✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

चिन्यांचा उपद्व्याप

क
कोमल यांनी
Fri, 04/26/2013 - 15:45  ·  लेख
लेख
दोन तीन दिवसांपूर्वीच्या पेपर मध्ये आलेल्या बातमीने मनात खळबळ माजवली.
  • चीनी हेलिकॉपर्ट्सची भारतीय हवाई हद्दीत ३०० किमी पर्यंत घुसखोरी
  • चीनी सैन्याची देप्सांग खोऱ्यात सुमारे १० किमी पर्यंत घुसखोरी, ६ दिवसांनंतर भारताला खबर
आणि यावर संरक्षण मंत्रांचे वक्तव्य काहीसे असे होते- "चीनकडून होत असलेल्या घुसखोरीच्या मुद्द्यावर 'शांततापूर्ण' मार्ग काढण्यासाठी विविध पातळ्यांवर 'चर्चा' सुरू आहेत. देशाची एकात्मता आणि सुरक्षा यांचे रक्षण करण्यासाठी सरकार आवश्‍यक ती सर्व पावले उचलत आहे." ghusakhori आहोत कुठे आपण?? नक्की काय सुरु होणार आहे?? कि झालं आहे पण आपल्याला अजून सुगावा लागलेला नाहीये? १९६२ च्या युद्धाची ऐंशीत आणि नव्वदीत जन्मलेल्या आमच्या सारख्यांना फारच पुसट (किंवा अगदी नाहीच) झळ लागलेली. इंडो चायना वॉर बद्दल आम्ही ऐकल आमच्या आजी आजोबांकडून, तत्सम व्यक्तींकडून, वाचलं आंतरजालावरील माहितीपर लेखांतून किंवा भा. रा. भागवतांच्या मानस पुत्र फा. फे. कडून. फा. फे. चा गमतीचा मुद्दा सोडला तर आम्हाला फक्त एवढंच माहित आहे कि चीन सारखा बलाढ्य शत्रू खिशात सुरा घेऊन आपल्या शेजारी येउन बसला होता आणि संधी साधून त्याने आपल्यावर हल्ला केला. तात्कालिक राजकीय परिस्थितीमुळे म्हणा किंवा हिमालयात लष्करास आलेल्या अडचणींमुळे म्हणा आपला त्या युद्धामध्ये पराभव झाला. आता पुन्हा जर फिरून तशी परिस्थिती निर्माण झाली तर परिणाम काय होऊ शकतील? आजवर चीन ने या न त्या मार्गाने भारतासाठी प्रश्न निर्माण केले आहेतच. पाकिस्तानला केलेले अप्रत्यक्ष सहकार्य, गेल्या ३ वर्षांत ६०० वेळा केलेली घुसखोरी, याव्यतिरिक्त चिनी साहित्यांनी भारताची बाजारपेठ आणि खाद्यपेठ मोठ्याप्रमाणात बळकावली आहेच. "हिंदी चीनी भाई भाई(??)" म्हणत म्हणत या भाईने तर दादागिरी दाखवायला सुरुवात केली आहे असे वाटते. भारताचा आणि किती भूभाग हा भाई घशात घालणार आहे कुणास ठाऊक?? आजच्या घडीला भारतात असलेली राजकीय परिस्थिती किंवा राजकीय इच्छाशक्ती(!!)(एका दैनिकाच्या संपादकांच्या मते) चीन ला थोपवू शकेल का? (चीनी बातम्यांनी सुन्न झालेली) कोमल फोटो गूगल कडून साभार
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
102710 वाचन

💬 प्रतिसाद (164)

प्रतिक्रिया

अतिशय असहमत. अस्काइ चीन

ऋषिकेश
Fri, 05/03/2013 - 11:47 नवीन
अतिशय असहमत. अस्काइ चीन अर्थात चीनने बळकावलेला प्रदेश तर त्यांच्याच ताब्यात आहे.
'बळकावलेला' वर काहिसा असहमत / साशंक. यावर इथे वेगळा धागा उघडला होता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोमल

बिस्मार्क

विकास
Wed, 05/01/2013 - 00:00 नवीन
"In international diplomacy there are no permanent friends or permanent enemies, only permanent interests." - Prince von Otto Eduard Leopold Bismark थोडक्यात, जर का आपण आपला (म्हणजे देशाचा) स्वार्थ सांभाळत नसलो तर इतर कुठल्या शत्रूची गरज नाही, आणि पाळत असलो तर इतर आपोआप मैत्रीसाठी हात मागतील.
  • Log in or register to post comments

खरयं...

मदनबाण
Wed, 05/01/2013 - 12:28 नवीन
खरयं... आपलं सध्याच सरकार इतकं दुबळ आहे,की ते स्वतः कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही,आणि लष्करालाही घेउ देत नाही. सारखं यांच तुणतुण वाजवण चालु आहे की चीनला दुखवणे योग्य नाही,पण चीन आपल्या खोड्या काढतोय आणि जागा बळकवुन बसला आहे...जे सरकार त्यांच्या निर्णय पंगुत्वासाठी प्रसिद्ध पावलं आहे,ते कुटनितीचा वापर करण्याची गोष्ट करतो आहे.चीन हळुहळ्य या भागात तंबुंची संख्या आणि सैनिकांची संख्या लवकरच वाढवेल अशी शक्यता मला वाटते. ज्या हिंदुस्थानी सैंन्याने १९७१ मध्ये पाकिस्तान बरोबरचे युद्ध फक्त १३ दिवसात संपवले,तेच हिंदुस्थानी सैन्य या साध्या तंबुंच्या विरोधात साधे पाउलही उचली शकत नाही,हे फक्त आपल्या सरकारच्या दुबळ्या नितीमुळे होत आहे. जर ते आपल्या सिमेत येउन घुसुन तंबु गाडुन बसतात,तर आपल्या सैन्याने देखील त्यांच्या सिमेत घुसायला हवे,मग बघा चीनची प्रतिक्रिया काय होईल... जाता जाता :- चीन जरी लष्करी दॄष्ट्या आपल्या पेक्षा वरचढ असेल तरी सुद्धा आपल्या सैन्याचा युद्ध अभ्यास / अनुभव हा त्यांचा पेक्षा जास्त आहे.त्यांना फक्त सरकारने मोकळीक द्यायची गरज आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

सरकार जे पहिजे ते निर्णय घेते च आहे

प्रसाद१९७१
गुरुवार, 05/02/2013 - 17:00 नवीन
आपलं सध्याच सरकार इतकं दुबळ आहे,की ते स्वतः कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही
त्यांच्या स्वार्थाचे निर्णय अगदी घाईघाईनी घेतय सरकार. २जी, कोळसा, साखर कारखाने - लगेच ताबडतोब निर्णय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

चीनी लष्कराची मागणी !

मदनबाण
गुरुवार, 05/02/2013 - 10:11 नवीन
लडाखमधील लष्करी ठाणी मोडीत काढा
  • Log in or register to post comments

India misreads Chinese

मदनबाण
गुरुवार, 05/02/2013 - 10:40 नवीन
India misreads Chinese incursion, ties itself in knots Chinese incursion 19km, but 750 sq km at stake for India
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

न्युयॉर्क टाइम्समध्ये आलेली बातमी

श्रीरंग_जोशी
Fri, 05/03/2013 - 04:27 नवीन
http://www.nytimes.com/2013/05/03/world/asia/where-china-meets-india-push-comes-to-shove.html?hp&_r=0 या बातमीमधले शेवटचे वाक्य रोचक आहे. The latest spat between India and China is bound to resolve itself this year, one way or another. In six months, snow and bitterly cold weather will make the Chinese encampment very difficult, if not impossible, to maintain.
  • Log in or register to post comments

वा.. क्या बात है..

कोमल
Sun, 05/05/2013 - 20:24 नवीन
निसर्ग तरी मदतीस आहे आपल्या म्हणायचं. पण ती चिनी माणसं आहेत. काय काय तयारी करून आले असतील सांगता येत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

पण मी काय म्हणतो

इरसाल
Fri, 05/03/2013 - 10:17 नवीन
"घेंतला थोडा भाग, घुसलें थोडे मधे तर त्यांची नाकं थोडीच बाणेदार होणार आहेत भारतीयांसारखी, ती तशीच रहातील चपटी-चपटी". बाकी जागेचे थोडे शिंतोडे पाकिस्तान्कडे उडवा बाकीचे चीनकडे, जमल्यास बांग्लादेशालाही द्या अर्ध्य.
  • Log in or register to post comments

चीन बाबत आमचे नेहमीच दुर्लक्ष

आशु जोग
Sat, 05/04/2013 - 13:00 नवीन
चीन बाबत आमचे नेहमीच दुर्लक्ष होते. यासाठी हे पहावे
  • Log in or register to post comments

खूपच छान आणि सुटसुटीत माहिती

कोमल
Sun, 05/05/2013 - 20:19 नवीन
खरोखरच दुर्लक्ष होतं आपलं.. आता पाहिलं पाहीजे खुर्शिद साहेब काय बातमी घेऊन येत आहेत ते..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग

ताज्या बातमी नुसार आज

मदनबाण
Sun, 05/05/2013 - 21:27 नवीन
ताज्या बातमी नुसार आज संध्याकाळी भारतीय प्रमाण वेळे नुसार चीनी सैन्य मागे हटण्यास सुरुवात झाली आहे. आपले ITBP {Indo-Tibetan Border Police} चे लोक उद्या सकाळ पर्यंत दैलत बेग ओल्डी मधेच थांबुन राहणार आहेत आणि चीनी सैन्याची माघात निश्चित झाल्यावर माघारी परतणार आहेत. दुवा:- Indo-China border incursion row ends,withdraw troops from Ladakh
  • Log in or register to post comments

भारतीय प्रमाण वेळे नुसार

मदनबाण
Sun, 05/05/2013 - 21:29 नवीन
भारतीय प्रमाण वेळे नुसार संध्याकाळी ७:३० वाजल्या पासुन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

चीनची ही खुसखोरी तर आपल्याला

मदनबाण
Sun, 05/05/2013 - 21:58 नवीन
चीनची ही खुसखोरी तर आपल्याला कळलेलीच आहे,पण मागच्या महिन्यात त्यांनी वेगळ्याच प्रकारे घुसखोरी केली होती त्याची बातमी सुद्धा याच धाग्यावर सांगणे महत्वाचे आहे. मागच्या काही काळात चीन ने सायबर अ‍ॅटॅक करण्याचे सत्र आरंभले होते आणि त्यात लक्ष होते DRDO{Defence Research and Development Organisation} जास्त माहिती खालील दुव्यांवर मिळेल :--- INDIA's biggest Hack ever DRDO system's data hacked and uploaded in China DNA Exclusive: India's secrets are in Guangdong India’s secrets in China: Chinese hack DRDO security systems
  • Log in or register to post comments

"ते" काय

चिरोटा
Sun, 05/05/2013 - 22:23 नवीन
ईकडे दिलेली माहिती चांगली आहे. The informal border separating China and India is known as the Line of Actual Control. While it has never been formally demarcated, the countries have signed two accords to maintain peace in frontier areas. Both countries have sought to keep the row low-key, keen not to disrupt their booming bilateral trade http://www.scmp.com/news/china/article/1230083/india-foreign-minister-may-cancel-china-trip भांडण मिटलेले दिस्तेय. सूप प्यायला हरकत नाही.!
  • Log in or register to post comments

वाचून बरं वाटलं.

कोमल
Sun, 05/05/2013 - 22:37 नवीन
दिलेल्या माहिती बद्द्ल धन्यवाद मबा. तरीही धोका टळलेला नाहीच. असो. पुन्हा अशा गोष्टींकडे भारताने वेळीच लक्ष पुरवले पाहिजे. योग्य ती काळजी घ्यायला पाहिजे. आपमतलबी चीन कधीच कुरपती काढणं थांबवणार नाही.
  • Log in or register to post comments

मिपाकरांचे आभार

आजानुकर्ण
Mon, 05/06/2013 - 00:16 नवीन
मिपावरील संरक्षण तज्ज्ञांचे अत्यंत आभार. त्यांच्या मोलाच्या मार्गदर्शनामुळे भारत सरकारला चिन्यांच्या कुरापतींची जाणीव झाली व मिपाकरांच्या रेट्यामुळे व सल्ल्यामुळे हा प्रश्न योग्यप्रकारे तडीस नेणे सरकारला भाग पडले. अन्यथा येथेही आपले सरकार तोंडघशी पडले असते.
  • Log in or register to post comments

इथेही भारताचा पराभवच झाला.

श्रीगुरुजी
Mon, 05/06/2013 - 14:22 नवीन
इथेही भारताचा पराभवच झाला. चीनने म्हणे १९ किमी आत येऊन ठोकलेले तंबू काढून टाकले आहेत, पण चीन परत १९ किमी मागे जाणार का थोडेच अंतर मागे जाणार हे अजून नक्की नाही. आणि तंबू काढून टाकण्याच्या बदल्यात चीनने भारताचे नियंत्रण रेषेच्या आतील भारतीय भूभागातील सैन्य मागे घ्यायला लावले आहे. म्हणजे चीनने भारताला स्वतःच्याच भूमीतून सैन्य मागे घ्यायला लावले. आपले सैन्य आपल्याच भूमीतून मागे घ्यायला लागले तरी चीनला भारताच्या हद्दीत घातलेले तंबू काढावे लागले हा भारताचा दैदिप्यमान विजय आहे. अत्यंत मुत्सद्दी रीतीने व शांततेच्या मार्गाने जरब दाखवून चीनला नमवून आपण महासत्ता असल्याची जगाची पुन्हा एकदा खात्री पटविल्याबद्दल युपीए सरकारचे त्रिवार अभिनंदन! आपण राजनैतिक पातळीवर हा प्रश्न सोडवू असे आपले पंतप्रधान म्हणताच चीनला धडकी भरली व लगेच भारताला स्वतःच्याच भूमीतून मागे जायला लावण्याच्या किरकोळ अटीवर चीनने आपले तंबू गुंडाळले. आपल्या सर्वाच्या पूर्वपुण्याईनेच इतके खंबीर व कणखर पंतप्रधान व सरकार आपल्याला लाभले आहे. जय हो!
  • Log in or register to post comments

चीनची भारतीय क्षेत्रातून

श्रीगुरुजी
Tue, 05/07/2013 - 12:26 नवीन
चीनची भारतीय क्षेत्रातून माघार. युपीए सरकारच्या कणखरतेची व समर्थ परराष्ट धोरणाची पुन्हा एकदा प्रचीती. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/19926783.cms
  • Log in or register to post comments

हेच लिहायला आलो होतो. आता

विश्वनाथ मेहेंदळे
Wed, 05/08/2013 - 02:04 नवीन
हेच लिहायला आलो होतो. आता थत्तेचाचा आणि आजानुकर्ण काका काय म्हणतात ते पाहू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

थत्तेचाचा

आजानुकर्ण
Wed, 05/08/2013 - 21:46 नवीन
थत्तेचाचांचे माहिती नाही, पण निदान मी तरी संरक्षणसिद्थतेच्या बाबतीत पूर्णपणे मिपावर अवलंबून आहे. सरकारला काडीचीही अक्कल नसल्याने मिपाकरांवर विश्वास ठेवणे भाग पडते. मिपावरील संरक्षणतज्ज्ञांनी या संपूर्ण प्रकारात भारताने चीनविरोधात शेपूट घातले आहे याची प्रखर जाणीव सरकारला करुन दिली की हे पाऊलही सरकार मागे घेईल येत शंका वाटत नाही. तेवढे नकाशे वगैरे तयार झाले की मिपाकरांतर्फे सरकारला निवेदन जाईलच याची खात्री आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

खरंय

श्रावण मोडक
Wed, 05/08/2013 - 22:00 नवीन
मी गेले काही दिवस हा धागा सातत्यानं पाहतोय. इतरही धागे पाहतोय. चीनच्या त्या संरक्षणविषयक 'व्हाईट पेपर'वर अजून इथं काहीच कसं मतप्रदर्शन नाही झालं तज्ज्ञांचं, असा प्रश्न पडलाय... एवढा ऑनलाईन उपलब्ध असलेला व्हाईटपेपर आणि तरीही इथं मौन? काही तरी गौडबंगाल आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

उपरोध सोडा, मुद्द्याचे बोला.

विश्वनाथ मेहेंदळे
गुरुवार, 05/09/2013 - 00:37 नवीन
उपरोध सोडा, मुद्द्याचे बोला. मुद्दे नसले की हे उपरोध वगैरे वापरून वेळ मारून न्यायची, नै ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

इथले काँग्रेस समर्थक एकदम

श्रीगुरुजी
Wed, 05/08/2013 - 12:35 नवीन
इथले काँग्रेस समर्थक एकदम बेपत्ता झालेले दिसताहेत. मला वाटलं की भारताने चीनवर मिळविलेल्या दैदिप्यमान विजयाबद्दल इथे अभिनंदनाच्या प्रतिसादांचा पूर येईल. पण इथे तर शुकशुकाट दिसतोय. बाकी कोणी नसलं तरी निदान मी तरी या विजयाबद्दल सरकारचं अभिनंदन केलेलं आहे. मी काँग्रेसचा कट्टर समर्थक नसलो तरी काँग्रेसने केलेल्या चांगल्या कामगिरीचं मी नेहमीच कौतुक करतो.
  • Log in or register to post comments

ते तुम्हाला करावे लागेलच हो.

पिंपातला उंदीर
Wed, 05/08/2013 - 12:52 नवीन
ते तुम्हाला करावे लागेलच हो. पण कारगिल मध्ये आपण जो भू भाग गमावला त्याच्याबद्दल काय स्पष्टीकरण देणार आहात आपण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

+१

कोमल
Wed, 05/08/2013 - 14:38 नवीन
काँग्रेसने केलेल्या चांगल्या कामगिरीचं मी नेहमीच कौतुक करतो.
पण फार कमीदा अशी वेळ आली असेल ना?? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

>>> पण फार कमीदा अशी वेळ आली

श्रीगुरुजी
Wed, 05/08/2013 - 20:32 नवीन
>>> पण फार कमीदा अशी वेळ आली असेल ना?? छे छे! अशी वेळ जवळपास रोजच येत असते. काँग्रेसची कामगिरीच अशी आहे की काँग्रेसचं रोज कौतुक करावं लागतं. आता आजचंच बघा. सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा काँग्रेसचं कौतुक केलंय. मग आपण कशाला मागे रहायचं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोमल

असहमत

आजानुकर्ण
Wed, 05/08/2013 - 21:48 नवीन
येथे सरकारचे अभिनंदन करण्याचा प्रश्नच नाही. अभिनंदन त्या मिपाकरांचे की ज्यांनी सरकारला या प्रश्नाची प्रखर जाणीव करुन दिली. त्यामुळे काँग्रेस समर्थक इथे आले नसावेत असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

बाकी कर्नाटक मध्ये

पिंपातला उंदीर
Wed, 05/08/2013 - 12:52 नवीन
बाकी कर्नाटक मध्ये भारष्टाचरामध्ये कॉंग्रेस ची बरोबरी केल्याबद्दल अभिनंदन. आणि निवडणुकी मध्ये ३ क्रमांक वर गेल्या बद्दल सहानुभूती
  • Log in or register to post comments

>>> बाकी कर्नाटक मध्ये

श्रीगुरुजी
Wed, 05/08/2013 - 20:29 नवीन
>>> बाकी कर्नाटक मध्ये भारष्टाचरामध्ये कॉंग्रेस ची बरोबरी केल्याबद्दल अभिनंदन. काँग्रेसची बरोबरी कशी होणार हो? भ्रष्टाचारामध्ये काँग्रेसची पीएचडी आहे तर भाजप अजून लोअर केजीतच गटांगळ्या खातोय. किंवा असं समजा की भ्रष्टाचारामध्ये काँग्रेस वॉलमार्टसारखं एक सुपरमार्केट आहे, तर भाजप किरकोळ वाण्याचं दुकान.
  • Log in or register to post comments

+१

कोमल
Wed, 05/08/2013 - 22:47 नवीन
भ्रष्टाचारामध्ये काँग्रेस वॉलमार्टसारखं एक सुपरमार्केट आहे, तर भाजप किरकोळ वाण्याचं दुकान.
पण शेवटी सगळे एकाच माळेचे मणी की हो गुर्जी.. याचं थोडं कमी, त्याचं थोडं जास्त..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

भाजप लोवर केजी मध्ये आहे हे

पिंपातला उंदीर
Wed, 05/08/2013 - 21:15 नवीन
भाजप लोवर केजी मध्ये आहे हे तरी मान्य केलेत. हे ही नसे थोडके.
  • Log in or register to post comments

युपिए सरकार जिंदाबाद

कोमल
Mon, 05/27/2013 - 10:24 नवीन
भारतात रस्ता पण बांधला राव यांनी, आता फक्त पायघड्या टाकून स्वागत करायचे बाकी आहे. वेलकम चायना
  • Log in or register to post comments

जेव्हा संपूर्ण सरकार

श्रीगुरुजी
Mon, 05/27/2013 - 20:08 नवीन
जेव्हा संपूर्ण सरकार भ्रष्टाचार आणि लूटमार करण्यात गर्क असतं आणि नेतृत्व अत्यंत दुर्बल, निष्क्रीय, निर्विकार, हतबल आणि निर्णयक्षमताहीन असतं, तेव्हा शत्रूराष्ट्रे फायदा उठवणारच. १९४८ आणि १९६२ मध्ये अगदी असंच घडलं होतं. या दुर्बल नेतृत्वाचा गैरफायदा घेऊन अजून पुढील १०-११ महिन्यात पाजीस्तान-चीन सारखी शत्रूराष्ट्रे भारताचं अजून किती नुकसान करणार आहेत खुदा जाने!
  • Log in or register to post comments

?

नितिन थत्ते
Mon, 05/27/2013 - 20:52 नवीन
>>या दुर्बल नेतृत्वाचा गैरफायदा घेऊन अजून पुढील १०-११ महिन्यात पाजीस्तान-चीन सारखी शत्रूराष्ट्रे भारताचं अजून किती नुकसान करणार आहेत खुदा जाने! ऐला !! १०-११ महिन्यांनी काय होणार आहे? भलतेच आशावादी ब्वॉ तुम्ही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

१०-११ महिन्यांनी काय होणार

श्रीगुरुजी
Tue, 05/28/2013 - 11:54 नवीन
१०-११ महिन्यांनी काय होणार आहे? भलतेच निराशावादी ब्वॉ तुम्ही!
  • Log in or register to post comments

चीन ने Depsang, Chumar and

मदनबाण
Fri, 09/06/2013 - 09:39 नवीन
चीन ने Depsang, Chumar and Pangong Tso. या तीन भागात जवळपास 640 sq kms भाग स्वतःच्या ताब्यात घेतला आहे. Image removed. काही दुवे :- China army not letting Indian troops patrol LaC Chinese Army has occupied 640 square km in three Ladakh sectors, says report China 'gobbles’ up 640 sq km of Indian land in Ladakh
  • Log in or register to post comments

चिनी त्यांचा स्वभाव सोडणार

कोमल
Fri, 09/06/2013 - 10:05 नवीन
चिनी त्यांचा स्वभाव सोडणार नाही आणि भारत आपला.. उद्या सकाळी उठून दारात मटा ऐवजी चायना डेली आणि चितळें ऐवजी सान् लू दिसू नये म्हणजे मिळवली..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

नवा वाद...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 06/09/2020 - 17:36 नवीन
आपण भारतीय सध्या कोरोनाने परेशान असतांना चीन्यांनी पुन्हा लडाखकडील काही भागात घुसखोरी केली आहे, असे वाचनात आले नव्या या वादाबद्दल कोणी माहिती देऊन तो सर्व सीमेचा वाद समजावून सांगेल काय ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

कमाल आहे....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 06/09/2020 - 17:43 नवीन
"चीनकडून होत असलेल्या घुसखोरीच्या मुद्द्यावर 'शांततापूर्ण' मार्ग काढण्यासाठी विविध पातळ्यांवर 'चर्चा' सुरू आहेत. देशाची एकात्मता आणि सुरक्षा यांचे रक्षण करण्यासाठी सरकार आवश्‍यक ती सर्व पावले उचलत आहे."
दोनहजार तेरामधलेच वाक्य आताही कालपरवा टीव्हीवर ऐकलं. एकदा या चिन्यांचा बंदोबस्त केला पाहिजे, सारखा आपला काही ना काही भाग भुभाग कोरत असतात. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

या वादाबद्दल कोणी माहिती देऊन

मदनबाण
Tue, 06/09/2020 - 19:46 नवीन
या वादाबद्दल कोणी माहिती देऊन तो सर्व सीमेचा वाद समजावून सांगेल काय ? हा खालचा व्हिडियो पहा :- इतर :- अवांतर :- गुलाल चित्रपटातील माझं आवडत गाण एका वेगळ्या फॉरमॅट मध्ये :-

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Sooni Sooni... :- Cheeni Kum
  • Log in or register to post comments

अडीच किलोमिटर....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 06/10/2020 - 10:34 नवीन
लडाखमधून अडीच किलोमिटर चीनी सैनिक मागे फिरल्याच्या बातम्या येत आहेत व अजूनही आज त्या स्तरावर चर्चा होणार आहे. चला काहीतरी आशादायक घडत आहे. चीनला भीती ही मार्केटचीच आहे, त्याच्यामुळेही थोडा बॅक आला असावा असे वाटते. किती जागेवर ते पुढे आले होते आणि ते किती मागे फिरले यावर अधिकृत काहीही माहिती कुठे दिसत नाही. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

The aggression – and the fact

मदनबाण
गुरुवार, 06/11/2020 - 12:22 नवीन
The aggression – and the fact that Indian Prime Minister Narendra Modi didn’t see it coming – shows just how miserably his China policy has failed. मोदी सरकारच्या चीन रणनीतीचा मोठा पराभव आणि त्याची देशाला चुकवावी लागणारी किंमत ! विरोधाभास :- Amidst ‘Boycott China’, Government of India Creates Official ‘TikTok’ Account ‘Modi’s Aatma Nirbhar Bharat?’ Twitter in Shock After Government of India Creates Official TikTok Account इन्फोवॉर ? :- Old Reports Of RBI Granting Licence To Bank Of China Shared As Recent Amid anti-China feelings, Modi government permits Chinese bank to start operations in India Bank of China Ob­tains Li­cense to Op­er­ate in In­dia

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- There's absolutely no evidence that PLA is willing to roll back its encroachments.
  • Log in or register to post comments

बाणा.....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 06/11/2020 - 12:41 नवीन
अरे आपल्या बळकावलेल्या जागांचं आहे का काही या लिंकांमधे ? लिंका आणि व्हीडीयोवर लै फोकस तुमचा. :) सारांश पण सांगतीला मग बरं पडतं..... -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

अरे आपल्या बळकावलेल्या

मदनबाण
गुरुवार, 06/11/2020 - 16:33 नवीन
अरे आपल्या बळकावलेल्या जागांचं आहे का काही या लिंकांमधे ? एकंदर ६० किलोमीटर चीन ने त्यांच्या ताब्यात घेतली आहे. संदर्भ :- China has captured 60 sq km of Indian land! भारत की 60 वर्ग किमी ज़मीन चीन के कब्जे में, मोदी सरकार चुप, बीजेपी चुप ५६ इंच छाती ६० किलोमीटर जाई पर्यंत काय करत होती बरं ? मोदीं चा निषेध !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- There's absolutely no evidence that PLA is willing to roll back its encroachments.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चीन ने त्यांची तैनाती आणि वेपनरी वाढवली !

मदनबाण
गुरुवार, 06/11/2020 - 21:35 नवीन
चीन ने त्यांची तैनाती आणि वेपनरी वाढवली असुन आपल्या बाजुने देखील आर्टीलरी आणि सैन्याची डिप्लॉयमेंट वाढवली गेली आहे आणि वाढवली जात आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- There's absolutely no evidence that PLA is willing to roll back its encroachments.
  • Log in or register to post comments

India deploys main battle tanks closer to Chinese border

मदनबाण
गुरुवार, 06/11/2020 - 22:04 नवीन
India deploys main battle tanks closer to Chinese border – Defence News of India

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- There's absolutely no evidence that PLA is willing to roll back its encroachments.
  • Log in or register to post comments

अवघड आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 06/12/2020 - 13:54 नवीन
चीनी सैन्य साठ किलोमिटर आत घुसलेय आणि आपण त्यांना मागे अडीच किलोमिटर मागे ढकलले यात आपण खुश दिसत आहोत. गलवान खो-यावर त्यांनी आपला दावा केला आहे. सरकार इतक्या मोठमोठ्या गोष्टी करत असते पण या विषयावर काही कुठे बातम्या दिसत नाही. चीनची ताठर भूमिका गलवान खोरे आपलाच असल्याचा दावा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

चीनने साठ चौरस किलोमीटर भाग

अर्जुन
Fri, 06/12/2020 - 15:09 नवीन
चीनने साठ चौरस किलोमीटर भाग ताब्यात घेतला आहे. साठ किलोमीटर आत आलेला नाही. अडिच किलोमीटर मागे गेला, म्हणजे किती भूभाग सोडला हे नक्की सांगता येणे कठिण आहे.
  • Log in or register to post comments

गणित तसं अवघडच आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 06/14/2020 - 14:42 नवीन
साठ चौरस किमि म्हटलं तरी त्यांनी त्यांनी २४ बाय २.५० कि.मि. भाग बळकावला असेल असे समजू म्हणजे, तरी ते पंचवीस एक किलोमिटर आत घुसलेच आहेत ना ? लांबी रुंदीचा हिशेब लागत नसल्यामुळे नेमका किती भागात घुसखोरी केली आणि अडीच किमी म्हणजे फ़ारच थोडा भाग परत मिळालाय ना ? सरकार इतक्या गप्पा करीत असतं, पण इथे मात बॅकफूटवरच गेलोय हे स्पष्ट आहे, थोडं थोंड करुन पार लडाख पर्यंत येऊ द्या. :( -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्जुन
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा