Skip to main content

आस

लेखक अज्ञातकुल यांनी गुरुवार, 02/05/2013 19:57 या दिवशी प्रकाशित केले.
मन नाही नाही म्हणते पण हृदयात आस घन कळवळते दरवळ मृगजळ मेघांचा अंतरी आर्त अन वादळते गोकुळ स्वप्नांची सलगी जिरवून कथानक वावरते तापल्या काहिली तृप्त माळभर धुंधुर माया हिरवळते ओठात शब्द स्वर कंठातिल भावना लास्यमय ओघवते आशेस किनारा वाळूचा दर्पणी कामना विरघळते ....................अज्ञात
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2150
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

प्रत्येक कवितेत एखादा तरी अवघड, वापरात नसणारा शब्द तुम्ही वापरता. ते सहज होत असेल, तर ठीक आहे - पण तसा स्वतःला आग्रह करु नका ही कळकळीची विनंती. तुमच्या कविता मला आवडतात पण दरवेळी एखाद्या तरी शब्दाला ठेचकळल्यासारखे वाटते. अर्थात हा माझा प्रश्न आहे, तुमचा नाही याचीही जाणीव आहेच :-)

In reply to by आतिवास

कुठला शब्द अवघड वाटला आज ?. शब्द सहज येतात त्यासाठी माझा कुठलाही अट्टाहास नसतो. असो प्रांजळ प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार :)

:)

__/\__!!

In reply to by अज्ञातकुल

तुमचा धन्यवाद मी दुरुस्त केला आणि कविताही वाचली.