तात्या,
तुमचा वृतांत एकदम छान. धम्याच्या लग्नाला उपस्थित राहल्यासारखेच वाटले. फोटो एकदम छान आले आहेत. धम्या आणि धमी मस्त दिस्ताहेत. एकदम सह्ही. धम्या अगदी सोज्वळ(????) नवरा वाटतो आहे (नसला तरी).
तात्या, किती आम्रखंड भरपूर खाल्लत की नाही? जेवणाचा बेत एकदम जबरा..
सगळंच कसं आता छान छान वाटतं आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
शेवटी आला व्रुत्तांत.... धमी आणि धमु मस्तच दिसतायत....
ते जेवणाचं ताट पाहून भयंकर भूक लागली हो...का चिडवता....
तात्या तुमच्या ताटात अंमळ जास्तच श्रीखंड दिसतय्...मज्जा आहे बॉ..
सगळ्यांनी सॉलीड मजा केलेली दिसतेय्....मस्तच आलेत फोटो...
हा माणूस आज ना उद्या माझ्या व्यक्तिचित्राचा विषय होणार हे नक्की!
अरे वा मस्त व्यक्तिचित्र वाचायला मिळणार ढीन्चॅक ढीचॅक ढीन्चॅक ढीचॅक
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
मिपाकर पाहवयास मिळाले आनंद वाटला. मिपाकरांचे सर्वच गृप फोटो आवडले.
( कुठे तरी दगडफेक करायला निघालेला टोळी वाटली तो भाग सोडून द्या ;) )
धमाल, धमी जोडी सुरेख आहे.
आणि सर्वात आवडला फोटो तो गटनेचा आणि तात्याचा.
तात्यासाहेब, सचित्र वृत्तांत कळवल्याबद्दल आभार !!!
खरं सांगु तात्यानु, सकाळी आंद्याने तो "छोटा वॄत्तांत" टाकल्यावर व त्यात "तुमच्या फोटोवॄत्तांताचा उल्लेख" केल्यानंतर मी याची वाटच पहात होतो. आत्ताच मी आपल्याला खरड टाकणार होतो की "लोहा गरम आहे तेवढ्यात हातोडा" मारा पण आपण त्याआधीच लेख टाकलात. लै ब्येस केलात (आमचं पण त्या भें.. शुलेची ऐशीतैशीच!)
आता आपण आपलं स्वत:ला महामहीम वगैरे म्हणून घ्यायचं, अहो पण कसला आलाय डोंबलाचा महामहीम? या दीडदमडीच्या तात्याला त्या शिवाजीनगगर फलाटावरचं कुत्रंदेखील ओळखत नव्हतं!
=)) =)) =))
अरे बापरे ... असे झाले काय ?
आमच्या पुण्याच्या "कारभार्यांची" एकदा हजरी घ्यायला पाहिजे ...
खुद्द "महामहिम तात्यांची" बेअदबी म्हणजे काय ???
आयला "धम्या" त्या राजेशाही पोषाखात खराच "सरनौबत" दिसत आहे....
बेश्ट !!!!
बरं तेथे वरातीच घोडं नव्हते नाहीतर महाशय लगेच "मोहीमेवर" निघाले असते ...
बाकी प्रत्येकाची ओळख अप्रतिमच ...
आपण पण आंद्याच्या "हेअरस्टाईलला" मानतो ...
आम्हा मिकाकरांसोबत पेठकर वहिनी. प्रभाकर पेठकर मिपावर ज्या छान छान पाकृ टाकतात, त्या वास्तविक त्यांच्या असतात. पेठकर मात्र मधल्यामध्ये भाव खाऊन जातात!
असं आहे तर, ऐकतायं ना पेठकरकाका ???
कुणी का असेना, पाककॄती भारीच असतात !!!
धमाल्या, लेका हा फोटू जपून ठेव हो. अजून काही वर्षांनंतर लोक आश्चर्याने विचारतील, "अरे वा! तुमच्या लग्नाला साक्षात तात्या अभ्यंकर आले होते? तुम्ही कित्ती कित्ती लकी!
मस्त हो ... आवडले ...
धमाल्या, तुझ्या फोनवरचे रेकॉर्ड पण सेव्ह कर ....
पुढं मागं आत्मचरित्र लिहशील तर त्यात लिही की "माझ्या लग्नाच्या वेळी छोट्या डॉनाने आठवणीने फोन केला होता" ...
स्वगत : मार खाणार बहुतेक आता ...
पुणेरी पाटी टिपणार्या "विजुभाऊंसमोर" आम्ही केव्हाच हात जोडले आहेत ...
भरल्या ताटाच फोटो झकासच ...
[ इकडे आमचा जीव जळतो आहे पण त्याला पर्याय नाही. आता हे पाहिल्यावर पोटात "राईस - सांबार" कसे ढकलायचे हाच सध्याचा महत्वाचा प्रश्न. ]
पण ते पंगतीत थोडे काही तरी कमी वाटतेय, प्रत्येकाच्या ताटात "२-३ च जिलब्या" कशा ?
चांगला "ढिग" लावायचा ना जिलब्याचा ...
कार्यालय तर "पुणे-३०" मध्ये नव्हते, वाढणारे वाढपीही "पुणे - ३०" चे असण्याची शक्यता नाही मग अशी गोष्ट घडलीच कशी ?
धमाल्या आला नाही का "आग्रहाची जिलबी " वाढायला ???
[ नेहमीचेच, कॄपया ह. घ्या.]
बाकी मंडळी, तुम्ही खुप मजा केलीत ...
तुम्ही केलेली मजा पाहुन आम्हाला इकडे आनंद झाला.
"मिपाकरांचा असाच स्नेह वाढत राहो हिच विठुचरणी प्रार्थना"
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
अरे खरचं की, मला ते तात्यांच्या ताटात पसरलेले "आम्रखंड" म्हणजे "जिलबी" वाटले रे ...
असो "जिलबी" संमंधीत लिहलेली वाक्ये "ती तेथे नाहीत" असे समजुन उरलेले वाचावे ...
हा ना. नाहितर आमच्या "दिसण्याच्या क्षमतेबद्दल" आत्ता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. उद्या बाकीचे "महाभाग" मला "आंधळा" म्हणून जाहीर करुन टाकतील ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
तात्या,
वृतांत लै भारी दिलायत राव!
एवढी पक्वाने हादडलीत, आयला आमच्या तोंडाल पाणी सुटले.
(मटकीची उसळ सुद्धा लै पेशल दिसली)
सध्या बंगळूरास आहे. हे पदार्थ येथे कोठुन मिळणार?
मुंबईस आल्यावर धाड टाकतो.
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
तात्यानू.... फोटोसकट समिक्षेबद्द्ल मंडळातर्फे हार्दिक धन्यावाद.. सगळेच फोटो जबरा....(थाळी अंम्मळ सहीच)
सर्वांना चापताना पाहून आनंद .. आणि पुण्यात नसल्याने भेट न झाल्याचे दु:ख....
आपण धमूस आम्हा मिपाकरांकडून शूभेच्छा दिल्या असतीलच.....
सखाराम गटणे ने खर्या गटण्याच्या व्यक्तिमत्वाची बरोबरी केलीये...
(ग्रूप फोटो पाहून कुठल्याही मासिकात , चोरट्या अफूची आयात करणारी टोळी- हे पुलंचे बोल आठवले.)
कु.ख.
(ग्रूप फोटो पाहून कुठल्याही मासिकात , चोरट्या अफूची आयात करणारी टोळी- हे पुलंचे बोल आठवले.)
खविसशेठ
जबरा... एकदम चफखल....
:)) :)) :)) :)) हा हा हा हा हा खो खो खो खो =)) =)) =)) पडलो..
असे पक्वांनाने भरलेले ताट बघायचे आणि नंतर मॅगी आणि बनपाव खावा लागणे ह्याच्या सारखा दुसरा करेंटेपणा नाही
(करंटा रेशिडेंट जर्मन)केशवसुमार :''(
स्वगतः तात्याशेठ, प्रकाशचित्रे उत्तम आणि वर्णनही..धन्यवाद
वृत्तांत ...
पुणेकर असून महामहिम तात्या अभ्यंकर आणि मि पा परिवारा बरोबर धम्याच्या लग्नात धमाल करण्याची संधी हुकली..
त्यात असं बेष्ट जेवण पण राहिलं राव ... आम्रखंड उसळ वडे ... मला वाटतंय माझ्या लग्नानंतर परत असं जेवण नाही झालं ... :(
पुढचा नंबर कोणाचा आहे विकेट जाण्याचा... पुण्यात लग्न करा राव... जरा दोन तीन महिन्यानंतर...
धम्या ... अभिनंदन !!
हवेत दिसते आहे.. नवे नवरानवरी छान!
नवर्या मुलाकडच्या जवळच्या नातेवाईकांना फेटा बांधण्याची मध्ये सुरू झालेली परंपरा अजून जारी आहेसे दिसते आहे!
छान आले आहेत फोटो! आणि थाळ्याही स्टीलच्या जाऊन रंगीबेरंगी कधीपासून झाल्या? का हे आनंदमंगल कार्यालयाचे विशेष?
आमच्या लग्नानंतर मला वाटते कुटुंबातील एकाही लग्नाला भारतात नव्हते, त्यामुळे बरेच काही जुनाट संदर्भ आहेत.
तात्या .....फार भुक लागली हो पन्चपक्वान्नपाहुन
मिपा वरच्या लोकास एकत्र पाहुन मजा आली. नागपुरात असताना अशा कित्तीतरी लग्नात मेजवान्याचा फडशा उडविला होता. माहित नाही पुन्हा केव्हा परत अशा पन्गतीत जेवायला मिळेल.
अमेरीकी मनची उवाच.....नशीबाचा खेळ आणखीन काय?
मला तर स्वप्नातही भुक लागते.... :/
धामधुमीतून वेळ काढून धम्या आणि धमी तुमच्यासर्वांसोबत एकदम सजधजके छान दिसताहेत. (मनमोकळेपणाने हसणार्या धमीच्या शेजारी धम्याच्या चेहेर्यावरचे उसनं हसू बरंच काही सांगून जातंय! ;) आता कसं हायसं वाटलं, फार मज्जा करत होतास नाही का एकटा-एकटा? आता भोग आपल्या लग्नाची फळं)
चापा लेको आम्रखंड अन गुलाबजाम! =P~
तीन नंबरच्या फोटोतली 'सोनेरी टोळी' आपल्याला जाम आवडली बाबा! (स्वगत - तात्यांच्या 'भारदस्त व्यक्तिमत्त्वाचा' परिणाम हळूहळू बर्याच जणांवर होऊ लागलाय असे दिसते! :D )
विजूभाऊंनी टिपलेल्या पाटीबाबत काय बोलावे? ते येणार म्हटल्यावर, "विजूभाऊ येणार आहेत, कृपया कोणत्याही पाट्या लावू नयेत. त्यांनी फोटू काढल्यास आम्ही जबाबदार नाही!" अशी पाटी लावायची काळजी कार्यालयवाल्यांनीच घ्यायला नको का?
आणि शेवटी सखाराम गटणे ह्या प्राण्याचे दर्शन झाले व माझ्या इतक्या दिवस तुंबलेल्या उत्सुकतेच्या मोरीचा बोळा निघून मला हायसे वाटले! ;)
(स्वगत - सकाळी सकाळी काटाकिर्र मिसळ चापून झाल्यानंतर माझ्याशी थेट बोस्टनला फोनवर बोलल्याचे लिहायला तात्या विसरलेले दिसतात? हम्म्म्म्म्..चालायचंच, रंगा आतातरी जमिनीवर ये!)
चतुरंग
धन्स तात्या ... एकदम देशवारी घडवलीस..
माझं स्वातंत्र्यही अकरा वर्षांपूर्वी आनंद मंगल इथेच संपलं :)
------
मिसळ कुठे खाल्लीत? 'काटा किर्र' हा प्रकार कुठे आहे पुण्यात ?
--------
(बरेच दिवसा पुणे वारी न झाल्याने उत्सुक) संदीप
फोटो लय झकास! थाळी पाहुन भुक लागली. मस्त मजा केलेली दिसते.
तात्या वर्णन जबरा केले आहे.
आणि शेवटी सखाराम गटणे ह्या प्राण्याचे दर्शन झाले व माझ्या इतक्या दिवस तुंबलेल्या उत्सुकतेच्या मोरीचा बोळा निघून मला हायसे वाटले काय लिहिलय झकास.-
तीन नंबरचा फोटू - चोरट्या अफूची विक्री करणारी टोळी!- हा हा हा.. :)
बाकी, तीन नंबरच्या फोटूतले अर्धेअधिक लोक हे चेहेर्यावरून मोटर वाहन कायदा कलम १८५ चे आरोपी वाटताहेत! :)
तात्या.
तात्या, वृत्तांत वाचून लग्न अटेंड केल्याचा फील आला एकदम. श्री व सौ धमाल मस्तच दिसत आहेत! गृप फोटोही झकास आणि श्रीखंड पुरीचा बेतही फर्स्टक्लास!
हो.. आणि पुणेरी पाटीही नंबर १.
मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
.मनमोकळेपणाने हसणार्या धमीच्या शेजारी धम्याच्या चेहेर्यावरचे उसनं हसू बरंच काही सांगून जातंय! आता कसं हायसं वाटलं, फार मज्जा करत होतास नाही का एकटा-एकटा? आता भोग आपल्या लग्नाची फळं)>>>>>>>..
=))
तात्या सगळे फोटो आणि वर्णन छान. :)
...............
http://picasaweb.google.co.in/zakasrao
तात्या, धन्यवाद,
बाकी फोटो आणि वृतांतावरून लग्नाला जाऊन आल्यासारखे वाटले...
धमु,धमी छान आहे रे....किती गोड हसते आहे...:)
बाकी मि.पा.च्या सदस्यांचे फोटो पण मस्तच...
विजुभाऊंपासून आता पाट्या वाचवायला पाहिजेत, ते माझ्या घरी येणार असतील तर मी दारावरची नावाची पाटी लपवून ठेवेन..:))
काय माहिती, त्यातून नविन शोध लावतील आणि २-३ भागात वर्णन करून इतरांची करमणूक करतील?
त्यातून नविन शोध लावतील आणि २-३ भागात वर्णन करून इतरांची करमणूक करतील
झक्कास्.... ते म्हणतील 'पाटी म्हणजे पाटी म्हणजे पाटी असते, पुण्यात आणि युरोपात खूपच वेगेवेगळी असते'
विजुभाऊ ह.घ्या. हे सा न लगे
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
धमाल मुलाच्या लग्नात खूप मजा आली. तो स्वतः म्हणाला नाही, पण त्यालाही आली असावी.
तात्यांनी फोटो मस्तच टाकले आहेत.
माझ्या आणि तात्यांच्या शेजारी धमाल मुलगा आणि त्याची चि.सौ.का. वधू म्हणजे अगदीच कायदा मोडून केलेला बाल-विवाह असल्यासारखे वाटते आहे.
आमच्या डांबिस प्रभाकरला एवढी साधी अन् सोज्वळ बायको मिळाली तरी कशी?
तात्या, उसके लिए जोहरीकी नजर होनी चाहिए।
हा: हा: हा: लग्नापूर्वी मलाही असेच (साधी अन् सोज्वळ) वाटले होते.
प्रतिक्रिया
:)
वा..
+१
+२
आहा!!!
+१
चित्रवृत्तांत लै भारी.
व्वा, झक्कास !!!
जिलेबी?????
आयचा घो ...
छान आलेत
खरंच!
धमुचे लग्न!
मायला....
फोटो मस्त.
लई बेष्ट
हा हा हा!!
छ्याआआआआआ
झकास
लग्नाचे वातावरण
तात्या .....फार भुक लागली हो पन्चपक्वान्नपाहुन
मस्त फोटू आणि वर्णन तात्या!
धमाल .. धम्याच्या लग्नाची
धुम-४
लय भारी
:)
मस्त
चागले लिहले अहे
:)
मस्त
+१
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
.मनमोकळेपण
मस्त धमाल केलेली दिसते?
हाण तायडे
ही ही ही
मजा आली....