Skip to main content

तेंव्हा

लेखक psajid यांनी शुक्रवार, 27/12/2013 14:58 या दिवशी प्रकाशित केले.
तेंव्हा स्वप्नांसाठी , जागणारी ‘तळमळ’ वेगळी होती ऊरी भीती हुरहूर , आवडणारी ‘हळहळ’ वेगळी होती ! जीव गहाण खळीसाठी , पैंजनास कान दिला कुंतलात मुख , मन वेधणारी ‘सळसळ’ वेगळी होती ! वीण जोडून वर्तमानी , दाविले भविष्य त्यांनी घेऊन प्राक्तन हाती, वाहणारी ‘कळकळ’ वेगळी होती ! भोवतीचं भान नाही , क्षण एकेक माजलेला बोचलं सुख ज्यांना , वाटणारी ‘खळखळ’ वेगळी होती ! दोष त्यांचाच होता , ज्यांच्या सदाचारी वल्गना पडदा घेऊन द्वेषाचा , भेदणारी ‘मळमळ’ वेगळी होती ! हिरावला मस्तकमोती , "साजीद" घायाळ अश्वत्थामा चौघांसारखी जखम , सलणारी ‘भळभळ’ वेगळी होती ! - साजीद यासीन पठाण
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1622
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

आवडल

सुरुवातीच्या ओळींनी अपेक्षा वाढविल्या होत्या. पण यमक जुळवण्यासाठी आणलेले ‘खळखळ’, ‘मळमळ’, ‘भळभळ’ असे शब्द काहीसा रसभंग करून गेले. :-(