Skip to main content

गालिब च्या शायरी चा आस्वाद भाग २

गुल-फिशानी यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनप्रकार
शेर दाम-ए-हर मौज मे है हल्का-ए-सद्काम-ए-निहंग देखे क्या गुजरे है कतरे पे गुहर होने तक. आस्वाद या सुंदर शेर मध्ये गालिब असे सुचवितो की बघा एक सुंदर प्रवास एका नाजुक थेंबा चा (कतरा) नुकताच सुरु झालेला आहे.आणि कुठे तर जीवनरुपी महासागरा त.आणि या प्रवासा ची मंझील काय आहे तर एखादा शिंपला गाठुन मोती बनणे. पण साह्ब ये जिंदगी का सफर इतना आसान होगा ? नाही च कारण यात तो म्हणतो की काय अडथंळे आहेत तर प्र्त्येक लाटे च्या घेर्‍यात ( दाम-ए-हर- मौज मे ) है मगरीं चे शेकडो अक्राळ वि़क्राळ उघडुन ठेवलेले जबडे (हल्का-ए-सद्काम-ए-निहंग) (मराठी त काय म्हणालो असतो हो काळा च्या कराल दाढे त) आणि ते ही प्रत्येक सागर लहरी त (हर मौज मे) मग या नाजुक थेंबाच कस हो व्हायच या कठीण प्रवासात ?काय आहे याच्या पुढ्यात वाढुन ठेवलेल? मगरी च्या जबड्यात जाणार की शिंपल्या त पडुन आपल्या जिवना च श्रेयस मिळवणार? और इस सफर मे इस पर जाने क्या क्या गुजरेगी ? तेच तर गालिब मोठ्या करुणेने म्हणत आहे अस की let,s see friend what will happens to this tiny drop. हे प्रतिकात्मक आहे जे प्रत्येक माणसा च्या जीवन प्रवासाला लागु पडत.प्रत्येक माणसा ला before he becomes a beautiful pearl काय काय नाही हो भोगाव लागत? दु:ख, अपमान् वेदना, वियोग,विरोध बरच काही. एक लंबी लिस्ट प्रत्येकाची आपापली जसे आपले गुलजार साह्ब म्हणतात तसच " मिसरा गालिब का और कयफियत सबकी अपनी अपनी " आणि ते तस भोगण्यात एका अर्थी चुक ही नाही कारण तो एक शायर म्हणतो च ना कि " कोइ समझे का क्या राज-ए-गुलशन जब तलक ना उलझे काटो से दामन " आणि गालिब जो स्वतः एक जीवना चा विशाल पट भोगलेला आहे (काय नाही भोगल त्याने स्वतः असंख्य प्रियजनां चि मरणे ,वियोग,अपमान, गरिबि आणि काय काय कितितरि) तो जेव्हा अस म्हणतो आहे ना तर त्यात ना त्याचि काठोकाठ करुणा फक्त करुणा च भरलेली आहे only christ like compassion nothing else.जस आपले ज्ञानेश्वर जेव्हा म्हणाले होते ना करुणेने ओथंबुन "जो जे वांछील तो ते लाहो" अगदि त्याच जातकुळीतली करूणा ही आहे. जि फक्त जिवना चा परिपुर्ण अनुभव घेतल्यावरच मी पण लयाला गेल्यावरच ह्र्दयात पाझरु शकते जसे म्हटले आहे ना जिवन ज्यां ना कळ्ले हो पक्व फळापरी मी पण ज्यांचे गळले हो. असा च माणुस त्या दुसर्‍या नाजुक थेंबा विषयी , त्याच्या नुकत्याच सुरु झालेल्या प्रवासा विषयी जो की तो दुरद्रुष्टीने बघत आहे म्हणु शकतो की चल अकेला चल अकेला यहा पुरा खेल अभि जिवन का तुने कहा है खेला ? katra
गुल-फिशानी

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

मि.का. प्रतिसादा साठी दिल से धन्यवाद आणि तुमची गालिब वर ची मालिका वाचली काय सुंदर लिहिता हो तुम्ही आणि काय हो बंद का केलि यार तुम्ही इतक्या लवकर? प्लिज अजुन लिहा वाचायला मजा येइल .अजुन तुमचे कोठे दुसरे धागे या विषया वरील असल्यास प्लीज कळवा माझा पासवर्ड चा माझ्या च मुर्खपणामुळे मोठा प्रोब्लेम झाला आहे बहुदा मला मिपा वर नवा आय डी बनवण्या शिवाय काही मार्ग दीसत नाही असो
11/10/2013 - 15:21 Permalink
मिसळलेला काव्यप्रेमी

In reply to by गुल-फिशानी

काय हो बंद का केलि यार तुम्ही इतक्या लवकर?
काय बोलणार... उफ्फ़ ये गालिब.. तशी बैठक परत जमलिच नाही. होईल कधीतरी.
11/10/2013 - 17:30 Permalink
अर्धवटराव

थेंबाचा मोती बनणे हि मंझील आहे असं नेमकं कुठे म्हटलं आहे या शायरीत? कि थेंबाचे मुक्त विहरणे हेच साध्य आहे, व मगरीचा जबडा वा शिंपला (पिंजरा लोखंडाचा असो वा सोन्याचा) हे दोन्ही त्याच्या या मुक्त जीवनातले अडथळे आहेत, असं काहिसं म्हणायचय गालीबला ?
10/10/2013 - 22:38 Permalink
गुल-फिशानी

In reply to by अर्धवटराव

अर्धवटराव मी आपल्या मताशी
कि थेंबाचे मुक्त विहरणे हेच साध्य आहे
शी नम्रपणे असहमति व्यक्त करतो कारण असा अर्थ अभिप्रेत असता तर प्रथम मगरी च्या जबड्यांचि clearly negative प्रतिमा आलीच नसति. आणि दुसर सर्वात महत्वाच म्हणजे ते अतिशय crystal clear limit टाकतात की गुहर होने तक जर विहरणे हे साध्य अभिप्रेत असले असते तर देख्ननेका सिलसीला गुहर झाल्या नंतर ही चालु राहीला असता.
11/10/2013 - 20:15 Permalink
मारवा

अगदि स्पशट आहे जेव्हा तो म्हणतो की कतरे पे गुहर होने तक. तेव्हा गालिब ला अग्दि उघड म्हनायच की गुहर होणे हि च इछ्हा आहे आनि विहरण हे साध्य अस्ते तर मगरीचा जबडा असा अडथळा आहे असा उल्लेख केलाच नसता हो मला वाटत अर्थ तसा स्प्ष्ट आहे.
11/10/2013 - 14:26 Permalink
गुल-फिशानी

In reply to by मुक्त विहारि

मुक्त विहारि माझे गालिब पेक्षा कवी ग्रेस यांच्या बाबतीत तुम्ही म्हणाला असे जवळ जवळ प्रत्येक कविते बाबतच होते डोक्यावरुन जाते पण मनात फारच खोलवर शिरुन अगदि आतला जो गाभा असतो ना त्याला पार हलवुन सोडते. उदा हि ओळ सुन्न देखणा चेहरा माझा बिगुल मुखातुन वाजे पराभवांच्या पर्वां मध्ये जसे उजळतात राजे
11/10/2013 - 21:02 Permalink
मुक्त विहारि

In reply to by गुल-फिशानी

शब्दांच्याही पलीकडे आणि अर्थाच्या ही पुढे काहीतरी असते धर्म,भाषा आणि देशाच्या सीमा ओलांडून मनाला ते धुंदवते मुवि
11/10/2013 - 21:12 Permalink