 नवीन
काही गोष्टी जुन्या होतच नाहीत. स्मृतीतून जगाकडे पाहायची सवय सोडली तर सगळं नवं असतं. तसा हा पाऊस. जगजीतची एक गज़ल आहे : दुनिया जिसे कहेते है जादूका खिलौना है, मिल जाए तो मिट्टी है, ...खो जाए तो सोना तुझ्या कवितेच्या आशयाशी संगती सांगणार्‍या, गज़लेतल्या या ओळी आठवल्या: बरसातका बादल तो दिवाना है क्या जाने किस छत को भिगोना है,... किस राहसे बचना है दुनिया जिसे कहेते है जादूका खिलौना है।
  • Log in or register to post comments

क्या बात

चाणक्य
Wed, 01/08/2014 - 11:18 नवीन
प्रतिसाद आवडला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

मिका

तिमा
Wed, 01/08/2014 - 11:39 नवीन
कवितेचा आशय आवडला. पण नेहमीचे 'फिनिशिंग' वाटले नाही. थोडीशी विस्कळीत वाटली.
  • Log in or register to post comments

+१

आतिवास
Wed, 01/08/2014 - 11:59 नवीन
हेच लिहायला आले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

यग्जाक्टली!!

बॅटमॅन
Wed, 01/08/2014 - 16:59 नवीन
यग्जाक्टली!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

सुंदर.

सस्नेह
गुरुवार, 01/09/2014 - 13:31 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

(No subject)

कवितानागेश
गुरुवार, 01/09/2014 - 16:08 नवीन
:)
  • Log in or register to post comments

आवडली!

पैसा
Wed, 01/15/2014 - 10:54 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments

मस्त !!

फिझा
Tue, 01/21/2014 - 04:05 नवीन
मस्त !!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा