पांडुरंग पांडुरंग
पांडुरंग पांडुरंग दर्शन दे रे
कधीचे प्राण माझे नयनी उभे रे ॥धृ॥
नाण्यावरी ठसा जसा, दिवा मंदिरात
तसा तूच सामावला माझ्या अंतरात
वितळू दे काया, तुझ्या मुर्तीत घे रे ॥१॥
पांडुरंग पांडुरंग दर्शन दे रे...
जन म्हणे विठोबाच्या नादी खुळावला
दृष्टाळला जन्म सारा, संसार नासला
उत्तराया तुच नाथा, प्रकटोनी ये रे ॥३॥
पांडुरंग पांडुरंग दर्शन दे रे...
तुझ्या कल्पनेने जीव उताविळ होतो
दश इंद्रियांनी देह मोहरून गातो
"पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग"
विनवितो तुला तुझ्या चाकरीत घे रे॥२॥
पांडुरंग पांडुरंग दर्शन दे रे...
भक्तिगीत --कौस्तुभ
http://www.facebook.com/AseSphuraveGeet
घाल घाल पिंगा वार्या ची चाल
अत्ता घाइ घाइत,फक्त कविता
आत्मा साहेब कवीता नाही ती
मस्त छान जमले आहे भक्ती गीत.
गलती से मिस्टेक हो गया...
भक्तीगीत छान लिहिलंय. वृत्तात
धन्यवाद!
अतिशय सुंदर गीत ..
धन्यवाद मीत्रा गणेश !
छान आहे