✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मुली शोधाण्यातले frustration

ट
टवाळ कार्टा यांनी
Sun, 12/30/2012 - 20:29  ·  लेख
लेख
मुली शोधाण्यातले frustration नाव वाचूनच समजले असेल की सध्या मुली शोधण्याचा कार्यक्रम चालू आहे ..अगदी बरोबर..अर्थात लग्नासाठी आणि लेख फक्त आणि फक्त frustration मुळे लिहिला आहे माझा traditional match making वर अजिबात विश्वास नाहीये कारण त्यात स्वभाव किती जुळतात याला सगळ्यात कमी importance आहे ...so i prefer to chat with girls before actually deciding future aspects पण जे अनुभव आले ते इथे लिहित आहे पण मला फक्त जाणून घ्यायचे आहे की सगळ्याच so called forward मुली अशा असतात कि मलाच हे "नग" मिळाले (त्याच बरोबर मिपाकरांना दंगा करायला मोकळे रान मिळणार आहे याचीही जाणीव आहे ) मुलगी type १ डॉक्टर - matrimony site वर माझ्या request ला +ve reply केला म्हणून मी chat request पाठवली पहिल्याच chat मध्ये म्हणाली ...चुकुन +ve reply केला :( मुलगी type २ मार्केटिंग professional - matrimony site वर माझ्या request ला +ve reply केला म्हणून मी chat request पाठवली २-३ वेळा chat केल्यावर एके दिवशी मला expected असलेल्या गुणाविषयी बोलत होतो तर सहज म्हणालो "एका लग्नाची दुसरी गोष्ट" मध्ये मुक्ता बर्वेने जे "character" केले आहे त्या type ची मुलगी मी शोधत आहे लगेच रेप्ली आला ....माझ्या expectations खूप फिल्मी आहेत ....आणि दुसर्या क्षणापासून chat बंद मुलगी type ३ engineer - matrimony site वर माझ्या request ला +ve reply केला म्हणून मी chat request पाठवली ७-८ chat नंतर चेपू वर add झालो ...आणखी ४-५ chat नंतर तिने upload केलेल्या फोटोवर comment लिहिली "rose with rose"...तो फोटो बागेतल्या गुलाबाबरोबर काढला होता त्यानंतर चेपुच्या फ्रेंड लिस्ट मधून बाहेर आणि chat contact blocked उरलेल्यांपैकी बर्याच matrimony site वर माझ्या request ला +ve/-ve कसलाच reply नाही चेपुवर message पाठवला तर तिथेही काही reply नाही जर वाट बघून call केला तर खालीलपैकी १ उत्तर तयार दिवसाला ५० mails येतात ....किती जणांना reply करणार ....(अर्रे मग profile hidden का नाही ठेवत ????) किंवा (this is classic) नकार देऊन कुणाला दुखवायला नाही आवडत...(चायला दुसर्यांना वाट बघायला लाऊन काय सुख मिळते???) किंवा घरच्यांना जातीबाहेराचा मुलगा नाही चालणार...(तरी मी so called उच्च जातीतला आहे) जर तिला तिचे स्वतःचे मत विचारले तर उत्तर ....तिला जातीचा फरक पडत नाही पण ती parents चे ऐकणार because she respects her parents...उद्या नवर्याने त्याच्या आई-वडिलांचे चुकीचे म्हणणे सुद्धा "respect" साठी ऐकले ....तर ते सुद्धा बरोबरच love marriage असेल तर तिच्या घरच्यांना जातीचा काहीही प्रॉब्लेम नाही पण arrange marriage जातीबाहेर नाही करायचे जवळपास सगळ्याच मुलींचे reply असेच ...(almost १००+)...आणि almost सगळ्या highly educated आजच्या जमान्यात सुद्धा सगळ्यांचे अनुभव असेच आहेत??? (पुढील लेखांमध्ये शुद्धलेखनाच्या चुका हळूहळू कमी होतील)
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
125477 वाचन

💬 प्रतिसाद (511)

