आमची प्रेरणा https://misalpav.com/node/25136
सुरेश चे लग्न जमत नसते त्यामुळे तो टेन्शन मधे असायचा. आज बुधवार होता. बुधवारी एक कविता करणे हा सुरेशचा नियम होता त्यामुळे तो आजतरी बाहेर जाणार नव्हता. मात्र लग्न जमत नाही या तेन्शन मुळॅ त्याच्या बुधवारच्या कविता आटल्या होत्या. इतक्यात रमेश चा फोन आला
" काय अरे सुरेश बाबांची प्यान्ट टेलरकडुन आणायची विसरलास. मी ती दीड वीत लहान करायला दिली होती.
तू सुद्धा ...अरे मी देखील टेलर मास्तरला ती बाबांची प्यान्ट दीड वीत कमी करा म्ह्णून सांगुन आलोय." सुरेश.
म्हणजे तु सुद्धा." रमेश
" हो" सुरेश
त्या प्यान्टचे काय झाले आसेल आत्ता" रमेश.
ते ठीक आहे रे. पण बाबा कालपासून सोसायटीत चट्ट्यापट्ट्याची अन्डरप्यान्ट घालूनच फिरताहेत. पार लाज आणली आहे त्याने त्याना प्यान्ट लवकर आणुन द्यायला हवी." सुरेश
तु जातोस का टेलर मास्तर कडे" रमेश
नको मला तेन्शन आहे" सुरेश
कसले टेन्शन?
माजेह लग्न जमत नाहिय्ये. तुला माहीतच आहे ना त्यासाठी मी पाम्ढरे बुधवार करतो.
सोड रे बुधवार करून कोणाचे काही झालय?
आज रामगड ला तमाशा आहे. येतोस.
तमाशा? पण आज बुधवार आहे
त्याला काय झाले
बुधवारी मी वाईट कामे करत नाही.
बुधवारी सकाळी धुतोस ना....
हो.ते चांगले काम आहे. वाईट नाही.
असो... एका नर्तकीच्या आणि तिच्या साथीदाराना पोटाची भूक भागवण्यासाठी मदत करणे हे देखील पवित्र काम आहे. ते बुधवारी केल्यास पूण्यच मिळेल.
असे म्हणतोस...... चल मग येतोच मी. माझी बाईक मागच्या वेळेस जीप उडवताना जीपसोबत नदीत पडली. तीला सर्दी झालीये. स्पार्क प्लग मधुन सारखे मिसफायरचे फट्ट फट्ट आवाज येताहेत.
हरकत नाही आपण सोसायटीच्या वॉचमन ची सायकल घेवून जाऊया. चल निघू या.
मी तुला हायएव वरच्या धाब्यावर भेटतो. तेथेच जेवू अन जाऊया.
हायवेवरच्या धाब्यावर मटार उसळ अन केळ्याचे शिकरण चापून झाल्यावर सुरेश रमेश दोघे तमाशाला गेले. गण झाला गवळण झाली कटाव झाला वग सुरु झाला. वगाच्या मधे एक लावणी आली.
" हात सोडा राया माझा..... लगीन ठरलया... अन राया माझं लगीन ठरलया...."
रमेश लावणीच्या अदाकारीत गुंग झाला होता. सुरेश मात्र लावणीच्या शब्दानी आणखीच टेन्शन मधे आला. मघा धाब्यावर चापलेल्या केल्याच्या शिकरणाची धुंदी आता जास्तच चढली होती. त्याचा अम्मल म्हणा किंवा टेन्शन म्हणा सुरेश ला आता फार राग येवु लागला. त्याच्या मनात येवू लागले " माझी ही अवस्था झाली त्या गणीताच्या दामले मास्तरांमुळेच त्यानी शाळेत मला गृहपाठात चांगले मार्क दिले असते तर सोनाली पूर्णफातरफेकरने मला त्यावरच्या डिफीकल्टीज विचारल्या असत्या. त्या डिफीकल्तीज मी सोडवून दिल्या असत्या. अन आज माझ्यावर ही अवस्था ओढवली नसते. आज मी रमेश सोबत तमाशा पहाण्या ऐवजी सौ सोनाली सुरेश पूर्णफातरफेकर-अर्धकामे सोबत टीव्हीवर सास बहू मालीका पहात बसलो असतो.
