बघायचे नव्हतेच पण मी ते तपासुन पाहीले
मी तुझ्यादुव्यातले गाणे तपासुन पाहीले..
रात्र अर्धी लोटली की लक्षात मज यायला
नेमके काव्य कुठवरी जाते? तपासुन पाहिले..
जाणिले जे भोगले, का भोगले? माझेच मी
काव्य माझ्यामेंदुतले खाते तपासुन पाहिले
रोज ती गझलेत मेली, पण तरी जगली कशी?
कोणते हे द्रव्य ती पिते? चाखुनीया पाहिले
समजे ना मज कधी काव्य अथवा गझलेतले
मात्र केश्या विडंबनाने ते तुझ्या समजावले
बाईबाटली बोंब नको करु केसु
असे कशाला बरे मी समजावले?
गप्प कराया आता पुरते मजला
बाउन्सर असे का बरे टाकले?
केसु तुम्हाला खरे तर प्रतिसाद देऊन थकलो कारण, वा! मस्त! असेच सारखे म्हणावे लागते. तुमच्यातल्या शीघ्र कवित्वालाही प्रणाम!त्यामुळे ह्यापुढे काही न आवडणारे लिहाल तेव्हाच प्रतिसाद देत जाईन.
तुमच्याबरोबरच सहजरावांचेही अभिनंदन! हल्ली त्यांचीही काव्यप्रतिभा जागृत झालेली दिसतेय! त्यांनीही मस्त उत्तर दिलंय त्यांच्या भाषेत!
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
लई खतरनाक
त्या तिच्या नरड्यात होते अडकलेले काय, ते
का असे रेड्या परी गाते ? तपासुन पाहिले...
जाणिले, जे गायले , का गायले ? माझेच मी
काल या छातीतले भाते तपासुन पाहिले...
हे विषेश भारी
सहजराव.. विडंबन आवडले... मात्र अजून विडंबनांची प्रॅक्टीस करा.. अगदी केसुची सर आली नसली तरी जवळ आहात ;) .. कम ऑन!!!!
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
केसुशेठ,
जबराट !
तिसर्या आणि पाचव्या द्विपदीला ९ गुण.
बाकी सर्वांना ८ गुण.
घर कुठे जाते, मध्ये घरं हवे : -१.
विरामचिन्हाचा सूचक वापरः +१.
एकूणः ८.५ गुण.
मस्त !
- सर्किट
काय केसु जास्त भलते सलते दुवे देत जाउ नका बॉ
वा !!
वा ! मस्त!
धन्यवाद!!
हा हा!
मस्त रे केशवा!
लय भारी..
क्या बात है !!!!!!
रोज ती
धन्यवाद!!