✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना श्रद्धांजली !

ध
धर्मराजमुटके यांनी
Tue, 08/20/2013 - 09:48  ·  लेख
लेख
नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार पुण्यात ओंकारेश्वर पुलावर सकाळी डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. जरी त्यांच्या विचारांबाबत मतभेद असले तरी अशा प्रकारच्या हल्ला हा महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीवरचा हल्ला आहे. महाराष्ट्र वैचारिक अधोगतीच्या दिशेने चालला आहे हे निश्चित ! डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना श्रद्धांजली !
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
52213 वाचन

💬 प्रतिसाद (222)

प्रतिक्रिया

अगदी अगदी. मराठी माणसालाही

मृत्युन्जय
Tue, 08/20/2013 - 12:24 नवीन
अगदी अगदी. मराठी माणसालाही नरेंद्र दाभोळकर माहिती नाहित हे नव्यानेच कळाले. आत्ताच एकाशी बोलत होतो तर नरेंद्र दाभोळकर कोण हे समजावुन सांगत होतो तेव्हा मी " ते नाही का ते जे जादू टोणा अंधश्रद्धा वगैरे विरुद्ध......" तर फक्त जादू शब्द ऐकुन ओह ते मॅजिशियन का? माहिती होते ते मला. ऐकले होते. " असे उत्तर आले. मी स्वतःच्याच उरल्यासुरल्या झिंज्या उपटुन घेतल्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोमल

औघड आहे सारंच

बॅटमॅन
Tue, 08/20/2013 - 12:33 नवीन
औघड आहे सारंच :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

दाभोळकरांच्या विचारांची हत्या आधीच झाली होती. आता शरिराची झाली.

प्रसाद१९७१
Tue, 08/20/2013 - 14:54 नवीन
मी, "अरे, नरेंद्र दाभोळकरांची हत्या झाली." तो, "सो सॉरी, नात्यातले होते का?"
दाभोळकरांच्या विचारांची हत्या आधीच झाली होती. आता शरिराची झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोमल

दोन प्रचंड मोठी माणस आपल्यातुन आज गेली. फार वाईट झाल.

निश
Tue, 08/20/2013 - 11:54 नवीन
दोन प्रचंड मोठी माणस आपल्यातुन आज गेली. फार वाईट झाल. ऐक देवावर नितांत भक्ती असलेले व दुसरे दैव वादावर कडक आसुड ओढणारे. फार म्हंजे फार वाईट झाल. आज अजुन दोन चांगली माणस आपल्यातुन गेली.
  • Log in or register to post comments

सुन्न!

आतिवास
Tue, 08/20/2013 - 11:55 नवीन
सुन्न! अशा घटना होत राहतात, एकामागून एक. प्रत्येक वेळी असं काही यापुढे होणार नाही, होऊ नये असं वाटतं ... आणि तरीही .. समाज म्हणून आपण किती हतबल होत चाललो आहोत!! अधिक काही केले पाहिजे .... आपण प्रत्येकानेच!
  • Log in or register to post comments

फलज्योतिषाचे

अवतार
Tue, 08/20/2013 - 11:59 नवीन
फलज्योतिषाचे समर्थन करणारे आणि विरोध करणाऱ्यांचे एकाच दिवशी निधन व्हावे हा केवळ योगायोगच म्हणावा लागेल!
  • Log in or register to post comments

वाईट बातमी. श्रद्धांजली.

कवितानागेश
Tue, 08/20/2013 - 12:11 नवीन
वाईट बातमी. श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments

नरेंद्र दाभोलकरांना श्रध्दांजली.

निखिलचं शाईपेन
Tue, 08/20/2013 - 12:26 नवीन
अपवाद म्हणून किंवा हे त्यातल्या त्यात ओके आहे किंवा आमच्यात बाबा या गोष्टी चालत आल्यात आणि आम्ही पाळतो त्या, काय हार्म्लेस आहेत, या मानसिकतेतून मग क्रूरपणा बाबतच्या संवेदना बोथट होत जातात. त्यातून मग कुंडली, राशीभविष्य हे ठीक आहे पण नरबळी म्हणजे खूप वाईट असल्या अतिफालतू आणि मूर्ख विचारांचा पगडा एकूणच बऱ्याच लोकांवर आहे. कुठलाही वैज्ञानिक आधार नसताना केवळ परंपरा म्हणून मानल्या गेलेल्या अनेक गोष्टी हळू हळू बदलतील म्हणून शहाणे लोक आयदर त्याबाबतीत बोलायचे टाळतात किंवा मग एखादा बोलला तर सगळे अतिमूर्ख त्याचा समाचार घेतात. हि श्वापदे कळपाने राहतात. तेव्हा ज्याचा पुरावा नाही ते खरे नाही हि मानसिकता संपूर्णपणे अंगिकारली जाईल तेव्हाच हे मृत्यूसत्र थांबेल. आज एका शहाण्या माणसाचा खून झाला पण समाजाने काय गमावलेय हे जाती पाती मानणाऱ्या, दरबारात जाणाऱ्या (उ दा भोंदु लोक आणि त्यांचे दरबार आणि दाराबारातली ती वेडी लोकं), कुंडलीगिरी करणाऱ्या लोकांना संपूर्णपणे कळणे गरजेचे असले तरी खरंच खूप अवघड आहे. नरेंद्र दाभोलकरांना श्रध्दांजली … -निखिल.
  • Log in or register to post comments

धक्कादायक बातमी

उर्मिला००
Tue, 08/20/2013 - 12:27 नवीन
अजुन विश्वास बसत नाहीये.जाहीर निषेध या भ्याड कृत्याचा.
  • Log in or register to post comments

भावपूर्ण श्रद्धांजली.

अनिरुद्ध प
Tue, 08/20/2013 - 12:28 नवीन
दोनही मृतात्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments

नरेंद्र दाभोळकरांना भावपूर्ण

दत्ता काळे
Tue, 08/20/2013 - 12:47 नवीन
नरेंद्र दाभोळकरांना भावपूर्ण श्रध्दांजली आणि त्यांच्यावरील हल्ल्याचा निषेध. बौद्धिक पातळीवर दाभोळकरांशी चर्चा आणि प्रतिवाद न करु शकणार्‍या लोकांकडुन अजुन काहीच अपेक्षा नाही म्हणा. .... हेच म्हणतो.
  • Log in or register to post comments

अतिशय खेदजनक बातमी.

गणपा
Tue, 08/20/2013 - 12:56 नवीन
अतिशय खेदजनक बातमी. भ्याडांचा निषेध !
  • Log in or register to post comments

हिजड्यांच्या राज्यात राहात असल्याची लाज वाटते.

बाबा पाटील
Tue, 08/20/2013 - 13:01 नवीन
पुरोगामी महाराष्ट्राचा युपी बिहार होत चाललाय,जिथे मुद्दे संपतात तिथे गुद्दे सुरु होतात्,या बाबा बुवांकडे प्रतिकार करण्याकरिता मुद्दे च संपले होते, पण यांना एक कळत नाही माणसे मारुन विचार संपत नाहित्,उलट आणखी जोमाने उभे राहतात्,या गोष्टीचा नुसताच पोकळ निषेध व्यक्त करुन उपयोग नाही तर विरोधात खंबिरपणे उभे राहणे गरजेचे आहे मी तयार आहे मित्रनो,तुमची तयारी आहे का ? सर्व नेटीझन एकत्र येउन याविरोधात रान उठवु शकतात्,निदान मि.पाने तरी याबाबत पुढाकार घ्यावा ही विंनती....
  • Log in or register to post comments

पुरोगामी महाराष्ट्राचा युपी

बॅटमॅन
Tue, 08/20/2013 - 14:21 नवीन
पुरोगामी महाराष्ट्राचा युपी बिहार होत चाललाय
खंप्लीट सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील

+१

कोमल
Tue, 08/20/2013 - 23:10 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

अतिशय खेदजनक बातमी. एक GREAT

आशिष दा
Tue, 08/20/2013 - 13:20 नवीन
अतिशय खेदजनक बातमी. एक GREAT माणूस गेला. पण नरेंद्र दाभोळकरांबद्दल पूर्ण आदर ठेऊन तरीही म्हणावसं वाटतं की- आंतरजालावर RIP वाचून गंमत वाटली. तथाकथित RATIONAL BEINGS पण देहा नंतर काही उरतं असा मानू लागली की काय ? किती मोठी IRONY ?
  • Log in or register to post comments

विनम्र श्रद्धांजली

सर्वसाक्षी
Tue, 08/20/2013 - 13:22 नवीन
डॉ दाभोळकरांच्या हत्येचा निषेध. समाजप्रबोधन करणारी व्यक्ति ज्यांच्या नजरेत सलत आहे अशांचेच हे काम असावे. ही तर मुस्कटदाबी झाली. अंधश्रद्धा निर्मूलनातला एक खंदा कार्यकर्ता हरपला, हे समाजाचे नुकसानच नव्हे तर दुर्दैव आहे. या हत्येच्या मुळाशी जाणे आवश्यक आहे. डॉ. दाभोळकर आणि श्री. साळगांवकर यांना विनम्र श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments

असं घडायला नको होतं ...

मनीषा
Tue, 08/20/2013 - 13:31 नवीन
आदरपूर्वक श्रद्धांजली !
  • Log in or register to post comments

अत्यंत भ्याड कृत्य आहे. निषेध

पिशी अबोली
Tue, 08/20/2013 - 14:07 नवीन
अत्यंत भ्याड कृत्य आहे. निषेध. आता याचा आधार घेऊन भावना भडकावायचा प्रयत्न लोक करतील. डॉ. दाभोळकरांचा विवेकीपणा समाजात टिकावा एवढीच इच्छा. :(
  • Log in or register to post comments

माणुस मरतो पण विचार नाही.

अजया
Tue, 08/20/2013 - 14:09 नवीन
माणुस मरतो पण विचार नाही. जादुटोणाविरोधी विधेयकाला सर्वप्रकारे पाठिंबा देणे हीच दाभोलकरांना खरी श्रद्धांजली ठरेल. नाहीतर नुसतेच "जन पळ्भर म्हणतील हाय हाय.."
  • Log in or register to post comments

विचार मरू नये हे म्हणणे जास्त

शिवोऽहम्
Tue, 08/20/2013 - 14:37 नवीन
विचार मरू नये हे म्हणणे जास्त योग्य ठरेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

ह्या दुर्दैवी घटने इतके

प्रसाद१९७१
Tue, 08/20/2013 - 14:51 नवीन
ह्या दुर्दैवी घटने इतके आश्चर्य वाटण्या सारखे काय आहे? ह्या देशामधले आमदार, खासदार, नगरसेवक बघितले तर सज्जन माणसांचे खून होणार हे सांगायला कशाला पाहिजे.
  • Log in or register to post comments

सुन्न करणारी घटना!

इशा१२३
Tue, 08/20/2013 - 14:52 नवीन
समाजाला अत्यंत गरज असणार्‍या व्यक्तीची अशाप्रकारे हत्या हि खरच मनाला ह्ळह्ळ वाटणारी.निषेध करावा तितका कमीच!
  • Log in or register to post comments

भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध

दिपक.कुवेत
Tue, 08/20/2013 - 14:53 नवीन
आणि ह्या दोघांना भावपूर्ण श्रध्दांजली.
  • Log in or register to post comments

डॉ. दाभोळकरांच्या हत्येमागचं

नंदन
Tue, 08/20/2013 - 15:01 नवीन
डॉ. दाभोळकरांच्या हत्येमागचं कारण वैचारिक असो, राजकीय वा आर्थिक -- "बोला आमच्याविरूद्ध हवं तेवढं! आमच्या समाजातले दोष दाखवलेत म्हणून जीवे मारण्याचे फतवे का निघणार आहेत? तेव्हा रहा सुरक्षित आणि करा टीका." छापाचं जे लंगडं समर्थन अनेकदा वाचायला/ऐकायला मिळे -- त्यातला फोलपणा निदान आता तरी अशांच्या ध्यानी यावा, ही अपेक्षा बाळगणंदेखील व्यर्थ आहे; असं वाटायला लावणारे काही प्रतिसाद (फेसबुकावर/अन्यत्र) वाचले आणि ही दु:खद बातमी ऐकल्यावर वाटलेली खंत अधिक गडद झाली.
  • Log in or register to post comments

दुर्दैवानं खरंय.

बॅटमॅन
Tue, 08/20/2013 - 15:19 नवीन
दुर्दैवानं खरंय. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

श्रद्धांजली

सानिकास्वप्निल
Tue, 08/20/2013 - 15:07 नवीन
भावपूर्ण श्रद्धांजली
  • Log in or register to post comments

इतिहास

राही
Tue, 08/20/2013 - 15:44 नवीन
हुतात्मा बनलेल्या वैचारिक क्रुसेडर्स् च्या साखळीतला आणखी एक दुवा. हा दुवा अखेरचाच ठरो आणि ही साखळी इथेच थांबो अश्या आशेच्या एका किरणाचीही अपेक्षा करता येऊ नये इतपत वातावरण काळेकुट्ट झाले आहे. आयुष्यभर आपले युद्ध अहिंसकतेने लढणार्‍याचा अंत हिंसामय असावा हे इतिहासाला मान्यच जणू. जयंतराव साळगावकरांना श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments

वाईट बातमी. श्रद्धांजली.

मोदक
Tue, 08/20/2013 - 15:47 नवीन
वाईट बातमी. श्रद्धांजली. :-(
  • Log in or register to post comments

(No subject)

अत्रुप्त आत्मा
Tue, 08/20/2013 - 16:04 नवीन
:( :( :(
  • Log in or register to post comments

अस्लम बाबा

संचित
Tue, 08/20/2013 - 16:21 नवीन
१० वर्षा आधी स्वत: च्या हाताने कुठलेही शस्त्र न वापरता शस्त्रक्रिया करणारा आणि अंनिस ला आव्हान देणारा तो असलं बाबा कुठे गेला?
  • Log in or register to post comments

विचार पटले नाहीत म्हणून त्या

पद्मश्री चित्रे
Tue, 08/20/2013 - 16:29 नवीन
विचार पटले नाहीत म्हणून त्या माणसाची हत्या करणे हे खरच चूक आहे.भावपूर्ण श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments

!!??

पैसा
Tue, 08/20/2013 - 16:42 नवीन
हे सगळं खरंच घडलंय का? अजून विश्वास बसत नाही. उत्तर भारतात अशा घटना घडतात असे म्हणून आम्ही वाळूत डोकं खुपसून बसलो होतो! :(
  • Log in or register to post comments

+१११

ब़जरबट्टू
Tue, 08/20/2013 - 17:15 नवीन
अगदी, आज महाराष्ट्र पण अधोगतीला लागलाय... :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

खरं आहे...

विकास
Tue, 08/20/2013 - 17:17 नवीन
आत्ता येथे सकाळी सकाळी जालावर वर्तमानपत्र वाचायला घेतले आणि दाभोलकरांची बातमी ऐकून सुन्न झालो. महाराष्ट्र खरेच वाळूत डोके खुपसून बसलेला आहे. या घटनेचे कुठलेही राजकारण न करता त्याच्या मुळाशी जाऊन मारेकरी आणि बोलवते धनी शोधणे गरजेचे आहे असे वाटते. स्वतः दाभोलकरांचा अध्यात्म (यात फिलॉसॉफी आली, अंधश्रद्धा म्हणून नाही) विश्वास होता का माहीत नाही. म्हणून त्यांच्या आत्म्यास शांती लाभावी असे मी माझ्या श्रद्धेने म्हणतो आणि त्यांनी सुरू केलेले अंधश्रद्धा निर्मुलनाचे कार्य पुढे योग्य दिशेने चालूच राहूंदेत अशी प्रार्थना करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

