नमस्कार,
कामाच्या व्यापामुळे मिपावर लिहिणे कमी (अल्मोस्ट बंदच) झाले असले तरी वाचन मात्र सुरु आहे. असो.
आपली मदत हवी आहे म्हणून हा एक नम्र विनंतीलेख!
कार्यालयाच्या कामानिमित्त ऑगस्ट २०१३ च्या पहिल्या आठवड्यात मूर्सव्हील (उच्चार चुकीचा असल्यास क्षमस्व, पहिल्यांदाच या गावाचे नाव ऐकले आहे), नॉर्थ कॅरोलीना, अमेरिका येथे सहकुटुंब (म्हणजे फक्त बायको आणि मी) जाण्याचे ठरते आहे. अजून इथली बरीच कामे बाकी आहेत. अशा नियोजित परदेशवारीचे विमान केव्हा वाकड किंवा हिंजवडीच्या ट्रॅफीकमध्ये गच्च रुतून बसेल याचा नेम नसतो. परंतु सध्या तरी हे जाणे अटळणीय आहे असे वाटते (असे नेहमीच वाटते). साधारण ६-८ महिन्यांच्या कालावधीसाठी जाणे होईल असे आम्हास सांगण्यात आले आहे.
कुटुंबासोबत प्रथमच परदेशवारी (आणि ती ही अमेरिका) घडते आहे. त्यामुळे जरा टेंशन आले आहे. तिथे घर शोधणे कितपत सोपे आहे आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कशी आहे याचा अजून फारसा अंदाज आलेला नाहे. मला कार चालवता येत नसल्याने (हसणे बंद!) कार्यालयात आणि इतरत्र जाणे-येणे कसे करावे याबाबत भीतीदायक असा संभ्रम मनात ठाण मांडून बसलेला आहे. शिवाय घर शोधणे हे ही एक जिकीरीचे काम आहेच. हे गाव शॉर्लेपासून ('ट' चा उच्चार होतो की नाही माहित नाही, ईलिनॉयमध्ये 'स' चा होत नाही म्हणून इथे 'ट' चा होत नसावा असा भाबडा अंदाज) २५-३० माईल्सवर आहे असे ऐकले आहे. तिथले हवामान कसे आहे हे अजून पूर्णपणे कळालेले नाही.
मिपाकर मंडळींपैकी या भागात राहणारे किंवा या भागात ओळखीचे/मित्र/नातेवाईक राहत असलेले मिपाकर या बाबतीत मदत करू शकतील काय?
विशेषतः घर शोधणे आणि सार्वजनिक वाहतूकीची सोय याबाबतीत कुणी मदत करू शकले तर फार बरे होईल. बाकी उपयुक्त माहिती मिळाल्यास सोने पे सुहागा!
कृपया शक्य असल्यास मदत करावी ही विनंती!
आपला,
समीर
| लेखनविषय: |
|---|
वाचने
41373
प्रतिक्रिया
102
मिसळपाव
प्रतिक्रिया
कृपया कुकर आणू नये, कस्टम मधे
माझ्यामते नुकत्याच झालेल्या बॉस्टन प्रकरणामुळे आणि
In reply to कृपया कुकर आणू नये, कस्टम मधे by gaikiakash
+१
In reply to माझ्यामते नुकत्याच झालेल्या बॉस्टन प्रकरणामुळे आणि by किलमाऊस्की
रंगा व धमू ...
;-)
In reply to रंगा व धमू ... by चौकटराजा
TSA Confiscatin Pressure Cookers
धन्यवाद!
मनोरंजक माहिती.
वा कलंत्री साहेब.
In reply to मनोरंजक माहिती. by कलंत्री
समीरसूर - आहात कुठे?
व्वा, उसगावाबद्दल कित्ती माहित्ती मिळाल्लि ईट्ठे.
चार वर्षांतला बदल