मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आठवणी चित्रलुब्धाच्या ! ( रीळ ३)

चौकटराजा · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
आपल्याकडील बंगाली कादंबर्‍यात उद्योगपाण्यसाठी नायक खेडेगावातून कोल्कता येथे जाण्याची प्रथा आहे. हिंदी चित्रसृष्टीत "इसलिये मै बम्बई ( आत मुंबई) चला आया " असे म्हणण्याची प्रथा आहे. त्याच प्रमाणे नशीब काढण्यासाठी हॉलीवूडकडे प्रयाण याचीही एक परंपरा त्या चित्रपट सृष्टीत दिसते. मेल गिब्सन, रॉजर मूर , पिअर्स ब्रॉसनन ( ऑस्टेलिया) मार्सेलो मॅस्त्रीयानी, सोफिया लॉरेन, ज्यॉ पॉल बेलमांडो, लिझा मिनेली ,जीना लोलोबिगिडा ( इटली) शॉन कोनेरी, (ब्रिटन) ओमर शरीफ ( इजिप्त) तसेच काही फ्रेंच नटांचीही उदाहरणे आहेत. अशाच प्रकारे आपल्याकडे रंगभूमीकडून चित्रपटाकडे स्थलांतरित झालेले श्रीराम लागू नसीरूद्दीन शाह, उत्पल दत्त असे कलाकार दिसतात त्याच प्रमाणे ब्रिटीश वा अमेरिकन रंगभूमीवर गाजलेले नटही कालक्रमाने इंग्रजी चित्रपटाच्या प्रवाहात आलेले होते. त्यात मायकेल केन (इटालियन जॉब, ब्लेम इट ऑन रिओ फेम), डेव्हीड निवेन( अरौंड द वर्ल्ड, ब्रेन, गन्स ओफ नॅव्हऱोन फेम) चार्ल्स हेस्टन. ( टेन कमांडमेंट्स, बेनहर फेम) लॉरेन्स ऑलिव्हिये ( एअरपोर्ट ) रेक्स हॅरिसन, ( माय फेअर लेडी) रिचर्ड बर्टन ( क्लिओपात्रा, व्हेअर इगल्स डेअर) ईई . या नटाना घेऊन काही अजरामर कलाकृती हॉलीवूड मधे तयार झाल्या. मेट्रो गोल्डविन मेयर ही फार जुनी चित्रनिर्मिती व वितरण संस्था आहे . त्यानी आपला ५० वा वाढदिवस मोठ्या अनोखेपणाने साजरा केला. मला वाटते १९७८ च्या सुमारास त्यानी Thats entertainment नावाचा चित्रपट आणला. पूर्वी हॉलीवूड मधे संगितिका तयार करण्याचा प्रघात होता. अशा उत्तमोत्तम संगितिकांचा अनुपम संग्रह म्हणजे हा चित्रपट. dancing and singing in rain, seven brides for seven brothers , bathing beauty आपल्याकडे अनुक्रमे आमीरखान- भप्पी लाहिरी- टिप टिप बारीश शुरू हो गयी.सत्ते पे सत्ता, अमिताभ व इतर सात जण व जुना दिल्लीका ठग या स्वरूपात आले खरे पण ज्याने या मूळ संगितिका पाहिल्या तो ख्रराच भाग्यवान. विशेशता: त्या काळातही हॉलीवूड किती उच्च दर्जाचे काम करू शकत होते याचा पुरावा म्ह्णजे bathing beautiy ही संगितिका. स्त्रिया व पुरूष पोहताना काय काय कलात्मक नेत्रसुख देउ शकतात याचा उच्च नमुना ! या संग्रहात हॉलीवूडचा स्टायलिश नर्तक नट फ्रेड अस्टेयर व गोड चेहर्‍याची जुडी गार्लंड यांचे स्मरण आजही होते. गायक नट फ्रॅन्क सिनात्रा ( व्हान रायन एक्स्प्रेस, लेडी ईन सिमेंट फेम ) याचाही गायकी परफॉर्मन्स या चित्रात पाहिल्याचे आठवतेय. याच सिनात्राच्या मुलीने नॅन्सीने एक गीत बॉडपटात गायल्याचे रसिकाना आठवत असेलच. l रेक्स हॅरिसन यानीही My fair lady या अविस्मरणीय पटात प्रो, हिगिन्स यांची मस्त भूमिका केली त्या अगोदर रंगभूमी वर कामे केली होतीच. त्याच्या जोडीला ऑड्री हेप्बर्न ही होती. आपल्याकडे गाजलेल्या "ती फुलराणी" या पुल लिखित नाट्कात भक्ती बर्वे यानी फुलवाली ही अजरामर भूमिका केली तशीच अजरामर भूमिका ऑड्री ने माय फेअर लेडी मधे केली होती. ऐ चा उच्चार शिकण्यासाठी रेन इन स्पेन हे गीत ती वारंवार गाते हे ज्यानी हा पट पाहिला असेल त्याना चांगलेच स्मरत असेल. रिचर्डे बर्टन या देखण्या ब्रिटीश नटाने देखील रंगभूमी गाजवल्या नंतर चित्रपटात छाप उमटविली.