तुही नाही मीही नाही ………….
प्रेमाची रुजुवात झाली होती मनात, पण
बोललो हिमतीने कधीच ….तुही नाही , मीही नाही ………
पावसाची रिप रिपही चिंब करणारी, पण
भिजलो आकंठ कधीच … .तुही नाही , मीही नाही ………
सहजच घडते अशी असते भेट, पण
साधला योगायोग कधीच …. .तुही नाही , मीही नाही …
डोळ्यातली नीरओळ संथ वाहत राहिली, पण
बुडालो पुरात कधीच .… .तुही नाही , मीही नाही ……
समांतर चालत राहिलो एकाकी वाट, पण
थांबलो वळणावर क्षणभर कधीच … .तुही नाही , मीही नाही ………
आठवणींची उजळणी करत राहिलो आयुष्यभर, पण
प्रश्नांना सामोरे गेलो कधीच … .तुही नाही , मीही नाही ………
चढलेल्या वयाचे उतारपण बघत राहिलो , पण ….
कोवळे मन सांभाळले कधीच …..तुही नाही मीही नाही …।
..............तुही नाही मीही नाही …
...........……। फिझा
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1523
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
म्हंजे नक्की काय झालं?
तुम्हीही नाही आणि त्यांनीही नाही
जीवनाच्या रहाट्गाड्यात अशा
मस्त
मला तुमच्या सगळ्याच रचना