सुरेशचा राग वाढत होता. एका क्षणी सुरेश जाग्यावरून उठला. तमाशातील नाच्याला वाटले की सुरेश बक्षीशी देण्याकरीताच उठला आहे. त्याने सुरेशच्या जवळ जात सुरेशच्या हनुवटीला हात लावला. सुरेश चिडलेला हो ताच नाच्याने हनुवटीला हात लावलेले पाहून केळ्याच्या शिकरणीची झिंग जागी झाली त्याने नाच्याला जोरात ओढले. लावणीवर नाचणारी स्त्री अवाक झाली. लावणी थांबली. तसा नाच्या बेहान झाला त्याने सुरेश ला एक ठेवून दिली. तो वार वर्मी बसला. सुरेश तिथेच आडवा झाला. पडताना त्यने डावा हात आधाराला घेतला. डाव्या हातावर पडताना नाच्याने त्याचा उजवा हात धरूनच टेह्वला होता. हात लचकला. सुरेश धुमसतच तमाशाच्या कनातीतून बाहेर पडला.
त्याने सायकल घेतली. हात लचकलेला पाय हेलपडत होते. त्यातच केळ्याच्या शिकरणची धुंदी.होतीच. रागारागातच सुरेशने सायकल काढली. अन पायडल हाणत त्याने दामले मास्तरांच्या घराकडे वाटचाल सुरू केली. त्याच्या डोक्यात राग पुर्ण चढलेला होता. काहिही झाले तरी दामले मास्तराना त्यानी केलेल्या पापाचे प्राय:श्चित द्यायचे होते.
चढावर सुरेश सायकल हाणत होता. एकदम बुंगाट १५/२० किमी च्या वेगाने सायकल जात होती. गार हवेमुळे मुळे शिकरण आता जास्तच चढू लागले होते.
समोरून कोणीतरी अर्जून रनगाडा चालवत येत होते. सुरेश ने नीट पाहिले. ओह्ह्ह न्नो..... सोनाली पुर्णफातफेकर....
सुरेशला आठवले सोनालीचा नवरा नरेश सैन्यात होता. सोनाली अन नरेश बहुतेक रणगाड्यातून पिकनीकला निघाले असावेत. रणगाड्याच्या काचेतून सोनाली नरेशच्या खांड्यावर मान टाकून प्रवास एन्जॉय करत असल्याचे दिसले.
सुरेशचा राग अनावर झाला. या असल्या रणगाडावाल्यासोबत गेलीस तू माझ्यात काय कमी होते. रणगाडा नसेल पण माझ्याकडे स्वतःची बाईक होती. त्यावर बसून मला मागून घट्ट मिठी मारत तू अशीच माझ्या बरोबर फिरली असतीस.
तुझ्या बापाला तो रणगाडावाला आवडला ना..... दामले मास्तर मिर्दाबाद. सुरेश चे आता भान सुटले होते. रणगाडा त्याला पास करून पुढे गेला. सुरेशने सायकल सिग्नल नसतानादेखील डिव्हायडरवरून यू टर्न घेवून उलट्या दिशेने चालवायला सुरवात केली.आता उतारच होता. जोरात सायकल हाणत सुरेश ने रणगाड्याला गाठले. नरेश आणि सोनाली अर्धफातरफेकर अजूनही तशाच अवस्थेत रणगाड्यात होते. सोनालीच्या मानेचा अँगल आता थोडा अधीकच तिरका झाला होता. तिचे डोळे मितलेले असले तरी त्यातून सूख पाझरत असल्याचे स्पष्ट कळत होएत. सुरेशचा राग आता आवरायच्या पलीकडे गेला. त्याने आणखीनच जोरात हाणायला सुरवात केली. सायकल वेगात पुढे चालू लागली. रणगाडा आता खूपच मागे पडला. नीरा नदीचा पूल ओलांडल्यानंतर सुरेशने पुन्हा एकदा यूटर्न घेतला. सायकलने वेग घेतला.
