व्हतास सारथी म्हणोनी....
व्हतास सारथी म्हणोनी , माझ्या दारीया फुलेली ,येलं जाई-जुई भारी,
तुळशीला अंगणात कशी आलीया उभारी,
रंग रांगोळीचा ठसा दिसं उठूनं पुढल्यादार,,
पिक जोमानं वाढलं , कस नाचतं शिवार,,,
देवा जाई-जुई वानी , येल बहरुदे संसार,
तुळशीच्या सत्वापरी , मी लाभूदे या घरी,
रंग रंगात दिसूदे रं , मज पती श्रीहरि
नशीबाच्या शिवारात , दे रं पुण्याईच्या सरी
मज ठाऊक नाही देवा, तुझी भक्ती तूच करशी
आम्ही लेकरं तुझी रं , किती पोटं तूच भरशी..
मी लावते दिवा जरी , सुर्य तेजाच तुझ रुपं
संसाराला हात तुझा , निर्गुण ब्रम्ह तु स्वरुप ,
मज आसक्ती नको रं, खेळ सारा हा कर्तव्याचा
ओंजळीत दे रं वसा , तुझ्या निष्काम कर्माचा
शेवटला तू ये रं देवा , माझी पालखी न्ह्यायाला,
पाठी सारुन द्वैत सार , कुशीत घे रं निजायला
म्या माझीच न उरले. गेले तुझ्यात विरुनी.....
केला प्रवास म्या इथवर , व्हतास सारथी म्हणोनी..
व्हतास सारथी म्हणोनी........
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2819
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्हतास सारथी
फारच सुंदर कविता. नशीबाच्या
In reply to व्हतास सारथी by ज्ञानराम
आवडले....
आवडले
नशीबाच्या शिवारात , दे रं
---^---- आभार.