प्रतिक्रिया

सरकारी हस्तक्षेप

रमेश भिडे
Sun, 02/17/2013 - 23:56 नवीन
मला तर वाटतेय भारत सरकार ने नवीन कायदा करून विवाह मंत्रालय स्थापन करावे ,आणि लग्न न होवू शकणार्याव सगळ्यानी तिकडे नावे नोंदवावीत . मग सरकार योग्य टी कार्यवाही करून matchmaking करून देईल ............ जी गोष्ट सामाजिकदृष्ट्या नियंत्रणाबाहेर जाते तेव्हा सरकारी हस्तक्षेप करावाच लागतो. मुलींनी किती अपेक्षा ठेवाव्या(ताणाव्या) ? इत्यादि गोष्टीत व्यक्तिस्वातंत्र्य आणि तत्सम गोष्टींना फाट्यावर मारून लग्ने जमवावीत ,अशा मताचा मी आहे. याचे कारण आजकाल सर्रास बोकाळलेले प्रेमविवाह आणि अंतरजातीय /अंतरधर्मीय विवाहामुळे सो-कॉल्ड उच्च जातीतील मुलांची फारच कुचंबणा होत आहे हो!
  • Log in or register to post comments

बहुतांश

रमेश भिडे
Mon, 02/18/2013 - 00:03 नवीन
बहुतांश ब्राह्मण मुली अंतरजातीय /अंतरधर्मीय विवाह करतात ,त्याचा जबरदस्त फटका ब्राह्मण मुलांना बसून आजकाल लग्नाला मुलगी मिळणे महामुश्किल काम झाले आहे, त्या उद्विग्न्तेतून आलेले हे विचार आहेत, काही चुकीचे असल्यास क्षमा करा....................
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश भिडे

मुलींचा कित्ता

अभ्या..
Mon, 02/18/2013 - 00:07 नवीन
क्षमा कसली मागताय? अजून उद्विग्नता येईल अशाने. ब्राह्मण मुलींचा कित्ता तुम्ही गिरवा. नैय्या पार. एकदम शिंपल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश भिडे

मजा येतेय एक एक प्रतिसाद

टवाळ कार्टा
Tue, 02/19/2013 - 01:22 नवीन
मजा येतेय एक एक प्रतिसाद वाचुन :)
  • Log in or register to post comments

.

आशु जोग
Wed, 02/27/2013 - 23:07 नवीन
.
  • Log in or register to post comments

एक अवांतर किस्सा : अरेन्ज्ड

भडकमकर मास्तर
गुरुवार, 02/28/2013 - 06:17 नवीन
एक अवांतर किस्सा : अरेन्ज्ड लग्न न जमण्याच्या स्थितीमुळे कंटाळलेल्या माझ्या एका मित्राला वधूवर सूचक मंडळातल्या एका प्रौढ बैन्नी विचारले," त्यापेक्षा तुम्ही प्रेमविवाह का नाही करत?" .. आधीच वैतागलेल्या त्याने सर्व राग आवरून त्यांना म्हटले, " अहो ते जमले असते तर इथे कशाला झक मारायला आलो असतो रोज रोज?"
  • Log in or register to post comments

माझ्या एका मित्राला आलेली

वेल्लाभट
गुरुवार, 02/28/2013 - 09:28 नवीन
माझ्या एका मित्राला आलेली काही स्थळं: या डील साठी त्यांच्या असलेल्या अटी: १) महिना एक लाख पगार हवा २) बहीण भाऊ नको (?!?) (काही दिवसांनी आईवडील नको असंही म्हणतील) ३) किमान ३ बीएचके घर हवं. ४) फॉरेन सेटल हवा इत्यादी.
  • Log in or register to post comments

काहीही

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 02/28/2013 - 13:32 नवीन
अशा अटी घालणार्‍या पोरीला काय म्हणावे ? १) महिना एक लाख पगार हवा <> ४) फॉरेन सेटल हवा ही फॉरेन मधे एक लाखात कसे काय घर चालवणार देव जाणे =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

या अटी वेगवेगळ्या आहेत. एका

वेल्लाभट
गुरुवार, 02/28/2013 - 14:03 नवीन
या अटी वेगवेगळ्या आहेत. एका स्थळाच्या नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

ही फॉरेन मधे एक लाखात कसे काय

इरसाल
गुरुवार, 02/28/2013 - 17:26 नवीन
ही फॉरेन मधे एक लाखात कसे काय घर चालवणार देव जाणे
तो तिचा वैयक्तिक प्रश्न आहे. तुम्ही फार वैयक्तिक होवु पहात आहात. माझ्याकडे यापेक्षाही भयंकर शब्द आहेत तुम्हाला बोलायला. पण जावु दे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

मग टवाळ्कर्टा, मिळली का नाय

लिलि काळे
गुरुवार, 02/28/2013 - 12:05 नवीन
मग टवाळ्कर्टा, मिळली का नाय हवी तशी छोकरी तुम्हाला?
  • Log in or register to post comments

तुमची च कमी होती काळे काकू

प्रसाद१९७१
गुरुवार, 02/28/2013 - 13:54 नवीन
तुमची च कमी होती काळे काकू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिलि काळे

तुम्ही का त्यांच्या मागे

अधिराज
गुरुवार, 02/28/2013 - 14:02 नवीन
तुम्ही का त्यांच्या मागे लागलाय हात धुवुन?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

त्यांना मेंदुचा आजार जडलाय्

श्री गावसेना प्रमुख
गुरुवार, 02/28/2013 - 16:54 नवीन
त्यांना मेंदुचा आजार जडलाय्,गजनीसारखा त्यामुळे ते दिसेल त्याला टोकतात(ह घ्या)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अधिराज

जर निर्णय लवकर घेतला नाही तर

kanchanbari
गुरुवार, 02/28/2013 - 18:51 नवीन
जर निर्णय लवकर घेतला नाही तर हे frustration असेच चालु राहील..इथे तुमच्या लेखाला प्रतिक्रिया बर्‍याच आल्या पण त्यातील काहीवर अंमलबजावनी केली तरच तुमचे लग्न लवकर होइल एवढे नक्की...
  • Log in or register to post comments

आज जरा उत्खनन चालु आहे! तर हे

पिलीयन रायडर
Fri, 02/05/2016 - 17:43 नवीन
आज जरा उत्खनन चालु आहे! तर हे एक रत्न सापडलं.. टका.. सापडली का रे मुलगी?
  • Log in or register to post comments

खिक्क...त्या आधी अनाहिता मुली

टवाळ कार्टा
Fri, 02/05/2016 - 17:56 नवीन
खिक्क...त्या आधी अनाहिता मुली सुचवणार होत्या त्याचे काय झाले ते सांगा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

त्यासाठी तुझी सग्गळी खर्री

पिलीयन रायडर
Fri, 02/05/2016 - 18:15 नवीन
त्यासाठी तुझी सग्गळी खर्री खर्री माहिती लागेल.. देणार का?!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

देउ की

टवाळ कार्टा
Sat, 02/06/2016 - 11:35 नवीन
देउ की
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

OK!!

पिलीयन रायडर
Sun, 02/07/2016 - 17:25 नवीन
OK!! Please provide details about total number of Du-ID on Misalpav.com with ID names! Baki nav gav Patta CTC etc kundali mandu aamhi... Tu fakt Mipa var chi mahiti De!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

या माहितीचा मुलीला कसा उपयोग

टवाळ कार्टा
Sun, 02/07/2016 - 19:51 नवीन
या माहितीचा मुलीला कसा उपयोग होणार ते सांगावे...मी लगेच सांगतो हे सगळे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

बहुधा

श्रीरंग_जोशी
Sun, 02/07/2016 - 20:14 नवीन
बहुधा मिपावरच्याच एखाद्या सुकन्येचे स्थळ असावे. तुझा मिपावावर पाहता तिला जरा धाकधुक वाटली असावी. हा अंदाज बरोबर ठरल्यास दोघांनाही शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

मिपावरचीच पोरगी शोधली तर

पिलीयन रायडर
Mon, 02/08/2016 - 11:15 नवीन
मिपावरचीच पोरगी शोधली तर संसार नक्की कोण करणार? दोघेही इथेच पडीक!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

ते आम्चे आम्ही बघून घेउ..

टवाळ कार्टा
Mon, 02/08/2016 - 12:22 नवीन
ते आम्चे आम्ही बघून घेउ...बाकी अत्तापर्यंत फक्त एकच मिपाकरीण ठिक वाटलीये...भेटायचा योग आला नाहीये अज्जून ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

प्रयत्न केला अस्ता.. पण अता

पिलीयन रायडर
Mon, 02/08/2016 - 12:24 नवीन
प्रयत्न केला अस्ता.. पण अता राहुच दे...!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

एखादी मुलगी तुला सुचवायच्या

पिलीयन रायडर
Mon, 02/08/2016 - 11:14 नवीन
एखादी मुलगी तुला सुचवायच्या आधी आम्हाला तुझी सगळी माहिती नको का?! डु आयदीने केलेला धिंगाणा पाहुन मग आम्ही तुझी जालीय कुंडली मांडु.. तुझे मानसिक विश्लेषण करु.. सरांच्या पायावर सुद्धा घालुन आणु.. आणि मग ठरवु पुढे काय करयाचं ते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

बसा वाट बघत.... ल्लु ल्लु

टवाळ कार्टा
Mon, 02/08/2016 - 12:22 नवीन
बसा वाट बघत.... ल्लु ल्लु ल्लु ल्लु ल्लु ल्लु ल्लु ल्लु ल्लु ल्लु ल्लु ल्लु ल्लु ल्लु ल्लु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

मग हुडुत..!

पिलीयन रायडर
Mon, 02/08/2016 - 12:23 नवीन
मग हुडुत..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

झेपत नै तर घ्यायचे कशाला

टवाळ कार्टा
Mon, 02/08/2016 - 12:24 नवीन
झेपत नै तर घ्यायचे कशाला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

आमच्याकडे ते कुणी

पिलीयन रायडर
Mon, 02/08/2016 - 12:25 नवीन
आमच्याकडे ते कुणी ल्ल्ल्ल्ल्ल्लुऊऊऊ करत आले की हाड हाड करायचीच पद्धत आहे.. ह्यात झेपण्या न झेपण्याचा सवालच काय वो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

चायला तुम्च्याकडे गुर्जी

टवाळ कार्टा
Mon, 02/08/2016 - 12:36 नवीन
चायला तुम्च्याकडे गुर्जी म्हणूनच जात नसावेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

चार वर्ष झाली हे कार्टं

अजया
Fri, 02/05/2016 - 18:30 नवीन
चार वर्ष झाली हे कार्टं शोधतंच आहे वाटतं अजून! जर्रा म्हणून तडजोड करत नाही का रे तुम्ही पोरं?
  • Log in or register to post comments

ओ

श्रीरंग_जोशी
Fri, 02/05/2016 - 19:33 नवीन
ओ तै, धाग्याला केवळ तीन वर्षे अन सहा आठवडे होत आले आहेत. उगाच तीनाचे चार करून टक्याचे frustration वाढवू नका. टक्या मित्रा - आशा सोडू नकोस रे बाबा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

आता कोणत्या अपेक्शा कमी

टवाळ कार्टा
Fri, 02/05/2016 - 23:20 नवीन
आता कोणत्या अपेक्शा कमी कराव्या हे पण सांगून टाका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

अपेक्षा ठेवुच नको!

अजया
Sat, 02/06/2016 - 09:07 नवीन
अपेक्षा ठेवुच नको! अपेक्षाभंगासारखे दुःख नाही.पहिल्या वेळी सूर मारायला शिकवताना कसं धाडकन उडी मारतात तसं आलेली नेक्स्ट मुलगी बघ आणि संपवून टाक विषय ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

काय ठरलं (का) मग? आशावादी

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 02/05/2016 - 19:10 नवीन
काय ठरलं (का) मग? आशावादी असतास तर बरं झालं असतं. परेरा तयार होती.
  • Log in or register to post comments

बाळ टक्कु मक्कू शोनू* काय

अत्रुप्त आत्मा
Fri, 02/05/2016 - 19:20 नवीन
बाळ टक्कु मक्कू शोनू* काय स्टेटस आहे सध्या नक्की तुझं!? *the मामी! ;)
  • Log in or register to post comments

तुमचं घोडं गंगेत न्हालं

प्रचेतस
Fri, 02/05/2016 - 20:04 नवीन
तुमचं घोडं गंगेत न्हालं म्हणून तुम्ही टक्याला अता असं बोलायलात. दू दू दू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

हेच्च लिहायला आलेलो =))

टवाळ कार्टा
Fri, 02/05/2016 - 23:20 नवीन
हेच्च लिहायला आलेलो =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

(No subject)

अत्रुप्त आत्मा
Fri, 02/05/2016 - 23:26 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

सध्या

नाखु
Mon, 02/08/2016 - 09:09 नवीन
ते टक्या सारख्यांचे** आदर्श (की प्रेरणास्थान ?) आहेत असे आम्चे निरि़क्षण आहे. चर्चा सामान्य वाचक नाखु. यात त्या त्या इच्छीतांनी आपली नावे डकवावीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

आयला आता फक्त 'मुली सोडा मुलं

मम्बाजी सर्वज्ञ
Fri, 02/05/2016 - 19:28 नवीन
आयला आता फक्त 'मुली सोडा मुलं बघायला सुरुवात करा' असा सल्ला द्यायचा राहिलंय.... बाळ टवाळा, प्रतिक्रिया वाचून डिप्रेस होऊन सज्जनगडाची वाट धरू नको हो.....
  • Log in or register to post comments

=)))

अजया
Fri, 02/05/2016 - 19:48 नवीन
=))) तीन वर्षात बर्याच ठिकाणचे कांदेपोहे खाल्ले असतील टक्याने.मजा आहे बुवा ;) लोकांकडचे कांपो छान लागतात!
  • Log in or register to post comments

एकदा आमच्या घरी कांदेपोहे

विजय पुरोहित
Fri, 02/05/2016 - 20:14 नवीन
एकदा आमच्या घरी कांदेपोहे कट्टा करायला हवा. मी स्वतः अगदी छान बनवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

तुमच्याकडे कोणी लग्नाचं आहे

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 02/05/2016 - 22:10 नवीन
तुमच्याकडे कोणी लग्नाचं आहे का हो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजय पुरोहित

नाय हो. सहज म्हणतो एकदा

विजय पुरोहित
Fri, 02/05/2016 - 22:39 नवीन
नाय हो. सहज म्हणतो एकदा आमच्याकडे कांदेपोहे कट्टा व्हावा. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

कांदे पोहे खायची इच्छा राहूनच

सुबोध खरे
गुरुवार, 07/07/2016 - 11:00 नवीन
कांदे पोहे खायची इच्छा राहूनच गेली. चारच मुली पाहिल्या. एक सार्वजनिक ठिकाणी आणि तीन आमच्याच घरी. तिसरीशी लग्न झालं. आमच्या सासूबाई कांदेपोहे चांगले करत पण लग्नानंतरचे कांदेपोहे वेगळे. लग्नाआधी दुसऱ्याच्या घरी जाऊन त्याच्याच मुलीकडे न लाजता सरळ पाहत त्यांचेच चहा पोहे खाण्याची मजा काही औरच आहे(असावी). त्यातून घराचा एखादा वरिष्ठ माणूस म्हणून जातो-- नीट "बघून घे" मुलगी. टक्या अजून एंजॉय करून घे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

=))

टवाळ कार्टा
गुरुवार, 07/07/2016 - 11:41 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

अजून एक उरकून टाका

वाल्मिक
गुरुवार, 07/07/2016 - 11:48 नवीन
अजून एक उरकून टाका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

टकाबालकास वधूसंशोधनासाठी

विजय पुरोहित
Fri, 02/05/2016 - 20:13 नवीन
टकाबालकास वधूसंशोधनासाठी शुभेच्छा... लग्न ठरल्यावर अत्मूगुर्जींपेक्षा कमी रेटमध्ये वैदिक/गांधर्व/राक्षस पाहिजे त्या पद्धतीने विवाह लावणेत येईल याची नोंद घ्यावी. ;)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा