Skip to main content

कवितेचे शिर्षक आहे: मिठी

लेखक जोशमनिष यांनी मंगळवार, 19/03/2013 15:01 या दिवशी प्रकाशित केले.
कातर क्षण, अस्थिर मन द्यावे झोकून, तुझ्या मिठीत गुंतता हृदय, निष्काम प्रेममय अविरत लय, तुझ्या मिठीत अनावर प्रीती, ओढ सांगाती प्रेमधारा वर्षति, तुझ्या मिठीत श्वास गुंफले, द्वैत सरले भानही नुरले, तुझ्या मिठीत काहूर थमले, मन सावरले मेघही बरसले, तुझ्या मिठीत आधार भावनिक, बळ आत्मिक आश्वासन प्रेरक, तुझ्या मिठीत
लेखनविषय:

वाचने 1729
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

+१

थमले हा शब्द जरा खटकतोय. बाकी अभिव्यक्तीत अजून जरा नेमकेपणा आणता आला असता. पुढील लेखनास शुभेच्छा.

काहूर शमले? शेवटचं कडवं वाचताना थोडं अडखळायला होतंय. बाकी कविता छान आहे. पुलेशु.

आधार भावनिक, बळ आत्मिक आश्वासन प्रेरक, तुझ्या मिठीत
प्रेरक आश्वासित, तुझ्या मिठीत. असं चालेल?