✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

दार का लावतात ?

च
चौकटराजा यांनी
Fri, 01/18/2013 - 18:34  ·  लेख
लेख
इमारतीच्या गेटच्या लगत पेस्टीसाईड मारणार्‍या कंपनीने एक पाटी चकट फू लावलेली असते ." गेट समोर वहाने लावू नयेत" तरीही न शिकलेली - पेपर टाकणारी पोरं तिथंच नेमकी सायकल का लावतात ? असे विचारल्यासारखा हा काथ्या आहे. पण काय आहे नं जर विचारलं नाही तर उत्तर कधीच कळणार नाही. तेव्हा विचारतोच. खूपदा या प्रश्नास सामोरे जावे लागते की " सगळे लोक दार का लावतात?" मी बरेचदा, व्यक्ती आणि तिचा कल पाहून "विरंगुळा" हे उत्तर देऊन वेळ मारुन नेतो. तर काहींना सांगतो की "मुले वयात आल्यानंतर आई व़डीलानी दार लावायचंच " अशी परंपरा आहे. मग पुढचा प्रश्न येतो "मग दिवसा ढवळ्या सगळे सतत फ्लॅटचे दार का लावतात?" आणि मी निरुत्तरसा होतो. पण काही मित्र मैत्रिणी हे जवळचे असतात. मग त्यांना सविस्तर सांगतो की वास्तू शास्त्राच्या ( प्राचीन असे म्हणायचे आहे मला की मग त्याचा इफेक्ट वाढतो ) तत्वज्ञानानुसार, दार लावताना आपल्या हातातील उर्जाचक्र कार्यान्वित होते . ( बरोबर अगदी कुन्डलिनी जागृत झाल्याप्रमाणेच ! ) व त्यातल्या उर्जास्रोतामुळे हात बळकट होतात व चकाकतात देखील. काहीजणांना दार लावल्यावर जोरदार पेंग कोचावरच येते आणि वेगळ्या स्वप्नात ते वावरतात . विशेषतः विद्यार्थ्यांना दार लावल्यावर प्रायव्हसी मिळत असल्याने असल्याने अभ्यास चांगला होतो. काही जणांना दार लावल्याशिवाय दिवसाची सुरूवात चांगली होत नाही. म्हणजे नकळत दारस्पर्श जीवनक्रियेला मदत करतो. "दारा"ला "कवाड " हेदेखील नाव आहे. काहीजणांना काळा दरवाजा ( सीसमचा ) लागतो तर काही जणांचे पिवळ्या रंगाचे ( हळदू या लाकडाचे ) दारा शिवाय चालत नाही. दारा च्या या बहुगुणी उपयुक्ततेमुळे अनेक जण दार लावतात. आता हे उत्तर कितपत बरोबर आहे यावर कोणी जाणकार प्रकाश टाकू शकतील का? या परंपरेमागे, अन्य काही कारण आहे का? विसू - उत्तर माहीत असून न दिल्यास परिणाम - डोक्याची शम्भर छकले होऊन ........
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
13182 वाचन

💬 प्रतिसाद (65)

प्रतिक्रिया

काका,

प्रचेतस
Fri, 01/18/2013 - 18:37 नवीन
काका, वेळ जात नाहीये का? ओपींचा दुसरा भाग टाका की.
  • Log in or register to post comments

वाहत्या गंगेत हात धुण्याचा

धन्या
Fri, 01/18/2013 - 18:40 नवीन
वाहत्या गंगेत हात धुण्याचा मोह भल्याभल्यांना आवरत नाही. दुसरं काय? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

काहीतरी गडबड झालेली दिसतेय.

धन्या
Fri, 01/18/2013 - 18:44 नवीन
काहीतरी गडबड झालेली दिसतेय. मी वरिल प्रतिसादात "वाहत्या गंगेत हात धुण्याचा मोह भल्याभल्यांना आवरत नाही." असं लिहिलं होतं. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

मध्येच दार लागल.. त्यामुळे ते

शैलेन्द्र
Fri, 01/18/2013 - 18:53 नवीन
मध्येच दार लागल.. त्यामुळे ते बाकीच बाहेरच राहिले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

क ह र !!!

धन्या
Fri, 01/18/2013 - 19:18 नवीन
क ह र !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

सगळ्य्यात भारी प्रतिसाद

जेनी...
Fri, 01/18/2013 - 22:17 नवीन
सगळ्य्यात भारी प्रतिसाद =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

+१

आनन्दिता
Fri, 01/18/2013 - 22:48 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

धन्या

आशु जोग
Sun, 01/20/2013 - 21:57 नवीन
धन्या स्वाक्षरीबाबत पुनर्विचार करावा स्वाक्षरीमधून एक नवीन धागा आणि वाद व्हायला नको
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

???????????????

श्री गावसेना प्रमुख
Fri, 01/18/2013 - 18:39 नवीन
का लावतात?कोणीही मध्ये ढुंकुन बघु नये म्हणुन्,काहींना सवय असते ढुंकण्याची
  • Log in or register to post comments

दार लावल्यावर आतली कडी का

बॅटमॅन
Fri, 01/18/2013 - 18:39 नवीन
दार लावल्यावर आतली कडी का घालतात? असा अजून एक धागा "मिपाचाक" वर टाकायला हर्कत नसावी =)) =))
  • Log in or register to post comments

मला आधी पुरुष गाऊन का घालतात

Dhananjay Borgaonkar
Fri, 01/18/2013 - 18:45 नवीन
मला आधी पुरुष गाऊन का घालतात याच उत्तर द्या, तरच मी तुमच्या प्रश्नच उत्तर देतो ;)
  • Log in or register to post comments

अरे

मिसळलेला काव्यप्रेमी
Fri, 01/18/2013 - 18:51 नवीन
अरे काय??? सगळे आपले काही ना काही लावतच सुटलेत.. कंटाळा आला राव... बाकी तुमच चालू द्या..
  • Log in or register to post comments

अरे काय???

शैलेन्द्र
Fri, 01/18/2013 - 19:01 नवीन
अरे काय??? सगळे आपले काही ना काही लावतच सुटलेत.. कंटाळा आला राव... बाकी तुमच चालू द्या..
नका हो नका.. उगाच मन नको तिकडे धाव घेत..
  • Log in or register to post comments

उगाच मन नको तिकडे धाव घेत

मिसळलेला काव्यप्रेमी
Fri, 01/18/2013 - 19:05 नवीन
उगाच मन नको तिकडे धाव घेत नाही हो नाही, तुम्ही अगदी योग्य मार्गावर आहात... फक्त थांबू नका... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

+१

धन्या
Fri, 01/18/2013 - 19:15 नवीन
तुम्ही अगदी योग्य मार्गावर आहात... फक्त थांबू नका...
सहमत आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी

ठ्याः!

धमाल मुलगा
Fri, 01/18/2013 - 19:14 नवीन
मेलो तिच्यायला! झक मारली अन काफी पिताना हे वाचलं...ठसका लागून पार उर्ध्व लागायची वेळ आली ना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

हांग आश्शी...

धन्या
Fri, 01/18/2013 - 19:17 नवीन
धम्या अँड हीज कॉफी आर ब्याक. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

कॉफी ऐवजी योग्य गोष्ट असती तर

शैलेन्द्र
Fri, 01/18/2013 - 19:22 नवीन
कॉफी ऐवजी योग्य गोष्ट असती तर उर्ध्व तर लागलेच असते शिवाय, सर्दीही पळाली असती..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

हा प्रतिसाद वाचून धमालरावांना

धन्या
Fri, 01/18/2013 - 19:28 नवीन
हा प्रतिसाद वाचून धमालरावांना जालावरुन संन्यास घ्यावासा वाटला तर त्यात नवल नाही. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

अरे अरे

मिसळलेला काव्यप्रेमी
Fri, 01/18/2013 - 19:31 नवीन
हे म्हंजे, दाऊदला दंबूक चालवायला शिकवण्यापैकी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

अहो, धमाल्राव सांच्याला चक्क

शैलेन्द्र
Fri, 01/18/2013 - 19:39 नवीन
अहो, धमाल्राव सांच्याला चक्क काफी पितायेत असे हिन दीन द्रुष्य पाहुन राहवले नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी

ख्या ख्या ख्या!

धमाल मुलगा
Fri, 01/18/2013 - 19:47 नवीन
अरे बाबानो, आमचं शैलेंद्रराव हैत ते, त्यांना बरोबर ठौकहै, आज दिवस कोणताय, टैम काय झालाय ते पाहूनच मुद्दाम तसं लिहिंलंय ते. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी

चला तर मग!!!कुठे जायचं?

Dhananjay Borgaonkar
Fri, 01/18/2013 - 19:51 नवीन
चला तर मग!!!कुठे जायचं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

फरमिशन?

धमाल मुलगा
Fri, 01/18/2013 - 20:00 नवीन
होम मिनिष्टरांची फरमिशन काढलीय का? नयतर घरला जाशिला अन् तोंडावर दार लाऊन घतल मज. 'दार का लावतात?' ह्या प्रशरश्राचं उत्तर मिळेल. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Dhananjay Borgaonkar

सध्या होम मिनिष्टर माहेरचा

Dhananjay Borgaonkar
Fri, 01/18/2013 - 20:11 नवीन
सध्या होम मिनिष्टर माहेरचा पाहुण्चार घेत आहेत्..म्हटल आपण आपल्या पाहुण्यांबरोबर दोन चार घेउ..कसे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

धागा सफल!

स्मिता.
Fri, 01/18/2013 - 19:36 नवीन
धाग्यात काही दम असो वा नसो... त्या निमित्ताने अज्ञातवासात गेलेल्या धमालरावांचे दर्शन झाले आणि धागा सफल झाला!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

+१

मिसळलेला काव्यप्रेमी
Fri, 01/18/2013 - 19:40 नवीन
+११११११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता.

ईश्शं!

धमाल मुलगा
Fri, 01/18/2013 - 19:52 नवीन
तुमचं आपलं कैतरीच बाई! विषय काय चाललाय अन् तुमचं आपलं कैतरीच हं. :-P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी

केल्याने होत

कलश
Fri, 01/18/2013 - 19:50 नवीन
आहे रे आधी __________. पुढचे काय म्हणायचेय ते लक्षात आलेच असेल ;)
  • Log in or register to post comments

असल्या धाग्यात दम नसतोच

चौकटराजा
Fri, 01/18/2013 - 19:52 नवीन
एकदा स्मिता पाटील म्हणाली होती " एकदा तरी मी अमिताभ बनू की नको ?, की सारखेच प्यारलल सिनेमात राहू ?" तसा आमचा हा धागा आहे.ओपीचा दुसरा भाग तयार आहे .नशीब व कर्म नावाचा गंभीर विषयही विचाराधीन आहे. या धाग्याला इत: पर कोणीही प्रतिसाद देऊन नये म्हणजे कुंकू का लावतात असा भंकस धागा निर्माण होणार नाही व हे पुढचे सगळे " मोहाचे" धागे टळतील महाराजा ! [
  • Log in or register to post comments

काका, अस कुंकु जर अधूनमधून

शैलेन्द्र
Fri, 01/18/2013 - 20:01 नवीन
काका, अस कुंकु जर अधूनमधून लागल नाही तर, ट्यार्पी कसा वाढणार? कुंकू, नाडी, अध्यात्म, स्त्रीमुक्ती, बाबाभक्ती याशिवाय मिसळ मजा कशी देइल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

च्छ्या! ह्याला काय अर्थय राव!

धमाल मुलगा
Fri, 01/18/2013 - 20:08 नवीन
च्छ्या! ह्याला काय अर्थय राव! लोकांनी काय प्रश्न विचारुच नयेत काय? वस्तुतः तो प्रश्न भंकस नव्हता. त्यावर आलेल्या काही प्रतिक्रिया पाहता , नवी माहिती नक्कीच मिळाली. आता, 'नवी' हे कदाचित वयोगट, संदर्भ इत्यादीनुसार सापेक्ष असेल. पण टाकाऊ नक्कीच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

धमुने

विकास
Fri, 01/18/2013 - 20:18 नवीन
आज दरवाजा सताड उघडलेला दिसतोय! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

+१

सोत्रि
Fri, 01/18/2013 - 23:02 नवीन
हा हा हा, झक्कास, अगदी सहमत! :D -(दरबान) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

दरवाजा

विकास
Fri, 01/18/2013 - 20:17 नवीन
आपल्या भावना समजल्यामुळे जरा माहितीपूर्ण प्रतिसाद देतो... ;) सगळीच दारे (दरवाजे) लावता येतात असे नाही... १९७१ मध्ये तुर्कस्थानात एक ७१ साली नैसर्गिकवायूच्या उत्खननाच्या वेळेस खड्डा पडला. त्यातून विषारी वायू नुसताच बाहेर येऊ शकतो या काळजीने तो तसाच तेथे जाळत ठेवला गेला. अपेक्षा होती की काही दिवसात तो संपेल. तो आजतागायत संपलेला नाही. त्याला तिथले उणेपुरे ३५० स्थानिक "मौत का दरवाजा" असे म्हणतात. (देरवेझे) Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

गॅस पायपात घालुन पुण्यात

शैलेन्द्र
Fri, 01/18/2013 - 20:39 नवीन
गॅस पायपात घालुन पुण्यात जाळायला आणावा म्हणतो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

काय थंडीये

नर्मदेतला गोटा
Fri, 01/18/2013 - 23:16 नवीन
काय थंडीये शेकून घ्यावे म्हणतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

फारच जनरल

तिमा
Fri, 01/18/2013 - 19:56 नवीन
प्रश्न झालाय हा! म्हणजे कुठलं दार ? याचा खुलासा हवा. बाथरुमचे दार आंघोळ करताना लावतात कारण, आतील पाणी बाहेर उडू नये म्हणून. संडासाचे दार लावतात कारण आतील कुवास बाहेर पसरु नये म्हणून. अशी प्रत्येक दाराची उत्तरे वेगवेगळी असू शकतील.
  • Log in or register to post comments

मला वाटलं मोरीचं आणि संडासाचं

आदूबाळ
Fri, 01/18/2013 - 22:04 नवीन
मला वाटलं मोरीचं आणि संडासाचं दार लावतात कारण आत काय गंमत चालू आहे ते बाहेरच्यांना कळू कये म्हणून! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

मोरीतली गंमत ठीक आहे पण....

टवाळ कार्टा
Sat, 01/19/2013 - 00:42 नवीन
मोरीतली गंमत ठीक आहे पण.... संडासातसुद्धा गंमत???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

दॅट डिपेंड्स, टवाळभाऊ!

आदूबाळ
Sat, 01/19/2013 - 00:59 नवीन
दॅट डिपेंड्स, टवाळभाऊ!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

अति तेथे माती...

बोलघेवडा
Fri, 01/18/2013 - 20:34 नवीन
अति तेथे माती...
  • Log in or register to post comments

भल्या भल्यांना कुठं थांबावं

गणपा
Fri, 01/18/2013 - 20:48 नवीन
भल्या भल्यांना कुठं थांबावं कळत नाही. सुरवातीला हसू येतं मग आवरा म्हणायची पाळी येते. :)
  • Log in or register to post comments

मला तर हा काय लेख तेच कळाल

प्रतिज्ञा
Fri, 01/18/2013 - 21:54 नवीन
मला तर हा काय लेख तेच कळाल नाही
  • Log in or register to post comments

आमच्या गावातील काही लोक, घरात

श्रिया
Fri, 01/18/2013 - 22:28 नवीन
आमच्या गावातील काही लोक, घरात चांगलेचुंगले खायला बनवले की, जेवण करताना मुख्य दार लावून घेतात!
  • Log in or register to post comments

आपण कुठल्या गावात रहाता?

आदूबाळ
Fri, 01/18/2013 - 22:32 नवीन
आपण कुठल्या गावात रहाता? 'युज्वल ससपेक्ट' तर नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रिया

हा हा..

उपास
Fri, 01/18/2013 - 23:20 नवीन
'दार लावलं तरी वास लपत नाही' (सगळ्याच वासांना लागू) :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रिया

. धाग्याला कुंकू लावले.

नर्मदेतला गोटा
Fri, 01/18/2013 - 22:32 नवीन
. धाग्याला कुंकू लावले.
  • Log in or register to post comments

दार का लावतात हा प्रश्न तसा

नर्मदेतला गोटा
Fri, 01/18/2013 - 23:19 नवीन
दार का लावतात हा प्रश्न तसा अर्धवट आहे नुसते दार लावून उपयोग नाही कडीही लावा आतली
  • Log in or register to post comments

'कडीही लावा आतली"

श्रीगुरुजी
Sat, 01/19/2013 - 13:05 नवीन
'कडीही लावा आतली" हे वाचल्यावर "मी नाही बाई त्यातली आणि कडी लावा आतली" हे सुप्रसिद्ध वाक्य आठवले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नर्मदेतला गोटा
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा