Skip to main content

काठमांडू ते कंदाहार - Flight IC 814

लेखक मोदक यांनी रविवार, 24/03/2013 23:12 या दिवशी प्रकाशित केले.
1998 साली झालेल्या विमान अपहरणाबद्दल अनेक ठिकाणी अनेकवेळा सतत चर्चा होत असते. श्री श्रीरंग जोशींनी या घटनेसंदर्भात विस्तृत लेखन दिवाळी अंकामधील काठमांडू ते कंदहार या लेखामध्ये केले आहेच. अनेक ठिकाणी होणारे विषयांतर पाहता या विषयावर हा धागा काढत आहे. या धाग्यामध्ये आपण या अपहरणासंदर्भात चर्चा करूया. संपादक मंडळास नम्र विनंती. १) माहेरच्या अव्हेरावरचे प्रतिसाद इथे शिफ्ट करणे शक्य असेल तर कृपया करावेत - तिथले विषयांतर टळेल. २) सदर धागा अस्थानी किंवा अनावश्यक वाटत असेल तर जरूर उडवावा - माझी हरकत नाही. सदर अपहरणादरम्यान अपहरणकर्त्यांकडून मारल्या गेलेल्या रूपेन कट्याल यांना श्रद्धांजली.

वाचने 52342
प्रतिक्रिया 77

प्रतिक्रिया

गुरुजी फार पूर्वी पाकिस्तानी चर्चा सत्र तू नळीवर ऐकले होते तेव्हा भारतावर पाकिस्तान च्या सीमेवर अफगाणिस्तान भारत अनेक दूतावास उघडून तेथे रॉ चे हस्तक प्रशिक्षित अतिरेक्यांना पाकिस्तानात सोडत आहेत त्यांचा रोख तेहेरीके तालिबान वर होता , ह्याला उद्देशून एक वरिष्ठ अधिकारी म्हणाला की हे चूक आहे ,भारताचे फक्त चार दूतावास असून त्यातील काही तर तालिबानी राजवटीत सुद्धा होते , माझ्या डोक्यात तो मुद्दा बसला होता , विशेष प्रवासी ह्या अतिरेक्यांनी जी अफाट खंडणीची मागणी केली होती ती एकरकमी एका चेक वर देऊ शकले असा एक प्रवासी त्या विमानाच्या बिसनेस क्लास मध्ये उपस्थित होता ,ह्याची जर सुद्धा कल्पना त्या दहशतवाद्यांना नव्हती, जगभरातील करन्सी प्रिंटींग चा ९० टक्के व्यवसाय ताब्यात असलेला हा प्रवाशाचे नाव होते De La Rue Giori त्याने दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले हिंदूइजम म्हणजे काय ह्याची मला अजिबात कल्पना नाही पण ह्या १० दिवसात ज्या रीत्या ह्या परिस्थितीस शांतपणे सामोरे गेले. हे पाहून मी थक्क झालो , मी कल्पना केली ह्यांच्या जागी फ्रेंच व इटालियन प्रवासी असते तर ह्या परिस्थितीत काय केले असते ,

In reply to by निनाद मुक्काम …

या प्रवाशाच्या व्यवसायाबद्दल अतिरेक्यांना किंवा त्यांच्या सुत्रधारांना काहीच माहिती नसणे हे आपले नशिबच म्हणायचे. नाहीतर वाटाघाटींमध्ये त्यांचे पारडे अधिकच जड झाले असते. अर्थात त्या व्यक्तिचे प्रसिद्धीपासून लांब राहणे यावेळी उपयोगी ठरले.

९/११च्या हल्ल्यातील युनायटेड ९३ विमानातील प्रवाशांसारखे धाडसी कृत्य IC 814 प्रवाशांनाही का करता आले नाही? हा मुद्दापण या चर्चेत यायला हवा. प्रत्येकवेळेस "सरकार"ला जबाबदार ठरविण्याऐवजी, जर त्या विमानातील १००+ देशबांधवानी ६ अतिरेक्यांचा मुकाबला करून इतिहास बदलला असता. कुठल्याही अतिरेकी संघटनेचे धाडस झाले नसते पुन्हा इथे येवून दहशतवादी कारवाया करण्याचे. देशाची आणि देशवासियांची प्रतिमा संपूर्ण जगात उंचावली असती. नाना पाटेकरचे दिव्य शब्द : इथे http://www.youtube.com/watch?v=u-DNavQ5l9w

In reply to by बेभान

९/११च्या हल्ल्यातील युनायटेड ९३ विमानातील प्रवाशांसारखे धाडसी कृत्य IC 814 प्रवाशांनाही का करता आले नाही? युनायटेड ९३ च्या प्रवाशांनी अपहरणाची बातमी देण्यासाठी आपापल्या कुटुंबीयांना मोबाईलवरून कॉल केले तेंव्हा त्यांना ९/११ बद्दल समजले. म्हणजेच त्यांना माहिती होते की ट्वीन टॉवर्स वर विमाने धडकली आहेत व आपणही असेच कुठेतरी आदळणार आहोत. अपहरण झाल्यानंतर युनायटेड ९३ काही मिनिटे अत्यंत कमी उंचीवरून उडत होते व युनायटेड ९३ च्या प्रवाशांनी बदललेला रूट फ्लाईट अटेंडंट्सच्या मदतीने "गेस" केला होता. या सर्व घटनांची परिणीती "मृत्यू निश्चित आहे" या धारणेत झाली व त्यामुळे जिवावर उदार होवून प्रवाशांनी कॉकपीटवर हल्ला केला असावा. त्या सर्व प्रवाशांनी दाखवलेल्या धाडसामुळे व्हाईट हाऊस / कॅपीटल बिल्डींग शाबूत राहिली असे म्हणायला हरकत नाही. अवांतर - ९/११ च्या घटनेमध्ये बहुतांश विमानांमध्ये अपहरणकर्त्यांनी प्रवाशांना फारसा उपद्रव न करता सरळ कॉकपीटवर हल्ला करून तेच ताब्यात घेतले होते व स्वतःला तिथे कोंडून घेवून विमाने लक्ष्यांवर धडकवली! यामुळे "नक्की काय चालले आहे" हे अनेक प्रवाशांना लक्षात आले नसावे अतीअवांतर - होलोकॉस्टमध्ये कैद्यांना जाणीवपूर्वक "मृत्यू निश्चित आहे" या भावनेची जाणीव करून दिली नव्हती. "जिवंत राहण्याची आशा" अशा घटनांमध्ये परिस्थिती आणि प्रतिकाराच्या मनस्थितीवर प्रभाव टाकत असावी. :-( जर त्या विमानातील १००+ देशबांधवानी ६ अतिरेक्यांचा मुकाबला करून इतिहास बदलला असता. तुमच्या भावना समजू शकतो परंतु अपहरणकर्त्यांनी रूपेन कट्याल ला भोसकून आणि मारहाण करून दिलेला मृत्यू दहशत बसवण्यास पुरेसा असावा असे वाटते. कुठल्याही अतिरेकी संघटनेचे धाडस झाले नसते पुन्हा इथे येवून दहशतवादी कारवाया करण्याचे. हा गैरसमज आहे - प्रतिकाराची एखादी घटना इतक्या टोकाची दहशत बसवू शकत नाही. (असे मला वाटते!) देशाची आणि देशवासियांची प्रतिमा संपूर्ण जगात उंचावली असती. पास. *********** इतिहास बदलणे, देशाची प्रतिमा उंचावणे वगैरे गोष्टी माझ्या"नंतर" घडणार असल्याने अशा घटनांमध्ये "नंतर" फॅक्टर निर्णायक ठरत असावा.