कवितेचे शिर्षक आहे: मिठी
कातर क्षण, अस्थिर मन
द्यावे झोकून, तुझ्या मिठीत
गुंतता हृदय, निष्काम प्रेममय
अविरत लय, तुझ्या मिठीत
अनावर प्रीती, ओढ सांगाती
प्रेमधारा वर्षति, तुझ्या मिठीत
श्वास गुंफले, द्वैत सरले
भानही नुरले, तुझ्या मिठीत
काहूर थमले, मन सावरले
मेघही बरसले, तुझ्या मिठीत
आधार भावनिक, बळ आत्मिक
आश्वासन प्रेरक, तुझ्या मिठीत
शीर्षक आकर्षक आहे.....
+१
थमले हा शब्द जारा खटकतोय.
काहूर शमले?
आधार भावनिक, बळ आत्मिक