पावसात भिजूनही मी कोरडाच राहणे
हे जरा नविनच होते
चिंब होऊनही मी धुंद न होणे
हे जरा नविनच होते
.
हा कुठला नवा खेळ?
.
दाटून येता 'तो' जीव असा हुरहुरतो
'तो' येताच दारचा निशिगंध बहरतो
ढग फुटून 'तो' असा काही बरसतो
त्या गंधाने मी आकंठ मोहरतो
.
नेहमी हा पाऊस येतो आणि मी शुद्ध हरवतो
सचैल भिजून भान हरपतो
कोसळणाऱ्या मेघधारांनी माझे सूर भिजतात
हृदयात मेघमल्हाराची गाज उमटू लागते
मनात वसंत रुंजी घालाया लागतो
मग आजच असे का व्हावे?
.
हा वर्षाव कोरडा का वाटावा
कां आज मी ओथंबत नाही नेहमीसारखा
.
.
हम्म... आज ह्या पावसाची दिशाच चुकली होती
तो तुझ्या घराला टाळून आला होता
हे जरा नविनच होते.... नविनच...
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(एक जुनी रचना)
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5225
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
नेहमीप्रमाणेच झकास रे मिका.
(No subject)
आवडली
झकासच
सुंदर कविता
मस्तच!
वाचने १५३
मिका.. रचना जुनी आहे हे कळतंय
छान आहे रचना... आवडली.
उदाहरणार्थ नविनच वगैरे
मिका, सुरेख!
क्या बात
In reply to मिका, सुरेख! by संजय क्षीरसागर
मिका
+१
In reply to मिका by तिमा
यग्जाक्टली!!
In reply to मिका by तिमा
सुंदर.
(No subject)
आवडली!
मस्त !!