✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

उपवासाला कुठले पदार्थ चालतात?

प
प्रकाश घाटपांडे यांनी
Sat, 10/20/2012 - 11:14  ·  लेख
लेख
बटाटा, रताळे, केळे, वरई, साबुदाणा, शेंगदाणे हे माहित असलेले काही पदार्थ आहेत, मला एक प्रश्न पडतो कि उपवासाला अमुक एक पदार्थ चालतो किंवा चालत नाही हे ठरवण्याचे काय निकष आहेत. कुठल्या धर्मग्रंथात असे लिहिले आहे काय? तसेच कर्नाटकात चालणारा पदार्थ महाराष्ट्रात चालत नाही असे काही प्रांतिक भाग पण त्यात आहे म्हणे? मला शेंगदाण्याची गंमत वाटते कि शेंगदाणा चालतो पण शेंगदाण्याचे तेल चालत नाही. एखाद्याने ठरवले की मी उपवासाला हलका पदार्थ म्हणुन फक्त भातच खाईन पण ते चालत नाही.उपवास हा श्रद्धेचा भाग आहे हे मान्य. मला कधी कधी याविषयी देखील शंका येते कि उपवास करणारे खरेच श्रद्धेने करतात कि गतानुगतिकतेचा भाग म्हणुन करतात. म्हणजे असे कि घरात सगळे करतात म्हणुन मी करतो या पेक्षा वेगळा विचार नाही. घरात सगळे करत आलेले आहेत मग आपण ती परंपरा कशाला मोडा हा त्यामागे असलेला विचार. उपवास मोडल्याने पाप लागते असे ते मानीत नसावे पण मोडला तर मनाला बोचणी लागते. उपवासा विषयी इतरांची मते जाणुन घ्यायला आवडेल?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
241369 वाचन

💬 प्रतिसाद (70)

प्रतिक्रिया

ती काय तरी संताजी धनाजींची

नितिन थत्ते
Mon, 10/22/2012 - 19:50 नवीन
ती काय तरी संताजी धनाजींची गोस्ट आइकल्याली व्हती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

प्रकाशश्री, उपवास म्हणजे काहीही न खाणं!

संजय क्षीरसागर
Mon, 10/22/2012 - 13:36 नवीन
तुमचा प्रश्न : उपवासाला कुठले पदार्थ चालतात? असाये. ते म्हणजे `मला काहीही खायचं नाहीये तर मी काय खाऊ? असं विचारणं झालं. अध्यात्मिक मार्गात उपवासाचा उपयोग शारीरिक उर्जा स्वतःप्रत आणायला केला जातो. तुम्ही एक ठरवा : खायचं किंवा नाही खायचं. एकदा नाही खायचं म्हटल्यावर विषय संपला. खायचं असेल तर काय खावं याला अनंत उत्तरं आहेत आणि ती इथे दिसतायत पण त्यांचा उपवासाशी काहीएक संबंध नाही. (तशी ड्रेसकोडवर पण चर्चा आहे पण त्याचा हेतू चर्चा भरकटवणं आहे की आकलनाचा आवाका (की दोन्ही) हे लक्षात येत नाही.) तुम्ही नीट पाहिलत तर `खावं किंवा नाही' हा आपला निश्चय होत नाही म्हणून सगळे प्रश्न आहेत.
  • Log in or register to post comments

उपवास म्हणजे

संदीप जगदाळे
Mon, 10/22/2012 - 16:29 नवीन
उपवास म्हणजे पोटाला (पचनसंस्थेला) एक दिवस आराम !
  • Log in or register to post comments

सहमत

मूकवाचक
Mon, 10/22/2012 - 19:10 नवीन
थोडी भर - उपवासाची व्याख्या काहीही असो, तो करण्याआधी काही डाचत असेल तर उलटी करून मोकळे होते आवश्यक!सगळी मळमळ बाहेर पडली की मग पचनसंस्थेला आराम देणे सोपे जाते :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप जगदाळे

भाव तिथे देव. देव कै म्हणत

प्रियाकूल
Mon, 10/22/2012 - 17:27 नवीन
भाव तिथे देव. देव कै म्हणत नाही कि माझ्यासाठी तू उपवास कर तरच मी तुला प्रसन्न होईन.जे मिळेल , जे पचेल ते खावं. आमच्याकडे तर मीठ,जिरे आणि कोथिंबीर पण चालत नाही.(मी चालवते) मिठाऐवजी शेंदेलोण वापरते. मिठापेक्षा चांगलं असतं अस ऐकलय. बी पी, शुगर वाल्यांसाठी शेंदेलोण वापरावं म्हणतात. बाकी साबुदाणा कसा बनवतात ते गूगल वर सर्च करून पहिले तेव्हा हि लिंक मिळाली. http://www.youtube.com/watch?v=hM0G6b0I7TI पण कसा होता न कि उपवासादिवाशीच पाणी पुरी चा गाडा दिसतो आणि फार च कंट्रोल करावा लागतो. ;)
  • Log in or register to post comments

पाणीपुरीचा गाडा पाहून कंट्रोल

बॅटमॅन
Mon, 10/22/2012 - 17:35 नवीन
पाणीपुरीचा गाडा पाहून कंट्रोल करणे लै सोपे आहे जर "ती" बातमी पाहिली असेल तर ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाकूल

:)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 10/22/2012 - 17:46 नवीन
ती बातमी येऊन काही दिवस थोडं असं तसं झालं असेल पण भय्यांचा पाणीपुरीचा धंदा बसला किंवा कमी झाला असे वाटत नाही. सालं बोटं बुडवुन कुछ तिखा कुछ मिठा पाणीपुरी खावी ती त्यांचीच. कितीही मळकट भय्या असु दे, सालं हे वेड अनेकांचं कमी झालं असेल असं वाटत नाही. प्रियाकूल साबुदाना कसा बनवतात त्याचा व्हिडियो डकवल्याबद्दल धन्स. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

कितीही मळकट भय्या असु दे,

बॅटमॅन
Mon, 10/22/2012 - 18:01 नवीन
कितीही मळकट भय्या असु दे, सालं हे वेड अनेकांचं कमी झालं असेल असं वाटत नाही.
पुलंच्या पानवाला मधले हे वाक्य आठवले ;) "आता त्याचा तो पाने पुसायचा फडका-त्यात पान स्वच्छ होते की घाण होते हा वादाचा मुद्दा आहे, पण त्याच्या कळकटपणाच्या चढत्या श्रेणीला चौपाटीवरच्या भेळेची चव असते असे जाणकार सांगतात."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

व्वा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 10/22/2012 - 18:09 नवीन
"आता त्याचा तो पाने पुसायचा फडका-त्यात पान स्वच्छ होते की घाण होते हा वादाचा मुद्दा आहे, पण त्याच्या कळकटपणाच्या चढत्या श्रेणीला चौपाटीवरच्या भेळेची चव असते असे जाणकार सांगतात." स्सहीच निरिक्षण आहे. सर्व कळकट-मळकट भय्यांचे (यात कुठेही द्वेष नाही, प्रेमच आहे) त्यांच्या प्लेटांचे, फडक्यांचे, तिखा-मिठा डब्याचे, पाणीपुरीचे, स्वतंत्र धाग्यात फोटो फोटो डकवावे, असा माझा मनात खयाल आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

नक्की डकवा. शिवाय भारतव्यापी

बॅटमॅन
Mon, 10/22/2012 - 18:12 नवीन
नक्की डकवा. शिवाय भारतव्यापी पोल घ्यायला हर्कत नसावी- कुठल्या गावची पाणीपुरी जगातभारी? माझे मत कोलकात्याला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

इंदूर.

मोदक
Tue, 10/23/2012 - 01:43 नवीन
इंदूर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

स्सही हं.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 10/22/2012 - 17:43 नवीन
उपवासादिवाशीच पाणी पुरी चा गाडा दिसतो आणि फार च कंट्रोल करावा लागतो. हाहाहा. स्सही हं. मलाही उपवासाच्या दिवशी पाणीपुरी खावी वाटेल, कुठेतरी चिकनची तंगडी तळलेली लटकावलेली दिसते. औरंगाबादेत 'सागर' हॉटेलच्या पुढे काही दुकाना आहेत, तेथुन समोरुन जातांना असं सगळं तळणं येता जाता दिसत असतं. सगळं असं मांसाहारी प्रकार पाहावा लागतो. मसाल्याचा वास तरी भारी येईल. कुठे इम्रती वाला मुद्दामहुन आपला उपवास असतो म्हणुन की काय असे भारी वेढे अशा ष्टाइलनं टाकतो की उपवास काय रुटीन आयुष्य थोडं थबकतं. खरं म्हणजे अशा सर्व विचारांनी आपल्या मनाचा ताबा घेतला की तिथेच उपवास मोडतो, नै का ! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाकूल

अहो तै, थांबा थांबा!

रेवती
Mon, 10/22/2012 - 18:21 नवीन
अहो तै, थांबा थांबा! ती बातमी वाचली/ पाहिली नाहीत काय? ;) त्यानंतर तो पदार्थ खाणे सोडून दिले होते. उलट पापु दिसली तरी मळमळायला लागायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाकूल

ती बातमी वाचली/ पाहिली नाहीत

किसन शिंदे
Tue, 10/23/2012 - 02:00 नवीन
ती बातमी वाचली/ पाहिली नाहीत काय?
आता तो भय्या हाराचा धंदा करतो म्हणे. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

मूलत:

आनन्दा
Tue, 10/23/2012 - 13:56 नवीन
मूलतः उपासाला कंदमुळे आणि फळे चालत्यात... तेव्हा त्या नियमात बसणारे काहीही चालते. मग ते देशी असो की विदेशी! जसे की पंतप्रधान भारताचा नागरीक असावा.. मन :प
  • Log in or register to post comments

उपवासाला काय चालते?

माम्लेदारचा पन्खा
Wed, 10/24/2012 - 15:24 नवीन
बाकी काही चालो न चालो ,आपल्या देशाकडे पाहून एक गोष्ट नक्की कळली आहे....पैसे खायला कोणताही उपवास आडवा येत नाही !
  • Log in or register to post comments

या निमित्तानी चे.पु.वर आलेली

अत्रुप्त आत्मा
Sun, 10/28/2012 - 23:21 नवीन
या निमित्तानी चे.पु.वर आलेली १ पोस्ट मुद्दाम इथे उचल-टाक करतो... आंम्ही ज्या साबुदाण्याला(आणी उपासाच्या इतर सार्‍याच पदार्थांना) ८ वर्षापूर्वीच बाय/बाय केले आहे...त्याच्या निर्मितिप्रक्रीये बद्दलची माहिती आहे ही... अवश्य वाचा... Image removed.
क्या आप जानते हैं साबूदाने की असलियत को ??
आमतौर पर साबूदाना शाकाहार कहा जाता है और व्रत, उपवास में इसका काफी प्रयोग होता है। लेकिन शाकाहार होने के बावजूद भी साबूदाना पवित्र नहीं है। क्या आप इस सच्चाई को जानते ह ैं ? साबूदाना किसी पेड़ पर नहीं ऊगता । यह कासावा या टैपियोका नामक कन्द से बनाया जाता है । , कासावा वैसे तो दक्षिण अमेरिकी पौधा है लेकिन अब भारत में यह तमिलनाडु,केरल, आन्ध्रप्रदेश और कर्नाटक में भी उगाया जाता है । केरल में इस पौधे को “कप्पा” कहा जाता है । इसकी जड को काट कर इसे बनाया जाता है जो शकरकंदी की तरह होती है इस कन्द में भरपूर स्टार्च होता है । यह सच है कि साबूदाना (Tapioca) कसावा के गूदे से बनाया जाता है परंतु इसकी निर्माण विधि इतनी अपवित्र है कि इसे शाकाहार एवं स्वास्थ्यप्रद नहीं कहा जा सकता। साबूदाना बनाने के लिए सबसे पहले कसावा को खुले मैदान में बनी बडी बडी कुण्डियों में डाला जाता है तथा पानी डाल कर रखा जाता है और रसायनों की सहायता से उन्हें लम्बे समय तक गलाया, सड़ाया जाता है। इस प्रकार सड़ने से तैयार हुआ गूदा महीनों तक खुले आसमान के नीचे पड़ा रहता है। रात में कुण्डियों को गर्मी देने के लिए उनके आस-पास बड़े-बड़े बल्ब जलाये जाते हैं। इससे बल्ब के आस-पास उड़ने वाले कई छोटे मोटे जहरीले जीव भी इन कुण्डियों में गिर कर मर जाते हैं। दूसरी ओर इस गूदे में पानी डाला जाता है जिससे उसमें सफेद रंग के करोड़ों लम्बे कृमि पैदा हो जाते हैं। इसके बाद इस गूदे को मजदूरों के पैरों तले रौंदा जाता है या आज कल कई जगह मशीनों से भी मसला जाता है इस प्रक्रिया में गूदे में गिरे हुए कीट पतंग तथा सफेद कृमि भी उसी में समा जाते हैं। यह प्रक्रिया कई बार दोहरायी जाती है। और फिर उनमें से प्राप्त स्टार्च को धूप में सुखाया जाता है । जब यह पदार्थ लेईनुमा हो जाता है तो मशीनों की सहायता से इसे छन्नियों पर डालकर गोलियाँ बनाई जाती हैं ,ठीक उसी तरह जैसे की बून्दी छानी जाती है । इन गोलियों को फिर नारियल का तेल लगी कढ़ाही में भूना जाता है और अंत में गर्म हवा से सुखाया जाता है । और मोती जैसे चमकीले दाने बनाकर साबूदाने का नाम रूप दिया जाता है बस साबूदाना तैयार । फिर इन्हे आकार ,चमक, सफेदी के आधार पर अलग अलग छाँट लिया जाता है और बाज़ार में पहुंचा दिया जाता है । परंतु इस चमक के पीछे कितनी अपवित्रता छिपी है वह सभी को दिखायी नहीं देती। तो चलिये उपवास के दिनों में ( उपवास करें न करें यह अलग बात हैं ) साबूदाने की स्वादिष्ट खिचड़ी ,या खीर या बर्फी खाते हुए साबूदाने की निर्माण प्रक्रिया को याद कीजिये ०==========०============०==========०============०==========०============०======
  • Log in or register to post comments

वाचणार नाही...

श्रीरंग_जोशी
Sun, 10/28/2012 - 23:38 नवीन
साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडे हे अत्यंत प्रिय असल्याने वरील माहिती वाचून क्लेश न केलेलाच बरा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

अरे अरे!

प्रकाश घाटपांडे
Mon, 10/29/2012 - 16:23 नवीन
गुर्जी समस्त उपवासकरांना हे समजले तर काय अनर्थ होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

???????????

ईन्टरफेल
Mon, 11/05/2012 - 20:53 नवीन
कै नै ओ ! सकाळि ११ वाजता मिळनारी पोळी भाजी ! रात्रि ९ वाजता मिळनारी चटनि भाकर ! उपवास गेला चुलीत !
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा