मदत हवी आहे
नमस्कार,
कामाच्या व्यापामुळे मिपावर लिहिणे कमी (अल्मोस्ट बंदच) झाले असले तरी वाचन मात्र सुरु आहे. असो.
आपली मदत हवी आहे म्हणून हा एक नम्र विनंतीलेख!
कार्यालयाच्या कामानिमित्त ऑगस्ट २०१३ च्या पहिल्या आठवड्यात मूर्सव्हील (उच्चार चुकीचा असल्यास क्षमस्व, पहिल्यांदाच या गावाचे नाव ऐकले आहे), नॉर्थ कॅरोलीना, अमेरिका येथे सहकुटुंब (म्हणजे फक्त बायको आणि मी) जाण्याचे ठरते आहे. अजून इथली बरीच कामे बाकी आहेत. अशा नियोजित परदेशवारीचे विमान केव्हा वाकड किंवा हिंजवडीच्या ट्रॅफीकमध्ये गच्च रुतून बसेल याचा नेम नसतो. परंतु सध्या तरी हे जाणे अटळणीय आहे असे वाटते (असे नेहमीच वाटते). साधारण ६-८ महिन्यांच्या कालावधीसाठी जाणे होईल असे आम्हास सांगण्यात आले आहे.
कुटुंबासोबत प्रथमच परदेशवारी (आणि ती ही अमेरिका) घडते आहे. त्यामुळे जरा टेंशन आले आहे. तिथे घर शोधणे कितपत सोपे आहे आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कशी आहे याचा अजून फारसा अंदाज आलेला नाहे. मला कार चालवता येत नसल्याने (हसणे बंद!) कार्यालयात आणि इतरत्र जाणे-येणे कसे करावे याबाबत भीतीदायक असा संभ्रम मनात ठाण मांडून बसलेला आहे. शिवाय घर शोधणे हे ही एक जिकीरीचे काम आहेच. हे गाव शॉर्लेपासून ('ट' चा उच्चार होतो की नाही माहित नाही, ईलिनॉयमध्ये 'स' चा होत नाही म्हणून इथे 'ट' चा होत नसावा असा भाबडा अंदाज) २५-३० माईल्सवर आहे असे ऐकले आहे. तिथले हवामान कसे आहे हे अजून पूर्णपणे कळालेले नाही.
मिपाकर मंडळींपैकी या भागात राहणारे किंवा या भागात ओळखीचे/मित्र/नातेवाईक राहत असलेले मिपाकर या बाबतीत मदत करू शकतील काय?
विशेषतः घर शोधणे आणि सार्वजनिक वाहतूकीची सोय याबाबतीत कुणी मदत करू शकले तर फार बरे होईल. बाकी उपयुक्त माहिती मिळाल्यास सोने पे सुहागा!
कृपया शक्य असल्यास मदत करावी ही विनंती!
आपला,
समीर
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
प्रतिक्रिया
अपर्टमेंट्साठी बरेचदा कंपनी
एक प्रश्न
सहमत. पण मला नाही वाटत
मार्गे दुबई किंवा फ्रँकफर्ट ...
बरोबर आहे
माझा अनुभव
आपल्या सगळ्यांचे
उत्तरे
आखाती नियम.
सहमत
हो मी सुद्धा बाकरवडी आणलेली. चेकींगमधे त्रास नाही होत.
+१
फोनवर मिळणारी मिनिटे पुरेशी
बरोबर
- एटीअॅन्डटीच्या मोबाइल्सला कॉल करायला कुठलिही मर्यादा नाही.
- नाईट्स अॅन्ड विकेंड (रोज रात्री ९ ते सकाळी ६) व शनिवार, रविवार २४ तास - एकून ५००० मिनिट
- इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल व लँडलाइन्स (इथल्या भाषेत होम फोन्स) - ४५० मिनिट
- या ४५० मिनिटांपैकी उरलेल मिनिट १२ महिन्यांपर्यंत कॅरीफॉर्वर्ड होत राहतात.
- अॅडीशनल फोन केवळ ९.९९ डॉलर/महिना या दरावर जोडता येतो मिनिटांच्या मर्यादा मात्र बदलत नाहीत.
अधिक माहितीएच ४
नाही ते शक्य नाही.
उप्स..
tri band सेल फोन
चांगली माहिती मिळाली......
मी एच१ व्हिसावर येणार आहे
एक बदल
ह्या साईट बद्दल खूप खूप धन्यवाद
:-)
वॉलेंटीअरींग
अहो मला ताई नका म्हणू. हेमांगी म्हणा.
लवकर प्लिज !!!!
नक्की लिहिन
बॅगा.
+१
हो बॅगेच्या दुकानात मिळतील TSA लॉक्स.
hello
धन्य तुमची.
माझ्या मुळे कोणीतरी धन्य झाले
हा हा..
हा हा
धन्यवाद मंडळी
इनकमिंग कॉल्स
आई शप्पथ..
मेडिक्लेम व डोक्टर....
हे फार महत्वाचे
कृपया कुकर आणू नये, कस्टम मधे
माझ्यामते नुकत्याच झालेल्या बॉस्टन प्रकरणामुळे आणि
+१
रंगा व धमू ...
;-)
TSA Confiscatin Pressure Cookers
धन्यवाद!
मनोरंजक माहिती.
वा कलंत्री साहेब.
समीरसूर - आहात कुठे?