ओरिगामी प्रदर्शन

लेखक: सुधांशुनूलकर जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
|| श्री गुरवे नमः || ओरिगामी मित्र या संस्थेतर्फे मुंबईमध्ये ‘वंडरफोल्ड २०१२’ हे वार्षिक ओरिगामी प्रदर्शन आयोजित केलं आहे. शुक्रवार, ७ डिसेंबर ते सोमवार, १० डिसेंबर या चार दिवशी सकाळी ११ ते संध्याकाळी ६ या वेळात प्रभादेवी येथील पु.ल. देशपांडे कला अकादमीमध्ये हे प्रदर्शन आहे. या प्रदर्शनाला येण्याचं समस्त मिपाकरांना आग्रहाचं वैयक्तिक निमंत्रण. . प्रदर्शनाव्यतिरिक्त ओरिगामी शिकण्यासाठी सशुल्क कार्यशाळाही घेण्यात येतील. प्राथमिक (एलिमेंटरी), मध्यम (इंटरमीजीएट) आणि विशेष (स्पेशल) अशा तीन स्तरांवरच्या कार्यशाळा आहेत. ओरिगामीचे कागदही उपलब्ध असतील. मिपाकरांना माझी एक विनंती : शनिवारी आणि रविवारी येणार असाल तर मला नक्की कळवा, म्हणजे आपली भेट होईल. सुधांशुनूलकर ओरिगामी मित्र ९८६९४२८५०३.

विलासराव यांनी 05/12/2012 - 09:00 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

मी येईल रविवारी.

मी देतो 1 कार्यक्रमाला सह्कुटुंब यायच ह,पत्रीका मिळाली असे समजुन घ्या राग नसावा लोभ असावा.

क्षमस्व. काय गडबड झालीये ते समजत नाही. तरी, श्री गावसेना प्रमुख यांनी खाली लिहिल्याप्रमाणे, कार्यक्रमाला सह्कुटुंब यायचं हं, पत्रिका मिळाली असं समजून सर्वांनी नक्की या. राग नसावा, लोभ असावा. सुधांशुनूलकर.

अभ्या.. यांनी 06/12/2012 - 02:18 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

यायला जमणार नाही म्हणून वाईट वाटतंय खूप. :( खूप खूप शुभेच्छा या उपक्रमाला. :)