✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

राज ठाकरेंनी अखेर बोनीकपूर च्या कार्यक्रमाचा विरोध थांबवला..!

क
कॉमन मॅन यांनी
गुरुवार, 09/06/2012 - 18:19  ·  लेख
लेख
अलीकडेच सहारा वन की कुठल्याश्या वाहिनीवर दाखवण्यात येणाऱ्या सूरक्षेत्र या कार्यक्रमाबाबत मनसेने जोरदार विरोध दर्शवला होता तसेच ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांनाही चार खडे बोल वगैरे सुनावले होते.. भारताविरुद्ध रोज उठून काहीना काही दहशतवादी कारवाया करणाऱ्या, प्रशिक्षित दहशतवाद्यांना भारतात पाठवणाऱ्या पाकिस्तानातील कलाकारांना इथे बोलावून त्यांच्याकरता रेड कारपेट घालण्याची काय गरज आहे? असे मुद्दे घेऊन मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता.. जाहीर भाषण करून आशाताईंनाही फटकारले होते, त्याचप्रमाणे विविध वाहिन्यांवरील चर्चात्मक कार्यक्रमात मनसेच्या पित्त्यांनी सदर कार्यक्रमाला तीव्र विरोध दर्शवला होता आम्हाला तेव्हा राजसाहेबांची भूमिका मनापासून पटली होती. कारण खरोखरच जो देश आपल्याशी केवळ शत्रुत्वाच्या नात्याने वागतो त्या देशाशी आपण सांस्कृतिक किंवा अन्य कोणतीही जवळीक केली तरी त्या पाकिस्तानचे शेपूट नेहमी वाकडे राहणार आणि भारतात अतिरेकी कारवाया करून निरपराध भारतीयांना ठार मारण्याचा त्यांचा उद्योग सुरूच राहणार.. तेव्हा अशा देशाच्या कलाकारांना इथे निश्चितच बोलावता कामा नये.. 'आपल्या देशात काय कमी मुलं आहेत जी चांगली गातात? त्यांना संधी द्या की..' - राज ठाकरेंच्या यादेखील भूमिकेचे आम्हाला खूप कौतुक वाटले होते.. परंतु पैसा हा देशापेक्षाही, देशाभिमानापेक्षाही मोठा असतो हेच शेवटी आज राज ठाकरेंनी दाखवून दिले.. आज बातमी आली की त्या कार्यक्रमाचे निर्माते बोनी कपूर राज ठाकरेंना भेटले आणि चक्क समझौता झाला म्हणे..! आशाताईंसारख्या महान कलावंताला या कार्यक्रमात भाग न घेण्यासाठी जाहीरपणे चार खडे बोल सुनावणाऱ्या राज ठाकरेंनी त्या बोनी कपूरसमोरशी समझौता कसा केला ?? [संपादितः मूळ धाग्यातील भाषा आक्षेपार्ह असल्यामुळे धागा शीर्षकासकट संपादित करण्यात आला आहे. धाग्यातील बातमी आणि त्यावरील टीका टिप्पणी याबद्दल सदस्यांनी काय ती चर्चा करावी ही विनंती. वैयक्तिक शेरे असलेले प्रतिसाद संपादित करण्यात आले आहेत आणि येतील. धन्यवाद!]
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10541 वाचन

💬 प्रतिसाद (60)

प्रतिक्रिया

इथे कोणी धोतर वापरणारे असतील

सुहास..
Fri, 09/07/2012 - 16:10 नवीन
इथे कोणी धोतर वापरणारे असतील असे वाटत नाही. तसेच धोतर हे वस्त्रप्रावरण केवळ समाजाचा एकच घटक ( पर्यायाने पुरुष ) वापरतो. सबब " धोतर" हे सामान्यनाम वापरून सदस्यांत डिस्क्रिमिनेशन कशासाठी? उगाचच पाशवीशक्ती दाक्षीण्य दाखवू नये >>> अनमोल धोतराबद्दल ...आपल हे.....सल्ल्याबद्दल धन्यवाद ओ केप्लर बी चे काका !! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

मुळात एक नक्कि राज ठाकरेंच राजकीय गणित जबरदस्त आहे.

निश
Fri, 09/07/2012 - 15:23 नवीन
मुळात एक नक्कि राज ठाकरेंच राजकीय गणित जबरदस्त आहे. समझौता करत असताना त्यानी तमाम हिंदी वाहिन्याना दिलेला ईशाराच आहे की जर सध्याच्या राजकीय वातावणात हिंदी वाहिन्याना प्रक्षेपण करायच असेल तर राज ठाकरेंच मत विचारात घ्यावच लागेल. ईशारा देण्याच काम झाल मग त्यानी समझौता केला. एक जबरदस्त राजकीय खेळि. योग्य वेळी व योग्य त्या दिशेने केलेली.
  • Log in or register to post comments

छान

ग्रेटथिन्कर
Fri, 09/07/2012 - 21:53 नवीन
छान
  • Log in or register to post comments

डोकेदुखीचा विषय

भरत कुलकर्णी
Sat, 09/08/2012 - 07:33 नवीन
डोकेदुखीचा विषय
  • Log in or register to post comments

शेवटी राज ठाकरे एक राजकारणी

सनविवि
Sat, 09/08/2012 - 15:51 नवीन
शेवटी राज ठाकरे एक राजकारणी आहेत आणि कुठल्याही राजकारण्याप्रमाणे त्यांना मतं मिळवण्यात जास्त आणि प्रश्न सोडवण्यात कमी रुची आहे हे लक्षात घेतले म्हणजे असे प्रश्न पडत नाहीत.
  • Log in or register to post comments

जोवर राज निर्दोष आहेत असे सिद्ध होत नाहीं तोवर ते दोषी आहेत?

सुधीर काळे
Sat, 09/08/2012 - 16:30 नवीन
थोडक्यात जोवर राज ठाकरे निर्दोष आहेत असे सिद्ध होत नाहीं तोवर ते दोषी आहेत असे मानवे अशी घटनादुरुस्ती आणायला हवी! जय हो!
  • Log in or register to post comments

हे तर सर्वच हिंदूत्ववाद्यांना

नाना चेंगट
Sat, 09/08/2012 - 17:44 नवीन
हे तर सर्वच हिंदूत्ववाद्यांना लागु करावे. आणि सर्वधर्मसमभाववाले दोषी असले तरी निर्दोषच मानले जावे अशी अजून एक दुरुस्ती सुचवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे

ह्या विषयावर वर्तमानपत्रां

मराठी_माणूस
Sun, 09/09/2012 - 17:13 नवीन
ह्या विषयावर वर्तमानपत्रां मध्ये बरेच छापुन आले तसेच टीव्ही वर पण खुप चर्चा घडुन आली. पण ह्या गदरोळात एका महत्वाच्या बातमीकडे दुर्लक्ष झाले. ती म्हणजे टाटांनी धुडकावलेली पाक सरकारची सुमो ची ऑर्डर. "जो देश आमच्याविरुध्द अतिरेकि कारवाया करतो त्यांच्या बरोबर कोणताही धंदा करण्यात स्वारस्य नसल्याचे" त्यांनी सांगितले. अशी धमक आजता गायत (नुसत्या शाब्दीक वल्गना नव्हेत) अन्य कोणी दाखवलेली नाहे. राज ठाकरेनि ह्या बातमिचा त्यांच्या चर्चेत उल्लेख केला असता तर त्यांच्या मुद्द्याला वजन मिळाले असते आणि अप्रत्यक्ष पणे टाटांचा गौरव ही झाला असता.
  • Log in or register to post comments

सदर बातमीचा उल्लेख नितीन

श्रीरंग
Sun, 09/09/2012 - 22:28 नवीन
सदर बातमीचा उल्लेख नितीन सरदेसाई यांनी "आजचा सवाल" मध्ये केल्याचे ऐकले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

राजसाहेब "विकले गेलेले" दिसत नाहींत! (आजच मिळालेली नवी माहिती)

सुधीर काळे
Mon, 09/10/2012 - 14:45 नवीन
राज ठाकरे यांचे एक खास सहकारी माझे चांगले जवळचे मित्र आहेत त्यांच्याकडे मी याबद्दल आज चौकशी केली असता मला कळले कीं बोनी कपूर यांनी आपण पुन्हा असे पाकिस्तानी कलाकार घेऊन कार्यक्रम करणार नाहीं अशी हमी दिली आणि हा एकुलता एक कार्यक्रम त्यांना करू द्यावा अशी राजसाहेबांना विनंती केली. यानंतरच राज ठाकरे यांनी हा एक कार्यक्रम होऊ द्यायचा निर्णय घेतला. शिवाय ८ सप्टेंबर हा आशाताईंचा वाढदिवसही होता. याचा या निर्णयावर कांहीं परिणाम झाला असावा काय याबद्दल मी विचारले पण माझ्या मित्रांना याबद्दल कांहीं कल्पना नव्हती. पण मला वैयक्तिकपणे असे वाटते कीं याचाही विचार बहुदा झाला असावा. असो. थोडक्यात राजसाहेब "विकले गेलेले" दिसत नाहींत!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा