काठमांडू ते कंदाहार - Flight IC 814
1998 साली झालेल्या विमान अपहरणाबद्दल अनेक ठिकाणी अनेकवेळा सतत चर्चा होत असते.
श्री श्रीरंग जोशींनी या घटनेसंदर्भात विस्तृत लेखन दिवाळी अंकामधील काठमांडू ते कंदहार या लेखामध्ये केले आहेच.
अनेक ठिकाणी होणारे विषयांतर पाहता या विषयावर हा धागा काढत आहे. या धाग्यामध्ये आपण या अपहरणासंदर्भात चर्चा करूया.
संपादक मंडळास नम्र विनंती.
१) माहेरच्या अव्हेरावरचे प्रतिसाद इथे शिफ्ट करणे शक्य असेल तर कृपया करावेत - तिथले विषयांतर टळेल.
२) सदर धागा अस्थानी किंवा अनावश्यक वाटत असेल तर जरूर उडवावा - माझी हरकत नाही.
सदर अपहरणादरम्यान अपहरणकर्त्यांकडून मारल्या गेलेल्या रूपेन कट्याल यांना श्रद्धांजली.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
ईस्त्राईलने ती कारवाई
ईस्त्राईलने ती कारवाई करण्यापूर्वी पंतप्रधान गोल्डा मायर यांनी ओलीसांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला होता त्यावेळी नातेवाईकांच्या जीवापेक्षा देशहित महत्वाचे आहे असे सांगून सरकार जो काही निर्णय घेईल त्याला पूर्ण पाठींबा दिला होता असे वाचल्याचे आठवते.तपशीलामध्ये फरक आहे... १) ऑपरेशन एंटबे दरम्यान "यित्झॅक राबीन" हे इस्राईलचे पंतप्रधान होते २) ओलीसांच्या नातेवाईकांनी पंतप्रधान राबीन यांच्या निवासस्थानावरील सैनिकांचे संरक्षक कडे तोडून व सैनिकांना धक्काबुक्की करून राबीन यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता व ओलीसांच्या सुटकेसाठी वाटाघाटी करा अशी जाहीर विनंती केली होती. बाकी समाजाच्या प्रगल्भतेबद्दल हेच म्हणावेसे वाटते की.. कितीही उदात्त विचार केला तरी वैयक्तीक पातळीवर आपण थोडेफार स्वार्थी असतो. "माझे नातेवाईक या विमानांमध्ये असते तर...?" या प्रश्नाचे आपल्याबाबतीतले उत्तर सर्व प्रश्नांना पूर्णविराम देते. इस्राईलमधले आणखी एक उदाहरण - एंटबे संदर्भातलेच.. एंटबे विमानतळावरती हल्ल्याच्या सुरूवातीच्या क्षणांदरम्यान योनी नेतान्याहू च्या आदेशावरून मुकी बेत्सर या योनीच्या सहकार्याने दोन सैनीकांवर गोळ्या झाडल्या होत्या व या गोळ्यांच्या आवाजामुळे "Element of Surprise" राहिले नाही व याचा परिणाम योनी नेतान्याहूच्या मृत्यूमध्ये झाला. या मुद्द्यावरून योनी नेतान्याहूचा लहान भाऊ व सध्याचे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू आणि मुकी बेत्सर यांनी एकमेकांवर उघड उघड आरोप केले आहेत. हे उदाहरण द्यायचा उद्देश हाच आहे की.. आपण आपल्या कुटुंबीयांच्या बाबतीत हळवे असतो, देशप्रेमापुढे वा देशाच्या भलाईपेक्षाही!धन्यवाद
"कारगिल नुकतेच झाले होते ..
हा प्रतिसाद खूपच आवडला.
या प्रकरणामध्ये भारताने
या प्रकरणामध्ये भारताने अतिरेक्यांपुढे गुडघे टेकले, वाजपेयी नेभळट निघाले, भारताची अब्रू गेली, सरकारने बेजबाबदारपणाचा कळस केला, इस्राएलसारखा चिमूटभर देश जे करू शकला ते भारत करू शकला नाही, कमांडो कारवाई करून अतिरेक्यांना मारणे सहज शक्य होते पण भारत सरकारने बेपर्वाई दाखविली इ. दोषारोप "लोकसत्ता"तून कुमार केतकर व इतर काही माध्यमे सातत्याने करत असतात. इथले काही सभासद असेच प्रतिसाद देत होते. या चर्चेतील काही माहितीपूर्ण प्रतिसादांमुळे त्यांना वस्तुस्थिती लक्षात आली असेल अशी आशा आहे.+१११११११११११११यापुढे
विमान पाडावे ?
श्रीरंग जोशी , सूर्याजीराव ,
>>>चार दूतावास
चार कॉन्स्युलेट्स असाव्यात
"माझ्या माहितीप्रमाणे तालिबान
माझी लिहिण्यात चूक झाली
वाणिज्य दूतावास म्हणा :-)
माझी लिहिण्यात चूक झाली
आपला Northen Alliance ला
विकीपेडिया वर वाचली माहिती
कंदाहार प्रकरणावर चर्चा
कंदाहार प्रकरणावर चर्चा
कंदाहार प्रकरणावर चर्चा करण्यासाठी सेपरेट चर्चा करायची आहे त्यात पुन्हा एटांबे, पांडे वगैरे प्रकरणे कशाला.मान्य - अवांतर झाले आहे परंतु ते धागा काढला त्यावेळी माहेरच्या अव्हेरावरती दिलेले प्रतिसाद होते. मला या घटनांविषयी अधिक माहिती नसल्याने "स्वपार्टीसमर्थक" इथे थोडा प्रकाश टाकतील अशी अपेक्षा होती! (ह.घ्या.) एंटबेचा उल्लेख आला कारण अनेकदा तपशीलातील चुका बर्याच गोष्टींना वेगळे वळण लावतात... उदा लाल टोपी यांचा हा प्रतिसाद.ईस्त्राईलने ती कारवाई करण्यापूर्वी पंतप्रधान गोल्डा मायर यांनी ओलीसांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला होता त्यावेळी नातेवाईकांच्या जीवापेक्षा देशहित महत्वाचे आहे असे सांगून सरकार जो काही निर्णय घेईल त्याला पूर्ण पाठींबा दिला होताही वस्तुस्थिती नाहीये, आणि हा गैरसमज दूर करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला.कंदाहारचे निमीत्त पण काँग्रेस किती वाइट आणि भाजपा किती स्वच्छ ह्यावरच चर्चा हवी असेल तर ती माहेरचा अव्हेर मधे चालूच आहे.काँग्रेस वाईट आहे आणि भाजपा स्वच्छ आहे असे मी म्हणालो आहे का..? हे तुमचे मत असेल तर माझी काहीच हरकत नाही. तुम्ही भाजपाला वाईट म्हणाला आणि काँग्रेसला चांगले म्हणाला तरीही माझी हरकत नाही. ;-)कॉग्रेसने केलेली चूक लक्षात
विशेष प्रवासी
विशेष प्रवासी
विशेष माहितीबद्दल धन्यवाद
९/११
९/११च्या हल्ल्यातील युनायटेड
९/११च्या हल्ल्यातील युनायटेड ९३ विमानातील प्रवाशांसारखे धाडसी कृत्य IC 814 प्रवाशांनाही का करता आले नाही?युनायटेड ९३ च्या प्रवाशांनी अपहरणाची बातमी देण्यासाठी आपापल्या कुटुंबीयांना मोबाईलवरून कॉल केले तेंव्हा त्यांना ९/११ बद्दल समजले. म्हणजेच त्यांना माहिती होते की ट्वीन टॉवर्स वर विमाने धडकली आहेत व आपणही असेच कुठेतरी आदळणार आहोत. अपहरण झाल्यानंतर युनायटेड ९३ काही मिनिटे अत्यंत कमी उंचीवरून उडत होते व युनायटेड ९३ च्या प्रवाशांनी बदललेला रूट फ्लाईट अटेंडंट्सच्या मदतीने "गेस" केला होता. या सर्व घटनांची परिणीती "मृत्यू निश्चित आहे" या धारणेत झाली व त्यामुळे जिवावर उदार होवून प्रवाशांनी कॉकपीटवर हल्ला केला असावा. त्या सर्व प्रवाशांनी दाखवलेल्या धाडसामुळे व्हाईट हाऊस / कॅपीटल बिल्डींग शाबूत राहिली असे म्हणायला हरकत नाही. अवांतर - ९/११ च्या घटनेमध्ये बहुतांश विमानांमध्ये अपहरणकर्त्यांनी प्रवाशांना फारसा उपद्रव न करता सरळ कॉकपीटवर हल्ला करून तेच ताब्यात घेतले होते व स्वतःला तिथे कोंडून घेवून विमाने लक्ष्यांवर धडकवली! यामुळे "नक्की काय चालले आहे" हे अनेक प्रवाशांना लक्षात आले नसावे अतीअवांतर - होलोकॉस्टमध्ये कैद्यांना जाणीवपूर्वक "मृत्यू निश्चित आहे" या भावनेची जाणीव करून दिली नव्हती. "जिवंत राहण्याची आशा" अशा घटनांमध्ये परिस्थिती आणि प्रतिकाराच्या मनस्थितीवर प्रभाव टाकत असावी. :-(जर त्या विमानातील १००+ देशबांधवानी ६ अतिरेक्यांचा मुकाबला करून इतिहास बदलला असता.तुमच्या भावना समजू शकतो परंतु अपहरणकर्त्यांनी रूपेन कट्याल ला भोसकून आणि मारहाण करून दिलेला मृत्यू दहशत बसवण्यास पुरेसा असावा असे वाटते.कुठल्याही अतिरेकी संघटनेचे धाडस झाले नसते पुन्हा इथे येवून दहशतवादी कारवाया करण्याचे.हा गैरसमज आहे - प्रतिकाराची एखादी घटना इतक्या टोकाची दहशत बसवू शकत नाही. (असे मला वाटते!)देशाची आणि देशवासियांची प्रतिमा संपूर्ण जगात उंचावली असती.पास. *********** इतिहास बदलणे, देशाची प्रतिमा उंचावणे वगैरे गोष्टी माझ्या"नंतर" घडणार असल्याने अशा घटनांमध्ये "नंतर" फॅक्टर निर्णायक ठरत असावा.बेल बॉटम चित्रपटाची कथा
ते दिल्ली - श्रीनगर विमान (१९८४)
काही जणांना वस्तुस्थिती