Skip to main content

व्हतास सारथी म्हणोनी

लेखक ज्ञानराम यांनी रविवार, 02/09/2012 या दिवशी प्रकाशित केले.
व्हतास सारथी म्हणोनी.... व्हतास सारथी म्हणोनी , माझ्या दारीया फुलेली ,येलं जाई-जुई भारी, तुळशीला अंगणात कशी आलीया उभारी, रंग रांगोळीचा ठसा दिसं उठूनं पुढल्यादार,, पिक जोमानं वाढलं , कस नाचतं शिवार,,, देवा जाई-जुई वानी , येल बहरुदे संसार, तुळशीच्या सत्वापरी , मी लाभूदे या घरी, रंग रंगात दिसूदे रं , मज पती श्रीहरि नशीबाच्या शिवारात , दे रं पुण्याईच्या सरी मज ठाऊक नाही देवा, तुझी भक्ती तूच करशी आम्ही लेकरं तुझी रं , किती पोटं तूच भरशी.. मी लावते दिवा जरी , सुर्य तेजाच तुझ रुपं संसाराला हात तुझा , निर्गुण ब्रम्ह तु स्वरुप , मज आसक्ती नको रं, खेळ सारा हा कर्तव्याचा ओंजळीत दे रं वसा , तुझ्या निष्काम कर्माचा शेवटला तू ये रं देवा , माझी पालखी न्ह्यायाला, पाठी सारुन द्वैत सार , कुशीत घे रं निजायला म्या माझीच न उरले. गेले तुझ्यात विरुनी..... केला प्रवास म्या इथवर , व्हतास सारथी म्हणोनी.. व्हतास सारथी म्हणोनी........
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 2819
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

व्हतास सारथी म्हणोनी.... व्हतास सारथी म्हणोनी , माझ्या दारीया फुलेली ,येलं जाई-जुई भारी, तुळशीला अंगणात कशी आलीया उभारी, रंग रांगोळीचा ठसा दिसं उठूनं पुढल्यादारी,, पिक जोमानं वाढलं , कस नाचतं शिवारी देवा जाई-जुई वानी , येल बहरुदे संसार, तुळशीच्या सत्वापरी , मी लाभूदे या घरी, रंग रंगात दिसूदे रं , मज पती श्रीहरि नशीबाच्या शिवारात , दे रं पुण्याईच्या सरी मज ठाऊक नाही देवा, तुझी भक्ती तूच करशी आम्ही लेकरं तुझी रं , किती पोटं तूच भरशी.. मी लावते दिवा जरी , सुर्य तेजाच तुझ रुपं संसाराला हात तुझा , निर्गुण ब्रम्ह तु स्वरुप , मज आसक्ती नको रं, खेळ सारा हा कर्तव्याचा ओंजळीत दे रं वसा , तुझ्या निष्काम कर्माचा शेवटला तू ये रं देवा , माझी पालखी न्ह्यायाला, पाठी सारुन द्वेत सार , कुशीत घेरं निजायला म्या माझीच न उरले. गेले तुझ्यात विरुनी..... केला प्रवास म्या इथवर , व्हतास सारथी म्हणोनी.. व्हतास सारथी म्हणोनी........

नक्की समजले नाही; पण आवडले.

छान! फक्त कविता कलादालनात गेली आहे. प्रशांत, नीलकांत कोणीतरी इथून काव्य विभागात हलवा जरा!

नशीबाच्या शिवारात , दे रं पुण्याईच्या सरी
एकदम क्लास वन... ते संपुर्ण कडवेच खुप छान .. आशावादी ... लिहित रहा ... वाचत आहे ...

धन्यवाद , ( शुची ताई , मन , ज्योती ताई , गणेशा ! ) :)