बघा उत्तर देता येते कां ?
लेखनप्रकार
काही मजेदार कोडी
आमचे मित्र प्रा. यनावाला यांच्या तर्कक्रीडा या कोड्यांना चांगला प्रतिसाद मिळत होता. पण माझ्यासारख्या तर्कशास्त्रात "ढ" असणार्या लोकांना त्यातले ओ की ठो काही कळत नसे. उदा. बारा नाण्यात एक नाणे निराळे आहे. कमी की जास्त वजन हेही ठाऊक नाही. फक्त तिनदा काट्याचा उपयोग करून निराळे नाणे ओळखा. आमची मजल ते हलके (किंवा जड) आहे हे माहीत असेल तर उत्तर काढण्यापर्यंतचीच. आणि नंतर त्यांनी उत्तर सांगितले तेही आमच्या डोक्यावरून गेले. ते जाऊ द्या. माझी कोडी सोपी आहेत. अगदी शाळकरी म्हणालात तरी चालेल. पण नम्र विनंती की तुमचे उत्तर द्याच. वर कोणाशी सहमत असाल तर +१ म्हणा, पण प्रतिसाद द्याच. कां ? तर सुरवातीचे प्रष्ण सोपे आहेत.
वीस लिटरच्या एका टाकीला खाली तोटी आहे. पूर्ण भरलेल्या टाकीतून तोटी उघडल्यावर एका मिनिटात २ लिटर पाणी कमी झाले. सर्व टाकी रिकामी होण्यास किती वेळ लागेल ?
शरद
वाचन
4208
प्रतिक्रिया
0