आयुष्य राजयोगी (तरही गझल)
आयुष्य राजयोगी,उपभोगता न आले
माझे असून “माझे” संबोधता न आले
आभाळ पापण्यांना सांभाळता न आले
मज दोन आसवांना हुलकावता न आले
राशी अनेक होत्या गाठीस पातकांच्या
गंगेस पाप सारे स्वीकारता न आले
बरसात तू सुखाची, केली सदैव देवा
झोळीच फाटकी मज सुख झेलता न आले
जखमा असंख्य होत्या अन् वेदना पुरेशा
वणव्यास का मनाच्या सुलगावता न आले
सोडून दूर सुख मी दु:खात चूर झाले
दु:खातल्या सुखाचे "सुख" टाळता न आले
जयवी - जयश्री अंबासकर
तरही?
तरही गझल म्हणजे एक कुठला तरी
सुरेख
रडगाणे दादायचा मुड नसल्याने पास देणार होतो, पण...
अरे वा ! मस्तं
मनापासून धन्यवाद
जखमा असंख्य होत्या अन् वेदना
आवडली गझल. 'आयुष्य राजयोगी'
मनापासून धन्यवाद
बहोत बढिया...!
लावुनी आग मनाला, सोडुनी गेलीस