Skip to main content

महालक्ष्मी दर्शन

लेखक लीलाधर यांनी सोमवार, 22/10/2012 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सूरपूजितै! शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते!! यादेवी सर्वभूतेषू लक्ष्मीरूपेण संस्थिता! नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः !! मंडळी नवरात्रात माझ्या घरी अशी महालक्ष्मीची स्थापना करुन तिचे समोर घागरी फुंकल्या जातात. आता तुम्हाला प्रश्न पडेल की महाल्क्ष्मी बरोबर शंकर भगवान कशाला आहेत ? त्याचे उत्तर असे की, कोल्हापूरची महालक्ष्मी व तुळजापूरची भवानीमाता यांच्या शिरस्थानी शिवलिंग धारण करुन त्या विराजमान झाल्या आहेत... सो महालक्ष्मी ज्यावेळेस पूजतात त्यावेळेस शंकर भगवानांची देखील स्थापना करुन त्यांची पूजा केली जाते. a a a a a a a a
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 7051
प्रतिक्रिया 33

प्रतिक्रिया

समस्त मिपाकरांना सूचवू ईच्छितो की सदरहू महादेव हे थर्माकोलचे बनवलेले असून देवीचा मुखवटा हा उकडीचा बनवण्यात आला असून त्यावर कलाकूसर करण्यात आली आहे.

In reply to by लीलाधर

लीलाधरा, काय ती क्रियापदं रे, तु सुचवत नाहीस रे, सांगतो आहेस किंवा स्पष्ट करतो आहेस. स्थळ् किंवा बार वगैरे मदहोश करणा-या गोष्टी सुचवत असतात.

In reply to by ५० फक्त

काय राव ५०.. ऊकार आणि वेलांट्या दी ऽ ऽ ऽ र्घ लिवायचे सोडून आनि सुद्द लिवून लै भारी समजून राहिला का स्वतःला? :-D सुचवणूकीतली कलाकूसर आवडलेला - मोदक

In reply to by मोदक

मा. श्री. मोदक, आपणांस पुण्यात स्थायिक होउन उणापुरा एक महिना होत आहे, काही काळ जाउ द्या. मग बोलु आपण.

In reply to by ५० फक्त

मा.श्री मोदक यांचा "मोदक " असा उल्लेख केल्याने त्यांचे अस्स्ल नाव ( आता तुम्हीच ओळ्खा) विस्मुर्तीत जाऊ शकते हे ध्यानात घ्या ही विनंती.. मा.मा. स्नेही चिंचवडकर

मूर्ती खरेच छान बनवल्या आहेत. तरीही एक शंका शंकराच्या जागी विष्णू हवा किंवा महालक्ष्मीच्या जागी पार्वती.

In reply to by प्रचेतस

@शंकराच्या जागी विष्णू हवा किंवा महालक्ष्मीच्या जागी पार्वती.>>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/smiley.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

नावात काय आहे ? आपला मतलब समोर ठेवलेला गोडधोडाचा नैवेद्य खरंच न खाल्याशी मतलब.

In reply to by प्रचेतस

शंकरोबाला बसायला पाट दिलाय मग महालक्ष्मीला (पार्वतीला) उभं राहायची शिक्षा का ? स्त्रीजातीवरचा हा अन्याय बघूनही मिपावरच्या पाशवी शक्ती गप्प कशा ?

खरेच छान मूर्ती !! थर्माकोलचे बनवलेले आहे हे सांगितल्याशिवाय कळुन येत नाही.

In reply to by पैसा

महादेवाच्या लग्नात उभी असेल महालक्ष्मी करवली म्हणुन किंवा मुर्तीच्या पोझिशनवरुन तर कान पिळ्ण्याचा कार्यक्रम चालु आहे असं दिसतंय. असो.

