Skip to main content

दार का लावतात ?

लेखक चौकटराजा यांनी शुक्रवार, 18/01/2013 18:34 या दिवशी प्रकाशित केले.
इमारतीच्या गेटच्या लगत पेस्टीसाईड मारणार्‍या कंपनीने एक पाटी चकट फू लावलेली असते ." गेट समोर वहाने लावू नयेत" तरीही न शिकलेली - पेपर टाकणारी पोरं तिथंच नेमकी सायकल का लावतात ? असे विचारल्यासारखा हा काथ्या आहे. पण काय आहे नं जर विचारलं नाही तर उत्तर कधीच कळणार नाही. तेव्हा विचारतोच. खूपदा या प्रश्नास सामोरे जावे लागते की " सगळे लोक दार का लावतात?" मी बरेचदा, व्यक्ती आणि तिचा कल पाहून "विरंगुळा" हे उत्तर देऊन वेळ मारुन नेतो. तर काहींना सांगतो की "मुले वयात आल्यानंतर आई व़डीलानी दार लावायचंच " अशी परंपरा आहे. मग पुढचा प्रश्न येतो "मग दिवसा ढवळ्या सगळे सतत फ्लॅटचे दार का लावतात?" आणि मी निरुत्तरसा होतो. पण काही मित्र मैत्रिणी हे जवळचे असतात. मग त्यांना सविस्तर सांगतो की वास्तू शास्त्राच्या ( प्राचीन असे म्हणायचे आहे मला की मग त्याचा इफेक्ट वाढतो ) तत्वज्ञानानुसार, दार लावताना आपल्या हातातील उर्जाचक्र कार्यान्वित होते . ( बरोबर अगदी कुन्डलिनी जागृत झाल्याप्रमाणेच ! ) व त्यातल्या उर्जास्रोतामुळे हात बळकट होतात व चकाकतात देखील. काहीजणांना दार लावल्यावर जोरदार पेंग कोचावरच येते आणि वेगळ्या स्वप्नात ते वावरतात . विशेषतः विद्यार्थ्यांना दार लावल्यावर प्रायव्हसी मिळत असल्याने असल्याने अभ्यास चांगला होतो. काही जणांना दार लावल्याशिवाय दिवसाची सुरूवात चांगली होत नाही. म्हणजे नकळत दारस्पर्श जीवनक्रियेला मदत करतो. "दारा"ला "कवाड " हेदेखील नाव आहे. काहीजणांना काळा दरवाजा ( सीसमचा ) लागतो तर काही जणांचे पिवळ्या रंगाचे ( हळदू या लाकडाचे ) दारा शिवाय चालत नाही. दारा च्या या बहुगुणी उपयुक्ततेमुळे अनेक जण दार लावतात. आता हे उत्तर कितपत बरोबर आहे यावर कोणी जाणकार प्रकाश टाकू शकतील का? या परंपरेमागे, अन्य काही कारण आहे का? विसू - उत्तर माहीत असून न दिल्यास परिणाम - डोक्याची शम्भर छकले होऊन ........

वाचने 13273
प्रतिक्रिया 65

प्रतिक्रिया

In reply to by धन्या

काहीतरी गडबड झालेली दिसतेय. मी वरिल प्रतिसादात "वाहत्या गंगेत हात धुण्याचा मोह भल्याभल्यांना आवरत नाही." असं लिहिलं होतं. :)

In reply to by धन्या

मध्येच दार लागल.. त्यामुळे ते बाकीच बाहेरच राहिले

In reply to by धन्या

धन्या स्वाक्षरीबाबत पुनर्विचार करावा स्वाक्षरीमधून एक नवीन धागा आणि वाद व्हायला नको

का लावतात?कोणीही मध्ये ढुंकुन बघु नये म्हणुन्,काहींना सवय असते ढुंकण्याची

अरे काय??? सगळे आपले काही ना काही लावतच सुटलेत.. कंटाळा आला राव... बाकी तुमच चालू द्या..

अरे काय??? सगळे आपले काही ना काही लावतच सुटलेत.. कंटाळा आला राव... बाकी तुमच चालू द्या..
नका हो नका.. उगाच मन नको तिकडे धाव घेत..

In reply to by शैलेन्द्र

उगाच मन नको तिकडे धाव घेत नाही हो नाही, तुम्ही अगदी योग्य मार्गावर आहात... फक्त थांबू नका... ;)

In reply to by शैलेन्द्र

मेलो तिच्यायला! झक मारली अन काफी पिताना हे वाचलं...ठसका लागून पार उर्ध्व लागायची वेळ आली ना!

In reply to by धमाल मुलगा

कॉफी ऐवजी योग्य गोष्ट असती तर उर्ध्व तर लागलेच असते शिवाय, सर्दीही पळाली असती..

In reply to by शैलेन्द्र

हा प्रतिसाद वाचून धमालरावांना जालावरुन संन्यास घ्यावासा वाटला तर त्यात नवल नाही. ;)

In reply to by शैलेन्द्र

हे म्हंजे, दाऊदला दंबूक चालवायला शिकवण्यापैकी आहे.

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

अहो, धमाल्राव सांच्याला चक्क काफी पितायेत असे हिन दीन द्रुष्य पाहुन राहवले नाही..

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

अरे बाबानो, आमचं शैलेंद्रराव हैत ते, त्यांना बरोबर ठौकहै, आज दिवस कोणताय, टैम काय झालाय ते पाहूनच मुद्दाम तसं लिहिंलंय ते. :-)

In reply to by Dhananjay Borgaonkar

होम मिनिष्टरांची फरमिशन काढलीय का? नयतर घरला जाशिला अन् तोंडावर दार लाऊन घतल मज. 'दार का लावतात?' ह्या प्रशरश्राचं उत्तर मिळेल. ;-)

In reply to by धमाल मुलगा

सध्या होम मिनिष्टर माहेरचा पाहुण्चार घेत आहेत्..म्हटल आपण आपल्या पाहुण्यांबरोबर दोन चार घेउ..कसे..

In reply to by धमाल मुलगा

धाग्यात काही दम असो वा नसो... त्या निमित्ताने अज्ञातवासात गेलेल्या धमालरावांचे दर्शन झाले आणि धागा सफल झाला!!!

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

तुमचं आपलं कैतरीच बाई! विषय काय चाललाय अन् तुमचं आपलं कैतरीच हं. :-P

एकदा स्मिता पाटील म्हणाली होती " एकदा तरी मी अमिताभ बनू की नको ?, की सारखेच प्यारलल सिनेमात राहू ?" तसा आमचा हा धागा आहे.ओपीचा दुसरा भाग तयार आहे .नशीब व कर्म नावाचा गंभीर विषयही विचाराधीन आहे. या धाग्याला इत: पर कोणीही प्रतिसाद देऊन नये म्हणजे कुंकू का लावतात असा भंकस धागा निर्माण होणार नाही व हे पुढचे सगळे " मोहाचे" धागे टळतील महाराजा ! [

In reply to by चौकटराजा

काका, अस कुंकु जर अधूनमधून लागल नाही तर, ट्यार्पी कसा वाढणार? कुंकू, नाडी, अध्यात्म, स्त्रीमुक्ती, बाबाभक्ती याशिवाय मिसळ मजा कशी देइल?

In reply to by चौकटराजा

च्छ्या! ह्याला काय अर्थय राव! लोकांनी काय प्रश्न विचारुच नयेत काय? वस्तुतः तो प्रश्न भंकस नव्हता. त्यावर आलेल्या काही प्रतिक्रिया पाहता , नवी माहिती नक्कीच मिळाली. आता, 'नवी' हे कदाचित वयोगट, संदर्भ इत्यादीनुसार सापेक्ष असेल. पण टाकाऊ नक्कीच नाही.

In reply to by चौकटराजा

आपल्या भावना समजल्यामुळे जरा माहितीपूर्ण प्रतिसाद देतो... ;) सगळीच दारे (दरवाजे) लावता येतात असे नाही... १९७१ मध्ये तुर्कस्थानात एक ७१ साली नैसर्गिकवायूच्या उत्खननाच्या वेळेस खड्डा पडला. त्यातून विषारी वायू नुसताच बाहेर येऊ शकतो या काळजीने तो तसाच तेथे जाळत ठेवला गेला. अपेक्षा होती की काही दिवसात तो संपेल. तो आजतागायत संपलेला नाही. त्याला तिथले उणेपुरे ३५० स्थानिक "मौत का दरवाजा" असे म्हणतात. (देरवेझे) Darwaza

प्रश्न झालाय हा! म्हणजे कुठलं दार ? याचा खुलासा हवा. बाथरुमचे दार आंघोळ करताना लावतात कारण, आतील पाणी बाहेर उडू नये म्हणून. संडासाचे दार लावतात कारण आतील कुवास बाहेर पसरु नये म्हणून. अशी प्रत्येक दाराची उत्तरे वेगवेगळी असू शकतील.

In reply to by तिमा

मला वाटलं मोरीचं आणि संडासाचं दार लावतात कारण आत काय गंमत चालू आहे ते बाहेरच्यांना कळू कये म्हणून! ;)

आमच्या गावातील काही लोक, घरात चांगलेचुंगले खायला बनवले की, जेवण करताना मुख्य दार लावून घेतात!

In reply to by नर्मदेतला गोटा

'कडीही लावा आतली" हे वाचल्यावर "मी नाही बाई त्यातली आणि कडी लावा आतली" हे सुप्रसिद्ध वाक्य आठवले.

मन सुद्धं तुजं गोष्ट हाये पृथ्वी मोलाची तू लाव रं गड्या दार तुला भीती कशाची पर्वाबी कुनाची.... :)

In reply to by नर्मदेतला गोटा

१.तिथे द्वार लावण्याची गरज नव्हती, त्यामुळे कोणी द्वार लावू लागले, की लोक विचारायचे- द्वार का(हून)? २. ना घर का ना घाट का अशी स्थिती झाल्यावर कृष्णाने स्थापन केलेली नगरी, त्यामुळे लोक म्हणायचे - मैं द्वार का. सध्या इतकेच सुचते आहे, जाणकारांनी अजून अग्न्यस्त्रे टाकून अज्ञान जाळोन टाकावे हे विनंती.

In reply to by भीमाईचा पिपळ्या.

वो दादा.. इडंबनाची आर्डर द्येयच्या आधी लेखकाचे नाव तपाशून पघा. चौराकाकां बरूबर स्कोर शेटल करायचा हाये का? न्हा ऽ ऽ ऽ ई. मग इडंबन न्हा ऽ ऽ ऽ ई. ;-) बाकी तुम्ही चुकीच्या दुकानात आडर दिली. इडंबन करावे तर आम्च्या बुवांनीच! (- असे वल्लीदा म्हन्तो.) (सर्व संबंधितांनी हलके घ्यावे - न घेतल्यास फाट्यावर मारण्यात यील :-D)

In reply to by मोदक

न घेतल्यास फाट्यावर मारण्यात यील - धायरी का वडगाव का संतोष हॉल्,कोणत्या ?

In reply to by ५० फक्त

न घेतल्यास फाट्यावर मारण्यात यील - धायरी का वडगाव का संतोष हॉल्,कोणत्या ?
=))

In reply to by किसन शिंदे

आमी वारज्याच्या फाट्यावर मारू न्हायतर ठाण्यातल्या. येणी पिराब्लेम..? ;-) (रोखठोक) मोदक

In reply to by मोदक

@आमी वारज्याच्या फाट्यावर मारू न्हायतर ठाण्यातल्या. येणी पिराब्लेम..? smiley>>> =)) =)) =)) (रोखठोक) मोदक>>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-stargate016.gif

In reply to by मोदक

वडगाव बु. फाट्याचा उल्लेख नसल्याने हायसे वाटल्याच्या भावनेतून झालेला हा परमानंद असावा.

In reply to by प्रचेतस

@हायसे वाटल्याच्या भावनेतून झालेला हा परमानंद असावा.>>> आं............दु...दु...हलकट :-p अगोबा-बॉक्सिंग आत्मा ...http://www.sherv.net/cm/emoticons/boxing/punching-face-smiley-emoticon.gif

दार का लावतात ?
'दार उघडे का ठेवतात' असले प्रश्न कोणी विचारू नयेत म्हणून बहूदा.

In reply to by परिकथेतील राजकुमार

माझा प्रतिसाद का संपादित झाला ब्वॉ ? नक्की 'तो' शब्द खटकला, का पराचा आहे म्हणून प्रतिसाद खटकला ? मिपावर शोध घेता तो विशिष्ठ शब्द मलातरी २९४ ठिकाणी सध्यातरी दिसतो आहे. असो.. शेवटी मिपाचे रुपांतर 'पुरुषांची मंगळागौर' ह्या सदरातच करायचे म्हणल्यावरती काय करणार.