मी पाहिलेल्या बर्टनच्या सिनेमात मला where egales dare व cleopatra या कलाकृती लक्षात राहिल्या माझे एक आवडते लेखक अ‍ॅलिस्टर मॅकलीन यांच्या मूळ कादंबरीवर आधारित व्हेअर होता. तर अत्यंत भव्य सेटस व गुंतागुंतीची कथा असलेला क्लिओपात्रा होता. क्लिओपात्राचे भव्य स्वरूपात रोममधे स्वागत होते ती मिरवणूक अविस्मरणीय. याच मालिकेत चार्लस हेस्टन या नटाचाही उल्लेख अत्यावश्यक. k हेस्टन हा अमोरिकेत जन्मला असल्याने त्याने थेट फिल्म मधेच नाव गाजवायला सुरूवात केली पौराणिक चित्रपटाबरोब सायन्स फिक्शन अशा विविध पटात त्याने साठ वर्षे कारकीर्द घडविली. Ben hur , ten commandments हे चित्रपट नाताळचे निमित्त करून येत रहात .भव्य सेट्स, व अफलातून मॉबसीन अशी विशेषता असलेले ही चित्रे वारंवार पाहिली. बेनहर मधील ९ मिनिटांची सलग रथाची शर्यत व कमांडमेट्स मधील शेवटचा देवाच्या डोंगरावर जाण्याचा सीन अचाटच म्हणावे लागतील. डेव्हीड निवेन यानीही रंगभूमी गाजविली नव्हती व त्यानीही आपली सैन्यातील नोकरी सोडून नट बनले.त्यांचा ज्यूल व्हर्न यांच्या पुस्तकावर आधारलेला Around the world in 80 days हा चित्रपट मला काही पहायला मिळाला नाही पण Sea wolves , The guns of Navarone escape to Athena हे चित्रपट मात्र मी पाहिले . पैकी गन्स मधील त्यांचा कार्पोरल मिलर मला मस्त वाटला. k . k जुन्या जमान्यातील नट कॅरी ग्रान्ट क्लकार्क गेबल यांचे प्रत्येकी एकेक चित्रपट मी पाहिले कॅरी ग्रान्ट याचा North by north west हा अल्फ्रेड हिच़कॉक दिग्दर्शित तर क्लाके गेबल याचा Gone with the wind . पैकी गॉन विथ द विंड याची कथा त्यावेळी मला काही कळली नाही. एक आठवते की मी ज्यावेळी हा सिनेमा पहायला राहुल थेट्रर ला गेलो त्यावेळी माझे वय असेल पंचवीस. हा सिनेमा १९३९ ला प्रदर्शित झाला व रंगीत होता. एक गृहस्थ त्यावेळी साधारण पासस्ठीचे असतील , आपल्या बायकोला मोठ्या हौसेने त्यांच्या तारुण्यात हुकलेला क्षण पकडण्यासाठी या सिनेमाला आले होते. अमोरेकन सिव्हील वॉरची पार्श्वभूमी असलेल्या या सिनेमात व्हिव्यन ली ही अभिनेत्री प्रमुख भूमिकेत होती. हॉलीवूड पटात विषय उदा. एस्केप, सायन्स फिक्शन, वॉर, डिझॅस्ट्रर असे आले तर कॅरॅक्टर्से मधे जेम्स बॉन्ड ड्राकुला, बॅटमॅन, पि़क पॅन्र्थर ई आले त्याविषयी पुढच्या लेखात ..... क्रमशः

वाचने 1699 वाचनखूण प्रतिक्रिया 4

पिवळा डांबिस Wed, 12/12/2012 - 05:55
हे रीळं उलगडणं सुरेख जमतंय. आवडतंय देखील!! इंग्रजी चित्रपटांनी आयुष्यात दिलेल्या आनंदाचं मोल करता येणार नाही. एक सूचना: जर जमलं तर पुढील भागांमधे आधीच्या भागांच्या लिंक्स देता येणार नाहीत का? मी प्रथम हा भाग वाचला आणि नंतर मग आधीचे भाग उत्खनन करून काढले. परंतु सगळेच वाचक इतके मिपाफ्रेंन्डली असतील असं नाही म्हणून ही एक सूचना... असो. लवकर पुढले भाग येऊद्यात, वाट पहात आहे...