Skip to main content

*......................एक नाजुक परी..............*

लेखक प्रेमवेडा यांनी गुरुवार, 22/11/2012 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
एक नाजुक परी आली आमुच्या घरी दिवे लागले दारी आप आंगे स्वतः || * दुडू दुडू रांगत फिरे अवघ्या घरात आनंद काळजात उठे पाहुनिया || चिमुकले दोन दात आले बोळक्या मुखात जे जे दिसते घरात पाही चाखावया || तुरू तुरू चालत आवडे दुधभात भोवताली पसारा जमा करुनिया || ती चिमुकली परी झाली राजकुमारी सुकुमार, निघालो आम्ही शोधावया |||| * = आपोआप
लेखनविषय:

वाचने 1059
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

आवडली कविता.