Skip to main content

तुही नाही मीही नाही …………. !!!

लेखक फिझा यांनी सोमवार, 26/08/2013 08:41 या दिवशी प्रकाशित केले.
तुही नाही मीही नाही …………. प्रेमाची रुजुवात झाली होती मनात, पण बोललो हिमतीने कधीच ….तुही नाही , मीही नाही ……… पावसाची रिप रिपही चिंब करणारी, पण भिजलो आकंठ कधीच … .तुही नाही , मीही नाही ……… सहजच घडते अशी असते भेट, पण साधला योगायोग कधीच …. .तुही नाही , मीही नाही … डोळ्यातली नीरओळ संथ वाहत राहिली, पण बुडालो पुरात कधीच .… .तुही नाही , मीही नाही …… समांतर चालत राहिलो एकाकी वाट, पण थांबलो वळणावर क्षणभर कधीच … .तुही नाही , मीही नाही ……… आठवणींची उजळणी करत राहिलो आयुष्यभर, पण प्रश्नांना सामोरे गेलो कधीच … .तुही नाही , मीही नाही ……… चढलेल्या वयाचे उतारपण बघत राहिलो , पण …. कोवळे मन सांभाळले कधीच …..तुही नाही मीही नाही …। ..............तुही नाही मीही नाही … ...........……। फिझा
लेखनविषय:

वाचने 1532
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

जीवनाच्या रहाट्गाड्यात अशा किती तरी महत्वाच्या गोष्टी करायच्या राहून जातात.. या कवितेने त्याची आठवण करून दिली ... मनात आले .. आज ऑफिस मधून घरी गेल्यावर पुन्हा एकदा नवर्याला I love you म्हणावे ;-)

चढलेल्या वयाचे उतारपण बघत राहिलो , पण …. कोवळे मन सांभाळले कधीच …..तुही नाही मीही नाही
हे मस्तचं!! आवडली रचना.

मला तुमच्या सगळ्याच रचना आवडतात फिझा. सुरेख. बरच काही वाहुन गेलं, पाला पाचोळा उडवुन गेलं ओंजळ भरायची राहुनच गेली...