ब्रेकफास्ट रेसीपी ..... अंडा पाऊच (बिहारी स्टाईल)

कैलासवासी सोन्याबापु's picture
कैलासवासी सोन्याबापु in पाककृती
5 Jan 2014 - 10:26 am

ब्रेकफास्ट त्यात ही तराईच्या थंडीत (किंवा अगदी दिल्ली की सर्दी सुद्धा), अंडे इज मस्ट!!! सदरहु प्रकार मी एकदा बिहारात (मोतीहारी) इथे एका गाड्यावर खाल्ला होता आज घरात साहीत्य अन मुख्य म्हणजे बनवायचे नेमके भांडे (उपकरण ) सापड्ले सो म्हणले बनवुन बघावे, काहीसा हाफ फ्राय पल्टी मारके सारखा प्रकार आहे पण शेप मुळे मस्त वाटतो!!!!

साहित्य :-
१. २ अंडी
२. सरसों तेल (ह्यात चव जब-या येते, तुम्ही वास आवडत नसल्यास रिफाईंड वापरु शकता)
३. २ कांदे बारी चिरुन
४. ४ हिरव्या मिरच्या बारीक चिरुन (आपल्या गरजे नुसार अ‍ॅडजस्ट करणे)
५. सगळ्यात महत्वाचे तडका मारायला वापरतो ते हँडल असलेले भांडे

ingredients

तडक्याच्या भांड्यात सरसों तेल गरम करावे त्यात एक अंडे अलगद फोडुन घालावे त्यावर बारीक मिर्ची अन कांदा पेरावा चवी पुरते मीठ घालावे
सेट होईस्तोवर एकाबाजुने भाजाव मग पल्टी मारावी (परत तेल टाकायची गरज नाही)

Process

एंड प्रोड्क्ट असे दिसेल

End Product

फोडल्यावर आतुन लिक्विड बलक येतो

yolk

टोस्टेड ब्रेड, चपाती पराठा भात काय वाटेल त्याच्या सोबत मजा घ्या :) (नुसते पण सही लागते)

प्रतिक्रिया

प्रभाकर पेठकर's picture

5 Jan 2014 - 10:51 am | प्रभाकर पेठकर

>>>>साहित्य :-
२ अंडी

>>>> त्यात एक अंडे अलगद फोडुन घालावे....

दुसर्‍या अंड्याचं काय करायचं?

कैलासवासी सोन्याबापु's picture

5 Jan 2014 - 11:02 am | कैलासवासी सोन्याबापु

पहिल्यासारखेच दुसरे बनवावे!!! :P

कवितानागेश's picture

5 Jan 2014 - 11:54 am | कवितानागेश

ते पॅन मध्ये खोलगट असतं का? लहान असतं हे लक्षात आलं.
त्याशिवाय मधला भाग ओला राहणार नाही.

कैलासवासी सोन्याबापु's picture

5 Jan 2014 - 1:19 pm | कैलासवासी सोन्याबापु

पॅन नाही म्हणता येणार ह्याला कढई म्हणा वाटल्यास!!!, आपण दाल तडका ला वरुन तडका मारायसाठी जो वेगळा तडका बनवतो ते बनवायचे भांडे म्हणा वाटल्यास

पलटी मारल्यावर आच बंद करावी काय?
जर आच चालुच राहीली आणि वेळेत अंडे बाहेर काढले नाही तर आतला बलक पुर्ण शिजून जाईल.
टायमिंगला फार महत्व आहे यात असं वाटतय.
हाफ फ्राय तसही आवडता प्रकार आहे. त्यात आज असं कांदा मिरची पेरुन 'अंडा पाऊच' ओरपुन रविवारची सकाळ सत्कारणी लावावी म्हणतो.

कैलासवासी सोन्याबापु's picture

5 Jan 2014 - 1:28 pm | कैलासवासी सोन्याबापु

येस गणपा भाऊ !! सब टायमिंग का खेला है!!!... मी आच बंद नाही केली पण एकदा ती बारकी कढई तापल्यावर गॅस अगदी बारीक केला होता, मेख ही असते की कांदा मिर्ची शिजावे पण बलक शिजायला नको त्या अंड्याचा "पाऊच" व्हायला पायजे. म्हणजे आत बलक शिल्लक राहतो (बाकी आंच बंद करायचा प्रयोग मी पण नाही केला, गिव्ह ईट अ ट्राय :) )

'अंडा पाऊच' ओरपुन रविवारची सकाळ सत्कारणी लावावी म्हणतो

देवा आपल्या सिद्ध हस्ते हे होउनच जावु द्या!!! , अन झाले की फोटो अन व्हॅल्यु अ‍ॅडीशन करा आमच्या पण रेसेपीत

सोन्याबापू
नवीन, छान, सोप्पी रेसिपी!
.....जबरदस्त!!!!

बरे झाले, हाफ फ्राय ला कधीतरी सुट्टी देता येईल.
फोटो टाकले तेही बरे झाले.
Keep it up!

आणि हो अश्या सोप्या रेसिपी आम्हा पुणेकरांच्या savings लाहि हातभार लावतील (हॉटेलची महाग तयार भाजी/ ready to cook pouch आणायचे वाचेल हो आमचे. हा!!! हा!!!! हा!!!... !!!!)अजून नवीन काही तरी येऊ द्या.

सरसों तेल : हे तेल(काही हि न टाकता)आधी जरा जास्तच (झाग/बुडबुडे कमी होई पर्यंत) तापवून घेतले तर त्याचा उग्र वास खूप कमी होतो. सर्वांनी खाउन पाहायला काहीच हरकत नाही. त्याने बिहारी/उत्तर भारतीय डिश चा आस्वाद चाखता येतो. अजून एक कारण, सर्व प्रकारचे तेल आलटून पालटून खाणे हे आरोग्यदायी ठरते.

आपला लाडका: आयुर्हीत

कैलासवासी सोन्याबापु's picture

5 Jan 2014 - 3:04 pm | कैलासवासी सोन्याबापु

सुरुवातीला मला फार त्रास व्हायचा सरसों चा पण आता तेच बरं वाटतं! :)

पैसा's picture

5 Jan 2014 - 3:58 pm | पैसा

मस्त, सोप्पं आणि पटकन होणारं खाणं!

कैलासवासी सोन्याबापु's picture

5 Jan 2014 - 4:42 pm | कैलासवासी सोन्याबापु

येस!!! सोपं आहे अन वेगळं ही

प्रभाकर पेठकर's picture

5 Jan 2014 - 4:48 pm | प्रभाकर पेठकर

आज करून आणि खाऊन पाहिली पाककृती. कांदा-मिरची घातलेलं हाफफ्राय ह्याहून वेगळी कांही चव लागत नाही.
असं वाटतं की सर्व (कांदा-मिरच्या वगैरे) चिरुन ऑम्लेट करायचा बेत होता पण चुकून आधीच फोडलेली अंडी फ्रायपॅन मध्ये घातली. नंतर आठवलं, 'अरे, ऑम्लेट करायचं होतं.' मग चिरुन ठेवलेला कांदा मिरची वरून घातली आणि एक वेगळाच प्रकार गवसला.
सरसोच्या तेलानेही कांही वेगळी चव आली नाही.

कैलासवासी सोन्याबापु's picture

5 Jan 2014 - 5:08 pm | कैलासवासी सोन्याबापु

मी तरी कुठे म्हणलय चव वेगळी येईल असे ?? नेहमीचाच प्रकार थोड्या वेगळ्या पद्धतीने अन अंडी फ्राय पॅन मधे नव्हती घालायची ओ! (म्हणजे माझ्या रेसेपीनुसार), तुमचं करायला गेलो एक चालु देत :P), तडका पॅन म्हणा वाटल्यास खोल, फोडणी करायला वापरतात तो

प्रभाकर पेठकर's picture

5 Jan 2014 - 8:44 pm | प्रभाकर पेठकर

'तडका पॅन' चे प्रयोजन काय? त्याने विशेष काय फरक पडतो?

'तडका पॅन' चे प्रयोजन काय?

काका माझ्या मते पॅन वापरला तर अंड चहु बाजुंनी पसरेल, पण तेच जर फोडणीचं ( वा इतर कुठलं ही खोलगट लहान) भांड वापरलं तर अंड्याला अर्ध वर्तुळाकार आकार येईल आणी ते उलटलं की धागाकर्त्याच्या म्हणण्या नुसार पॉकेट तयार होईल.
.
बाकी सोन्याबापु खुलासा करतीलच.

प्रभाकर पेठकर's picture

5 Jan 2014 - 8:46 pm | प्रभाकर पेठकर

मी तुमच्या पाककृतीला नांवं ठेवत नाहीए. मुळात बिहार्‍यांनी ह्यात वेगळं काय केलंय हे शोधायचा प्रयत्न होता. कांही गैरसमज झाला असेल तर माफी मागतो.

कैलासवासी सोन्याबापु's picture

6 Jan 2014 - 7:49 am | कैलासवासी सोन्याबापु

अहो छे छे काका माफी वगैरे काही ही काय हो!!! मला काही नाही असं वाटलं, बिहा-यांनी वेगळे काही नाही केले फक्त टीपिकल डिश चे प्रस्तुतीकरण वेगळ्या पद्धतीने केले होते, ते जरा मस्त वाटले " रिप्रेझेंटेबल" म्हणुन ते पहायला अन शेयर करायला मौज वाटली इतकेच. गणपा भाऊ बरोबर बोल्ले मला तेच अभिप्रेत आहे/होते

रुस्तम's picture

6 Jan 2014 - 10:36 pm | रुस्तम

जपानी आम्लेट...

https://www.youtube.com/watch?v=NTIcJ_tdEJM

फोटोग्राफर243's picture

21 Jan 2015 - 8:42 am | फोटोग्राफर243

मला फोटोज दिसत नाही आहेत, काय कारण असावे? privacy settings?

फोटोग्राफरला फोटो दिसत नाही म्हणजे कमालच झाली. :)

कोमल's picture

21 Jan 2015 - 11:05 pm | कोमल

फोटो दिसत नैत :-\

खटपट्या's picture

22 Jan 2015 - 6:14 am | खटपट्या

फोटो बघीतल्याशीवाय अंदाज येणार नाही.

स्पंदना's picture

22 Jan 2015 - 10:03 am | स्पंदना

फोटो
फोटो

पंतश्री's picture

16 May 2015 - 11:45 am | पंतश्री

फोटो कूठे गेले???
फोटो दिसत नहियेत

श्रीरंग_जोशी's picture

17 May 2015 - 5:58 am | श्रीरंग_जोशी

फोटो क्र. , , , .

चारही फोटो दिसत नाहीयेत. दोन कारणे असू शकतात एकतर फोटोज गूगल फोटोज अकाउंटमधून डिलिट केले असावेत किंवा पब्लिक अ‍ॅक्सेस काढला असावा.

सोन्याबापू - कृपया योग्य ती कारवाई करा व सदार समस्येचे निराकरण करा.

नूतन सावंत's picture

16 May 2015 - 5:12 pm | नूतन सावंत

मलापण फोटो दिसत नाहीयेत.

यशोधरा's picture

16 May 2015 - 5:27 pm | यशोधरा

मलाही.

कैलासवासी सोन्याबापु's picture

17 May 2015 - 8:38 am | कैलासवासी सोन्याबापु

ते फोटो डिलीट झाले गूगल अकाउंट मधुन अन आता ते माझ्याकडे सद्ध्या उपलब्ध नाहीत

क्षमस्व

संजय पाटिल's picture

11 Jul 2015 - 5:00 pm | संजय पाटिल

मी पण फोटो मागणार होतो पण जाउ ध्या..