✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मालिका परीक्षण: स्टार प्लसवरचे महाभारत !! ( दर्जा: * * * * )

न
निमिष सोनार यांनी
Sat, 11/09/2013 - 13:35  ·  लेख
लेख

मालिकेचे नाव : महाभारत
निर्माते : स्वस्तिक पिक्चर्स
वाहिनी : स्टार प्लस (भाषा : हिंदी ) वेळ : सोम शुक्र रात्री 8:30 pm
वाहिनी : स्टार प्रवाह (भाषा : मराठी - डब) वेळ : सोम शुक्र संध्या ६:30 pm
मालिकेचा दर्जा : उत्तम ( * * * * )
संगीत दर्जा : उत्तम ( * * * * )

पुनर्प्रसारणाबद्दल :

सोमवार ते शुक्रवार रात्री 8:30 pm आणि पुनर्प्रसारण दुसऱ्या दिवशी सकाळी 8:00 am. तसेच शनिवारी आठवड्याभराचे एपिसोड संक्षिप्त स्वरूपात सकाळी 8 to 9 am या वेळेत आणि शनिवारी संध्याकाळी 5 to 7:30 pm संपूर्ण आठवड्याभराचे एपिसोडस असतात. रविवारी सुद्धा सकाळी संपूर्ण आठवड्याभराचे एपिसोडस असतात.

प्रस्तावना :

स्टार प्लस वर १६ सप्टेंबर २०१३ पासून महाभारत सुरू झाले आहे. ते छान आहे. नक्कीच!
जेव्हा विदुर दृतराष्ट्रा ऐवजी पांडूला राज्याभिषेक करावा असे सांगतो त्या एपिसोड पासून मी बघायला सुरुवात केली आणि विशेष म्हणजे मला हे महाभारत सुरू झाले याबद्दल कल्पना नव्हती, पण जेव्हा चॅनेल बदलता बदलता एक एपिसोड पाहिला तेव्हा त्याचा दर्जा पाहून लगेचच लक्षात आले की होय, हे महाभारत नक्कीच लोकप्रिय होणार आणि ते लोकप्रिय होत आहे हे नंतर विविध बातम्यांतून कळत गेले.

परीक्षण :

बऱ्याच काळानंतर एक सरस आणि दमदार सादरीकरण असलेले महाभारत आले आहे आणि त्यानंतरचे एपिसोड बघितल्यावर हा समज अधिक दृढ होत गेला. आपण बघत नसाल तर बघायला सुरुवात करा असे मी सांगेन. आधी महाभारता बद्दल माहिती असेल आणि नसेल तरीही हे बघताना मजा येईल. ज्ञान वाढेल. बोध मिळेल. दृष्टिकोन बदलेल.

मी लहान असताना दूरदर्शनवर 1988-90 साली बी. आर. चोप्रांचे महाभारत लागत होते. पण त्यातले संदर्भ वयानुसार कळत नव्हते.
त्यात "समय" आपल्याला कथा सांगताना दिसायचा (म्हणजे ऐकू यायचा). त्यात त्या काळाच्या मानाने स्पेशल इफेक्ट्स चांगले होते, निदान रामानंद सागर च्या रामायणाच्या तुलनेत ते इफेक्ट्स उच्च दर्जाचे होते.

त्यानंतर एकता कपूर ने 9X वाहिनीवर "कहानी हमारे महाभारत की" ही सिरियल सुरू केली होती पण त्याची भट्टी काही जमून आली नाही. टीकेमुळे ते बंद पडले. ते बरेच झाले.

आता चे हे स्वस्तिक प्रकाशनाचे स्टार प्लस वरचे महाभारत अधिक अभ्यास आणि मेहनत करून बनवले आहे, हे नक्की बघताना जाणवते! अबाल वृद्धांना आवडेल असेच ते बनवले गेले आहे आणि या महाभारतातले स्पेशल इफेक्ट्स लाजवाब आहेत. आपण एखादा चित्रपट बघतो आहे असेच वाटत राहते.

त्यातले वेळोवेळी पात्रांच्या तोंडी येणारे सुविचार, अधून मधून कृष्ण येऊन घडलेल्या प्रसंगावर भाष्य करतो ही कल्पना छान आहे. दर वेळेस तो म्हणतो, "स्वयं विचार किजिये" आणि खरेच त्याचे ते भाष्य आपल्याला विचार करण्यासारखे असते आणि आपल्याला जाणवते की आपल्याच भारतातल्या प्राचीन ग्रंथांमध्ये ऐतिहासिक व्यक्तींनी असे अनेक प्रकारचे तत्त्वज्ञान लिहून ठेवले आहे की त्यात आजच्या खासगी आणि व्यावसायिक, कोर्पोरेट जीवनातल्या अनेक प्रश्नांचे उत्तर सापडते. (महाभारत, चाणक्य, रामायण, शिवाजी, पेशवे, महाराणा प्रताप वगैरे)

अगदी सोप्यात सोप्या शब्दांत कृष्ण हे तत्त्वज्ञान सांगतो ते अगदी वाखाणण्याजोगे !!!

महाभारताच्या कथेबद्दल दोन तीन वेगवेगळी मते नक्कीच असतील. त्या अनुषंगाने निरीक्षणा अंती मला असे जाणवले आहे की रोज "कल देखिये" मध्ये जे प्रसंग दाखवतात ते थोडे बदलवून दुसऱ्या दिवशी मात्र वेगळेच दाखवतात. मला वाटते अगदी सूक्ष्म अभ्यास करून अगदी भव्य दिव्य प्रमाणात सढळ हाताने खर्च करून हे बनवलेले दिसते. म्हणून त्यांनी एकच प्रसंग वेगवेगळ्या प्रकारे चित्रित केलेला दिसतो पण वेळे अभावी त्यांना ते सगळेच दाखवता येत नसावे. म्हणून ते "कल देखिये"मध्ये थोडे वेगळे दाखवतात.

सेट्स उत्तम आहेत. इस्माइल दरबार आणि अजय अतुल यांचे संगीत सुद्धा अप्रतिम आहे. त्यामुळे हे महाभारत अक्षरशः जिवंत बनले आहे.

कालपर्यंत गोष्ट इथवर आली आहे:

भीमावर दुर्योधन आणि शकुनी यांनी मिळून खिरीतून विषप्रयोग करतात आणि मेल्यानंतर त्याला नदीत फेकून देतात. त्यानंतर वासुकी कडून विष नष्ट होवून भीमाला शंभर हत्तींचे बळ मिळते आणि स्वतःच्या तेराव्याला भीम हस्तिनापुरात परतून भीष्म, पांडव आणि कुंती यांना आश्चर्याचा सुखद धक्का आणि दुर्योधन शकुनी यांना आश्चर्याचा दुःखद धक्का देतो. त्यानंतर भीष्म कठोर पावले उचलून सर्व कौरव आणि पांडव यांना शिक्षणासाठी द्रोणाचार्यांकडे पाठवायचे ठरवतात आणि शकुनीला गांधार राज्यात हाकलून देण्याची तयारी करतात.

मराठीतून :
स्टार प्रवाह वर सुद्धा मराठीत डब करून हेच महाभारत सुरू झाले आहे. ते संध्याकाळी साडेसहा ला प्रसारित होते. पण त्याचे पुनर्प्रसारण नसते. त्याची कथा बरीच मागे आहे.

अधिक माहितीसाठी खालील दुवे बघा
http://en.wikipedia.org/wiki/Mahabharat_(2013_TV_series)
https://www.facebook.com/OfficialMahabharat

वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
कला
धर्म
इतिहास
लेखनप्रकार (Writing Type)
समीक्षा

प्रतिक्रिया द्या
27878 वाचन

💬 प्रतिसाद (113)

प्रतिक्रिया

हम्म

पैसा
गुरुवार, 11/21/2013 - 22:20 नवीन
मग काय ठरलं शेवटी? मी या मालिकेचे १ ते दीड भाग पाहिले आणि मग मालिका आहे हे विसरून गेले. पूर्वीची महाभारत अशीच काहीकाळ पाहिली होती. मग रामायण आणि महाभारत या मालिका सुरू असताना बाजारात गेल्यास रस्ते आणि दुकाने रिकामी मिळतात हा बहुमूल्य शोध लागला त्यामुळे त्या मालिका प्रचंड आवडू लागल्या. महाभारतावर अनेकांनी अनेक प्रकारे लिहिले आहे त्यात आणखी थोडी भर. काय फरक पडतो? जौ द्या. टीव्हीवर आलेल्या महाभारत मालिकांपैकी "भारत एक खोज" मालिकेच्या काही भागात जे महाभारत दाखवले होते ते मला बर्‍यापैकी आवडले होते.
  • Log in or register to post comments

कार्टून आणि महाभारताची स्पर्धा

चित्रगुप्त
Fri, 11/22/2013 - 12:12 नवीन
रामायण आणि महाभारत या मालिका सुरू असताना बाजारात गेल्यास रस्ते आणि दुकाने रिकामी मिळतात हा बहुमूल्य शोध लागला त्यामुळे त्या मालिका प्रचंड आवडू लागल्या.
अगदी असेच आमचेही झाले. त्यावेळी निवांतपणे फिरायला जायचो. बाकी आतचे महाभारत विनोदी कार्टून सारखे बघावे, असा विचार आहे. या सिरियलबद्दल एक मला न सुचलेला विचार काल कळला, तो म्हणजे कार्टून मालिका बघाणार्‍या अल्पपवयीन मुलांना हे असे उड्डाण करून येणारे पांडव वगैरे प्रचंड आवडतात. त्यामुळे ही बाळगोपाळ मंडळी महाभारत बघतील, आणि त्यांच्या आवडीच्या स्वरूपात त्यांच्यापर्यंत महाभारत पहुचेल, ही एक फार चांगली गोष्ट होईल, असे म्हणू शकतो. वयस्क, ज्यांनी महाभारतावरील अनेक पुस्तके वाचली आहे, त्यावर मनन केलेले आहे, त्यांनी ही मालिका बघण्यापेक्षा आजवर महाभारताची ओळख न झालेल्या लहान मुलांनी ती बघणे जास्त गरजेचे आहे, आणि हल्ली उपलब्ध असलेल्या कार्टूनांशी स्पर्धा असल्याने निर्मात्यांनी महाभारतात असा मालमसाला टाकला असावा, असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

अभिनंदन!!!

शिद
Fri, 11/22/2013 - 00:27 नवीन
कौरवांसारखे ह्या धाग्याचे बघताबघता १०० झाले... :)
  • Log in or register to post comments

अरे आनंद्-कार्लसन लढतीसारखे

सौंदाळा
Fri, 11/22/2013 - 12:19 नवीन
अरे आनंद्-कार्लसन लढतीसारखे धावते समालोचन आहे कि काय? झाला नविन भाग की टाक स्टोरी. मराठी आंतर्जालावर हा एक नविन प्रकार सुरु झालाय असे समजावे का? ;)
  • Log in or register to post comments

अरे आनंद्-कार्लसन लढतीसारखे

चावटमेला
Fri, 11/22/2013 - 12:35 नवीन
अरे आनंद्-कार्लसन लढतीसारखे धावते समालोचन आहे कि काय? झाला नविन भाग की टाक स्टोरी. मराठी आंतर्जालावर हा एक नविन प्रकार सुरु झालाय असे समजावे का?
माबो ची परंपरा मिपावर सुरू झालेली दिसतीये
  • Log in or register to post comments

तस्मात एकच ...

फिरंगी
Tue, 01/28/2014 - 13:12 नवीन
फारएंड सायबाच्या कडून परीक्षण कस करावे ते शिकावे .............फारइंडांचे परीक्षण कमीतकमी पुढील १० वर्षे वाचावे .......आणि लिहिते व्हावे .....
  • Log in or register to post comments

युटूबवर पीटर ब्रूकचे महाभारत

संपत
Tue, 01/28/2014 - 13:52 नवीन
युटूबवर पीटर ब्रूकचे महाभारत उपलब्ध आहे. जिज्ञासूनी जरूर पाहावे.
  • Log in or register to post comments

म्हैसतै, तुम्ही नेहमीच

म्हैस
Wed, 01/29/2014 - 18:19 नवीन
म्हैसतै, तुम्ही नेहमीच संदर्भांशिवाय बोलत असता. आणि संदर्भ मागितले कि देत नाहीत.
इकडचं तिकडचं काहीतरी वाचत बसण्यापेक्षा मूळ महाभारत वाचा. द्रोण वचनाला बांधील होते म्हणून त्यांनी असं केलं. तसच खाल्लेल्या मिठाला जागायला सुधा बांधील होते म्हणून इच्छा नसताना कौरवांच्या बाजूने लढावं लागलं
  • Log in or register to post comments

सहम्त आहे.

प्रचेतस
Wed, 01/29/2014 - 18:43 नवीन
सहम्त आहे. आता इकडचे तिकडचे वाचण्यापेक्षा मूळ महाभारत वाचावे म्हणतो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: म्हैस

आणी मुळ म्हंजे कुठलं ते

यसवायजी
Wed, 01/29/2014 - 19:56 नवीन
आणी मुळ म्हंजे कुठलं ते म्हैसतैंना पैलाच इचारुन घ्या. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अगदी अगदी.

प्रचेतस
Wed, 01/29/2014 - 21:08 नवीन
अगदी अगदी. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

चित्रगुप्ताच्या मताशी सहमत .

म्हैस
Wed, 01/29/2014 - 18:22 नवीन
चित्रगुप्ताच्या मताशी सहमत . ह्यात 6०% उगीच आपला काहीतरी बाळबोध दाखवलंय पण ४०% मूळ महाभारताला धरून आहे ह्याच्याशी सुधा सहमत
  • Log in or register to post comments

महाभारत नियमितपणे पहाताय की नाही मिसळपावकर मंडळी ?

निमिष सोनार
Fri, 03/28/2014 - 16:06 नवीन
महाभारत नियमितपणे पहाताय की नाही मिसळपावकर मंडळी ?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा