या धाग्याचं शीर्षक औपरोधिक असलं तरी धागा पूर्ण सिरीयस आहे.
बर्याच वेळा एखाद्या प्रश्नाबद्दल आपली नक्की काय भूमिका आहे हे आपल्याला ठरवता येत नाही. अशावेळी एक हायपोथेटिकल सीनारिओ बनवून त्या प्रसंगात आपण काय करू, असा प्रश्न स्वतःलाच विचारला तर कदाचित आपल्या मनातला गोंधळ निस्तरायला मदत होऊ शकते/शकेल. या धाग्यात असाच एक सिनारिओ कल्पला आहे. समलिंगी संबध पूर्ण वैध की अवैध, याबद्दल आपल्यापैकी काहींच्या मनात संशय येत असतो. एका बाजूला समलिंगी संबंधांचे पूर्ण समर्थन करणारे लोक, तर दुसर्या बाजूला स. सं. म्हणजे पूर्ण अनैसर्गिक, पाप, अधर्म असे मानणारे संस्कृतीरक्षक, या दोन टोकांच्या मध्ये असणारे बरेच असतील. त्यांच्यापैकी "समलिंगी व्यक्तिंना सध्याच्या सामाजिक वातावरणात ज्या दिव्यातून जावं लागतं ते बघता अशा व्यक्तिंना माझं पूर्ण समर्थन आणि सहानुभूती आहे, समलैंगिकता ही विकृती नाही, पण ती पूर्ण नैसर्गिक मानावी का? समजा, एखाद्या व्यक्तीची समलैंगिकता 'दुरुस्त' करता येत असेल तर ती तशी करावी का? कॅन्सर, अपंगत्व यांच्या निर्मूलनासाठी जसं संशोधन होतं तसं समलैंगिकतेबद्दल व्हावं का? की अशी अपेक्षा करणं हेच चूक आहे?" अशा विचारांच्या द्विधा अवस्थेत पडलेल्यांसाठी खालचा हायपोथेटिकल सिनॅरिओ आहे. मिस्टर आणि मिसेस पाटलांच्या जागी वाचकांनी आपल्याला कल्पून पाहिलं तर त्यांचा काय निर्णय असेल, हे वाचायला आवडेल.
******************
स्थळ - डॉ. सान्यांचे प्रसूतिगृह
काळ - काही दशके भविष्यातला
'या मिस्टर ऍंड मिसेस पाटील' डॉ. सान्यांनी तोंडभर हसून स्वागत केलं. 'कशी आहे तब्येत?' मिसेस पाटलांकडे बघून त्यांनी प्रश्न केला. 'आता त्रास कमी होतो का? वा वा, छान, छान!' 'यांची नोकरी काय म्हणतेय? पुन्हा फॉरेनला कधी आता?' चारदोन इकडच्या तिकडच्या गप्पा करून ते लगेच मुद्द्याकडे वळले.
'हे पहा, या वेळी मी तुम्हालाही बोलवलं कारण मला काही महत्वाचं बोलायचं आहे. नवीनच आलेल्या सेक्शुअल प्रेफरन्स
डिटरमिनेशन टेस्टबद्दल आपण ऐकलं असेलच. होणारं बाळ समलिंगी होणार की विषमलिंगी ते यातून ठरवता येतं. तर मिसेस पाटलांवर ही टेस्ट मी गेल्यावेळी केली होती आणि तिचे रिझल्ट्स आले आहेत. तुमचं मूल समलिंगी असणार आहे.' त्यांनी थोडं थांबून दोघांच्या प्रतिक्रियेचा अंदाज घेतला.
'अं... असूदेकी, आता त्यात काय विशेष राहिलंय, समलैंगिकता समाजाने पूर्ण मान्य केली आहे. पूर्वीसारखं राहिलं नाही आता. मूल हेल्दी जन्मलं पाहिजे हेच महत्वाचं.' मिस्टर पाटील म्हणाले. मिसेस पाटलांनी मान डोलावली. 'मला वाटलं तुम्ही काहीतरी भयंकर सांगता की काय? हुश्श...'
'गुड! मला वाटलंच होतं तुम्ही असं म्हणाल.' डॉक्टर म्हणाले 'तरीसुद्धा, मी तुम्हाला तुमच्या सर्व ऑप्शन्सची माहिती देऊ इच्छितो. अलिकडेच एक नवी थेरपी निघाली आहे. या थेरपीद्वारे होणार्या गर्भाचं सेक्शुअल ओरिएंटेशन केवळ एका इंजेक्शनने बदलता येऊ शकतं. तुम्हाला पाहिजे असल्यास आपण बाळाचं ओरिएंटेशन बदलू शकतो. ही थेरपी पूर्णपणे सेफ असून खर्चाच्या दृष्टीने तुमच्या अगदीच आवाक्यात आहे. तुम्ही दोघं विचार करून मला पुढच्या वेळी सांगा, तुम्हाला समलिंगी मूल चालेल की नॉर्मल... आपलं, विषमलिंगी' घड्याळाकडे बघत डॉक्टर म्हणाले.
मिस्टर आणि मिसेस पाटील विचारात पडले. समलैंगिकता पूर्ण मान्य झालेल्या समाजात ते रहात होते. होणार्या मुलाला भविष्यात समाजमान्यता, लग्न, सरोगेट पालकत्व या दृष्टीने कुठलाच त्रास होण्याचा संभव नव्हता. थेरपी घ्यावी की नको? त्याने आपण प्रतिगामी ठरू का? दांभिक ठरू का?
मिस्टर आणि मिसेस पाटलांनी काय करावं? तुम्ही काय कराल?
वाचने
9166
प्रतिक्रिया
43
मिसळपाव
प्रतिक्रिया
लैच भंपक लेख..
(No subject)
दुष्काळ !
तुम्ही राजन खान आहात का?
समलैंगिकता अनुवंशिक असते का?
काही दशकांनन्तर काय, आणि
वरच्या प्रतिसादांवरून तरी
आता तुम्ही सिरीयस प्रश्न
In reply to वरच्या प्रतिसादांवरून तरी by खान
सिरियसली?!
आणि हो, मला ती ट्रिट्मेंट
In reply to सिरियसली?! by आबा
अभिनंदन
अजून एक हायपोथेटिकल सिनॅरिओ
+१
In reply to अजून एक हायपोथेटिकल सिनॅरिओ by विकास
उत्तर?
कल्पनारंजन नाही
केस जरा वेगळी असायला हवी होती !
मुलगी असती तर?
वाजवी
रोचक सिनारीयो आहे. माझ्या मते
सहमत, पण...
In reply to रोचक सिनारीयो आहे. माझ्या मते by ऋषिकेश
सहमत आहेच..
In reply to सहमत, पण... by आदूबाळ
हो....
समलैंगिकता , स्त्री-पुरूष, ज्योतिष
कै च्य कै !
अगदी डावखुरा आणि उजवा इतकं
या विषयावर अनंत चर्चा झालीये आणि लेखातला प्रश्न चुकीचा आहे
हायला संजयजी,
In reply to या विषयावर अनंत चर्चा झालीये आणि लेखातला प्रश्न चुकीचा आहे by संजय क्षीरसागर
विचारपूर्वक प्रतिसाद देणार्या
फक्त एक उत्तर द्या
In reply to विचारपूर्वक प्रतिसाद देणार्या by खान
होमोसेक्शुअॅलिटी कशानं
In reply to फक्त एक उत्तर द्या by संजय क्षीरसागर
मला असं वाटतं की ती जेनेटिक
In reply to होमोसेक्शुअॅलिटी कशानं by ऋषिकेश
आपणही पुरुष, (पुरुषी लैंगिक
In reply to मला असं वाटतं की ती जेनेटिक by गवि
गवि सहसा फंडामधे चुकत नाही पण...
In reply to आपणही पुरुष, (पुरुषी लैंगिक by ऋषिकेश
शक्य होईल तितके उत्तर द्यायचा
In reply to मला असं वाटतं की ती जेनेटिक by गवि
असं नाहीये,
In reply to शक्य होईल तितके उत्तर द्यायचा by शैलेन्द्र
लेखकाचं काय मत / अभ्यास आहे
In reply to असं नाहीये, by संजय क्षीरसागर
हम्म...
In reply to विचारपूर्वक प्रतिसाद देणार्या by खान
प्रतिसाद प्रचंड आवडला..
In reply to हम्म... by दादा कोंडके
माझ्या ओळ्खीचं एक समलिंगी कपल
In reply to विचारपूर्वक प्रतिसाद देणार्या by खान
तुम्हाला
मूळ मुद्दा (फायनली!)
स्वमैथुन हा सम/विषम
In reply to मूळ मुद्दा (फायनली!) by खान
तुम्हाला एकतर प्रश्न नीट मांडता येत नाहीये किंवा तुम्ही स्वतःच