विचारमैथुन १ - डॉक्टर सान्यांची न्यूज

खान's picture
खान in काथ्याकूट
8 Jan 2013 - 11:26 pm
गाभा: 

या धाग्याचं शीर्षक औपरोधिक असलं तरी धागा पूर्ण सिरीयस आहे.

बर्‍याच वेळा एखाद्या प्रश्नाबद्दल आपली नक्की काय भूमिका आहे हे आपल्याला ठरवता येत नाही. अशावेळी एक हायपोथेटिकल सीनारिओ बनवून त्या प्रसंगात आपण काय करू, असा प्रश्न स्वतःलाच विचारला तर कदाचित आपल्या मनातला गोंधळ निस्तरायला मदत होऊ शकते/शकेल. या धाग्यात असाच एक सिनारिओ कल्पला आहे. समलिंगी संबध पूर्ण वैध की अवैध, याबद्दल आपल्यापैकी काहींच्या मनात संशय येत असतो. एका बाजूला समलिंगी संबंधांचे पूर्ण समर्थन करणारे लोक, तर दुसर्‍या बाजूला स. सं. म्हणजे पूर्ण अनैसर्गिक, पाप, अधर्म असे मानणारे संस्कृतीरक्षक, या दोन टोकांच्या मध्ये असणारे बरेच असतील. त्यांच्यापैकी "समलिंगी व्यक्तिंना सध्याच्या सामाजिक वातावरणात ज्या दिव्यातून जावं लागतं ते बघता अशा व्यक्तिंना माझं पूर्ण समर्थन आणि सहानुभूती आहे, समलैंगिकता ही विकृती नाही, पण ती पूर्ण नैसर्गिक मानावी का? समजा, एखाद्या व्यक्तीची समलैंगिकता 'दुरुस्त' करता येत असेल तर ती तशी करावी का? कॅन्सर, अपंगत्व यांच्या निर्मूलनासाठी जसं संशोधन होतं तसं समलैंगिकतेबद्दल व्हावं का? की अशी अपेक्षा करणं हेच चूक आहे?" अशा विचारांच्या द्विधा अवस्थेत पडलेल्यांसाठी खालचा हायपोथेटिकल सिनॅरिओ आहे. मिस्टर आणि मिसेस पाटलांच्या जागी वाचकांनी आपल्याला कल्पून पाहिलं तर त्यांचा काय निर्णय असेल, हे वाचायला आवडेल.

******************

स्थळ - डॉ. सान्यांचे प्रसूतिगृह
काळ - काही दशके भविष्यातला

'या मिस्टर ऍंड मिसेस पाटील' डॉ. सान्यांनी तोंडभर हसून स्वागत केलं. 'कशी आहे तब्येत?' मिसेस पाटलांकडे बघून त्यांनी प्रश्न केला. 'आता त्रास कमी होतो का? वा वा, छान, छान!' 'यांची नोकरी काय म्हणतेय? पुन्हा फॉरेनला कधी आता?' चारदोन इकडच्या तिकडच्या गप्पा करून ते लगेच मुद्द्याकडे वळले.

'हे पहा, या वेळी मी तुम्हालाही बोलवलं कारण मला काही महत्वाचं बोलायचं आहे. नवीनच आलेल्या सेक्शुअल प्रेफरन्स
डिटरमिनेशन टेस्टबद्दल आपण ऐकलं असेलच. होणारं बाळ समलिंगी होणार की विषमलिंगी ते यातून ठरवता येतं. तर मिसेस पाटलांवर ही टेस्ट मी गेल्यावेळी केली होती आणि तिचे रिझल्ट्स आले आहेत. तुमचं मूल समलिंगी असणार आहे.' त्यांनी थोडं थांबून दोघांच्या प्रतिक्रियेचा अंदाज घेतला.
'अं... असूदेकी, आता त्यात काय विशेष राहिलंय, समलैंगिकता समाजाने पूर्ण मान्य केली आहे. पूर्वीसारखं राहिलं नाही आता. मूल हेल्दी जन्मलं पाहिजे हेच महत्वाचं.' मिस्टर पाटील म्हणाले. मिसेस पाटलांनी मान डोलावली. 'मला वाटलं तुम्ही काहीतरी भयंकर सांगता की काय? हुश्श...'
'गुड! मला वाटलंच होतं तुम्ही असं म्हणाल.' डॉक्टर म्हणाले 'तरीसुद्धा, मी तुम्हाला तुमच्या सर्व ऑप्शन्सची माहिती देऊ इच्छितो. अलिकडेच एक नवी थेरपी निघाली आहे. या थेरपीद्वारे होणार्‍या गर्भाचं सेक्शुअल ओरिएंटेशन केवळ एका इंजेक्शनने बदलता येऊ शकतं. तुम्हाला पाहिजे असल्यास आपण बाळाचं ओरिएंटेशन बदलू शकतो. ही थेरपी पूर्णपणे सेफ असून खर्चाच्या दृष्टीने तुमच्या अगदीच आवाक्यात आहे. तुम्ही दोघं विचार करून मला पुढच्या वेळी सांगा, तुम्हाला समलिंगी मूल चालेल की नॉर्मल... आपलं, विषमलिंगी' घड्याळाकडे बघत डॉक्टर म्हणाले.

मिस्टर आणि मिसेस पाटील विचारात पडले. समलैंगिकता पूर्ण मान्य झालेल्या समाजात ते रहात होते. होणार्‍या मुलाला भविष्यात समाजमान्यता, लग्न, सरोगेट पालकत्व या दृष्टीने कुठलाच त्रास होण्याचा संभव नव्हता. थेरपी घ्यावी की नको? त्याने आपण प्रतिगामी ठरू का? दांभिक ठरू का?

मिस्टर आणि मिसेस पाटलांनी काय करावं? तुम्ही काय कराल?

प्रतिक्रिया

शैलेन्द्र's picture

8 Jan 2013 - 11:33 pm | शैलेन्द्र

लैच भंपक लेख..
"कॅन्सर, अपंगत्व यांच्या निर्मूलनासाठी जसं संशोधन होतं तसं समलैंगिकतेबद्दल व्हावं का?" हे वाचुन डोळे पाणावले..

अत्रुप्त आत्मा's picture

8 Jan 2013 - 11:51 pm | अत्रुप्त आत्मा

तर्री's picture

8 Jan 2013 - 11:59 pm | तर्री

१.तसाही दुष्काळ आपण स्वीकारला आहे. एखाद वर्षी पाऊस पडत नाही तेंव्हा त्याला दुष्काळ म्हणतात . समाजाने ते स्वीकारले आहे.
२.सलग अनेक पाऊस पडला नाही की त्याला दुष्काळी प्रदेश म्हणण्यात येते. तेही समाजाला मान्य आहे.
३.कधीच पाऊस पडत नसेल तर त्याला "वाळवंट" म्हणतात.
४. अकलेच्या वाळवंटात वैचारिक उंटांची फरफट कशापायी ?

मालोजीराव's picture

9 Jan 2013 - 12:23 am | मालोजीराव

विचारणं औपरोधिक असलं तरी प्रश्न पूर्ण सिरीयस आहे.

सुचेल तसं's picture

9 Jan 2013 - 12:26 am | सुचेल तसं

समलैंगिकता अनुवंशिक असते का? म्ह़़णजे ह्या केसमधे नवरा-बायकोपैकी कोणी तसं आहे का? असेल तर त्याला/तिला स्वतःच्या अनुभवावरून, होणार्‍या बाळाबाबत काय करावं हे ठरवणं सोपं जाईल. दोघांपैकी कोणीही तसं नसेल तर मला नाही वाटत ते होणार्‍या बाळाला समलैंगिक राहू द्यायचा पर्याय स्विकारतील.

होणारं बाळ बायसेक्शुअल (बहुलिंगी... माहित नाही हा मराठी प्रतिशब्द बरोबर आहे का ते)आहे का ते कळणार आहे का ह्या टेस्टमधून?

कवितानागेश's picture

9 Jan 2013 - 12:32 am | कवितानागेश

काही दशकांनन्तर काय, आणि अत्ता तरी काय, मुलांनी हेल्दी असण्याची कालजी पालक घेउ शकतात.
बाकी विचारसरणी आणि आवडीनिवडी मुले त्यांची तीच ठरवतील की मोठी झाल्यावर.

वरच्या प्रतिसादांवरून तरी लेखाचा उद्देश काहींच्या डोक्यावरून गेला आहे असं वाटतं. इतरांचाही गैरसमज होऊ नये म्हणून काही स्पष्टीकरण गरजेचं आहे असं वाटतं.

१. मी समलैंगिकतेच्या विरोधात मुळीच नाही. समलैंगिक व्यक्तींना आजच्या समाजात कुठल्या परिस्थितीतून जावं लागतं त्याची मी थोडीतरी कल्पना करू शकतो. समलैंगिकता अनैसर्गिक आहे असं माझं म्हणणं मुळीच नाही. खरं तर माझं असं काहीच निश्चित मत नाही, म्हणूनच सम्यकपणे विचार करू शकणार्‍या व्यक्तींसाठी हा प्रश्न आहे. मी स्वतः कोणतीही भूमिका किंवा अजेंडा घेऊन हा धागा काढलेला नाही. मी वर विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर 'थेरपी घेणार नाही' असं आलं तर मला बहुतेक आश्वस्तच वाटेल.
२. मी कुठल्याही धार्मिक विचारसरणीच्या दृष्टीकोनातून हा प्रश्न विचारलेला नाही. मी कोणताही धर्म मानत नाही. माझ्या आयडीवरून माझ्या धर्माबद्दल कोणतीही कल्पना करून घेऊ नये. (हो, हे सांगितलेलं बरं असतं)
३. कृपया सिरियस प्रतिसाद अपेक्षित आहेत.

शैलेन्द्र's picture

9 Jan 2013 - 11:22 am | शैलेन्द्र

आता तुम्ही सिरीयस प्रश्न म्हणताय म्हणून सिरीयस उत्तर देतो..

१) तुम्ही समलैंगिकतेच्या विरोधात आहात,समर्थनात आहात की कि कशातच नाही आहात याच्याशी आम्हाला काही मतलब नाही. आमच्या दृष्टीने, एखाद्याचे समलैंगिक असणे ही जोवर तो आम्हाला (पुरुष असल्यास/असल्याने) त्रास देत नाही तोवर गौण व वैयक्तिक बाब आहे.

२) मुख्य आक्षेप आहे तो समलैंगिकता अनुवांशिक आहे किंवा गुणसूत्रात फेर्फार करून ती दुर करता येइल या समजाला.. समलैंगिकता या विषयावर लिहून काहीतरी खळबळ माजवावी असा या लेखाचा उद्देश वाटतो. विषयाची नीट माहिती न घेता शतकी धागे पाडायच्या मानसिकतेचा वाचकांना वास यावा इतक हे वरवरच लिखाण आहे.

साध्या इतकेच

आबा's picture

9 Jan 2013 - 12:38 am | आबा

बरं असो,
का हो बदलायचं सेक्षुअल ओरिएन्टेशन?
नाही, म्हणजे नेमकं कारण काय?!

पाटिलांचा काळ वैज्ञानिक दृष्ट्या बराच पुढारलेला आहे हे स्पष्टच आहे.
सेक्षुअल ओरिएन्टेशन बदलण्याचं ईजेक्षन ही कल्पना वाटते तितकी "जवळच्या" भविष्यकाळातली नाही, त्यासाठी बराच काळ जावा लागेल.
तोपर्यंत टॅबू नष्ट झालेला असेल आणि पाटिल डायलेमा मध्ये पडणार नाहीत.
मुळात सेक्शुअल ओरिएन्टेशन बदलण्याचं इंजेक्षन ही ट्रिटमेंटच एखाद्या, कॉस्मेटिक सर्जरी सारखी (किंवा या प्रतिसादासारखी) युजलेस ठरेल.

आता एक फुकटचा सल्ला:
आपल्या जाणिवा सुद्धा वैज्ञानिक प्रगती बरोबर विस्तारत असतात. त्यामुळे सध्याच्या जाणिवा वापरून, वैज्ञानिक दृष्ट्या प्रगत जगातले मॉरल डायलेमाज सोडवण्याचा प्रयत्न सहसा करू नये.

आणि हो, मला ती ट्रिट्मेंट स्वतःच्या मुलाला द्यायला आवडणार नाही

अर्धवटराव's picture

9 Jan 2013 - 12:48 am | अर्धवटराव

कुठलाही अभिनिवेष न आणता एका (सध्या तरी) नाजुक विषयाला संयतपणे हात घातल्याबद्दल अभिनंदन.

देह पूर्णपणे नैसगीक आहे तसच त्याच्या भावना, लैंगीक इन्क्लीनेशन वगैरे. त्यामुळे समलैंगिकता अनैसर्गीक निश्चित नाहि. लिंगभेद आणि सेक्सअपील यांचे एकमेव प्रयोजन म्हणजे नवीन पिढी जन्माला यावी, असं जर गृहीत धरलं तर समलैंगीकता एक केमीकल लोचा कॅटॅगिरीत जाईल. शिवाय विवाहसंस्थेला समलैंगीकतेची बाधा आहेच. समलैंगीक विवाहांना कितीही मान्यता दिली तरी "जैवीक दृष्ट्या निर्माण झालेल्या पिढीच्या संगोपर्नार्थ एक सिस्टीम" असं जे विवाह संस्थेचं स्वरूप सध्या आहे त्यात समलैंगीकता बसत नाहि.

ऑब्जेक्टीव्ह उत्तर द्यायचं झाल्यास एखादी लसटोचणी जर समलैंगीकतेपासुन सुटका करत असेल तर ते अवष्य करावे .

अर्धवटराव

........

'हे पहा, या वेळी मी तुम्हालाही बोलवलं कारण मला काही महत्वाचं बोलायचं आहे. नवीनच आलेल्या dextrous
डिटरमिनेशन टेस्टबद्दल
आपण ऐकलं असेलच. होणारं बाळ उजवे होणार की डावखुरे ते यातून ठरवता येतं. तर मिसेस पाटलांवर ही टेस्ट मी गेल्यावेळी केली होती आणि तिचे रिझल्ट्स आले आहेत. तुमचं मूल डावखुरे असणार आहे.' त्यांनी थोडं थांबून दोघांच्या प्रतिक्रियेचा अंदाज घेतला.
.........

मी तुम्हाला तुमच्या सर्व ऑप्शन्सची माहिती देऊ इच्छितो. अलिकडेच एक नवी थेरपी निघाली आहे. या थेरपीद्वारे होणार्‍या गर्भाचं डावखुरेपण केवळ एका इंजेक्शनने बदलता येऊ शकतं.

............

मिस्टर आणि मिसेस पाटलांनी काय करावं? तुम्ही काय कराल?

दादा कोंडके's picture

9 Jan 2013 - 2:49 am | दादा कोंडके

सहमत.

आपलं अपत्य कसं असावं हे प्रत्येक आई-वडिलांना ठरवण्याचा हक्क आहे. आणि ते तात्कालीक कायद्याला धरून असेल तर ते त्यांनी जरूर करावं त्यात एव्हडं गहजब करण्यासारखं काय आहे? होमोज् च्या हक्कांसाठी लढणार्‍यांनी होमोसेक्षुअल अपत्य जन्माला घालण्याची जबरदस्ती का? स्वतःचं पुरोगामित्व सिद्ध करण्यासाठी अपत्याचा बळी/त्रास का द्यायचा? काही वर्षापुर्वीपर्यंत (सरकारनेच याची सुरवात केली होती) लिंगपरिक्षण आणि गर्भपात कायद्याला मान्य होते आता नाहीत, दॅट्स इट.

उपास's picture

9 Jan 2013 - 1:04 am | उपास

>>आपल्या जाणिवा सुद्धा वैज्ञानिक प्रगती बरोबर विस्तारत असतात. त्यामुळे सध्याच्या जाणिवा वापरून, वैज्ञानिक दृष्ट्या प्रगत जगातले मॉरल डायलेमाज सोडवण्याचा प्रयत्न सहसा करू नये.
हे बरोबर उत्तर. परिस्थिती जर भविष्यातील असेल तर उत्तर सुद्धा भविष्यातीलच जाणीवा/ नेणीवा असूनच हवे. आत्ताच्या जाणींवातून उत्तर देणे म्हणजे केवळ अपव्याव.
उदा.
<शंभर एक वर्षापूव्रीचा काळ....>
समजा भविष्यात, माझ्याकडे एक काळी डबी आहे (नाउ-कीया कंपनीची) त्यातून विनाविलंब निरोप पाठवण्याची सोय आहे तर गावाकडे घरात कुणी गेल्याची बातमी ह्या डब्यांतून कळवली तर तुम्ही हवेतून उडून लगेच याल का?

असा प्रश्न आत्ता तितके नवल करत नाही कारण मोबाईल आणि विमान प्रवास ह्या दोन्ही जाणीवा वैज्ञानिक प्रगतीसह विस्तारल्या आहेतच, अगदी सामान्य माणसाच्याही आणि हेच विज्ञानाच यश आहे, माणसाची प्रगती आहे.
थोडक्यात, त्याकाळात ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण तितकच सोप्प होईल किंवा प्रश्न गैरलागू असेल ही शक्यता जास्त.
अर्थात, प्रश्नात जसे कल्पनारंजन केले आहे तसे उत्तरातही करायचे असेल तर त्याला अंत नाही, असो!

खान's picture

9 Jan 2013 - 1:54 am | खान

>>आपल्या जाणिवा सुद्धा वैज्ञानिक प्रगती बरोबर विस्तारत असतात. त्यामुळे सध्याच्या जाणिवा वापरून, वैज्ञानिक दृष्ट्या प्रगत जगातले मॉरल डायलेमाज सोडवण्याचा प्रयत्न सहसा करू नये.

हा सिनॅरिओ केवळ भविष्यातच लागू होतो असं नाही. त्याला भविष्यात एवढ्यासाठी ढकललं आहे की आजच्या जगातली सत्यं उदा. धार्मिक संघटनांचा कडवा विरोध, सामाजिक टॅबू, जुनाट कायदे आणि या सर्वांचा त्या व्यक्तीला होणारा त्रास यांना विचारप्रक्रियेतून बाद करता यावं, जेणेकरून आपण समलिंगीत्वाचा विचार पूर्णपणे ऑब्जक्टिवली करू शकू. जर तुम्ही मि. पाटलांसारखा विचार आज करत असाल तर तुमच्यासाठी काळ हा गौण मुद्दा आहे.

दुसरं असं की आपल्या विचारप्रक्रियेत पूर्वसंस्कारांचाही फार महत्त्वाचा वाटा असतो. उदा. दीडशे वर्षांपूर्वीच्या अत्यंत सज्जन माणसालादेखील विधवाविवाह हे भयंकर पाप आहे असं वाटलं असतं, तोच माणूस १९२० मध्ये असता तर त्याला विधवाविवाह ठीक, पण आंतर्जातीय विवाह पाप, असं वाटलं असतं, त्याच माणसाने आजच्या काळात आंतर्जातीय विवाह मान्य केला असता, पण समलिंगी विवाह पाप मानलं असतं. त्याला भविष्यात ढकलण्याचं कारण हे की, समलिंगीत्वाचे आजच्या काळातले पूर्वग्रहही आपल्या विचारप्रक्रियेतून बाद करावेत. मग मुद्दा एवढाच उरतो की असा माणूस समलिंगीत्वाला कुठे बसवेल? एक पूर्णपणे नैसर्गिक पण तुलनेने दुर्मिळ प्रवृत्ती, की बदलता आलं तर बदलावं असं aberration? (सॉरी चपखल मराठी शब्द सापडत नाही)

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Jan 2013 - 2:01 am | डॉ सुहास म्हात्रे

समलिंगी असणे ही मानसिक स्थिती आहे... यात काही शारीरीक वेगळेपणा असेलच असे नाही. शिवाय लैंगीक अभिमुखता (ओरिएंटेशन) हे पुरुष / स्त्री वयात आल्यानंतरच कळू शकते. लैंगीक जाणीव आल्याशिवाय एखाद्या व्यक्तीची लैंगीक अभिमुखता कशी काय कळू शकेल?

आतापर्यंत तरी पोटातल्या बाळाची अथवा लहान (वयात न आलेल्या) मुलांची तपासणी करून त्यांची भविष्यात लैंगीक अभिमुखता कशी असेल ते ओळखण्याची काही तपासणी निघालेली नाही.

प्रश्न जर "तुमचे समलिंगी अभिमुखतेबद्दल काय मत आहे" हाच असेल तर उदाहरण जरा वेगळे... वयात आलेल्या मुलाबद्दल असते तर योग्य झाले असते.

शास्त्रीय दृष्टीकोनातून समलिंगी असणे ही डावखुरे असण्यासारखेच एक व्हेरिएशन आहे... आणि कदाचित तेवढेच कॉमन. पण त्याला असलेल्या प्रचंड सामाजीक लांछनामुळे ते बहुतकरून लपवले जाते. त्यावर खास असा उपायही नाही.

Homosexuality is NOT a personal choice; or a specific physical deformity or malformation. It is a variation of sexual orientation due to complex interplay of biological, psychological and environmental factors.

कौन्तेय's picture

9 Jan 2013 - 7:21 am | कौन्तेय

स्त्री पुरूषांचं प्रमाण नियमित करणे हे जसं निसर्गाचं एक काम आहे त्याच प्रमाणे प्रत्येक काळातल्या लोकसंख्येत काही टक्के समलिंगी असणे हा निसर्गाचा खेळच आहे समजा. काही कनिष्ठ / दुष्ट परिस्थितींमुळे एखाद्याला वा एखादीला पूर्णतः / अंशतः समलिंगीत्व अनैसर्गिकपणे आलं असल्यास त्याच्या वा तिच्या इच्छेनुसार त्यावर उपलब्ध असल्यास 'उपचार' करणे गैर नाही. पण पोटातल्या बाळाला जसे केवळ मुलगी असण्यावरून मारून टाकणे चूक तसेच समलिंगी असण्यावरूनही. इंजक्शन देऊन पोटातल्या पोटात मुलीचा मुलगा करता आला तर करावा का??? निसर्गाच्या समतोल नियमन चक्रात आपण ढवळाढवळ करू नाही.
पण एक तिढा कायम आहे. मूल अपंग जन्मणार समजल्यावर गर्भपात करून घेणारी जोडपी आपण बघतो. त्या जोडप्यांप्रति सहानुभूतही होतो. पण त्या जीवाला - तो कसा का असेना, जगायचा हक्क नव्हताच असं कसं गृहित धरता येईल? अर्थात हा मुद्दा या चर्चेच्या जरा बाहेरचा आहे. तेव्हा याला धरून तिरकी तिरकी चर्चा चालवू नये!

