गुंजे बनकर देश राग...

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
26 Apr 2013 - 2:00 pm

आमची माती आमची माणसं, साप्ताहिकी, अमृतमंथन, प्रतिभा आणि प्रतिमा, छायागीत, गजरा, फक्त शनिवारी आणि रविवारी दाखवले जाणारे मराठी-हिंदी चित्रपट,

सुहासिनी मुळगावकर, विनायक चासकर, विनय आपटे, सई परांजपे, अरुण जोगळेकर, अनंत भावे, प्रदिप भिडे अशी अन
अनेक गुणी माणसं...

वर्ल्ड धीस वीक, चाळ नावाची वाचाळ वस्ती, शोटाइम, हमलोग, नुक्कड, उडान, ये जो है जिंदगी, एक कहानी, सुरभि, बुनियाद, तमस, 'मिले सूर मेरा तुम्हारा', 'बजे सरगम....देश राग', या अवघ्या दोन गाण्यांनी जागवलेली राष्ट्रीय भावना, अशोक चक्रधर संचालित खास होळीनिमित्तचं हिंदी हास्यकविसंमेलन....आणि असे कितीतरी अनेक उत्तम कार्यक्रम....!

dd

आज या सगळ्याची खूप आठवण येते..!
मुंबै दूरदर्शन केन्द्राचे आणि दिल्लीच्या त्या मंडीहाउसचे हे ऋण नक्कीच मान्य केले पाहिजे..

आज म्हणे काहितरी तीनशेहून अधिक वाहिन्या आहेत परंतु एकही वाहिनी सलग १५ मिनिटांच्यावर बघवत नाही ही खरी शोकांतिका आहे, आपली सांस्कृतिक दिवाळखोरी आहे..!

खूप काही पार हरवून बसलो आहोत आपण. आणि म्हणूनच ८० च्या दशकातल्या दूरदर्शनला माझा मानाचा मुजरा...!

-- तात्या.

(८० च्या दशकातल्या अजूनही खूप कार्यक्रमांची नोंद इथे घ्यायची राहिली आहे याची जाणीव आहे. वाचकांनी जमल्यास ती प्रतिसादात करावी ही विनंती)

मौजमजासद्भावनाविरंगुळा

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

26 Apr 2013 - 2:07 pm | विसोबा खेचर

सुहासिनी मुळगावकर या विलक्षण प्रतिभावंत व्यक्तिमत्वाला फारच अल्प आयुष्य लाभलं ही तर फारच दुर्दैवाची गोष्ट. अत्यंत कल्पक होत्या त्या. अनेक उत्तमोत्तम कार्यक्रमांच्या कल्पना सतत त्यांच्या मनात येत असत..!

चिंतामणी's picture

26 Apr 2013 - 3:03 pm | चिंतामणी

मुंबै दूरदर्शन केन्द्राचे आणि दिल्लीच्या त्या मंडीहाउसचे हे ऋण नक्कीच मान्य केले पाहिजे..

सुहासिनी मुळगावकर

नोस्टाल्जिक केलेत.

प्रतीभा आणि प्रतीमा हा दर रवीवरचा कार्यक्रम म्हणजे मेजवानीच असायची.

"बजे सरगम" हे अत्यंत श्रवणीय असं गाणं हे घ्या:

दूरदर्शनवर पूर्वी "नीम का पेड" नावाची सुंदर मालिका लागायची. त्याचं शीर्षकगीत अतिशय अर्थगर्भ होतं. "मूंह की बात सुने हर कोई, दिल के दर्द को जाने कौन? आवाजों के बाजारों में, खामोशी पहचाने कौन?" (जगजीत सिंह, निदा फाजली)

विसोबा खेचर's picture

26 Apr 2013 - 2:34 pm | विसोबा खेचर

>> "मूंह की बात सुने हर कोई, दिल के दर्द को जाने कौन?

अतिशय सुरेख गाणं आहे हे. दुव्याबद्दल अनेकाभार..

अक्षया's picture

26 Apr 2013 - 2:20 pm | अक्षया

वर लिहीलेले सगळेच कार्यक्रम आणि फुल खीले है गुलशन गुलशन..तबत्सुम चा एक आवडता कार्यकम.
चिमणराव गुंड्याभाऊ, मालगुडी डेज व असे अनेक कार्यक्रम आवडते होते.

आता अशा दर्जाचे कार्यक्रम नसतात.

"म्हणूनच ८० च्या दशकातल्या दूरदर्शनला माझा मानाचा मुजरा...!" + १

मन१'s picture

26 Apr 2013 - 2:26 pm | मन१

ह्याच धर्तीवर बरच काही म्हणायचय ते अर्धवट लिहून ठेवलय.
डायरी बाहेर काढावी म्हणतोय.

रमेश आठवले's picture

26 Apr 2013 - 2:35 pm | रमेश आठवले

अलीकडे या commercial वाहिन्यांचा धागड धिंगा आणि मी फर्स्ट हे सांगण्याच्या धडपडी पेक्षा dd1 ,dd2 ,dd भारती , सह्याद्री आणि satellite connection असल्यास आकाशवाणीचे निरनिराळ्या वाहिन्यांवर येणारे कार्यक्रम हे जास्त सुसह्य आणि श्रवणीय वाटू लागले आहेत.

अनुप ढेरे's picture

26 Apr 2013 - 2:47 pm | अनुप ढेरे

ही मालिका कुठे मिळू शकेल का? सीडी अथवा टॉरेंट वर वगैरे? फार इछ्छा आहे बघायची?

अग्निकोल्हा's picture

26 Apr 2013 - 4:51 pm | अग्निकोल्हा

किले का रहस्य
किस्सा शांति का
नुक्कड
गुल गुलशन गुलफाम
हेलो जिंदगी
भारत एक खोज
निव
फास्टर फेणे
बाकी स्पिरीट ऑफ युनीटी कॉन्सर्ट आवडत नाही पण त्याच्या शेवटी कर्यक्रम संपल्यावर येणार्‍या टायटल्सला आर रेहमानने दिलेले चक्क (साउथ) इंडियन क्लासिकल मुजीक एकदम फेव्हरीट.

आदूबाळ's picture

26 Apr 2013 - 10:27 pm | आदूबाळ

हे "किले का रहस्य" काय होतं? याच नावाची सत्यजित राय यांची एक फेलूदा-कथा आहे. त्यावरच आधारित होतं का?

balasaheb's picture

26 Apr 2013 - 5:29 pm | balasaheb

माझा सुध्हा

तुमचा अभिषेक's picture

26 Apr 2013 - 5:36 pm | तुमचा अभिषेक

हि मॅन
जायंट रोबोट
मोगली
देख भाई देख
जबान संभालके
रामायण-महाभारत
नुक्कड
सर्कस
मालगुडी डेज
गोट्या
सुपरहिट मुकाबला (गाण्यांचा टॉप टेन शो)
दादा दादी की कहाणीया (अशोक कुमार)
मिस्टर योगी (बारा राशींच्या मुली बघणारा - काय त्या कलाकाराचे नाव आठवत नाही पण चांगला अभिनय करायचा..)
किले का रहस्य
करमचंद
एक शून्य शून्य
तिसरा डोळा
.
.
.

पण एक मात्र आहे तेव्हा जे आहे त्यात आपण खुष असायचो म्हणून या मालिकांची क्रेझ होती. यावरून त्या आताच्या मालिकांपेक्षा सरस असा निष्कर्श काढता येऊ शकत नाही. आता बरेच पर्याय उपलब्ध असल्याने आपलाच एक हात रीमोटच्या बटणावर असतो, चार मिनिटांच्या वर जाहिराती गेल्या (ज्या खरे तर आजकाल कल्पक बनवतात तरी) आपल्या डोक्याला शॉट लागतो.... कसे झालेय ना, वा रे वा केबलचे चारशे रुपये भाडे द्यायचे, शंभर चॅनेल उपलब्ध असताना आम्ही तुमचा चॅनेल बघायचा आणि तुम्ही आम्हाला जाहीराती दाखवणार... असा आपला अ‍ॅटीट्यूड झालाय.. :)

मराठे's picture

26 Apr 2013 - 7:55 pm | मराठे

>> मिस्टर योगी (बारा राशींच्या मुली बघणारा - काय त्या कलाकाराचे नाव आठवत नाही पण चांगला अभिनय करायचा..)

मोहन गोखले. अत्यंत गुणी आणि अल्पायुशी कलावंत.

(सूर्याची पिल्ले नावाचं एक नाटक आहे आपली मराठीवर त्यात मोहन गोखले आहे.. शिवाय पी.एस.पी.ओ. च्या जाहितातीतही होते. पूर्वी श्वेतांबरा नावाची मालिका असायची त्यात होते)

तुमचा अभिषेक's picture

26 Apr 2013 - 11:37 pm | तुमचा अभिषेक

मोहन आणि गोखले नावाच्या इतर दिग्गज कलाकारामुळे थोडे कन्फ्युजन झाले आणि पटकन आठवले नाही नाव..
बाकी खरेच... अत्यंत गुणी आणि अल्पायुशी कलावंत. :(

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

27 Apr 2013 - 12:29 am | निनाद मुक्काम प...

हे राम मध्ये गोडसे ची भूमिका तेच करणार होते, हसन च्या शब्दात त्यांच्याहून योग्य कलाकार मला शोधून न ही सापडला नसता.
पुढे त्यांच्या अकस्मात निधनानंतर पोंक्षे ह्यांनी ही भूमिका केली.
मिस्टर योगी ची लिन्क
https://www.youtube.com/watch?v=bOQ9j_9ZWUY

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

27 Apr 2013 - 12:33 am | निनाद मुक्काम प...

लिंक काही कारणास्तव देता येत नाही आहे.
काय समस्या आहे ते कळत नाही.

श्रीरंग_जोशी's picture

27 Apr 2013 - 12:40 am | श्रीरंग_जोशी

टेक्स्ट फॉरमॅट फूल एचटीएमएल ऐवजी प्लेन टेक्स्ट निवडून बघ. दुव्यात्त जर अवतरण चिन्हे असली की असे होते कधी कधी.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

27 Apr 2013 - 12:43 am | निनाद मुक्काम प...
श्रीरंग_जोशी's picture

27 Apr 2013 - 1:09 am | श्रीरंग_जोशी

https://www.youtube.com/watch?v

युट्यूबच्या होमपेजला पोचवत आहे :-).

चौकटराजा's picture

26 Apr 2013 - 5:51 pm | चौकटराजा

आताच्या वाहिन्या केवळ "झगमग नकाब "वाल्या आहेत. आमच्या घरातील पुढची पिढी सह्याद्री वाहिनी बघत नाही. मी मनात म्हणतो. सगळे रेलचेल आहे लेको तरीही तुम्ही करंटे. आजही त्या वाहिनीवर चुकून अधून मधून त्यांच्या पूर्व पुण्याईचे अर्काईव्ह प्रकट होते. तो दिवस धन्य होतो. तात्या, काही हिंदी वाहिन्यावर अजूनही अशोक चक्रधर आपल्या दिलखुष व्यक्तिमत्वाचा परिचय अधुन मधून देत असतात.सलमा सुलतान आता साठीला आल्या असतील पण पदराचा कोन तोच असतो. त्याही दिसतात. पण " चिंता करतो विश्वाची " असा चेहरा त्यानी अजूनही बदललेला नाही. तात्या, नरोत्तम पुरीचे क्विझचे कार्यक्रम, डॉ, पदम सिंघवी , सुधीर गाडगीळ बुवा, दिल्लीचे वर्षाअख्रेरीचे कार्यक्रम त्यात डाकूच्या वेषातील बलराम जाखड., नववधूच्या वेषातील किरण बेदी, काय काय आठवू,??.शैल चतुर्वेदी " बापू बोलो" वाले सुरेश शर्मा, चक्रधरांची " खटमलोंकी फरियाद " ही रोचक बोचक कविता. ! गजरा, सुरेश खरे, आणि आजही मनचक्षूसमोरू न हलणारा खास आवडता चेहरा - डो किरण चित्रे.

आता एक कथा ( भुक्कड) घ्यायची त्यात चार पाच पात्रे नेमायची व ती एकतर मनोविकृत ( फार धूर्त किंवा फार सरळ ) दाखवायची. कोमा, आठवण जाणे, डबल रोल असा काहीतरी बाज आणून मुळातील भुक्कड कथेचा आणखीनच बेडबाजा वाजवायचा हे चाललं आहे. यातून अमोल पालेकरांची मोजकीच पात्रे असलेली अनिल चतर्जी व सरिता जोशी यांची " नकाब" डोळ्यासमोर येते. व हत्न हन्त म्हणावेसे वाटते. बाकी आपण स्वगृही आल्याने सचिन आला रे असे मोठ्याने कोकलावेसे वाटत आहे ! धन्स तात्या !

बाळ सप्रे's picture

26 Apr 2013 - 6:14 pm | बाळ सप्रे

पण "व्यत्यय" आणि दिल्लीची दादागिरी (प्रादेशिक कार्यक्रम, क्रिकेट सामने मध्येच तोडुन आपले कार्यक्रम सुरु करणे) डोक्यात जायची. :-(

फार फार पूर्वी "आकाशानंद" वाचकांची पत्रे वगैरे वाचून त्यावर प्रतिक्रीया द्यायचे.

(त्या वेळचा एक फालतू ज्योक आठवला)
वाचकः आजकाल तुम्ही गोट्या का दाखवत नाही?

आदिजोशी's picture

26 Apr 2013 - 8:08 pm | आदिजोशी

चॅनल निवडक आणि कलाकार / कार्यक्रम अनेक असे असल्याने केवळ उत्तमातले उत्तमच डिडिवर येत असावे. आज काल प्रकार उलटा दिसतो. इतक्या वाहिन्यांचे इतके तास भरून काढायचे असल्याने तुलनात्मक दॄष्ट्या चांगले कार्यक्रम कमी झाले असावेत. पण उत्तम कार्यक्रम आजही आहेत हे नक्की. अगदी गंगाधर टिपरे, झोका पासून एका लग्नाची दुसरी गोष्ट, उंच माझा झोका, इत्यादि अनेक आहेतच की.

उपास's picture

26 Apr 2013 - 8:23 pm | उपास

तात्या,
जुन्या आठवणी जाग्या होतात अशा अधून मधून, नॉस्टेल्जिक (मराठि प्रतिशब्द?) वाटणं साहजिकच! मी आकाशवाणीच्या बाबतीत जास्त हळवा होतो, वनितामंडळ, सुषमा हिप्पळगावकर, कामगार सभा, तो बिगुल सकाळची भक्तिगीतं, किर्तनं, पाचव्या रविवारचं नाट्यवाचन, बालदरबार, बिनाका गीतमाला आणि कितितरी..
दूरदर्शनच्या बर्‍याच सिरियल्स आहेत ज्यांचे वर उल्लेख आलेत. लाइफ लाईन म्हणून एक छान सिरियल दूरदर्शन वर होती.
जायंट रॉबोर्ट आवडायचा. 'बनेगी अपनी बात' त्या वयांत आवडायची झी यायला लागला होता तेव्हा नुकताच!
तेव्हा आजी म्हणायची, त्यांच्यावेळेला चिमण गुंड्याभाऊ सारख्या छान सिरियल्स असायच्या/ जुने चित्रपट -नाटकं वगैरे :) असंच असायला हवं आयुष्य! आत्ताही चांगल्या सिरियल्स आहेत की, नीरक्षिरविवेक हवा!
सद्ध्या तू नळीवर गंगाधर टिपरे बघतोय, कितवं पारायण माहित नाही पण अतिशय साधं पण उत्तम, सहज, सुंदर असं काही!

एकूणात जेव्हा विचार करतो तेव्हा वाटतं की त्या सिरियल्स चांगल्या होत्या ह्यात वाद नाही पण त्यांच्या आठवणी मला परत त्या जगात, त्या माणसांत घेऊन जातात ज्यांच्याबरोबर मी हे सगळं उपभोगलय. त्या सिरियल्स बरोबरीने येणार्‍या आठवणी मग किंचित जास्तच हळवं करतात!

ये जो है जिंदगी काय अफलातून कार्यक्रम होता. सतीश शाह ला केवढ्या वैविध्यपूर्ण भूमिकांत पाहीलय तेव्हा. सई परांजपे तेव्हा दूरदर्शनच्या होत्या "संचालक" का काहीशा होत्या वाटतं. त्यांच्या मुलाखतीत त्या म्हणाल्या होत्या "दूरदर्शनचा व्याप सांभाळणं जिकीरीचं काम आहे. प्रेक्षकांना सतत काहीना काही मनोरंजक द्यावं लागतं."

किसन शिंदे's picture

26 Apr 2013 - 9:24 pm | किसन शिंदे

विजय आनंद डिटेक्टीव होता त्या कार्यक्रमाचे नाव काय? आणि त्या कार्यक्रमाचे नाव काय, ज्यात आधी शफी इनामदार होता आणि त्याच्या मृत्यूनंतर सतिश शहा आला, ज्यात राकेश बेदीही होता. जसपाल भट्टीचा एक कार्यक्रम, टिपू सुलतान झालेला संजय खान, झाँसी कि रानी, द ग्रेट मराठा, दर रविवारी सकाळी लागणारी चंद्रकांता....

मराठे's picture

26 Apr 2013 - 9:26 pm | मराठे

तहकीकात

श्रीरंग_जोशी's picture

26 Apr 2013 - 9:32 pm | श्रीरंग_जोशी

झी टिव्ही किंवा इ एल टिव्ही वरची एक विनोदी मालिका होती ती ज्यात काम करत असतानाच्या काळात शफी इनामदार यांचा मृत्यू झाला. नेमके नाव मलाही आठवत नाहीये. पण मालिका आठवत आहे.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

26 Apr 2013 - 11:11 pm | निनाद मुक्काम प...

विजय आनंद च्या मालिकेचे नाव बॅरिस्टर विजय असे होते, ती पहिली डिटेक्टिव मालिका
पुढे परमवीर , hallo इंस्पेक्टर ह्या अधिकारी बंधूंच्या मालिका , विक्रम वेताळ ,
चंद्र कांता , कलियुगातील वाल्मीकी सागर ह्यांच्या रामायण ,कृष्णा तर कलियुगातील व्यास बी र चोप्रा ह्यांचे महाभारत ,व्योमकेश बक्षी , नुक्कड, फौजी , तलाश,
तमस यात्रा अशी न संपणारी यादी आहे,
रेणुका शहाणे ह्यांनी एका मुलाखतीत सुरभी पुनर्जीवित न होण्याचे कारण पूर्वी अश्या कायर्क्रमाला सबसिडी मिळायच्या तश्या आता दिल्या जात नसल्याने सगळे काही टी आर पीच्या नादात संवंग करण्याकडे सगळ्यांचा कल असतो. जबान संभालके , महानगर , श्रीमान श्रीमती , अशी अजून बरीच उदाहरण आहे. बंदीनी जुनी मालिका आणि तिचे तेरा भाग हे उत्कृष्ट साहित्यनिर्मिती होते.
त्यावेळचे कलाकार सुद्धा मालिकेत समरस होऊन जीव लावून काम करत आता सारख्या पाट्या टाकल्या जात नाहीत.
आजकाल सुट्टीच्या दोन दिवसा पैकी एक दिवस मी तू नळीवर एखादी जुनी दूरदर्शन ची संपूर्ण मालिका ८ ते १२ तासात पाहून घेतो.
यात्रा , व्योमकेश बक्षी , भिकाजीराव करोडपती , भारत एक खोज तमस , विक्रम वेताळ , नुक्कड नवीन , जुने अश्या बरेच पाहून झाल्या आहेत. आता चाणक्य पहायची आहे.

महाभारतावर
काही पाहण्यासारखे

नीलकांत's picture

26 Apr 2013 - 9:25 pm | नीलकांत

ब्योमकेश बक्षी विसरलात का?

आणि हो बालचित्रवाणी सुध्दा खुप छान असायचं. :)

श्रीरंग_जोशी's picture

26 Apr 2013 - 11:20 pm | श्रीरंग_जोशी

बालचित्रवाणी - शाळेला सुटी लागल्यावर सकाळी ११ वाजता मुंबई दूरदर्शनवर असायची.

मुलामुलांची मजेमजेची, बालचित्रवाणी,
आम्ही पाखरे आनंदाने, आनंदाने...
गातो गंमत गाणी, बालचित्रवाणी
आमची बालचित्रवाणी.

पुण्यात निर्मिती व्हायची त्या कार्यक्रमांची.

निमिष ध.'s picture

26 Apr 2013 - 9:34 pm | निमिष ध.

आपली रेणूका शहाणे असलेली सुरभी अत्यन्त सुरेख होती. आम्ही दर आठवद्याला वाट पहायचो.

जुन्या TV Serial पहायच्या असतील तर ही साईट पहा.....
http://oldidiotbox.blogspot.in/

नक्की आनंद मिळेल.......