हि एक पारंपारिक व्हाईट ग्रेव्ही बेस्ड मुघलाई डिश आहे. माझी ग्रेव्हि अंमळ लाल झाली कारण मी लाल मिरच्या वाटणात घातल्या होत्या :D
साहित्य:
१. चिकन - १/२ किलो
२. साजुक तुप - २ पळ्या
३. कच्च्या कांद्याची पेस्ट - १ वाटि
४. ५ काजू, ५ सोललेले बदाम, मगज बी आणि पाईन नट्स - प्रत्येकी १ चमचा
५. फेटलेलं दही - १ कप
६. आलं / लसुण पेस्ट - १ चमचा
७. केवडा किंवा गुलाबजलाचे थोडे थेंब
८. तेल - १ पळी
९. गरम मसाला - १/२ चमचा किंवा खडा गरम मसाला - तमालपत्र - २, लवंग - ४, काळी मिरी - ४, दालचिनीचा छोटा तुकडा, हिरवी वेलची २
१०. ओल्या लाल किंवा हिरव्या मिरच्या - बारिक चिरुन ३ ते ४
११. चिमुटभर केशर
१२. चवीनुसार मीठ / साखर
१३. तडक्यासाठि - १ कांद्याचे गोल काप आणि २ सुख्या लाल मिरच्या
कृती:
१. मॅरीनेशन साठी चिकनमध्ये कांद्याची, आलं-लसुण पेस्ट, चिरलेल्या लाल किंवा हिरव्या मिरच्या आणि १ पळि तेल घालुन १ ते १.५ तास फ्रीज मध्ये ठेवून द्या
२. बदाम उकळत्या पाण्यात ५ मि. घाला व थंड झाले कि सोलुन घ्या. नंतर सोललेले बदाम, काजू, मगज बी आणि पाईन नट्सची मिक्सरमधे मुलायम पेस्ट करुन घ्या
3. आता मंद आचेवर एका नॉनस्टिक कढईत / पातेल्यात तुप तापलं कि खडा गरम मसाला घाला
४. मसाले परतले कि त्यात मॅरीनेट केलेलं चिकन घालुन परतत रहा. गरजेपुरत पाणि घालुन मंद आचेवर चिकन शिजवून घ्या
५. आता एक १५ मी. त्यात फेटलेल दहि, व्हाईट पेस्ट घालुन परता. गरज भासल्यास थोडं पाणि घाला जेणे करुन काजू पेस्ट मुळे ग्रेव्ही खाली लागणार नाही
६. आता एक ५ मी. त्यात गरम मसाला (जर खडा गरम मसाला घातला नसेल तर), चवीनुसार मीठ, १ चमचा साखर आणि केवडा किंवा गुलाबजलचे थेंब घाला
७. तोवर दुसर्या एका पॅन मध्ये १ पळी तेल गरम झाल कि कांद्याचे गोल काप घालुन परता. कांदा साधारण परतला कि सुख्या लाल मिरच्या घालुन हा तडका चिकनच्या ग्रेव्हीवर घाला व चिकन पुर्ण शीजलं कि गॅस बंद करा
८. हलकस भाजलेलं केशर चुरडून ग्रेव्हीवर घाला
९. गरमागरम चिकन रीझाला पोळी, फुलका किंवा नान सोबत सर्व करा. हे चिकन गर्लिक नान बरोबर उत्तम लागेल हा अंदाज
अवांतर:
१. मुळ पाकॄ मधे काजु/खसखस पेस्ट वापरली आहे. पण कायद्याने ईकडे खसखस बॅन असल्याने मी काजुमधे बदाम, मगज बी आणि पाईन नट्सची घालुन पेस्ट बनवली
२. काजु/बदामाचा गोडपणा पुरणार असेल तर साखर वगळु शकता. पण विश्वास ठेवा फायनल टेस्ट एवढि गोड नाहि होत
३. व्हेजवाले ह्या ग्रेव्हित चिकनएवजी पनीर/मश्रुम (दोन्हि एकत्र छान लागेल) किंवा मिक्स भाज्या (फ्लॉवर, फरसबी, गाजर, मटार, बेबी कॉर्न ई.) वापरु शकता

वाचने
12316
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
आम्ही व्हेज वाले
वाह ही पाककॄती तर एखाद्या स्वीट डीष पेक्षा सुंदर दिसते आहे.
करून पाहण्यात येईल.
जबर्या
छ्या, काय हे.
अहो असं कसं? मटारची भाजी
In reply to छ्या, काय हे. by त्रिवेणी
नाय हो,
In reply to अहो असं कसं? मटारची भाजी by बॅटमॅन
मोडणार...मोडणार..या डिशनी
हो ना!
In reply to मोडणार...मोडणार..या डिशनी by अत्रुप्त आत्मा
वा.. भारी दिसतोय हा प्रकार..
अत्याचार!!
गम्पाभौ!!???
In reply to अत्याचार!! by अत्रन्गि पाउस
कान पकडून
In reply to गम्पाभौ!!??? by कवितानागेश
भारीच ...
दिसायला अप्रतिम अन चवीला
मस्तच. मगज बी म्हणजे काय
मगज बीज.
In reply to मस्तच. मगज बी म्हणजे काय by जागु
लाल भोपळ्याच्या बिया सुकवून आणि साले काढून
In reply to मगज बीज. by प्रभाकर पेठकर
चिकन रेझाला
…
मस्त..
हेच म्हणायचं आहे मलाही.
In reply to मस्त.. by स्वाती दिनेश