जय परशुराम...जय वामन!!!
आजकाल(म्हणजे अगदी गेली ५ वर्ष सुद्धा)फेसबुकवर ब्राम्हण/ब्राम्हणेतर वादाला नुस्तं उधाण आलय.प्रत्येक जण अगदी आपापली पेजेस करण्यापासून ते ग्रुप्स तयार करण्यापर्यंत अगदी पेटलाय. मी जेंव्हा स्वतःला ब्राम्हण समाजातला घटक म्हणुन पाहातो,आणी आपल्या ऐतिहासिक चुका/घोडचुका तसेच आपल्या समाजबांधवाचे/भगिनिंचे त्याच चुकांची पुनरावृत्ती करणारे वर्तन पाहतो.तेंव्हा मला मोठी गंमत वाटते.आपल्या धर्मातल्या अन्यायी भुमिका/वर्ण श्रेष्ठत्वाचे अहंकार...इत्यादी अनेक गोष्टी आहेत.त्या पाहायच्या नाहीत.समजुनही घ्यायच्या नाहीत. केवळ विरोधकांना नामोहरम करणारी आत्मप्रौढीकडे झुकणारी खंडन/मंडन प्रक्रीया चालु ठेवायची. जातिचे अंधाभिमान/दुराभिमानही बाळगायचे आणी वर पुन्हा हिंन्दूसमाजाच्या/भारतीयत्वाच्या ऐक्याच्या गप्पाही मारायच्या.या दोन्ही भुमिका परस्पर विरोधी/परस्पर विसंगत आहेत हे तर समजुनच घ्यायचं नाही. पुरोगामी विचार मांडणार्यांचा द्वेष करायचा,आणी घेतल्याच काही पुरोगामी भुमिका मनावर तर त्या फक्त प्रतिपक्षाला नामोहरम करण्यासाठी एक धोरण/स्टॅटॅजी म्हणुन घ्यायच्या. असा हा सर्व आपल्या समाजजीवनाचा थक्क करणारा पसारा आहे.मी अनेकदा या जातवादी विद्वानांना निरनिराळ्या भुमिकांवरून छेडलं आहे. उदाहरणादाखल यातली ब्राम्हणश्रेष्ठत्वाची भुमिका काय म्हणते हे आपण पाहू...
ब्राम्हण हे श्रेष्ठ/ज्ञानी असतात... यावर आपण असं विचारलं की,''आपल्यातच जे मूर्ख/मंद/कमी बुद्धीमत्तेचे आहेत त्याचं काय?'' तर ही वस्तुस्थिती आहे,असं न मानता आरोप आहे असं समजुन.''आंम्ही कधी असं म्हटलं की ''फक्त'' ब्राम्हण(च) श्रेष्ठ/ज्ञानी असतात म्हणून!?'' अशी पलटी मारली जाते...मग आपण विचारवं,''आपलं नक्की म्हणणं काय मग?...'' तर , ''अहो जो विद्वान असेल तो(च) ब्राम्हण'' असं दुसरं अजुन पलटी खाणारं उत्तर मिळतं(यातुनच पुढे गुणाधिष्ठित चातुर्वर्ण्याचं सर्मथनंही ऐकायला मिळतं..)...मग आपण त्याच अनुषंगानी शेवटचा प्रश्न टाकावा..की, ''असं जर का आहे,तर मग ब्राम्हणांनी किंवा त्यांनी मागणी केल्यामुळे त्यांच्या धर्म अध्वर्यूंनी,समाजाच्या गुणात्मक विभागणीची आणी पुनर्रचनेची चळवळ का हाती घेतली नाही?'' किंवा येत्या काहि दिवसात ती तुंम्ही हाती घेणार काय?'' तर यावर एकतर उत्तर मिळत नाही..किंवा परिपूर्ण कांगावेखोर पणानी,,,''हेच तुंम्ही दुसर्या जातिंना सांगा...'' वगैरे स्वरुपाची उडवाउडवीची उत्तरं मिळतात. आणी तत्वात जिंकायला येणारी ही माणसं व्यवहारात जरा सुद्धा मनमिळाऊ आणी माणुसकी दाखवणारी नसतात,,,याचा माझ्यासारख्याला पुनःप्रत्यय येतो.
ब्राम्हण ब्राम्हण म्हणुनी माझे
पेव फुटलेले आहे
धुळीत बसलेले ते वादळ
पुन्हा उठले आहे.
जिथे पहावे तेथे आमचे
बोर्ड टांगले आहेत.
ज्याला हवे त्या तागडीत
सोइने तोलले आहेत.
जय परशुराम,जय वामन
ह्याच घोषणा आहेत
नक्की कुणाचा ''बळी'' द्यायच्या
हे लोक तयारीत आहेत?
इतिहास/वर्त-मान तपासायची
गरजच संपली आहे
भयगंडाच्या आत धिटाई
हिंसक झाली आहे.
संघटनांच्या बळा'साठी
घटना हव्या आहेत
तोंडात तत्व नैतिकतेची
मनात(मात्र)शिव्या आहेत.
आपले चेहेरे डागाळलेले
कधि दिसणार आहेत?
आणी ते पहायला कुणाच्या हतात
आरसे... असणार आहेत?
''ते'' काहिही म्हणोत परंतू
चिखल माझ्या घरात आहे.
मी मात्र सामाजिक स्वच्छतेच्या
ऐन...मोसमा/भरात आहे.
===================================================================
+
काही गोष्टी ब्लड बॉर्ण असतात....
मराठ्याच्या पोराला शिवाजी
तलवार नाही पन शिवरायांचा पुतळा ठेवलाय..
काळा पहाड कशाला वैयक्तीक
वरचे कोन आहेत हे माहितीच आहे पण...
वाद वाढवायचा नाहीये.....
या गोष्टी घरादारातून दिल्या
टंकनकष्ट वाचवल्या बद्दल
+१
@या धाग्यामुळे बुवांची अवस्था
अरेरेरेरे....आता तर उरलेली २
मराठा, ब्राह्मणच काय पण
बामन लेखनी विसरु शकत नाही आणी
पुस्तक - प्रश्न आणि प्रश्न
एक उत्तम लेख
ब्राह्मण्य आणि मराठ्य हि दोन
आणि ब्राह्मण्य आणि मराठ्य हे
spell check
आपली लाल; दुस-याचं काळं.
गुर्जींनीच काढला आहे ना धागा?
@सदियो रहा है दुश्मन दौर-ए