आस
मन नाही नाही म्हणते पण
हृदयात आस घन कळवळते
दरवळ मृगजळ मेघांचा
अंतरी आर्त अन वादळते
गोकुळ स्वप्नांची सलगी
जिरवून कथानक वावरते
तापल्या काहिली तृप्त
माळभर धुंधुर माया हिरवळते
ओठात शब्द स्वर कंठातिल
भावना लास्यमय ओघवते
आशेस किनारा वाळूचा
दर्पणी कामना विरघळते
....................अज्ञात
वादळ ते असे आहे का?
"वादळ ते" नाही. ते "वादळते"
वळ मृगजळ मेघांचा
मृगजळ मेघांचा दरवळ आला की
अवघड शब्द ...
कुठला शब्द अवघड वाटला आज ?.
(No subject)
(No subject)
__/\__
तुमचा प्रतिसाद नसला की
छान लिहीता तुम्ही.
मनःपूर्वक आभार
कविता आवडली.
धन्तवाद
दुरुस्ती