नितिन थत्ते's picture

9 Jan 2013 - 7:26 am | नितिन थत्ते

चर्चाविषय वाजवी वाटला.....

सध्याच्या मुलगा होण्याच्या उपलब्ध उपायांना असलेली मागणी पाहता लैंगिक प्रेफरन्सच्या निवडीचा प्रश्न अगदीच कैच्याकै वाटत नाही.

वंशवृद्धी/सातत्याच्या प्रेरणेशी कदाचित या प्रश्नाची सांगड बसू शकेल.

परंतु बर्‍याचदा माणसाला हायपोथेटिकल सिनारिओबद्दल विचार करून निर्णयावर येणे शक्य होत नाही. मी सध्या या सिनारिओच्या बर्‍याच पुढच्या टप्प्यावर आलेलो असल्याने (म्हणजे मला मूल होणार आहे वगैरे गोष्टी आधीच घडून गेलेल्या असल्याने) मला तात्विक भूमिका घेऊन मला समलैंगिक मूल चालेल असे उत्तर देणे शक्य आहे. परंतु ते प्रामाणिक असेल असे नाही. खरे तर मला 'मी काय केले असते' असा विचार करायला देखील जमत नाहीये.

रोचक सिनारीयो आहे. माझ्या मते मी मुल गर्भधारणेपासून पहिले चार महिने शारिरिक दृष्ट्या अव्यंग असेल तर त्यावर कोणतेही बदल करू इच्छिणार नाही.
पहिल्या चार महिन्यांनंतर शारीरीक व्यंग निर्माण झाले व ते ठिक होण्यासारखे असेल अतर ते उपाय करेन मात्र आईच्या जीवास धोका असल्याने नंतर व्यंग दिसल्यासही गर्भपात करण्याचा पर्याय स्वीकारणार नाही.

समलैंगिकता हे शारिरिकच काय कोणतेही व्यंग मी खरोखरच मानत नाही. माझ्या परिचयात समलैंगिक, भिन्नलिंगी आणि उभयलिंगी संबंध ठेवणार्‍या / आवडणार्‍या व्यक्ती आहेत व त्यांच्यात 'अनैसर्गिक' किंवा 'उपाय' करायला हवे असे काहिहि आढळलेले नाही. तेव्हा मी यात बदल करणार नाही असे वाटते.

आदूबाळ's picture

9 Jan 2013 - 1:17 pm | आदूबाळ

रोचक सिनारीयो आहे. माझ्या मते मी मुल गर्भधारणेपासून पहिले चार महिने शारिरिक दृष्ट्या अव्यंग असेल तर त्यावर कोणतेही बदल करू इच्छिणार नाही. पहिल्या चार महिन्यांनंतर शारीरीक व्यंग निर्माण झाले व ते ठिक होण्यासारखे असेल अतर ते उपाय करेन मात्र आईच्या जीवास धोका असल्याने नंतर व्यंग दिसल्यासही गर्भपात करण्याचा पर्याय स्वीकारणार नाही.

अगदी सहमत!

जर गर्भ अव्यंग असेल, तर निसर्गनियमात काहीही ढवळाढवळ करण्याचा अधिकार माणसाला प्राप्त होत नाही. (मुलगाच व्हावा* किंवा तो विशिष्ट गुणधर्माचा व्हावा# म्हणून औषधं पण नाहीत.)

पण
"व्यंग" म्हणजे नक्की काय, याची व्याख्याही नीट ठरवावी लागेल. नाहीतर निसर्गाच्या उत्क्रांती-प्रक्रियेला मानव अजाणतेपणी खोडा घालायचा. (उदा. एखाद्या गर्भात मेंदूचा आकार नेहेमीपेक्षा दीडपट असेल, तर ही उत्क्रांती आहे का व्यंग, याचा निर्णय घ्यावा लागेल!)

ऋषिकेश's picture

9 Jan 2013 - 2:48 pm | ऋषिकेश

(मुलगाच व्हावा* किंवा तो विशिष्ट गुणधर्माचा व्हावा# म्हणून औषधं पण नाहीत.)

तेही दिवस दूर नसावेत. तसे दिवस आल्यास काय करायचे या प्रश्नाची चर्चा तेव्हा मिपावर करूच :) ;)

"व्यंग" म्हणजे नक्की काय, याची व्याख्याही नीट ठरवावी लागेल. नाहीतर निसर्गाच्या उत्क्रांती-प्रक्रियेला मानव अजाणतेपणी खोडा घालायचा.

सहमत आहे. भविष्यकालीन बदलांचा अंदाज नसल्याने व्यंगाची कालातीत यादी करता येणार नाही पण ढोबळ व्याख्या करता यावी व त्या त्या काळाला सुसंगत यादीही बनवता यावी.
उत्क्रांती ही एका अर्भकाने अशी सुरवात होत नाही (किंवा त्याला 'खोडा' घालता येणार नाही). ती वर्षानुवर्षे, पिढ्यान्-पिढ्या चालणारी क्रिया आहे.

मन१'s picture

9 Jan 2013 - 11:00 am | मन१

ती लस का औषध काय आहे ते शक्यतोवर घ्यायचा प्रयत्न करेन; अर्थातच पूर्ण सुरक्षित असेल आणि जोडिदाराची परवानगी असेल तरच.

समलैंगिकता , स्त्री-पुरूष, ज्योतिष , पुणे आणि नाडी यांची कशीही टुकार काडी टाका ..
पब्लिक हिरिरिने भाग घेतय ;)

परिकथेतील राजकुमार's picture

9 Jan 2013 - 11:29 am | परिकथेतील राजकुमार

मिस्टर आणि मिसेस पाटलांनी काय करावं?

ते सांगण्याचा आम्हाला काय अधिकार ?

तुम्ही काय कराल?

हे विचारण्याच्या तुम्हाला काय अधिकार ?

अगदी डावखुरा आणि उजवा इतकं कमी परिमाण सम आणि विषमलैंगिकतेचं नाही. असा विचार म्हणजे ओव्हर सिंप्लिफिकेशन वाटतं, अगदी भविष्यकाळातला संदर्भ घेतला तरी.

डावखुर्‍या माणसाला प्रयत्नपूर्वक उजवखुरा(!) न केल्याने त्याच्या रोजच्या आणि दीर्घकालीन आयुष्यात जेवढे फरक होतील त्याहून नक्कीच जास्त डीटेलवार फरक समलैंगिक असण्या-नसण्याने पडतील.

अर्थात त्या काळातला विषमलैंगिक आणि समलैंगिक यांच्या लाईफमधे फरक असेल पण आजच्या समलैंगिकाच्या आणि त्या काळातल्या समलैंगिकाच्या आयुष्यात नक्कीच बराच फरक (फॉर गुड) पडलेला असेल असं मानता येईल, त्यामुळे समलैंगिक असणं आवर्जून टाळावं असं राहिलं नसेल.

आणखी दोन मुद्दे:

१. श्री आणि सौ पाटील विषमलिंगी असल्याने आपलं मूल आपल्यासारखं नाही याचा सूक्ष्म विषाद त्यांना वाटेलच. (समलैंगिक आहे याच्या धक्क्यापेक्षाही ते आपल्यापेक्षा वेगळ्या ओरिएंटेशनचं आहे अशी जाणीव. जसं गोर्‍या / निळ्या डोळ्यांच्या आईबापांना सावळं आणि काळ्या डोळ्यांचं मूल झाल्यावर वाटत असेल.)

२. त्या काळी कदाचित व्यावहारिक, आर्थिक, मानसिक वगैरे वगैरे दृष्टीने विषमलिंगीपेक्षा समलैंगिक असणं जास्त "फायद्याचं","सोयीचं","सुटसुटीत" ठरलं असू शकतं.

मूळ मुद्दा हा आहे

सेक्शुअल प्रेफरन्स डिटरमिनेशन

याचा अर्थ वन हॅज अ चॉईस. इथे मुलाला चॉइस नाही पालक मुलाविषयी निर्णय घेतायत.

पुढे प्रतिसादात लेखकानं म्हटलय :

जेणेकरून आपण समलिंगीत्वाचा विचार पूर्णपणे ऑब्जक्टिवली करू शकू

याचा अर्थ देअर इज नो प्रेफरन्स. वी आर लूकींग अ‍ॅट अ फॅक्ट.

या दोन भिन्न गोष्टी आहेत.

होमोजकडे माणूस म्हणून पहाणं कुणाही सूज्ञाला मान्य होईल पण स्वेच्छेनं होमो जन्माला घालण्याचा विचार विकृत आहे.

होमोसेक्शुअ‍ॅलिटीचा सुप्त अजेंडा राबवणारा लेख असं नाईलाजानं म्हणतो. आणि तसं नसेल तर या विचाराचा प्रसार थांबवावा अशी विनंती करतो

चाणक्य's picture

9 Jan 2013 - 4:28 pm | चाणक्य

हे लक्षातच आलं नव्हतं. वकील म्हणायचे कि काय तुम्ही ?

विचारपूर्वक प्रतिसाद देणार्‍या सर्व वाचकांचे आभार. प्रतिसादांत आलेले मुद्दे रोचक आहेत.

>>समलैंगिकता अनुवंशिक असते का?

अनुवंशिक असणं शक्यच नाही! कारण नैसर्गिक रीत्या समलैंगिकांना मूल होणं शक्य नसल्याने समलैंगिकांची पहिलीच पिढी गारद होऊन पुढची पिढी निर्माणच होणार नाही! तुम्हाला बहुदा 'समलैंगिकत्व नैसर्गिकरीत्या निर्माण होतं का?' असं म्हणायचं असावं. तर ते अर्थातच असावं. म्हणजे कुठलीही निसर्गतः विषमलिंगी असलेली व्यक्ती 'मला समलैंगिकतेतून 'किक' मिळते म्हणून मी आजपासून समलिंगी व्हायचं ठरवलं आहे' असं (बहुदा) ठरवत नसावी. (and vice versa)

>>निसर्गाच्या समतोल नियमन चक्रात आपण ढवळाढवळ करू नाही.
क्ष टक्के समलिंगी व्यक्ती जन्माला येणं हे निसर्गाचं जीवनचक्र समतोल राखण्यासाठीचं एक instrument आहे का?

>>हे विचारण्याच्या तुम्हाला काय अधिकार ?
'सांगण्याचा' काहीच अधिकार नाही हे मान्य, पण काय कराल हे 'विचारण्याचा' तरी असावा असं वाटतं.

>>नवीनच आलेल्या dextrous डिटरमिनेशन टेस्टबद्दल आपण ऐकलं असेलच. होणारं बाळ उजवे होणार की डावखुरे ते यातून ठरवता येतं.
>>शास्त्रीय दृष्टीकोनातून समलिंगी असणेही डावखुरे असण्यासारखेच एक व्हेरिएशन आहे

यासाठी दृष्टीकोनातून आपण काही रेफरन्स पॉईंट्स पाहू. त्यांच्या तीव्रतेच्या परिमाणानुसार...

- तुमचं मूल डावखुरं निपजणार आहे
- तुमच्या मुलीच्या मानेवर एक भलीमोठी जन्मखूण असणार आहे. आपण इंजेक्शनने ती घालवू शकतो.
- तुमचं मूल माईल्डली ऑटिस्टिक असणार आहे. तुम्हाला मुलाच्या जन्मापूर्वी आणि नंतर काही ट्रीटमेंट करावी लागेल, मुलाला ग्लुटेन-फ्री डाएट द्यावा लागेल इ.इ.
- तुमच्या मुलात जन्मतः हृद्रोग असणार आहे. त्याचं भावी आयुष्य प्रचंड कठीण असणार आहे. तुमच्याकडे सर्व पर्याय उपलब्ध आहेत, गर्भपातापासून.

या उतरंडीत समलैंगिकता हे व्हेरिएशन (मीही हे व्यंग मुळीच मानत नाही) कुठे बसेल असा प्रश्न होता. मला व्यक्तिशः गवि यांचा प्रतिसाद बराचसा पटला आहे. समलैंगिकता हे डावखुरेपणासारखं पण त्यापेक्षा काही पट अधिक परिमाण असलेलं व्हेरिएशन वाटतं. कुठल्याही आईबापांना आपलं मूल हे आपल्यासारखंच व्हावं असंच वाटेल. (जसं शाकाहारी आईबापांना आपलं मूल शाकाहारी असावं असं वाटतं, किंवा सश्रद्ध आईबापांना आपल्या मुलाने नास्तिक होऊ नये असं वाटेल, आणि vice versa) तसंच हेटरोसेक्शुअल आईवडिलांना 'आपलं मूल समलिंगी असलं तर एक उसासा टाकून मी ते ऍक्सेप्ट करेन, पण जर ती परिस्थिती बदलता येणं शक्य असेल तर मी बदलेन' हे उत्तरही सरळसरळ 'हो' किंवा 'नाही' उत्तरांइतकच प्रामाणिक वाटतं.

संजय क्षीरसागर's picture

10 Jan 2013 - 11:22 am | संजय क्षीरसागर

होमोसेक्शुअ‍ॅलिटी कशानं निर्माण होते?

आणि जमल्यास या गोलमाल वाक्यातनं तुम्हाला नक्की काय म्हणायचय ते सांगा

बर्‍याच वेळा एखाद्या प्रश्नाबद्दल आपली नक्की काय भूमिका आहे हे आपल्याला ठरवता येत नाही.

तुमची नक्की भूमिका ठरलीये का?

समलिंगी संबध पूर्ण वैध की अवैध, याबद्दल आपल्यापैकी काहींच्या मनात संशय येत असतो

त्याला न्यायलयानं वैधता दिली आहे याची तुम्हाला कल्पना दिसत नाही. त्याचं उघड कारण म्हणजे तो दोन सज्ञान व्यक्तींचा परस्परातला प्रश्न आहे.

त्यांच्यापैकी "समलिंगी व्यक्तिंना सध्याच्या सामाजिक वातावरणात ज्या दिव्यातून जावं लागतं ते बघता अशा व्यक्तिंना माझं पूर्ण समर्थन आणि सहानुभूती आहे

इथे तुम्ही स्टँड घेतला आहे. (आणि तुमच्या पहिल्या वाक्याचा बाजा वाजवला आहे)

समलैंगिकता ही विकृती नाही, पण ती पूर्ण नैसर्गिक मानावी का?

इथे तुमचा हेतू उघड होतो.

पण पुन्हा गाडी रूळावर आणण्याचा प्रयत्न केलाय :

समजा, एखाद्या व्यक्तीची समलैंगिकता 'दुरुस्त' करता येत असेल तर ती तशी करावी का?

आता तुम्ही नक्की काय साधताय ते कळावं म्हणून विचारतो :

होमोसेक्शुअ‍ॅलिटी कशानं निर्माण होते?

ऋषिकेश's picture

10 Jan 2013 - 12:13 pm | ऋषिकेश

होमोसेक्शुअ‍ॅलिटी कशानं निर्माण होते?

माझ्या मते ती निर्माण वगैरे काही होत नाही ती 'असते'

मला असं वाटतं की ती १००% जेनेटिक किंवा तत्सम नसावी. कदाचित ती हळूहळू डेव्हपलही होत असेल. त्यात अनुवंशिक रचना/ मेंदू / हार्मोन्स / बाह्यघटक (सराउंडिंग) हे सर्व अनिश्चित प्रमाणात आपला प्रभाव टाकत असतील. त्याशिवाय मुळात समान लिंगीयाविषयी आकर्षण हा सेंटरपॉईंट नसून स्वतःचं जे बायॉलॉजिकल लिंग आहे त्याच्या विरुद्ध लैंगिक प्रवृत्ती आणि त्यामुळे त्याच्या विरुद्धच्या म्हणजे पुन्हा स्वतःच्या लिंगाच्या व्यक्तीचं (नैसर्गिक) आकर्षण हा ड्रायव्हिंग फॅक्टर असावा.

आपणही पुरुष, (पुरुषी लैंगिक मानसिकतेचे ,जनरली अ‍ॅग्रेसिव्ह / अ‍ॅक्टिव्ह सेक्शुअल रोल) आणि आकर्षणही तशाच पुरुषी लैंगिकतेच्या (जनरली अ‍ॅग्रेसिव्ह / अ‍ॅक्टिव्ह सेक्शुअल रोल) पुरुषाविषयी आकर्षण" असं स्वरुप समलैंगिकतेचं नसावं. जनरली अ‍ॅक्टिव्ह रोल विरुद्ध जनरली रिसीव्हिंग / पॅसिव्ह रोल असा हा विरोधी आकर्षणाचा भाग असावा. (याचा अर्थ सर्व स्त्रिया पॅसिव्हच असतात सर्व पुरुष अ‍ॅक्टिव्हच असतात .. वगैरे असा नव्हे.. पण अ‍ॅव्हरेज जी काही त्या त्या जेंडरची जनरल मानसिक लैंगिकता आणि /किंवा विरुद्धलिंगीयाकडून लैंगिक अपेक्षा असते ती गृहीत धरलेली आहे.)

अधिक सोपं करायचं तर आपण स्त्री असतो तर बरं झालं असतं असं त्या रोलमधल्या पुरुष समलैंगिकाला वाटत असावं, पण मग दुसरी बाजू - याच जोडीतला पुरुषी रोलमधला पुरुष जोडीदार- त्याची भूमिका कशी बनत असावी हे समजणं थोडं कठीण आहे. कदाचित समलैंगिकांमधे दोन वेगवेगळ्या भूमिकेतले लोक असावेत.

आपणही पुरुष, (पुरुषी लैंगिक मानसिकतेचे ,जनरली अ‍ॅग्रेसिव्ह / अ‍ॅक्टिव्ह सेक्शुअल रोल) आणि आकर्षणही तशाच पुरुषी लैंगिकतेच्या (जनरली अ‍ॅग्रेसिव्ह / अ‍ॅक्टिव्ह सेक्शुअल रोल) पुरुषाविषयी आकर्षण" असं स्वरुप समलैंगिकतेचं नसावं. जनरली अ‍ॅक्टिव्ह रोल विरुद्ध जनरली रिसीव्हिंग / पॅसिव्ह रोल असा हा विरोधी आकर्षणाचा भाग असावा.

इथे तपशीलात शिरत नाही. पण इतकेच सांगतो की हा समज/गृहितक चुकीचे आहे

संजय क्षीरसागर's picture

10 Jan 2013 - 2:13 pm | संजय क्षीरसागर

अधिक सोपं करायचं तर आपण स्त्री असतो तर बरं झालं असतं असं त्या रोलमधल्या पुरुष समलैंगिकाला वाटत असावं, पण मग दुसरी बाजू - याच जोडीतला पुरुषी रोलमधला पुरुष जोडीदार- त्याची भूमिका कशी बनत असावी हे समजणं थोडं कठीण आहे. कदाचित समलैंगिकांमधे दोन वेगवेगळ्या भूमिकेतले लोक असावेत.

तसं नाहीये (म्हणून शेवटी लॉजिक ओपन राहिलय).

लेखकाचा काय अभ्यास आहे त्याची वाट पाहतोय. त्यांनी म्हटलय :

विचारपूर्वक प्रतिसाद देणार्‍या सर्व वाचकांचे आभार

म्हणून त्यांना विचारलय. अन्यथा कोर्टानं तो विषय केंव्हाच संपवलाय अँड दॅट इज फेअर इनफ.

होमोसेक्शुअ‍ॅलिटी मान्य करणं वेगळं आणि तिचं उदत्तीकरण वेगळं.

सेक्शुअल प्रेफरन्स डिटरमिनेशन

अशा निराधार विचारसरणीतून ते या लेखात केलं गेलय आणि गैर आहे.

शैलेन्द्र's picture

10 Jan 2013 - 2:32 pm | शैलेन्द्र

शक्य होईल तितके उत्तर द्यायचा प्रयत्न करतो.

अगोदर होमोसेक्सुअलिटी व होमोसेक्सुअल प्लेजर यांना वेगळे करुयात. ढोबळ मानाने होमोसेक्सुअलीटी ही मनोकायीक अवस्था आहे तर होमोसेक्सुअल प्लेजर हे स्वमैथुनाचे एक पुढचे पावुल आहे. निसर्गात होमोसेक्सुअलीटी कमी आढळत असुन, होमोसेक्सुअल प्लेजर जास्त आढळते.

"Additional studies pertaining to hormone involvement in homosexual behavior indicate that when administering treatments of testosterone and estradiol to female heterosexual animals, the elevated hormone levels increase the likelihood of homosexual behavior. Additionally, boosting the levels of sex hormones during an animal's pregnancy appears to increase the likelihood of it birthing a homosexual offspring"

थोडक्यात, कामेच्छा वाढली की तीला पुर्ण करण्यासाठी, मुळात कामेच्छा असण्याचा जो उद्देश "प्रजोत्पादन" तो बाजुला ठेवूनही त्या क्रीडेचा आनंद काही सजीवांकडुन घेतला जातो.

तसेच
"However, when analyzing these differences in bisexual rams, males were found to have lower levels of testosterone and estradiol in their blood, as well as smaller gonads then their heterosexual counterpart." थोडक्यात ज्या प्राण्यांत समागम करण्याची संधी ही शारीरिक ताकदीवर अवलंबुन असते त्यांत, ज्यांना ती मिळत नाही ते प्राणीही हा आनंद घेताना दिसतात.

मानवाने या सगळ्या नैसर्गीक प्रेरणांना समाज जाणीवांचा अजुन एक आयाम जोडल्याने तिथे हे सगळ अजुन गुंतागुंतीच आहे..

संजय क्षीरसागर's picture

10 Jan 2013 - 2:41 pm | संजय क्षीरसागर

थोडक्यात, कामेच्छा वाढली की तीला पुर्ण करण्यासाठी, मुळात कामेच्छा असण्याचा जो उद्देश "प्रजोत्पादन" तो बाजुला ठेवूनही त्या क्रीडेचा आनंद काही सजीवांकडुन घेतला जातो.

नो!

लेखकाचा अभ्यास काय आहे त्याचं कुतूहल आहे कारण

समजा, एखाद्या व्यक्तीची समलैंगिकता 'दुरुस्त' करता येत असेल तर ती तशी करावी का ?

वगैरे लिहीलय

लेखकाचं काय मत / अभ्यास आहे ते ओघाने पुढे येईलच. मी या प्रकारच्या ओरिएंटेशनमागे कोणते ड्रायव्हिंग घटक असावेत त्याचा विचार करतो आहे.

थोडक्यात, कामेच्छा वाढली की तीला पुर्ण करण्यासाठी, मुळात कामेच्छा असण्याचा जो उद्देश "प्रजोत्पादन" तो बाजुला ठेवूनही त्या क्रीडेचा आनंद काही सजीवांकडुन घेतला जातो.

या प्रकाराने बायसेक्शुअल ओरिएंटेशन समजून घेता येईल. (वाढीव कामेच्छा+ अनुपलब्धता = समलिंगीय व्यक्ती चालणे किंवा शक्तिप्रदर्शनासाठी नरांकडून प्राण्यांमधे कधीकधी असं केलं जातं) पण एरवी भिन्नलिंगीयांशीही संबंध असतोच.

आपण समलैंगिकता म्हणून जी पाहतो आहोत त्यात विरुद्धलिंगी आकर्षण नसणेच किंवा विरुद्ध लिंगी व्यक्ती उपलब्ध असूनही आवर्जून समान लिंगाच्या व्यक्तीला निवडण्याची प्रवृत्ती अशी कॅटेगरी आहे असं गृहीतक आहे. शिवाय मानसिक आकर्षण हा शारिरीक आकर्षणातलाच एक कॉम्पोनंट आहे असंही गृहीतक आहे.

दादा कोंडके's picture

10 Jan 2013 - 7:41 pm | दादा कोंडके

>>समलैंगिकता अनुवंशिक असते का?

अनुवंशिक असणं शक्यच नाही! कारण नैसर्गिक रीत्या समलैंगिकांना मूल होणं शक्य नसल्याने समलैंगिकांची पहिलीच पिढी गारद होऊन पुढची पिढी निर्माणच होणार नाही!

पहिलाच मुद्दा वाचून अडखळलो. समलैंगिकता 'हो' किंवा 'नाही' मध्ये मोजता येत नाही. प्रत्येक व्यक्तीमध्ये ती असते. प्रमाण (खूप)कमी/नसणे ते (खूप)जास्त असतं. चाळीशी नंतर दोन-तीन मुलं असलेले विवाहीत पुरुष एकदम साक्षात्कार झाल्यासारखे समलैंगिक संबंध ठेवलेले माहीत आहेत. त्यामुळे त्यांना 'माणूस' म्हणून वागवणे ठिक आहे पण अलिकडे मिडियाला धरून समलैंगिकतेचं जे उदात्तीकरण चाललयं ते डोक्यात जातं. अशाने समलैंगकतेकडे थोडेशेच इन्क्लाईन्ड असलेली लोकं जी ऑदरवाईज फार कुचंबणा न होता चार-चौघांसारखं आयुष्य जगली असती ती 'घुटघुटके मत जियो, अपनी पेहचान स्विकारो' वगैरे टाळ्याखाउ वाक्यांनी बिथरतात आणि 'घरके ना घाटके होतात'.

ता. क.: वरील परिच्छेदातल्या माहितीसाठी पुरावे मागु नयेत, अपमान करण्यात येइल. :)

शैलेन्द्र's picture

10 Jan 2013 - 11:56 pm | शैलेन्द्र

प्रतिसाद प्रचंड आवडला..

सुचेल तसं's picture

11 Jan 2013 - 12:57 am | सुचेल तसं

माझ्या ओळ्खीचं एक समलिंगी कपल आहे. ते अगदी लग्न होईपर्यंत एकमेकाशी एकनिष्ठ होते. दोघांची लग्न झाली (अर्थात वेगळ्या मुलींसोबत) आणि दोघांना मुलं आहेत. ह्याला तुम्ही काय म्हणणार? समलिंगी असणं आणि प्रजोत्पादन करणं हे काही केसेस मधे नक्कीच शक्य आहे. समलैंगित्व ही एक आवड अथवा फिलिंग आहे असं मला वाटतं. त्याचा प्रजोत्पादनाशी नेहेमीच संबंध जोडता येणार नाहे, हे नक्की. समलिंगी लोकं ही काही इम्पोटंट असतातच असं नाही. त्यांच्यामधे प्रजोत्पादनासाठी आवश्यक असे गुणधर्म असतील (म्हणजे स्पर्म काऊंट वगैरे) तर त्यांना प्रजोत्पादन काही अशक्य नाही.

बन्डु's picture

10 Jan 2013 - 3:07 pm | बन्डु

तुम्हाला विचार मंथन म्हणायचे आहे का?
मैथुन काय कैच्च्या कै... !!!

खान's picture

10 Jan 2013 - 10:50 pm | खान

मला वाटतं मला काय म्हणायचं आहे ते आता माझ्याच मनात थोडं स्पष्ट होतं आहे. काही प्रश्नांची उत्तरं देतो आणि मग मूळ मुद्द्याकडे वळतो.

होमोसेक्शुअ‍ॅलिटी कशानं निर्माण होते?
माझ्या मते ती निर्माण वगैरे काही होत नाही ती 'असते'

मलाही असंच वाटतं. काहींच्या बाबतीत ती विशिष्ट परिस्थितीत केलेली तात्पुरती तडजोड असावी (उदा. तुरुंगातले कैदी, किंवा फार काळ घरापासून दूर राहणारे) काही अति तुरळक प्रमाणात ती केवळ दुसर्‍याचे मानसिक खच्चीकरण किंवा त्याच्यावर स्वामित्व प्रस्थापित करण्यासाठी केली जात असेल. पण बहुतांश केसेसमध्ये ती निसर्गतःच आलेली प्रवृत्ती असावी.

त्याला न्यायलयानं वैधता दिली आहे याची तुम्हाला कल्पना दिसत नाही.

न्यायालयाने वैधता देणे-न देणे हा केवळ गव्हर्नन्सचा भाग झाला. न्यायालयाने वैधता देण्याच्या आदल्या दिवशी समलैंगिकता ही अयोग्य होती आणि दुसर्‍या दिवसापासून ती अचानक ऍक्सेप्टबल झाली असं नाही.

इथे तुम्ही स्टँड घेतला आहे. (आणि तुमच्या पहिल्या वाक्याचा बाजा वाजवला आहे)

'समर्थन' याचा अर्थ असा की ज्या व्यक्तींना आपण १०० टक्के समलिंगी आहोत याची जाणीव झाली आहे आणि त्यांनी 'बाहेर' यायचं ठरवलं आहे/आलेले आहेत त्यांना केवळ समाजातल्या तत्कालीन नैतिक-अनैतिक किंवा धार्मिक कल्पनांपायी आपली नैसर्गिक प्रेरणा दाबून टाकून जबरदस्तीने सेलिबेट रहावं लागू नये किंवा विषमलिंगी विवाह त्यांच्यावर लादला जाऊ नये.

होमोसेक्सुअल प्लेजर हे स्वमैथुनाचे एक पुढचे पावुल आहे. निसर्गात होमोसेक्सुअलीटी कमी आढळत असुन, होमोसेक्सुअल प्लेजर जास्त आढळते

असहमत. स्वमैथुन हा सम/विषम दोन्हीमध्ये सारख्याच प्रमाणात होतो आणि त्याचे कारण हे निव्वळ 'मजबूरी' (जोडीदाराची अनुपलब्धता) हे आहे. विषमलिंगी व्यक्तीने जोडीदार उपलब्ध होण्याआधी कितीही काळ स्वमैथुन केला असला तरी जोडीदार मिळाल्यावर ती स्वमैथुन किंवा समलिंगी संभोग यापैकी कशाकडेच वळणार नाही.

पण समलैंगिकतेतल्या नैतिकतेची चर्चा करणं हा माझा हेतू नाहीच. तशा चर्चा आजवर अनेक झाल्या आहेत आणि त्यात ऍड करण्यासाठी माझ्याकडे काही नाही आणि मी वैद्यक किंवा नैतिकता यांचा अभ्यासक नसल्यामुळे माझ्याकडे या संदर्भात काही भाष्य करण्याचा अधिकारही नाही. कुणाला उपदेशाचे डोस पाजायला किंवा अधर्मापासून वाचवायला मी आलेलो नाही.

मला पडलेला प्रश्न हा आहे की एकीकडे दुराग्रही परंपरावादी/धर्मलंड, हेटर्स आणि दुसरीकडे टोकाचे पॉलिटिकली करेक्ट रिऍक्शनरी डावे यांच्या साठमारीत समलिंगीत्वाचा निरपेक्ष विचार केला जातो का?

हा प्रश्न पडण्याचं कारण म्हणजे अलिकडेच कॅलिफोर्नियात येऊ पहात असलेला 'गे कन्वर्जन थेरपी बॅन'. कुण्या तथाकथित 'एक्स्पर्ट'ने समलिंगी तरुणांना विषमलिंगींमध्ये 'कन्वर्ट' करण्याची थेरपी चालू केली. संपूर्ण अवैज्ञानिक आणि पूर्वग्रहदूषित अशा या थेरपीत त्या मुलांचा मानसिक छळ केला गेला आणि अर्थातच त्या तथाकथित 'थेरपी' विरुद्ध गदारोळ झाला. आता कॅलिफोर्निया हे उदारतावादाचे माहेरघर असल्यामुळे (काही लोक याला 'उदारतामार्तंड' म्हणतील) त्यांनीही घाईघाईत कुठल्याही प्रकारच्या 'कन्वर्जन' थेरपीवर सरसकट बंदी आणणारा कायदा आणायचा प्रयत्न केला. अशा प्रकारे सरसकट बंदी आणणे ही उदारतावाद्यांची 'रिव्हर्स दादागिरी' म्हणता येईल का, असा प्रश्न पडला आहे (मी स्वतःला बर्‍यापैकी डावा समजतो तरीही). समजा शास्त्रीय पद्धतीने कुणाला या विषयावर संशोधन करावसं वाटलं तर त्यालाही भविष्यात बंदी येईल का? एखाद्या संशोधकाला समलैंगिकत्वामागच्या मूलप्रेरणेबाबत, किंवा त्यामागच्या जनुकीय कारणांबाबत संशोधन करून समजा समलैंगिकता 'ऍव्हॉईड' करता येण्यासाठी एखादी 'प्रोसेस' शोधावीशी वाटली तर त्याला ग्रॅंट मिळणं अशक्य होईल का? शतकानुशतके वैज्ञानिक संशोधनाला धर्मसंस्थानी खीळ घालायचे प्रयत्न केले, तसे आता दुसर्‍या बाजूने प्रयत्न होऊ लागतील का? कोणत्याही गोष्टीबद्दल मूलभूत संशोधन करताना त्याला कुठल्याही विचारसरणीचा, अगदी 'पॉलिटिकल करेक्टनेस'चाही अडथळा येऊ नये असं वाटतं.

उदाहरणार्थ, समलैंगिकतेचं समर्थन मान्य, पण त्यापायी क्लीबावस्था(trans-sexual) हे देखील एक पूर्ण नैसर्गिक 'व्हेरिएशन' असल्यामुळे तुम्ही ते मान्य कराच, अशा गदारोळात वर लिहिलेल्या संशोधनामधून जन्मतः क्लिबावस्था निर्माण होण्याच्या कारणांचा शोध घेऊन ती होऊच नये किंवा फिक्स करता यावी यासाठी काही संशोधन होण्याला आडकाठी निर्माण होईल. खरंतर, LGBT चळवळीतही हे लोक उतरंडीवर सर्वात खाली आणि नकोसे वाटणारे असावेत. (भारतात तर या व्यक्तीची स्थिती टोकाची वाईट आहेच, पण 'सुधारलेल्या' देशातही ऑर्डर घेणारा वेटर क्लीब होता म्हणून पाठीमागून अकारण टोमणे मारलेले पाहिले आहेत). क्लीबांना पूर्ण सहानुभूती आणि सन्मान मिळावा यावर दोनशे टक्के सहमत, पण ते नैसर्गिक असण्याबद्दलचा नकली आग्रह का?

आता वर लिहिलेली केस थोडी बदलून पहा.
'तुमचं मूल जन्मतः trans-sexual असणार आहे (bisexual नव्हे) त्याला आपण इंजेक्शनने पूर्ण पुरुष किंवा पूर्ण स्त्री बनवू शकू.'
तुमचं उत्तर 'नको' असं असेल का? किंबहुना असा प्रश्न विचारता येणं हेच निषिद्ध असं वाटतं का?

शैलेन्द्र's picture

11 Jan 2013 - 12:10 am | शैलेन्द्र

स्वमैथुन हा सम/विषम दोन्हीमध्ये सारख्याच प्रमाणात होतो आणि त्याचे कारण हे निव्वळ 'मजबूरी' (जोडीदाराची अनुपलब्धता) हे आहे. विषमलिंगी व्यक्तीने जोडीदार उपलब्ध होण्याआधी कितीही काळ स्वमैथुन केला असला तरी जोडीदार मिळाल्यावर ती स्वमैथुन किंवा समलिंगी संभोग यापैकी कशाकडेच वळणार नाही.

लग्न झालेले असतानाही/जोडीदार उपलब्ध असतानाही विविध प्रकारच्या स्वमैथुनात रमणारे किती लोक बघायचेत तुम्हाला?

विचारमैथुन करताय.

होमो सेक्शुअअ‍ॅलिटीवरनं आता तुम्ही ट्रान्ससेक्शुअअ‍ॅलिटीकडे गाडी वळवलीये.

तुम्हाला नक्की काय हवंय? उत्तर, पब्लिक ओपीनियन की नुसतं विचारमंथन?

आपला या पोस्टवरचा इंटरेस्ट संपला. पण जाताजाता एक ज्योक :

एका वयात आलेल्या मुलीला तिच्या पलंगाखाली कुणीतरी आहे अशी सतत भीती वाटते. सायकोअ‍ॅनॅलिसिस नंतर डॉक्टर पालकांना खाजगीत सांगतो `इट इज नथींग, शी इज अफ्रेड ऑफ मेन. लेट हर गो अराऊंड विथ समवन अँड शी वील बी ओके. बट इट हॅज टू बी अ सप्राईज'.

पालक एका तगड्या जीमइंस्ट्रक्टरची मदत घ्यायचं ठरवतात. ते त्याला सांगतात `आमच्या मुलीला तिच्या बेडखाली कुणीतरी आहे अशी सतत भीती वाटते, कॅन यू हेल्प अस? तो म्हणतो `शो मी, आय विल टेकावे हर फिअर '.

एक दिवस तिला कल्पना न देता ते जीमीला रात्री तिच्या बेडरूममधे सोडतात आणि दरवाजा बाहेरनं बंद करून घेतात. आत हलकल्लोळ होतो.

`यू कांट डू दॅट'
`नो, आय अ‍ॅम गोइंग टू टेकावे योर फिअर'
`धीस इज ब्रूटल'
`डोंट येल बेब, यू जस्ट सी वॉट आय डू'
बर्‍याच धुमाकुळानंतर दोघही दमून बाहेर येतात. जीमी विजयी मुद्रेनं पालकांकडे पाहतो, कन्येच्या चेहर्‍यावर हसूं असतं. पालक कृतकृत्य होतात आणि काहीतरी विचारयच म्हणून (नको तो) प्रश्न विचारतात.
`बाय द वे, हाऊ डीड यू टेकावे हर फिअर?'
`इट वॉज वेरी सिंपल अंकल, आय फोल्डेड हर बेड फ्लॅट !'

कन्या लेस्बी आणि जीमी होमो म्हटल्यावर यापेक्षा वेगळं काय होणार?