*......................एक नाजुक परी..............*
लेखनविषय:
एक नाजुक परी
आली आमुच्या घरी
दिवे लागले दारी
आप आंगे स्वतः || *
दुडू दुडू रांगत
फिरे अवघ्या घरात
आनंद काळजात
उठे पाहुनिया ||
चिमुकले दोन दात
आले बोळक्या मुखात
जे जे दिसते घरात
पाही चाखावया ||
तुरू तुरू चालत
आवडे दुधभात
भोवताली पसारा
जमा करुनिया ||
ती चिमुकली परी
झाली राजकुमारी
सुकुमार, निघालो
आम्ही शोधावया ||||
* = आपोआप
वाचने
1055
वाचनखूण
प्रतिक्रिया
2
छान
मस्त !!१