Skip to main content

ब्रेकफास्ट रेसीपी ..... अंडा पाऊच (बिहारी स्टाईल)

ब्रेकफास्ट रेसीपी ..... अंडा पाऊच (बिहारी स्टाईल)

Published on रवीवार, 05/01/2014 प्रकाशित मुखपृष्ठ
ब्रेकफास्ट त्यात ही तराईच्या थंडीत (किंवा अगदी दिल्ली की सर्दी सुद्धा), अंडे इज मस्ट!!! सदरहु प्रकार मी एकदा बिहारात (मोतीहारी) इथे एका गाड्यावर खाल्ला होता आज घरात साहीत्य अन मुख्य म्हणजे बनवायचे नेमके भांडे (उपकरण ) सापड्ले सो म्हणले बनवुन बघावे, काहीसा हाफ फ्राय पल्टी मारके सारखा प्रकार आहे पण शेप मुळे मस्त वाटतो!!!! साहित्य :- १. २ अंडी २. सरसों तेल (ह्यात चव जब-या येते, तुम्ही वास आवडत नसल्यास रिफाईंड वापरु शकता) ३. २ कांदे बारी चिरुन ४. ४ हिरव्या मिरच्या बारीक चिरुन (आपल्या गरजे नुसार अ‍ॅडजस्ट करणे) ५. सगळ्यात महत्वाचे तडका मारायला वापरतो ते हँडल असलेले भांडे ingredients तडक्याच्या भांड्यात सरसों तेल गरम करावे त्यात एक अंडे अलगद फोडुन घालावे त्यावर बारीक मिर्ची अन कांदा पेरावा चवी पुरते मीठ घालावे सेट होईस्तोवर एकाबाजुने भाजाव मग पल्टी मारावी (परत तेल टाकायची गरज नाही) Process एंड प्रोड्क्ट असे दिसेल End Product फोडल्यावर आतुन लिक्विड बलक येतो yolk टोस्टेड ब्रेड, चपाती पराठा भात काय वाटेल त्याच्या सोबत मजा घ्या :) (नुसते पण सही लागते)

याद्या 19045
प्रतिक्रिया 28

>>>>साहित्य :- २ अंडी >>>> त्यात एक अंडे अलगद फोडुन घालावे.... दुसर्‍या अंड्याचं काय करायचं?

In reply to by कवितानागेश

पॅन नाही म्हणता येणार ह्याला कढई म्हणा वाटल्यास!!!, आपण दाल तडका ला वरुन तडका मारायसाठी जो वेगळा तडका बनवतो ते बनवायचे भांडे म्हणा वाटल्यास

पलटी मारल्यावर आच बंद करावी काय? जर आच चालुच राहीली आणि वेळेत अंडे बाहेर काढले नाही तर आतला बलक पुर्ण शिजून जाईल. टायमिंगला फार महत्व आहे यात असं वाटतय. हाफ फ्राय तसही आवडता प्रकार आहे. त्यात आज असं कांदा मिरची पेरुन 'अंडा पाऊच' ओरपुन रविवारची सकाळ सत्कारणी लावावी म्हणतो.

In reply to by गणपा

येस गणपा भाऊ !! सब टायमिंग का खेला है!!!... मी आच बंद नाही केली पण एकदा ती बारकी कढई तापल्यावर गॅस अगदी बारीक केला होता, मेख ही असते की कांदा मिर्ची शिजावे पण बलक शिजायला नको त्या अंड्याचा "पाऊच" व्हायला पायजे. म्हणजे आत बलक शिल्लक राहतो (बाकी आंच बंद करायचा प्रयोग मी पण नाही केला, गिव्ह ईट अ ट्राय :) )
'अंडा पाऊच' ओरपुन रविवारची सकाळ सत्कारणी लावावी म्हणतो
देवा आपल्या सिद्ध हस्ते हे होउनच जावु द्या!!! , अन झाले की फोटो अन व्हॅल्यु अ‍ॅडीशन करा आमच्या पण रेसेपीत

सोन्याबापू नवीन, छान, सोप्पी रेसिपी! .....जबरदस्त!!!! बरे झाले, हाफ फ्राय ला कधीतरी सुट्टी देता येईल. फोटो टाकले तेही बरे झाले. Keep it up! आणि हो अश्या सोप्या रेसिपी आम्हा पुणेकरांच्या savings लाहि हातभार लावतील (हॉटेलची महाग तयार भाजी/ ready to cook pouch आणायचे वाचेल हो आमचे. हा!!! हा!!!! हा!!!... !!!!)अजून नवीन काही तरी येऊ द्या. सरसों तेल : हे तेल(काही हि न टाकता)आधी जरा जास्तच (झाग/बुडबुडे कमी होई पर्यंत) तापवून घेतले तर त्याचा उग्र वास खूप कमी होतो. सर्वांनी खाउन पाहायला काहीच हरकत नाही. त्याने बिहारी/उत्तर भारतीय डिश चा आस्वाद चाखता येतो. अजून एक कारण, सर्व प्रकारचे तेल आलटून पालटून खाणे हे आरोग्यदायी ठरते. आपला लाडका: आयुर्हीत

मस्त, सोप्पं आणि पटकन होणारं खाणं!

आज करून आणि खाऊन पाहिली पाककृती. कांदा-मिरची घातलेलं हाफफ्राय ह्याहून वेगळी कांही चव लागत नाही. असं वाटतं की सर्व (कांदा-मिरच्या वगैरे) चिरुन ऑम्लेट करायचा बेत होता पण चुकून आधीच फोडलेली अंडी फ्रायपॅन मध्ये घातली. नंतर आठवलं, 'अरे, ऑम्लेट करायचं होतं.' मग चिरुन ठेवलेला कांदा मिरची वरून घातली आणि एक वेगळाच प्रकार गवसला. सरसोच्या तेलानेही कांही वेगळी चव आली नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

मी तरी कुठे म्हणलय चव वेगळी येईल असे ?? नेहमीचाच प्रकार थोड्या वेगळ्या पद्धतीने अन अंडी फ्राय पॅन मधे नव्हती घालायची ओ! (म्हणजे माझ्या रेसेपीनुसार), तुमचं करायला गेलो एक चालु देत :P), तडका पॅन म्हणा वाटल्यास खोल, फोडणी करायला वापरतात तो

In reply to by प्रभाकर पेठकर

'तडका पॅन' चे प्रयोजन काय?
काका माझ्या मते पॅन वापरला तर अंड चहु बाजुंनी पसरेल, पण तेच जर फोडणीचं ( वा इतर कुठलं ही खोलगट लहान) भांड वापरलं तर अंड्याला अर्ध वर्तुळाकार आकार येईल आणी ते उलटलं की धागाकर्त्याच्या म्हणण्या नुसार पॉकेट तयार होईल. . बाकी सोन्याबापु खुलासा करतीलच.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

मी तुमच्या पाककृतीला नांवं ठेवत नाहीए. मुळात बिहार्‍यांनी ह्यात वेगळं काय केलंय हे शोधायचा प्रयत्न होता. कांही गैरसमज झाला असेल तर माफी मागतो.

In reply to by प्रभाकर पेठकर

अहो छे छे काका माफी वगैरे काही ही काय हो!!! मला काही नाही असं वाटलं, बिहा-यांनी वेगळे काही नाही केले फक्त टीपिकल डिश चे प्रस्तुतीकरण वेगळ्या पद्धतीने केले होते, ते जरा मस्त वाटले " रिप्रेझेंटेबल" म्हणुन ते पहायला अन शेयर करायला मौज वाटली इतकेच. गणपा भाऊ बरोबर बोल्ले मला तेच अभिप्रेत आहे/होते

फोटो कूठे गेले??? फोटो दिसत नहियेत

In reply to by पंतश्री

फोटो क्र. , , , . चारही फोटो दिसत नाहीयेत. दोन कारणे असू शकतात एकतर फोटोज गूगल फोटोज अकाउंटमधून डिलिट केले असावेत किंवा पब्लिक अ‍ॅक्सेस काढला असावा. सोन्याबापू - कृपया योग्य ती कारवाई करा व सदार समस्येचे निराकरण करा.

ते फोटो डिलीट झाले गूगल अकाउंट मधुन अन आता ते माझ्याकडे सद्ध्या उपलब्ध नाहीत क्षमस्व

मी पण फोटो मागणार होतो पण जाउ ध्या..