Skip to main content

बघा उत्तर देता येते कां ?

लेखक शरद यांनी सोमवार, 19/11/2012 10:12 या दिवशी प्रकाशित केले.
काही मजेदार कोडी आमचे मित्र प्रा. यनावाला यांच्या तर्कक्रीडा या कोड्यांना चांगला प्रतिसाद मिळत होता. पण माझ्यासारख्या तर्कशास्त्रात "ढ" असणार्‍या लोकांना त्यातले ओ की ठो काही कळत नसे. उदा. बारा नाण्यात एक नाणे निराळे आहे. कमी की जास्त वजन हेही ठाऊक नाही. फक्त तिनदा काट्याचा उपयोग करून निराळे नाणे ओळखा. आमची मजल ते हलके (किंवा जड) आहे हे माहीत असेल तर उत्तर काढण्यापर्यंतचीच. आणि नंतर त्यांनी उत्तर सांगितले तेही आमच्या डोक्यावरून गेले. ते जाऊ द्या. माझी कोडी सोपी आहेत. अगदी शाळकरी म्हणालात तरी चालेल. पण नम्र विनंती की तुमचे उत्तर द्याच. वर कोणाशी सहमत असाल तर +१ म्हणा, पण प्रतिसाद द्याच. कां ? तर सुरवातीचे प्रष्ण सोपे आहेत. वीस लिटरच्या एका टाकीला खाली तोटी आहे. पूर्ण भरलेल्या टाकीतून तोटी उघडल्यावर एका मिनिटात २ लिटर पाणी कमी झाले. सर्व टाकी रिकामी होण्यास किती वेळ लागेल ? शरद
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4242
प्रतिक्रिया 23

प्रतिक्रिया

दहा मिनिटात टाकी रिकामी होईल हे उत्त्तर आहे, पण हे उत्तर नसणार यात काही तरी कोडे असणार आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by ह भ प

सध्या दोनच उत्तरं आली आहेत तेव्हा ऑप्शन्स असे- १]नऊ २] दहा ३] वरीलपैकी नाही. -दिलीप बिरुटे

पूर्ण भरलेल्या टाकीतून तोटी उघडल्यावर एका मिनिटात २ लिटर पाणी कमी झाले टाकी जसजशी रिकामी होत जाईल त्या बरोबर २ लिटर पाणी कमी होण्यासाठी लागणारा वेळ वाढत जाईल का??

In reply to by विवेक मोडक

फ्लो रेट (लिटर / मिनीट) हा प्रेशर वर अवलंबून आहे. प्रेशर हे पाण्याच्या पातळीवर अवललंबून आहे. जसे पाणी बाहेर येइल, तसे प्रेशर कमी होइल. म्हणून फ्लो कमी होइल. म्हणून नऊ मिनिटे हे उत्तर बरोबर नाही.

वीस लिटरच्या एका टाकीला खाली तोटी आहे. त्या पूर्ण भरलेल्या टाकीतून तोटी उघडल्यावर एका मिनिटात २ लिटर पाणी कमी झाले. ती संपूर्ण टाकी रिकामी होण्यास किती वेळ लागेल ? .. हे असंच आहे नां नक्की ?

In reply to by आनन्दा

३ मधे करण्यासाठी निराळा नाणा हे इतरांपेक्षा जड आहे की हलका हे माहीत असायला हव.

In reply to by आनन्दा

मला माहीत असलेली पद्धत म्हणजे ६/६ ३/३ १/१ अशी नाणी वजन तागडी मधे टाकायची. पण त्यास निराळा नाणा जड आहे की हलका आहे हे माहीत असणे गरजेचे... तुमची पद्धत जरा उकलुन सांगता का

In reply to by सुखी

१. प्रथम ४/४ नाण्यांचे वजन करायचे - दोन्ही समान असेल, तर ज्याच्या वजनात फरक आहे ते तिसर्‍या गटात असेल, जर तसे असेल तर, दुसर्‍या गटातून २ नाणी काढून तिथे तिसर्‍या गटातली २ नाणी टाकून परत वजन करावे. म्हणजे दुसर्‍या वजनात आपल्याला २ नाण्यांचा एक गट मिळेल, ज्यात एक नाणे वेगळे आहे. पुढचे सोपे आहे. समजा दोन्ही समान नसेल, तर गटात न बसणारे नाणे यापैकी एकात आहे, तिसर्‍या गटातली ३ नाणी घेउन यापैकी एका गटात मिसळावी(पहिल्यासारखे) आणि परत ४/४ च्या प्रमाणे वजन करावे. यावेळेस तुम्हाला वेगळा असलेला ३ नाण्यांचा गट मिळेल आणि सोबत त्या नाण्याचे वजन जास्ती आहे की कमी आहे तेही कळेल. पुढचे सोपे आहे. अधिक टंकी शकत नाही. व्य.नि. किंवा दूरभाष करावा. :)

राव... नाणं जर निराळं असेल तर काटा वापरायची काय गरज, बघुन पण कळेलच ना !! राहीलं पाण्याच्या टाकीचं, तर त्यात सगळ्या गोष्टी (प्रेशर वगेरे) आयडिअल धरल्या तर पूर्ण भरलेली टाकी पूर्ण रिकामी होण्यास १० मिनीटे लागतील.. --बाप्पा लंबोदर.

'सगळं' पाणी रिकामं व्हायला तत्वतः अनंत काळ लागेल. कारण दाब कमी होत असल्यामुळे दर मिनिटाला दोन लीटर नाही, तर दर मिनिटाला दहा टक्के पाणी कमी होतं. म्हणजे दर मिनिटाला आधीच्या पाण्याच्या ९० टक्के पाणी रहातं. अशी कितीही मिनिटं गेली तरी ०.९ गुणिले ०.९ गुणिले ०.९ गुणिले ०.९ गुणिले ०.९... करत शून्य कधीच येणार नाही. कुठच्यातरी क्षणाला आपण टाकी रिकामी झाली असं म्हणू ... कधीतरी पाण्याचा एकच रेणू शिल्लक रहाण्याची वेळ येईल... पण या सगळ्याबद्दल या प्रश्नात पुरेशी माहिती नाही.

एक शंकाय टाकिला खाली तोटी आहे न. ?? मग टाकी'तुन' कोण्ती वाली तोटी उघडली. ?? काय राव टाकीला नेमकी खाली की आत?? कुठे तोटी आहे ते स्पष्ट करा . :( :-/

ही मौजमजा असल्यामुळे शास्त्रीय उत्तर दिल्याने रसभंग होईल. त्याऐवजी एक उदाहरण देतो. एक युवक आणि एक युवती एका खोलीच्या समोर समोर असलेल्या दोन भिंतींजवळ उभे आहेत. त्या दोघांमध्ये १० फूट अंतर आहे. युवतीला भेटण्यासाठी आतुर झालेला युवक उड्या मारीत तिच्याकडे जातो. पण त्यांच्यामधील अंतराच्या अर्धेच अंतर तो एका उडीत लांघू शकतो. किती उड्या मारून तो तिला गाठेल? . . . याचे गणिताप्रमाणे उत्तर : कधीच नाही, कारण कोणत्याही उडीत तो अर्धेच अंतर पुढे जाऊ शकतो, उरलेले अर्धे अंतर शिल्लक राहते. पण ... . . . फॉर ऑल प्रॅक्टिकल परपजेस ... वेगळे उत्तर येईल

या कोड्याचे सविस्तर विश्लेषण करून त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न मी एका स्वतंत्र लेखामध्ये केला आहे. त्याचा दुवा : http://www.misalpav.com/node/23224