रणगाडा आता समोर फक्त पन्नास फुटांवर होता. सुरेशच्या डोळ्यात खून चढला होता.त्याने ने सयकलचा हॅन्डल घट्ट धरला. पाय्डल वर पाय नीट रोवला. फुल्ल टेन्शन ने पाय खाली नेला...... सायकल वेगात अर्जून रणगाड्याच्या दिशेने निघाली.
धडाम ठॉऑऑऑऑऑऑऑऑप. फुस्स्स्स्स्स्स आवाज झाला सायकलची रणगाड्याशी जोरात धडक बसली होती. सुरेशचे इप्सीत साध्य झाले होते. रणगाडा च्या साखळ्या तुटून रणगाडात नदीत कोसळताना त्याला स्पष्ट दिसत होता.
डोळ्या समोर अंधार पसरला.
शुद्ध आली तेंव्हा सुरेश सिव्हील हॉस्पीटल मधे होता. रनगाडा नदीत पडताना नरेश अन सोनाली ने त्यातून उड्या मारून स्वतःचा जीव वाचवला होता. रणगाड्याच्या चेनमध्ये अडकल्यामुळे सायकलचे पुढच्या चाकाचे दोन स्पोक तुटले होते. सुरेशचा तोल जावून तो नदीत फेकला गेला होता. मात्र सोनाली पूर्णफातफेकर आनि सैन्यातल्या नरेशने त्याचा वाचवले. सुरेश ला हाताच्या कोपर्याला खरचतले होते. गावच्या कुंभाराने त्यावर मातीचा लेप देवून सुरेशचा जीव वाचवला होता.
ज्या सोनाली पूर्णफातरफेकरला आपण मारण्याचा प्रयत्न केला तीनेच वेळेवर येवून आपला जीव वाचवला. हे समजल्यावर सुरेश निशःब्द झाला. जिला आपण आपले आयुष्य उद्ध्वस्त केल्याबद्दल दोषी ठरवून मारायला निघालो होतो...........तिच्यामुळेच आज मृत्युच्या दारातून आपण परत आलो.............हे समजल्यावर नक्की काय बोलावे तेच त्याला कळत नव्हते...........................!
< निशःब्द >
वाचने
31942
प्रतिक्रिया
61
मिसळपाव
प्रतिक्रिया
वेड्यासारखी हसत सुटले आहे,
वेड्यासारखी हसत सुटले आहे, कार्यालयातले लोक वेड लागले आहे का असे पाहत आहेत माझ्याकडे, अरे काय हे, काहीतरी …. आणि असा कोणता धाबा आहे जिथे केळ्याचे शिकरण भेटते. बाकी जे काही लिहिले आहे भन्नाट.
****
मीपण
निशःब्द :-)
__/\__ __/\__ __/\__
:D :D :D __/\__ :D :D :D
:D :D :D __/\__ :D :D :D
:D :D :D __/\__ :D :D :D
उत्तम विडंबन
मजा आली वाचून. :)
१. त्या खास केळ्याच्या
चित्र उपलब्ध नाहीचित्र उपलब्ध नाहीचित्र उपलब्ध नाही
१. त्या खास केळ्याच्या शिक्रणाची पाकृ येउ दे.
२.
माझी बाई मागच्या वेळेस जीप उडवताना जीपसोबत नदीत पडली. तीला सर्दी झालीये. स्पार्क प्लग मधुन सारखे मिसफायरचे फट्ट फट्ट आवाज येताहेत.यावरून मागच्या अपघाताचा प्रसंग झाला तेव्हा तुमच्या बरोबर कोणतरी बसले होते असे दिसते. "बाई"ला स्पार्क प्लग असतात ही नविन शास्त्रिय माहिती मिळाली... आतापर्यंत कुठे वाचले नव्हते. सर्दी झाल्यावर बायका शिंकांऐवजी "मिसफायरचे फट्ट फट्ट आवाज" काढतात हेही नवेच. असो.मणोरंजणाबरोबर ज्ञानात पण भर्पूर भर पडली !!! +D +D +D
स्पार्क प्लग
In reply to १. त्या खास केळ्याच्या by डॉ सुहास म्हात्रे
असतात ;)
शोधा म्हणजे सापडेल..
भारी!!
भारी!! :D
गावच्या कुंभाराने त्यावर मातीचा लेप देवून सुरेशचा जीव वाचवला होता. हे मस्तच.
साष्टांग दंडवत विजूभाऊ,
___/\___,
खालचा एकही प्रतिसाद न वाचता लिहितो आहे. नंतर पुन्हा एकदा वाचून योग्य प्रतिसाद देईन.
वाचायला दहा मिनिटे लागली. हसून हसून पोट दुखायला लागले.
आधीचा लेख वाचल्यावर तुमचा प्रतिसाद वाचुन थक्क झालो.
बाकीचे नंतर लिहितो.
हाहाहा!
लै भारी!
विजुभाउ
यु टु? पण सॉल्लीड जमलीये.....केळ्याची शीकरण खासच!
व्हॉट्टे फ्यांटसी !
डिव्हायडरवरून यू टर्न घेवूनचित्र उपलब्ध नाही
शिकरण, बाईकची सर्दी, १५/२० चा
शिकरण, बाईकची सर्दी, १५/२० चा बुंगाट स्पीड, रणगाडा, डिव्हायडरवरून यू टर्न, सगळेच अतिशय जबरी =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) वायझेडसारखा सत्राशेसाठ वेळेला हसत सुटलो आहे अन तोंडातले ताक लॅपटॉपवर पसरलेय!! विजुभौ, किस ढाबे का शिक्रण खाते हो ऐसे विडंबन पाडने के लिये?
ज ब री
ज ब री वि ड म्ब न !!!
;)
काय हो ते " " डॉळामारू
In reply to ज ब री by मंदार कात्रे
काय हो ते " ;) " डॉळामारू स्मायळी तुमची सिग्नेचर आहे काऽय म्हंटो मी, सगळीकडे दिस्ताय ते =))
ब्याटम्यान....... बहुतेक
In reply to काय हो ते " " डॉळामारू by बॅटमॅन
ब्याटम्यान....... बहुतेक सगळेच जण डोळे मारताहेत.
तरी बरं डोळे मारून कुणाचा
In reply to ब्याटम्यान....... बहुतेक by विजुभाऊ
तरी बरं डोळे मारून कुणाचा रणगाडा फोडत नाहीत ते =))
हा हा हा .... महा महाप्रचंड
हा हा हा .... महा महाप्रचंड =)) =)) =))
हॅ हॅ हॅ... आवडेश.
सुरेशचे इप्सीत साध्य झाले होते. रणगाडा च्या साखळ्या तुटून रणगाडात नदीत कोसळताना त्याला स्पष्ट दिसत होता.
हॅ हॅ हॅ...
आवडेश.
ज ब री विडंबन
=))
बरेच दिवसांनी
ड्युएलचे इतके सुरेख वर्णन वाचले. मजा आलि.
_/\_
धन्य आहात... जबरि आहे हे... :)
_^_
काळजाला घरे पाडणारी कथा ;)
त्या घरांची कॉलनी झाली का?
In reply to _^_ by चावटमेला
त्या घरांची कॉलनी झाली का?
कुठली म्हाडाची की अन्य
In reply to त्या घरांची कॉलनी झाली का? by विजुभाऊ
कुठली म्हाडाची की अन्य बिल्डरची?
(No subject)
:-))
आन्गाश्शी
=))
लईच
खंग्री !
पार भुस्काट पाडलतं !!
लेखातील खालील दोन
लेखातील खालील दोन प्रसंगासाठी मिपावुड मध्ये एका फिल्म साठी हक्क देण्यात आलेलेले आहेत.
"एक था ताईगर" चा रीमेक निघतोय.
प्रसंग १ ) रणगाड्याच्या फ्रंट विन्डशील्ड (किती लहान अस्तं म्हैतै?) सुरेश ने सोनाली अन नरेश ला पाहिले तेही सोनाली नरेशच्या खांद्यावर मान टाकून बसली होती. ***या नंतर गाणे आहे " बहारो फूल बरसाऑ ( रीमिक्स)
रणगाड्याच्या चेन मध्ये सायकल अडकून फक्त दोन स्पोक तुटले. रणगाड्याची मात्र चेन तुटली. सुरेश अन सोनाली ने रणगाडा पडताना त्यातून बाहेर उडी मारुन जीव वाचवला.( *** या नंतरही गाणॅ आहे "सोने की हँडल चांदीकी सीट .आओ चले डार्लींग चले डब्बल सीट ( स्लो स्पीड मधे ( ये दोसती हम नही तोडेंगे....... शोले मधे शेवटी जसे होते तसे "
है का नाय सलमान खानचा " एक था ताईगर".... सुपर रीमेक
मेलो..
=)) =)) =)) भारी...
मेलो..
=)) =)) =)) भारी...
मिपावरती विडंबनांचा हॉल ऑफ
मिपावरती विडंबनांचा हॉल ऑफ फेम कुणीतरी सुरू करा राव....लै हसलोय आणि हसतोय हे विडंबन वाचून =)) =))
ह्या ह्या ह्या
ह्या ह्या ह्या =))
विजूभौंना सध्या बराच वेळ मोकळा दिसतोय. ;)
जाकी रं जोरात
कसलं शिरकाण नाट्य हाय !
हहह !
कश्श्याचा काहीही पत्ता लागला
कश्श्याचा काहीही पत्ता लागला नाही... आणि लोक्स बावळ्यागत हसतायत...
मूळ प्रेरणेची लिंक दिलीय ती
In reply to कश्श्याचा काहीही पत्ता लागला by विक्रान्त कुलकर्णी
मूळ प्रेरणेची लिंक दिलीय ती पाहण्याचे अंमळ कष्ट घ्यावेत...मग कळेल काय भानगड आहे ते.
नुस्ते वर्तमान बघुन काय
In reply to कश्श्याचा काहीही पत्ता लागला by विक्रान्त कुलकर्णी
नुस्ते वर्तमान बघुन काय समजणार. इतिहास म्हैत पायजेल
जौंद्या आप्पा...
In reply to कश्श्याचा काहीही पत्ता लागला by विक्रान्त कुलकर्णी
हितली लोकं बावळीच हैत. उगं येड्यासारखी रोज रोज मिपावर येतात काय, रोज रोज लेख वाचतात काय, त्या लेखांचे संदर्भ लक्षात ठेवतात काय अन मग त्यावर आलेली विडंबनंपण वाचतात, त्या विडंबनांच्या वर-खाली कुठेतरी दिलेली लिंक क्लिकवून मूळ धागाही पाहतात काय अन बावळ्यागत हसतात काय! खुळ्याची चावडी है जी सगळी.
त्यातल्यात्यात एक गोष्ट जमेची- विडंबन म्हणजे काय त्ये 'लोक्सांना' ठाऊक आहे, आणि विडंबन कळण्यासाठी मूळ कलाकृती(?) आधी पहावी लागते इतकं उमजतं ह्या खुळ्यांना. :)
आइच्या गावात. ढिश्क्याव
आइच्या गावात. ढिश्क्याव विडंबन आहे एक्दम. विजुभौंना पुढच्या भेटीत एक मस्तानी (प्यायची) सप्रेम भेट ;)
झालं!
In reply to आइच्या गावात. ढिश्क्याव by मृत्युन्जय
केलास ना पचका विजूभौंचा! :P
तरी बरं तो धाब्यावर शिकरण
In reply to झालं! by यशोधरा
तरी बरं तो धाब्यावर शिकरण खायला जाऊयात असे नाही म्हणाला ;)
LOL!
In reply to तरी बरं तो धाब्यावर शिकरण by विजुभाऊ
LOL!
वेड्यासारखा हसलो
वेड्यासारखा हसलो. भारी!
*lol*
*lol*
*lol*
*lol*
कथा तर कथा, प्रतिसादही जबरा आहेत
हा धागा वाचून परत एकदा नि
हा धागा वाचून परत एकदा नि:शब्द होऊन प्रचंड हसल्या गेले आहे =)) =)) =)) =))
वा वा वा.
वा वा वा.
मुळ कथेतील प्रतिसाद अन
मुळ कथेतील प्रतिसाद अन विजूशेठ यांची ही कथा वाचून हसतोय नुसता.
विडंबन वाचुन पुन्हा एकदा मनसोक्त हसु आले.
विडंबन वाचुन पुन्हा एकदा मनसोक्त हसु आले. वाहवा विजुभाऊ.
नुस्ती धमाल.
काय राव नुस्ती धमाल आहे ही कथा. प्यान्ट काय, शिकरण काय, तमाशा काय, सायकल काय, रणगाडा काय अन काय काय.
यापूर्वी वाचली होती तेंव्हा काही समजले नव्हते, कारण प्रेरणा - कथेकडे लक्ष गेले नव्हते. आज दोन्ही कथा वाचल्या आणि कलेजा खलास झाला.
वाचताचि या कथेला, कलेजा खलास झाला.
हा हा हा... फारच जबरी!
हे अफाट विडंबन आणि मूळ कथा (त्यातले प्रतिसाद) सगळंच याआधी वाचायचं राहिलं होतं =)
___/\___ विजुभौ खडक्स!
___/\___
विजुभौ खडक्स!
भारी
जमलयं !
विजुभौ
जबरी! केळ्याच्या शिकरणाची ही पोटेन्सी? कौनसे बागका केला है ये?
भारी आहे.:):)
भारी आहे.:):)
केळ्याच्या शिक्रणाची पाककृती
केळ्याच्या शिक्रणाची पाककृती ल्ह्यायलाच हवी
;)
जबरदस्त
जबरदस्त
धन्यवाद दिग्गी.
धन्यवाद दिग्गी.
हा लेख मी पूर्ण विसरलोहोतो.
तुमच्यामुळे परत वाचायला मिळाला
प्रेमभंगाचे दुःख भयंकर असते.
प्रेमभंगाचे दुःख भयंकर असते. पुढच्या कथेत विमानाला धडक द्या. सायकल फुगे बांधून तिला आकाशात उडवा.
आजकाल लोकांना झालंय काय ?
कुठे गेले हे दिवस. अशी कथा वाचून विकेंड भारी जायचे. शुक्रवारी पिताना मित्रांना वाचून दाखवायचो आणि सगळे खुळ्यागत हसायचो. आता हे रिल्स आणि ईन्स्टाच्या जमान्यात लेखकूंना सवड मिळेना कि काय लिवायला. ले दिवसांचा वाचनाचा भुकेला होतो. असे धागे पण वर काडा राव.
धन्यवाद अकिलीज
In reply to आजकाल लोकांना झालंय काय ? by अकिलिज
धन्यवाद अकिलीज
एक गंभीर प्रश्न उद्भवतोय ....
विजुभाऊ,
कथा चांगली जमलीये. पण एक गंभीर प्रश्न उद्भवतोय.
यावरनं तिचा नवराही त्याच अवस्थेत असावा. मग रणगाडा कोण चालवीत होतं? आपोआप सुटला होता का उतारावरून? तसं असेल तर सुरेशने सायकलीने धडक मारून त्या दोघांचे प्राण वाचवले म्हणायला पाहिजेत. सगळ्या कथेचा बाजंच बदलून जातो. कसं व्हायचं आता !
आ.न.,
-गा.पै.
गामा भाऊ मूळ कथा पहाआमची…
In reply to एक गंभीर प्रश्न उद्भवतोय .... by गामा पैलवान
गामा भाऊ
मूळ कथा पहा
आमची प्रेरणा https://misalpav.com/node/25136