लेखनप्रकार
शेर
दाम-ए-हर मौज मे है हल्का-ए-सद्काम-ए-निहंग
देखे क्या गुजरे है कतरे पे गुहर होने तक.
आस्वाद
या सुंदर शेर मध्ये गालिब असे सुचवितो की बघा एक सुंदर प्रवास एका नाजुक थेंबा चा (कतरा) नुकताच सुरु झालेला आहे.आणि कुठे तर जीवनरुपी महासागरा त.आणि या प्रवासा ची मंझील काय आहे तर एखादा शिंपला गाठुन मोती बनणे.
पण साह्ब ये जिंदगी का सफर इतना आसान होगा ? नाही च कारण यात तो म्हणतो की काय अडथंळे आहेत तर प्र्त्येक लाटे च्या घेर्यात ( दाम-ए-हर- मौज मे ) है मगरीं चे शेकडो अक्राळ वि़क्राळ उघडुन ठेवलेले जबडे (हल्का-ए-सद्काम-ए-निहंग) (मराठी त काय म्हणालो असतो हो काळा च्या कराल दाढे त) आणि ते ही प्रत्येक सागर लहरी त (हर मौज मे) मग या नाजुक थेंबाच कस हो व्हायच या कठीण प्रवासात ?काय आहे याच्या पुढ्यात वाढुन ठेवलेल? मगरी च्या जबड्यात जाणार की शिंपल्या त पडुन आपल्या जिवना च श्रेयस मिळवणार? और इस सफर मे इस पर जाने क्या क्या गुजरेगी ? तेच तर गालिब मोठ्या करुणेने म्हणत आहे अस की let,s see friend what will happens to this tiny drop.
हे प्रतिकात्मक आहे जे प्रत्येक माणसा च्या जीवन प्रवासाला लागु पडत.प्रत्येक माणसा ला before he becomes a beautiful pearl काय काय नाही हो भोगाव लागत? दु:ख, अपमान् वेदना, वियोग,विरोध बरच काही. एक लंबी लिस्ट प्रत्येकाची आपापली जसे आपले गुलजार साह्ब म्हणतात तसच " मिसरा गालिब का और कयफियत सबकी अपनी अपनी " आणि ते तस भोगण्यात एका अर्थी चुक ही नाही कारण तो एक शायर म्हणतो च ना कि " कोइ समझे का क्या राज-ए-गुलशन जब तलक ना उलझे काटो से दामन "
आणि गालिब जो स्वतः एक जीवना चा विशाल पट भोगलेला आहे (काय नाही भोगल त्याने स्वतः असंख्य प्रियजनां चि मरणे ,वियोग,अपमान, गरिबि आणि काय काय कितितरि) तो जेव्हा अस म्हणतो आहे ना तर त्यात ना त्याचि काठोकाठ करुणा फक्त करुणा च भरलेली आहे only christ like compassion nothing else.जस आपले ज्ञानेश्वर जेव्हा म्हणाले होते ना करुणेने ओथंबुन "जो जे वांछील तो ते लाहो" अगदि त्याच जातकुळीतली करूणा ही आहे.
जि फक्त जिवना चा परिपुर्ण अनुभव घेतल्यावरच मी पण लयाला गेल्यावरच ह्र्दयात पाझरु शकते जसे म्हटले आहे ना
जिवन ज्यां ना कळ्ले हो पक्व फळापरी मी पण ज्यांचे गळले हो. असा च माणुस त्या दुसर्या नाजुक थेंबा विषयी , त्याच्या नुकत्याच सुरु झालेल्या प्रवासा विषयी जो की तो दुरद्रुष्टीने बघत आहे म्हणु शकतो की
चल अकेला चल अकेला यहा पुरा खेल अभि जिवन का तुने कहा है खेला ?
मिसळपाव
वाचनीय
In reply to वाचनीय by मिसळलेला काव्यप्रेमी
धन्यवाद मि.का.
In reply to धन्यवाद मि.का. by गुल-फिशानी
काय हो बंद का केलि यार तुम्ही
सुंदर.
In reply to सुंदर. by अर्धवटराव
अर्धवटराव गंभीर वाचना बद्द्ल धन्यवाद
In reply to अर्धवटराव गंभीर वाचना बद्द्ल धन्यवाद by गुल-फिशानी
धन्यवाद.
अहो अर्धवट राव
In reply to अहो अर्धवट राव by मारवा
चान चान
सुरेख!
In reply to सुरेख! by पैसा
धन्यवाद ज्योति कामतजी
गालिबने हे जे काही लिहिलय ना
In reply to गालिबने हे जे काही लिहिलय ना by मुक्त विहारि
माझेही असेच होते
In reply to माझेही असेच होते by गुल-फिशानी
खरे आहे