✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

< निशःब्द >

व
विजुभाऊ यांनी
Sat, 07/13/2013 - 17:31  ·  लेख
लेख
आमची प्रेरणा http://misalpav.com/node/25136 सुरेश चे लग्न जमत नसते त्यामुळे तो टेन्शन मधे असायचा. आज बुधवार होता. बुधवारी एक कविता करणे हा सुरेशचा नियम होता त्यामुळे तो आजतरी बाहेर जाणार नव्हता. मात्र लग्न जमत नाही या तेन्शन मुळॅ त्याच्या बुधवारच्या कविता आटल्या होत्या. इतक्यात रमेश चा फोन आला " काय अरे सुरेश बाबांची प्यान्ट टेलरकडुन आणायची विसरलास. मी ती दीड वीत लहान करायला दिली होती. तू सुद्धा ...अरे मी देखील टेलर मास्तरला ती बाबांची प्यान्ट दीड वीत कमी करा म्ह्णून सांगुन आलोय." सुरेश. म्हणजे तु सुद्धा." रमेश " हो" सुरेश त्या प्यान्टचे काय झाले आसेल आत्ता" रमेश. ते ठीक आहे रे. पण बाबा कालपासून सोसायटीत चट्ट्यापट्ट्याची अन्डरप्यान्ट घालूनच फिरताहेत. पार लाज आणली आहे त्याने त्याना प्यान्ट लवकर आणुन द्यायला हवी." सुरेश तु जातोस का टेलर मास्तर कडे" रमेश नको मला तेन्शन आहे" सुरेश कसले टेन्शन? माजेह लग्न जमत नाहिय्ये. तुला माहीतच आहे ना त्यासाठी मी पाम्ढरे बुधवार करतो. सोड रे बुधवार करून कोणाचे काही झालय? आज रामगड ला तमाशा आहे. येतोस. तमाशा? पण आज बुधवार आहे त्याला काय झाले बुधवारी मी वाईट कामे करत नाही. बुधवारी सकाळी धुतोस ना.... हो.ते चांगले काम आहे. वाईट नाही. असो... एका नर्तकीच्या आणि तिच्या साथीदाराना पोटाची भूक भागवण्यासाठी मदत करणे हे देखील पवित्र काम आहे. ते बुधवारी केल्यास पूण्यच मिळेल. असे म्हणतोस...... चल मग येतोच मी. माझी बाईक मागच्या वेळेस जीप उडवताना जीपसोबत नदीत पडली. तीला सर्दी झालीये. स्पार्क प्लग मधुन सारखे मिसफायरचे फट्ट फट्ट आवाज येताहेत. हरकत नाही आपण सोसायटीच्या वॉचमन ची सायकल घेवून जाऊया. चल निघू या. मी तुला हायएव वरच्या धाब्यावर भेटतो. तेथेच जेवू अन जाऊया. हायवेवरच्या धाब्यावर मटार उसळ अन केळ्याचे शिकरण चापून झाल्यावर सुरेश रमेश दोघे तमाशाला गेले. गण झाला गवळण झाली कटाव झाला वग सुरु झाला. वगाच्या मधे एक लावणी आली. " हात सोडा राया माझा..... लगीन ठरलया... अन राया माझं लगीन ठरलया...." रमेश लावणीच्या अदाकारीत गुंग झाला होता. सुरेश मात्र लावणीच्या शब्दानी आणखीच टेन्शन मधे आला. मघा धाब्यावर चापलेल्या केल्याच्या शिकरणाची धुंदी आता जास्तच चढली होती. त्याचा अम्मल म्हणा किंवा टेन्शन म्हणा सुरेश ला आता फार राग येवु लागला. त्याच्या मनात येवू लागले " माझी ही अवस्था झाली त्या गणीताच्या दामले मास्तरांमुळेच त्यानी शाळेत मला गृहपाठात चांगले मार्क दिले असते तर सोनाली पूर्णफातरफेकरने मला त्यावरच्या डिफीकल्टीज विचारल्या असत्या. त्या डिफीकल्तीज मी सोडवून दिल्या असत्या. अन आज माझ्यावर ही अवस्था ओढवली नसते. आज मी रमेश सोबत तमाशा पहाण्या ऐवजी सौ सोनाली सुरेश पूर्णफातरफेकर-अर्धकामे सोबत टीव्हीवर सास बहू मालीका पहात बसलो असतो. सुरेशचा राग वाढत होता. एका क्षणी सुरेश जाग्यावरून उठला. तमाशातील नाच्याला वाटले की सुरेश बक्षीशी देण्याकरीताच उठला आहे. त्याने सुरेशच्या जवळ जात सुरेशच्या हनुवटीला हात लावला. सुरेश चिडलेला हो ताच नाच्याने हनुवटीला हात लावलेले पाहून केळ्याच्या शिकरणीची झिंग जागी झाली त्याने नाच्याला जोरात ओढले. लावणीवर नाचणारी स्त्री अवाक झाली. लावणी थांबली. तसा नाच्या बेहान झाला त्याने सुरेश ला एक ठेवून दिली. तो वार वर्मी बसला. सुरेश तिथेच आडवा झाला. पडताना त्यने डावा हात आधाराला घेतला. डाव्या हातावर पडताना नाच्याने त्याचा उजवा हात धरूनच टेह्वला होता. हात लचकला. सुरेश धुमसतच तमाशाच्या कनातीतून बाहेर पडला. त्याने सायकल घेतली. हात लचकलेला पाय हेलपडत होते. त्यातच केळ्याच्या शिकरणची धुंदी.होतीच. रागारागातच सुरेशने सायकल काढली. अन पायडल हाणत त्याने दामले मास्तरांच्या घराकडे वाटचाल सुरू केली. त्याच्या डोक्यात राग पुर्ण चढलेला होता. काहिही झाले तरी दामले मास्तराना त्यानी केलेल्या पापाचे प्राय:श्चित द्यायचे होते. चढावर सुरेश सायकल हाणत होता. एकदम बुंगाट १५/२० किमी च्या वेगाने सायकल जात होती. गार हवेमुळे मुळे शिकरण आता जास्तच चढू लागले होते. समोरून कोणीतरी अर्जून रनगाडा चालवत येत होते. सुरेश ने नीट पाहिले. ओह्ह्ह न्नो..... सोनाली पुर्णफातफेकर.... सुरेशला आठवले सोनालीचा नवरा नरेश सैन्यात होता. सोनाली अन नरेश बहुतेक रणगाड्यातून पिकनीकला निघाले असावेत. रणगाड्याच्या काचेतून सोनाली नरेशच्या खांड्यावर मान टाकून प्रवास एन्जॉय करत असल्याचे दिसले. सुरेशचा राग अनावर झाला. या असल्या रणगाडावाल्यासोबत गेलीस तू माझ्यात काय कमी होते. रणगाडा नसेल पण माझ्याकडे स्वतःची बाईक होती. त्यावर बसून मला मागून घट्ट मिठी मारत तू अशीच माझ्या बरोबर फिरली असतीस. तुझ्या बापाला तो रणगाडावाला आवडला ना..... दामले मास्तर मिर्दाबाद. सुरेश चे आता भान सुटले होते. रणगाडा त्याला पास करून पुढे गेला. सुरेशने सायकल सिग्नल नसतानादेखील डिव्हायडरवरून यू टर्न घेवून उलट्या दिशेने चालवायला सुरवात केली.आता उतारच होता. जोरात सायकल हाणत सुरेश ने रणगाड्याला गाठले. नरेश आणि सोनाली अर्धफातरफेकर अजूनही तशाच अवस्थेत रणगाड्यात होते. सोनालीच्या मानेचा अँगल आता थोडा अधीकच तिरका झाला होता. तिचे डोळे मितलेले असले तरी त्यातून सूख पाझरत असल्याचे स्पष्ट कळत होएत. सुरेशचा राग आता आवरायच्या पलीकडे गेला. त्याने आणखीनच जोरात हाणायला सुरवात केली. सायकल वेगात पुढे चालू लागली. रणगाडा आता खूपच मागे पडला. नीरा नदीचा पूल ओलांडल्यानंतर सुरेशने पुन्हा एकदा यूटर्न घेतला. सायकलने वेग घेतला. रणगाडा आता समोर फक्त पन्नास फुटांवर होता. सुरेशच्या डोळ्यात खून चढला होता.त्याने ने सयकलचा हॅन्डल घट्ट धरला. पाय्डल वर पाय नीट रोवला. फुल्ल टेन्शन ने पाय खाली नेला...... सायकल वेगात अर्जून रणगाड्याच्या दिशेने निघाली. धडाम ठॉऑऑऑऑऑऑऑऑप. फुस्स्स्स्स्स्स आवाज झाला सायकलची रणगाड्याशी जोरात धडक बसली होती. सुरेशचे इप्सीत साध्य झाले होते. रणगाडा च्या साखळ्या तुटून रणगाडात नदीत कोसळताना त्याला स्पष्ट दिसत होता. डोळ्या समोर अंधार पसरला. शुद्ध आली तेंव्हा सुरेश सिव्हील हॉस्पीटल मधे होता. रनगाडा नदीत पडताना नरेश अन सोनाली ने त्यातून उड्या मारून स्वतःचा जीव वाचवला होता. रणगाड्याच्या चेनमध्ये अडकल्यामुळे सायकलचे पुढच्या चाकाचे दोन स्पोक तुटले होते. सुरेशचा तोल जावून तो नदीत फेकला गेला होता. मात्र सोनाली पूर्णफातफेकर आनि सैन्यातल्या नरेशने त्याचा वाचवले. सुरेश ला हाताच्या कोपर्‍याला खरचतले होते. गावच्या कुंभाराने त्यावर मातीचा लेप देवून सुरेशचा जीव वाचवला होता. ज्या सोनाली पूर्णफातरफेकरला आपण मारण्याचा प्रयत्न केला तीनेच वेळेवर येवून आपला जीव वाचवला. हे समजल्यावर सुरेश निशःब्द झाला. जिला आपण आपले आयुष्य उद्ध्वस्त केल्याबद्दल दोषी ठरवून मारायला निघालो होतो...........तिच्यामुळेच आज मृत्युच्या दारातून आपण परत आलो.............हे समजल्यावर नक्की काय बोलावे तेच त्याला कळत नव्हते...........................!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
बालकथा
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
30965 वाचन

💬 प्रतिसाद (58)

प्रतिक्रिया

भारी

कपिलमुनी
गुरुवार, 10/29/2015 - 16:30 नवीन
जमलयं !
  • Log in or register to post comments

विजुभौ

बोका-ए-आझम
गुरुवार, 10/29/2015 - 16:59 नवीन
जबरी! केळ्याच्या शिकरणाची ही पोटेन्सी? कौनसे बागका केला है ये?
  • Log in or register to post comments

भारी आहे.:):)

दमामि
गुरुवार, 10/29/2015 - 18:19 नवीन
भारी आहे.:):)
  • Log in or register to post comments

केळ्याच्या शिक्रणाची पाककृती

विजुभाऊ
Wed, 05/25/2016 - 14:49 नवीन
केळ्याच्या शिक्रणाची पाककृती ल्ह्यायलाच हवी ;)
  • Log in or register to post comments

जबरदस्त

diggi12
गुरुवार, 08/22/2024 - 17:52 नवीन
जबरदस्त
  • Log in or register to post comments

धन्यवाद दिग्गी.

विजुभाऊ
गुरुवार, 09/05/2024 - 11:00 नवीन
धन्यवाद दिग्गी. हा लेख मी पूर्ण विसरलोहोतो. तुमच्यामुळे परत वाचायला मिळाला
  • Log in or register to post comments

प्रेमभंगाचे दुःख भयंकर असते.

विवेकपटाईत
गुरुवार, 09/05/2024 - 16:03 नवीन
प्रेमभंगाचे दुःख भयंकर असते. पुढच्या कथेत विमानाला धडक द्या. सायकल फुगे बांधून तिला आकाशात उडवा.
  • Log in or register to post comments

आजकाल लोकांना झालंय काय ?

अकिलिज
गुरुवार, 09/05/2024 - 20:25 नवीन
कुठे गेले हे दिवस. अशी कथा वाचून विकेंड भारी जायचे. शुक्रवारी पिताना मित्रांना वाचून दाखवायचो आणि सगळे खुळ्यागत हसायचो. आता हे रिल्स आणि ईन्स्टाच्या जमान्यात लेखकूंना सवड मिळेना कि काय लिवायला. ले दिवसांचा वाचनाचा भुकेला होतो. असे धागे पण वर काडा राव.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा