Skip to main content

नशिबाचे भोग -

लेखक विदेश यांनी रविवार, 27/01/2013 16:01 या दिवशी प्रकाशित केले.
" फुलू दया ना मला जरा , बघू दया ना जग जरा - तुम्ही सजीव, मीही सजीव कळून घ्या भावना जरा -" एक कळी स्फुंदत होती , वेलीजवळ मी असताना - मन आपले उलगडत होती हितगुज माझ्याशी करताना ! " काही करू शकत नाही जगाविरुद्ध जाता येत नाही - मरणाऱ्याला जगवते जग जगणाऱ्याला मारते जग -" ...केविलवाणे होत म्हणालो , दु:ख जाणूनही कळीचे . खिन्न हसून ती वदली .. " नशिबाचे भोग ज्याचे त्याचे ! " .
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1853
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

मरणाऱ्याला जगवते जग जगणाऱ्याला मारते जग