Skip to main content

दुरावलेलं..

लेखक गुड्डू यांनी शुक्रवार, 21/09/2012 16:38 या दिवशी प्रकाशित केले.
परतीचा प्रवास, वाटेत फक्त अंधार.. क्षितिजाची फक्त चाहूल, बाकी सर्व काळोख.. रातकिड्यांची किर्र किर्र, हलकेच वाऱ्याची शिळ.. पत्थरांची रेलचेल पायी, ठेच - खाच खळगेची साथ.. असं कसं घडलं, नक्की कुठे पाल शिंकली.. सर्व काही नीट चालू असता, कशी सर्व घडी विस्कटली.. आपण सूर्याला गाठलेलं, त्याला हसून हस्तांदोलन केलेलं.. जे न पाहिलं त्या रवीने, ते आपण दोघांनी सहज अनुभवलेलं.. तसं आठवतं घडलेलं सर्व काही, पण मन काही मानत नाही.. आठवणी येत राहतात , मनातून काही जात नाही.. आठवतो तो क्षण जिथे माझा पाय घसरला होता.. आठवतो तो क्षण जिथे काळही थबकला होता.. मीच घोडचूक केली, मीच नाही आवरू शकलो.. वासनेच्या हिंदोळ्याला, लगाम नाही घालू शकलो.. जाण्याची वाट फार सुखद होती रे, कारण तिथे तुझी उबदार सोबत होती रे.. परतीचा प्रवास आता एकट्यानेच करायचाय, तुझ्या आठवणींच्या सोबतीने .. जे झालं ते पुसता येणार नाही, या जाणीवेच्या सोबतीने.. जमलं तर माफ कर मला, आणि अलगदपणे विसरून जा.. हरवून टाक ते धागे दोरे, नव्या आयुष्याला सामोरा जा.. माझ्यासाठी तू नेहमीच जवळचा राहशील, तू म्हणजे माझ्या जागेपणी पडलेलं एक दिव्य स्वप्न.. जरी सध्या तू दुरावलेला, तरी तू या आयुष्यातला एकमेव जिवलग मित्र..
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1765
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

हरवून टाक ते धागे दोरे, नव्या आयुष्याला सामोरा जा.. इथे तुम्हाला सामोरी टाकायचं होतं का? नाहीतर मग इथे चुकल्यासारखं वाटतंय. मीच घोडचूक केली, मीच नाही आवरू शकलो.. वासनेच्या हिंदोळ्याला, लगाम नाही घालू शकलो..

>>>>नक्की कुठे पाल शिंकली.. पूर्वी माशी शिंकायची. हल्ली पालही शिंकायला लागली का? >>>>आठवतो तो क्षण जिथे माझा पाय घसरला होता.. आठवतो तो क्षण जिथे काळही थबकला होता.. मीच घोडचूक केली, मीच नाही आवरू शकलो.. वासनेच्या हिंदोळ्याला, लगाम नाही घालू शकलो.. माझ्यासाठी तू नेहमीच जवळचा राहशील,..... ..... तरी तू या आयुष्यातला एकमेव जिवलग मित्र.. ह्या ओळींमधून कांही तरी भलतेच मनांत रुजविले जात आहे.

आठवतो तो क्षण जिथे माझा पाय घसरला होता.. आठवतो तो क्षण जिथे काळही थबकला होता.. मीच घोडचूक केली, मीच नाही आवरू शकलो.. वासनेच्या हिंदोळ्याला, लगाम नाही घालू शकलो..>>> अहो ठीक आहे... पण मग लग्न करायच ना सरळ,,,कय पण राव तुम्ही??? ;-)

"वासनेच्या हिंदोळ्याला, लगाम नाही घालू शकलो..>>> अहो ठीक आहे... पण मग लग्न करायच ना सरळ,,,कय पण राव तुम्ही??? smiley" येडा झाला का? लग्न केल असत तर कविता कशी प्रसवेल? :) काय्य्पन उग्गिच..