कालाय तमे नमह

मनिमौ
Tue, 08/20/2013 - 16:51 नवीन
राजा कालाय कारणम हे खरेच . रोज कलियुग आहे हे नव्याने जाणवते आहे.
  • Log in or register to post comments

उद्विग्न

तिमा
Tue, 08/20/2013 - 16:54 नवीन
सकाळपासून अत्यंत अस्वस्थ आणि उद्विग्न आहे. बातमी कळल्यापासून कामातले लक्षच उडाले. शेवटी लवकर घरी आलो. काय चाललंय हे आपल्या महाराष्ट्रात ? जास्तीतजास्त लोकांनी या अंधश्रद्धेपासून मुक्ती घ्यावी हीच डॉक्टरांना उचित श्रद्धांजली ठरेल.
  • Log in or register to post comments

माझी अवस्था तशीच तिमा...

चौकटराजा
Wed, 08/21/2013 - 09:05 नवीन
मी आध्यात्म वा हे श्रद्धा अंधश्र्द्धा याबाबतीत अगदी दाभोलकरच असल्याने मला घरचा माणूस गेल्याचे दु: ख झाले. मी त्यांना एक अगदी छोटी मदत केली होती. बाकी त्यांच्या कार्यात झोकून द्यायचे राहिले. कारण ते यात्री होते मी शंकेखोर आहे. माणूस जन्मत:च काही तरी बरेच बरोबर घेऊन येतो. त्याला बलदण्यासाठी चळवळी , उपदेश यांच्यापेक्षा अनुभवाचा झटकाच अधिक उपयुक्त असे माझे मत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

काय चाल्लंय हे. :(

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 08/20/2013 - 17:37 नवीन
अत्यंत दु:खदायक घटना आहे. भ्याड हल्ल्याचा मी निषेध करतो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

+१

सखी
Tue, 08/20/2013 - 20:09 नवीन
अत्यंत दु:खदायक घटना आहे.भ्याड हल्ल्याचा मी निषेध करते - सुन्न करणारं आहे हे सगळं...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दोघांनाही भावपूर्ण श्रद्धांजली.

जुइ
Tue, 08/20/2013 - 17:56 नवीन
दोघांनाही भावपूर्ण श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments

श्रद्धांजली

घाटावरचे भट
Tue, 08/20/2013 - 18:10 नवीन
मनःपूर्वक श्रद्धांजली!! महाराष्ट्रात फोफावलेली गुंडगिरी आणि कायदा, पोलिस वगैरे गोष्टींची रसातळाला गेलेली किंमत पुनश्च अधोरेखित झाली.
  • Log in or register to post comments

श्रद्धांजली व निषेध

श्रीरंग_जोशी
Tue, 08/20/2013 - 18:12 नवीन
डॉ. दाभोळकरांच्या हत्येचा निषेध. अंधश्रद्धा - जादुटोणा विरोधी विधेयकाचे कायद्यात रुपांतर व त्याची कडक अंमलबजावणीच त्यांच्या कार्याला योग्य ती श्रद्धांजली ठरेल.
  • Log in or register to post comments

कळवळलो ऐकून..

उपास
Tue, 08/20/2013 - 18:38 नवीन
"आई गं!" ही पहिली प्रतिक्रीया आली तोंडातून.. लाजिरवाणी गोष्ट आहे एक समाज म्हणून आपल्याला. "पटले नाही विचार, टाक संपवून" ही वृत्ती पुन्हा पुन्हा वर येतेय. सतिश शेट्टींच्या हत्येचं पूर्ण राजकारण केलं गेलं.. आर्.टी.आय. च्या चळवळीचं अपरिमित नुकसान झालं तेव्हा.. शासनाला दोष देऊन थांबता येणार नाही, खूप चुकीच्या दिशेने वेगात चाल्लोय आपण. सामाजिक कार्यकर्त्यांना जीव ओतून काम करायला कसा धीर देणार आता! निराश वाटतय एकदम.. असं काही झालं की सामाजिक चळवळींचा वेग अतिशय मंदावतोच, ते कधीही न भरुन येणारं नुकसान असतं! डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या नावानेच विधेयक आणणं हीच खरी आदरांजली असेल त्यांना, बाकी सरकार काही करेल असं वाटत नाही, त्यांच्यावर तितका विश्वास राहिला नाही हे उघड सत्य आहे!
  • Log in or register to post comments

वी वील टेक इट फॉर्वर्ड सर.

अर्धवटराव
Tue, 08/20/2013 - 18:42 नवीन
सरांना विनम्र श्रद्धांजली. आपलं प्रतिबींब बघवत नाहि तर रूप टीकठाक करण्याऐवजी आरसा फोडायचा... हे कृत्य केवळ अविचारी नव्हे तर आत्मघाती आहे. सरांचं शरीर संपवलं तरी त्यांचे विचार संपणार नाहित वगैरे गप्पा तात्वीक म्हणुन ठीक आहे, पण एक माणुस निर्भीडपणे समाजाला त्याच्या उणीवा दाखवुन देत होता. तो आता गेला, तर त्या कार्याचे व्हायचे ते नुकसान झालेच :( वर गविंनी म्हटलय तसं, हा प्रकार केवळ वैचारीक मतभेदातुन झाला असावा असं वाटत नाहि. कुठे तरी हितसंबंध दुखावले गेले असावेत. अनिंस हि संस्था काहि खुप पैसा बाळगुन नसावी, व त्यात राजकीय फायदा देखील नसावा, त्यामुळे सरांच्या खुर्चीवरुन हे कांड झालेलं नाहि. सरांच्या कोअर वर्तुळातल्या लोकांना काहि कल्पना असेल... त्यांनी आता अधिक सावधानी बाळगण्याची गरज आहे. मेणाबत्ती मोर्चावाल्यांना हस्तिदंती मनोर्‍यातले समाजसुधारक म्हणुन हिणवले जाते... पण आजघडीला पुणे शहरात या मंडळींनी मोर्चा काढण्याची अत्यावष्यकता आहे. या खुनावर समाजाने सक्रिय प्रतिक्रीया द्यायलाच हवी. अर्धवटराव
  • Log in or register to post comments

दोघांनाही भावपूर्ण श्रद्धांजली.

अनन्न्या
Tue, 08/20/2013 - 18:44 नवीन
अत्यंत दु:खद घटना!
  • Log in or register to post comments

मनःपूर्वक श्रद्धांजली!!

थंडगार राख
Tue, 08/20/2013 - 18:49 नवीन
मनःपूर्वक श्रद्धांजली!!
  • Log in or register to post comments

आजच्या काळापेक्षाहि प्रतिकूल

अनिता ठाकूर
Tue, 08/20/2013 - 19:15 नवीन
आजच्या काळापेक्षाहि प्रतिकूल परिस्थितीत पूर्वी समाजसुधारकांनी, प्रचंड टीका सहन करीत काम केले, पण तेव्हा विरोधकांनी असे खून नाही केले. आज जे घडले ते भयंकर आहे. मन सुन्न झाले.
  • Log in or register to post comments

दाभोळकरांना दोन तीन वेळा

आनन्दिता
Tue, 08/20/2013 - 19:23 नवीन
दाभोळकरांना दोन तीन वेळा प्रत्यक्ष भेटायची संधी मिळली... प्रचंड कार्यक्षम व्यक्तीमत्व.... कट्टर नास्तिकाला ओंकारेश्वरा जवळ म्रुत्यु यावा हा कसला विचित्र योग.... भावपुर्ण श्रद्धांजली!!
  • Log in or register to post comments

महाराष्ट्र वैचारिक अधोगतीच्या

भ ट क्या खे ड वा ला
Tue, 08/20/2013 - 19:33 नवीन
महाराष्ट्र वैचारिक अधोगतीच्या दिशेने चालला आहे ह्यापुढे पुरोगामी महाराष्ट्र म्हणवणार नाही, हे नक्की.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा