चिकन रीझाला / रेझाला

दिपक.कुवेत's picture
दिपक.कुवेत in पाककृती
18 Jul 2013 - 4:30 pm

हि एक पारंपारिक व्हाईट ग्रेव्ही बेस्ड मुघलाई डिश आहे. माझी ग्रेव्हि अंमळ लाल झाली कारण मी लाल मिरच्या वाटणात घातल्या होत्या :D

Chicken

साहित्य:
१. चिकन - १/२ किलो
२. साजुक तुप - २ पळ्या
३. कच्च्या कांद्याची पेस्ट - १ वाटि
४. ५ काजू, ५ सोललेले बदाम, मगज बी आणि पाईन नट्स - प्रत्येकी १ चमचा
५. फेटलेलं दही - १ कप
६. आलं / लसुण पेस्ट - १ चमचा
७. केवडा किंवा गुलाबजलाचे थोडे थेंब
८. तेल - १ पळी
९. गरम मसाला - १/२ चमचा किंवा खडा गरम मसाला - तमालपत्र - २, लवंग - ४, काळी मिरी - ४, दालचिनीचा छोटा तुकडा, हिरवी वेलची २
१०. ओल्या लाल किंवा हिरव्या मिरच्या - बारिक चिरुन ३ ते ४
११. चिमुटभर केशर
१२. चवीनुसार मीठ / साखर
१३. तडक्यासाठि - १ कांद्याचे गोल काप आणि २ सुख्या लाल मिरच्या

कृती:
१. मॅरीनेशन साठी चिकनमध्ये कांद्याची, आलं-लसुण पेस्ट, चिरलेल्या लाल किंवा हिरव्या मिरच्या आणि १ पळि तेल घालुन १ ते १.५ तास फ्रीज मध्ये ठेवून द्या
२. बदाम उकळत्या पाण्यात ५ मि. घाला व थंड झाले कि सोलुन घ्या. नंतर सोललेले बदाम, काजू, मगज बी आणि पाईन नट्सची मिक्सरमधे मुलायम पेस्ट करुन घ्या
3. आता मंद आचेवर एका नॉनस्टिक कढईत / पातेल्यात तुप तापलं कि खडा गरम मसाला घाला
४. मसाले परतले कि त्यात मॅरीनेट केलेलं चिकन घालुन परतत रहा. गरजेपुरत पाणि घालुन मंद आचेवर चिकन शिजवून घ्या
५. आता एक १५ मी. त्यात फेटलेल दहि, व्हाईट पेस्ट घालुन परता. गरज भासल्यास थोडं पाणि घाला जेणे करुन काजू पेस्ट मुळे ग्रेव्ही खाली लागणार नाही
६. आता एक ५ मी. त्यात गरम मसाला (जर खडा गरम मसाला घातला नसेल तर), चवीनुसार मीठ, १ चमचा साखर आणि केवडा किंवा गुलाबजलचे थेंब घाला
७. तोवर दुसर्‍या एका पॅन मध्ये १ पळी तेल गरम झाल कि कांद्याचे गोल काप घालुन परता. कांदा साधारण परतला कि सुख्या लाल मिरच्या घालुन हा तडका चिकनच्या ग्रेव्हीवर घाला व चिकन पुर्ण शीजलं कि गॅस बंद करा
८. हलकस भाजलेलं केशर चुरडून ग्रेव्हीवर घाला
९. गरमागरम चिकन रीझाला पोळी, फुलका किंवा नान सोबत सर्व करा. हे चिकन गर्लिक नान बरोबर उत्तम लागेल हा अंदाज

अवांतर:
१. मुळ पाकॄ मधे काजु/खसखस पेस्ट वापरली आहे. पण कायद्याने ईकडे खसखस बॅन असल्याने मी काजुमधे बदाम, मगज बी आणि पाईन नट्सची घालुन पेस्ट बनवली
२. काजु/बदामाचा गोडपणा पुरणार असेल तर साखर वगळु शकता. पण विश्वास ठेवा फायनल टेस्ट एवढि गोड नाहि होत
३. व्हेजवाले ह्या ग्रेव्हित चिकनएवजी पनीर/मश्रुम (दोन्हि एकत्र छान लागेल) किंवा मिक्स भाज्या (फ्लॉवर, फरसबी, गाजर, मटार, बेबी कॉर्न ई.) वापरु शकता

प्रतिक्रिया

सविता००१'s picture

18 Jul 2013 - 4:38 pm | सविता००१

म्हणून पास. पण मनुष्या, किती छळशील सुंदर वर्णन आणि फोटोंनी? बाद्वे, व्हेज व्हर्जन लग्गेच करुन पाहणार आहे.

वाह ही पाककॄती तर एखाद्या स्वीट डीष पेक्षा सुंदर दिसते आहे.
फोटॉ मस्तच. :)

प्रभाकर पेठकर's picture

18 Jul 2013 - 4:45 pm | प्रभाकर पेठकर

शुद्ध तुपातील पौष्टीक रस्सा आणि ओली + सु़की लाल मिरची त्यावर केशराचे धागे.... एकंदर रुपडे फार आकर्षक आहे. चविष्टही असणारच. करून पाहण्यात येईल.

कपिलमुनी's picture

18 Jul 2013 - 5:07 pm | कपिलमुनी

ती पहाताच रीझाला,,,, कलीजा खल्लास झाला

त्रिवेणी's picture

18 Jul 2013 - 5:11 pm | त्रिवेणी

छ्या, काय हे.
थोडा उशिराने टाकायचा होता हा धागा. आज रात्री मटारची भाजी आहे जेवणात. हे बघुन नाही उतरायची ती घशाखाली.

बॅटमॅन's picture

18 Jul 2013 - 5:39 pm | बॅटमॅन

अहो असं कसं? मटारची भाजी म्हंजे तर चैन फुल्टू =))

बाकी रेशिपीबद्दल आम्ही काय बोलावे-फटू बघून उसासे सोडण्यापलीकडे आपण पामर तसेही काय करू शकतो म्हणा...

त्रिवेणी's picture

19 Jul 2013 - 11:13 am | त्रिवेणी

नाय हो,
मटारची भाजी + शिकरण असेल तरच चैन फुल्टू

अत्रुप्त आत्मा's picture

18 Jul 2013 - 5:35 pm | अत्रुप्त आत्मा

मोडणार...मोडणार..या डिशनी लोकांची उद्याची आषाढी मोडणार!!! =))

स्पंदना's picture

19 Jul 2013 - 4:45 am | स्पंदना

हो ना!
माझा निश्चय डळमळायला लागला आहे.
आता द्वादशीच्या पोळ्या करायचा बेत रद्द करु का?
निषेढ दिपक भौंचा.

वा.. भारी दिसतोय हा प्रकार.. लवकरच करुन बघेन :)

अत्रन्गि पाउस's picture

21 Jul 2013 - 10:26 pm | अत्रन्गि पाउस

अत्याचार आहेत !!!
एक शंका गम्पाभौ!!! मिरच्यानऐवजी पांढरे मिरे/लवंगा वापरले तर??? म्हणजे रंग लालसर होणार नाही ...

कवितानागेश's picture

21 Jul 2013 - 10:56 pm | कवितानागेश

नाई हो.
हे दुसरेच अत्याचारी.. आपले ते हे.. आचारी आहेत!

अत्रन्गि पाउस's picture

22 Jul 2013 - 7:03 am | अत्रन्गि पाउस

माफी मागतो :)...गलतीसे मिष्टेक हो गया

सुहास झेले's picture

22 Jul 2013 - 3:09 am | सुहास झेले

भारीच ... :) :)

हरिप्रिया_'s picture

22 Jul 2013 - 11:54 am | हरिप्रिया_

दिसायला अप्रतिम अन चवीला लाजवाब!!!

खाऊन सांगत आहे, थेट दिपकभौंच्या हातच :)

मस्तच. मगज बी म्हणजे काय

प्रभाकर पेठकर's picture

22 Jul 2013 - 12:59 pm | प्रभाकर पेठकर

लाल भोपळ्याच्या बिया सुकवून आणि साले काढून वापरतात. तशा सोललेल्या बिया तयार मिळतात. त्याला मगज बीज असे म्हणतात. कित्येक मुखवास मध्ये वापरतात. एखाद्या पदार्थाचे कालवण (ग्रेव्ही) घट्ट करण्यासाठी आणि त्याला शाही रुप देण्यासाठी पाण्यात भिजवून मऊ मुलायम दळून ती वापरतात

कलिंगडाच्या ना?

सानिकास्वप्निल's picture

22 Jul 2013 - 2:28 pm | सानिकास्वप्निल

चिकन रेझालाची पाकृ छान
फोटो आवडला :)

भाते's picture

17 Jul 2015 - 8:26 pm | भाते

कशाला या (महा-दुष्ट) माणसाचे जुने धागे उकरून वरती काढता रे! काय मिळतं तुम्हाला? :(

स्वाती दिनेश's picture

18 Jul 2015 - 6:47 pm | स्वाती दिनेश

लवकरच करून पहावी इतकी टेप्टिंग दिसतेय ही डिश..
स्वाती

पद्मावति's picture

18 Jul 2015 - 8:51 pm | पद्मावति

हेच म्हणायचं आहे मलाही.