महालक्ष्मी बरोबर महादेवच असतो. अधिक माहिती कृपया बुवा आपणास माहित असल्यास द्यावी माझी हरकत नाही. आणि कुठलाही कान पिळण्याचा कार्यक्रम चालू नाही याची कृपया जाणकारांनी नोंद घ्यावी.

लीलाधरा छान झाल्या आहेत मूर्ती. हे सगळं कोण केलं? मला तर महादेवाच्या मिशाची स्टाईल आवडली आहे. काय तो आकार. काय ती टोकं. ह्या लैच भारी.

मूर्ती छान बनवल्या आहेत्.क्षणभर भोलेनाथांच्या खांद्यावरील सापाकडे लक्ष गेलं नाही,(त्याला थोडासा काळा-राखाडी रंग द्यायला हवा होतास )गणपती आणि त्या खालची अक्षरे वाचुन पहिल्यांद मला ते भोलेनाथ नसुन मोरया गोसावी असावेत की काय असा विचार आला होता,अर्थात शंकाराचा ३रा डोळा दिसताच मात्र भोलेनाथांची खात्री पटली. महालक्ष्मी बरोबर महादेवच असतो. का ? तुला नाही माहित का ? घरच्या मोठ्या मंडळींना विचारुन पहा ना ! बाकी वरती मोरया गोसावींचा उल्लेख आला आहे,तर या मोरगावच्या श्रीमोरेश्वरा समोर चक्क नंदी आहे ! अष्टविनायकांतलं हे एकच मंदिर असं आहे,जिथे भव्य आकाराचा दगडी नंदी आहे. ;) प्रमाणाच्या बाहेर अवांतर :--- तू गुंडा पुरुष देव ही मालिका पाहतोस काय ? नाही महादेवाच्या मिशा लयं पिळदार काढल्या आहेस. ;)

काय भानगड काय लिलाधर? जरा उलगडुन सांगशील का असच आपल? काय हाय ते कळल, कश्यापासन बनलय ते बी कळल, पण कश्यासाठन हाय त्ये न्हाय कळल बाबा! सांग जरा उलगडुन बघु.

In reply to by स्पंदना

ताई खरेच मनापासून तुझे आभार ----^---- आणि अजून माहिती मिळवणे शक्य झाले नाही पण तरीही आपण केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद :)

>> महालक्ष्मी बरोबर महादेवच असतो.
वैभवभूषित वैकुंठेश्वर तिच्या पित्याने योजियला वर भोळा शंकर परी उमेच्या भरलासे लोचनी
हरी आणि हरात एक वेलांटीचा काय तो फरक. कन्फ्युजन व्हायचंच. ;)

लिलाधरा - फारच छान. हातात कला आहे तुझ्या.

In reply to by श्रीरंग_जोशी

कलेला दाद दिल्याबद्द्ल मनापासून आभार ----^---- पण ही कला घडवणारे हात मात्र दूसरेच आहेत माझा फक्त त्यात खारीचा वाटा आहे त्यामुळे त्याचे श्रेय मूळ मूर्तीकारालाच द्यायला हवे धन्यवाद :)

In reply to by लीलाधर

@माझा फक्त त्यात खारीचा वाटा आहे>>> अस्सं होय...! सांगा बरं काय आहे तो वाटा? ;-) नक्कि आपण केलय काय ते तरि कळू द्या. :-b

फोटो का दिसत नाहीत ?

फोटो दिसत नाहीयेत . बाकी कोल्हापूरची देवी महालक्ष्मी नाहीये . तिच्या मूर्तीत आणि लक्ष्मीच्या मूर्तीत कुठलंच साम्य नाही असा निर्वाळा दिलाय ना . ह्यावेळी दसर्याला कोल्हापूरच्या देवीला म्हणजेच आदिशक्ती पार्वतीला दिलेला शालू हा तिच्या मुलाकडून (विष्णूकडून )त्याच्या आईला देण्यात येत आहे असं तिरुपती देवस्थानने घोषित केलं होतं .